Tanish Acharekar

Comedy Drama Romance

4.5  

Tanish Acharekar

Comedy Drama Romance

प्रेम 134

प्रेम 134

5 mins
298


तो.. ती..आणि...( लघुकथा)


"अगं क्षमा चल ना लवकर .. send off चा दिवस आज शेवटचा.. तरीही उशीरच केलास तू" कबीर म्हणाला!े

कबीर आणि क्षमा बालपणापासुनचे जिवलग सवंगडी! हसत ,खेळत वेळ कशी निघुन गेली नाही कळालं ! आज त्यांचा 12 वी चा निरोप समारंभ.. ! नेहमीप्रमाणे दोघ सोबतच निघाले.

"कबीर, अरे किती घाई करतोस तू ! अजून वेळ आहे की बराचं..! आणि हे हातात काय तुझ्या? बोर्डाचा पेपर नाही आज कॉपी करायला cheats घेतल्यात वाटतं". क्षमा हसतच म्हणाली..


मूर्ख आहेस तू क्षमा, किती गं बोलतेस ! आज तुला माझं फार महत्त्वाचं काम करायचं आहे, करशील ना?


नाही करणारं ! हा हा.. अरे विचारतोस काय वेड्या? तुला नाही म्हणालेय का कधी..


बरं माझी आई ऐक as you know मला जानवी विषयी attraction आहे पण बहुदा ते प्रेम असावं..! I only think about her..आज शेवटची संधी.. काहीही असो सांगून टाकतोच ! राहावत नाहीये यार.. सुंदर, intelligent आणि perfect for me होना?


क्षमा आश्चर्याने त्याच्याकडे पाहातच राहिली. काहीही न बोलता ती अलगद हसली..


काय क्षमा तू जळत तर नाहीयेस ना? कबीर तुझ्यापासून लांब जाईल म्हणून ..हा हा हा


गप रे मी का जळावं ! तू आणि तुझी जानवी काहीही गोंधळ घाला!


ए बाई आधी काम कर. माझं हे प्रेमपत्र तिला दे, मला नाही जमनारं .. बाकीच घेईल मी बघून.. त्या अहंकारी मुलीला भाव देणं मला आवड़त नाही पण तू म्हणतोयेस म्हणून देते", क्षमा नाराजीने म्हणाली..


"अगं क्षमू, अहंकारी नाही ग ती.. हा ती कॉलेजची topper शिवाय अतिसुंदर आहे..तिचा आवाज तर fantastic! काय गाते ती. मग एवढं सर्वगुणसंपन्न असल्यावर जरा attitude असला तर चालतय की..I just love her...!" कबीर अभिमानाने म्हणाला!


होय बाबा प्रेम आंधळ असतं हेच खरं.. चल आलय college आपलं भेटुया..


हा.. काम कर माझं तेवढ आणि give me a good news only..कबीर निघुनही गेला.


क्षमा शेवटच्या बाकावर जाऊन बसली. नेहमी सगळ्यांशी बोलत सुटणारी क्षमा आता शांत झाली. ती कबीरने जानवी साठी दिलेलं पत्र उघडून पाहू लागली..


प्रिय जानवी,


खरंतर, मनात मी तुला नेहमी जानु म्हणतो कारण सांगु !


आपकी अदाओं ने कुछ ऐसा खेल खेला हैं

इस दिल ने सिर्फ आपको ही जान बोला हैं!

तुझ्यासाठी हा शायरी चा प्रयत्न खरंतर

खुप दिवसापासुन तुला सांगायचय I truly love you ! याशिवाय अधिक काय सांगू? बाकी निर्णय तुझा...

फक्त तुझाच कबीर..!


हा कबीर पण ना शुद्धलेखनाच्या किती चुका करतो.. हे अक्षर बघून ती कशी हो म्हणेल..ो

क्षमाने ते पत्र तिच्या हस्ताक्षरात पुन्हा लिहून काढलं.

कार्यक्रम सुरु व्हायला जरा वेळ होता क्षमा पत्र देण्यासाठी जानवीला शोधू लागली!ग

भरगच्च मुलींच्या घोळक्यात तिची नजर जानवी कडे गेली. कुणाशीतरी बोलत होती ती

खरंच कबीर म्हणतो त्याप्रमाणे किती सुंदर होती ती आज काळ्या रंगाच्या साडीत तर अधिक खुलून दिसू लागली.. चंद्रालाही नजर लागावी इतकी शुभ्र..अभ्यासातही स्मार्ट. ती गायची तेव्हा सारे मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे, संगीताची आवड नसणारा कबीर सुद्धा! खरंच ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो तिच्या सर्वच गोष्टी छान वाटू लागतात..! कधीनव्हे तो आज क्षमाला तिचा हेवा वाटू लागला. लहानपणा पासूनच्या सहवासामुळे तिचं कबीरवर निरपेक्ष प्रेम होतं पण हे जानवी नावाचं प्रकरण कळल्यापासून तिला तिच प्रेम मैत्रीच्या पलिकडे आहे याची जाणीव झाली! क्षमा तशी रेखीव होती जरा सावळी पण सुरेख.. अभ्यासात मात्र जानवीनंतर तिचाच नंबर.. क्षमाला साहित्य वाचनाची फार आवड कधीतरी कविता लिहित असे पण तिला तिच्या कलेच प्रदर्शन करायला आवडायचं नाही. म्हणून तिच्यातले काही गुण फक्त तिलाच माहित होते.


जरा वेळाने क्षमा पुढे झाली व मुलींच्या घोळक्यापाशी येऊन थांबली तिने नजरेनेच जानवीला बाजुला बोलावले.. काही न बोलता तिच्या हातात कबीरच प्रेमपत्र दिलं ती वाचू लागली.. वाचुन झाल्यावर ती जोरदार हसायला लागली.. ! आज अजून एका प्रेमपत्राची भर.. 25 th love letters completed. ! असं म्हणून जानवीने ते पत्र क्षमाला परत केलं आणि म्हणाली. कबीर हुशार आहे, करारी आणि उत्साही खेळाडू सुद्धा मला तो फक्त चांगला मित्र वाटतो त्यापलीकडे नाही" जानवी म्हणाली.


अगं पण जानवी, he loves you madly


हो ग सारेच म्हणतात असं पण मलाही त्याच्याविषयी तसं वाटायला हवं न! Being honest माझ्या आयुष्यात कुणी दुसरा आहे. एवढं बोलून जानवी तेथून निघाली.


    क्षमाला काही सुचेनास झालं ती पुन्हा बाकावर येऊन बसली काही वेळात कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांची भाषणं, शिक्षकांच्या शुभेच्छा असं करत कार्यक्रम संपला ! सारे एकमेकांना परिक्षेसाठी all the best करत घराकडे निघाले.. कबीर दूरूनच जानवीकडे मोठ्या आशेने बघतोय हे क्षमाला दिसत होते.


ती त्याच्यापाशी येऊन थांबली..

चला जाऊया का घरी आता संत कबीर?

अगं क्षमा तुझीच वाट पाहत होतो मी..

हम्म दिसतय्ं ते" क्षमा हसत म्हणाली

सांग ना काय म्हणाली जानवी, हो म्हणाली? कबीर निरागसपणे विचारु लागला.


सितारों से आगे जहाँ और भी हैं

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं .. क्षमा हळूच म्हणाली..


अगं काय हे मला कळेल असं बोल ना, कबीर वैतागला


अरे कबीर, जानवी म्हणाली तू फार गोड मुलगा आहेस तुला तिच्यापेक्षा छान कुणीतरी मिळेल!


अगं पण तू सांगायच न की त्याला तुचं हवी आहेस म्हणून!


सांगितल मी कबीर she don't feel same for you.


ठिक! कबीर शांततेत म्हणाला.


त्यानंतर बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.


कबीर मला सल्ले द्यायला आवडत नाही पण एक सांगते. प्रेम ही जगातील सर्वोच्च आणि अतिसूंदर भावना आहे! स्वत:ला प्रश्न विचार खरंच हे प्रेम होतं की क्षणिक आकर्षण! वाघाला ही हरीण आवडतं त्याविषयी आकर्षण वाटतं पण त्या आकर्षणाला आपण प्रेम म्हणत नसतो! प्रेमात कुणीच दुखावलं जात नाही love dosen't heart at all..


माझ्या मते one sided love can be devastating! त्यात कुणीच आनंदी होऊ शकतं नाही! कारण ज्या व्यक्तीवर इतकं प्रचंड प्रेम करतो तिला जर ते कधीच कळणारं नसेल तर ते शुन्य आहे रे! प्रेम हे दुतर्फा असावं!मग त्यासारखं सुंदर काही नाही! प्रेम हिसकावता ही येत नाही so त्या व्यक्तीला तिच्या आवडीनुसार जगू द्यावं!विचार करं आणि यांत गुंतू नकोस शेक्सपियर बाबाचं वाक्य लक्षात ठेव,always wrong person gives you right lesson for life ! So तुझ प्रेम व्यर्थ घालवू नकोस जि व्यक्ती deserve करते न तिला मात्र वाहुन दे!!


कबीर विस्मयाने क्षमा कडे पहायला लागला.


क्षमे किती mature झालीयेस गं तू..! वा किती छान समजावून सांगितलस I will think on it.. but u rocks


मूर्ख मुला मी आधीपासुन mature होते तुझ्या आज ध्यानात आलं.. क्षमा हसली.


हा आता मात्र लक्ष ठेवावं लागेल तुझ्यावर... कबीर मनसोक्त हसला..!


तेरा मुझसे से हैं पहले का नाता कोई यूँ ही नही दिल लुभाता कोई..


दोघांच बालपनीच anthem song गुणगुणत ते चालू लागले..नव्या जोमाने आनंदाने!


Rate this content
Log in

More marathi story from Tanish Acharekar

Similar marathi story from Comedy