फोटो
फोटो


सीमा जुना अल्बम घेऊन न्याहाळत होती आपल्या मुलाचे लहानपणीचे फोटो पाहत होती गौरव सीमा आणी दिनकराचा एकुलता एक मुलगा खूप लाडात वाढवलेला त्याचा जन्म झाला तेव्हा दोघांनाही आकाश ठेंगणे झाले होते दिनकरराव तर आपल्या मुलाला काही हि कमी पडू देत नसत असाच तो मोठा झाला तो म्हणजे त्याचा जीव सीमां तर त्याच्या आवडीचे नेहमी बनवायची असाच लाडवलेला कधी बिघडला हे त्याना कळेच नाही
त्याच्या मनासारखं नाही झालं कि तो आतंक तांडव करू लागला दिनकर सीमा ला आता मुलाची काळजी वाटू लागली असेच एके दिवशी त्याने दिनकर रावाकडे एक लाख रुपयाची मागणी केली एव्हडी मोठी रक्कम कशाला पाहिजे हा प्रश्न त्याला त्यांनी विचारला वर्ष उलटले शिक्षण संपून कुठे नोकरी करायची सोडून दिवस भर मित्रांसोबत फिरणं पार्टी रात्री घरी येणे हे चालू होत त्यात एव्हडी रक्कम नकार ऐकताच तो घरातून बाहेर पडला तो दोन दिवस घरी परतला नाही इथे दोघांचा जीव कासावीस होता फोन केला तर उचलत नव्हता तिसऱ्या दिवशी फोन आला तो सरळ हिस्सा मागण्यासाठी
दिनकरराव आणि सीमाच्या पायाखालची जमीन सरकली ज्या मुलां साठी त्यांनी जीवाचं रान केले त्याला कधीही काहीही कमी पडू दिले नाही तो आज आपला हिस्सा मागत होता दिनकरावानी एक हि पैसा न देण्याचे मनात ठरवले होते पण आईचा जीव पोर जीवाचं काही तरी करेल म्हूनन सीमाने त्याने समजावले एकुलतं एक लेकरू त्याच्याच तर सगळं आहे
आणि तो दिवस उजाडला गौरव हिस्सा घेण्यासाठी घरी परतला "बाळा हे सगळं तूचंच आहे ना मग हिस्सा आणि काय मागतो" सीमा उतरली "हो म्हूणन एक लाख दिले नाही बाबानी मला" "अरे ते पैसे कशासाठी पाहिजे हे जर तू सांगितले असतेस तर दिले असते त्यानी आता बघ एक वर्ष झालं तूच शिक्षण संपून कुठे नोकरी कर तू तुच्या पायावर उभा राहिला तर त्याना पण अभिमान वाटेल तु चा ""हे एवढे वैभव त्यानी आपला घाम गाळून उभं केलंय"" हो का ते तेच कर्तव्य होत एक बाप म्हूणन त्यात काय एवढे"" हे तू काय बोलतोस?" " बाबा कुठे आहे ?" अरे ते बाहेर गेले येतील तेवढ्यात तू फ्रेश हो जेवण कर मग रात्री निवांत बोलू ह्या विषयावर"" रात्री मी इथे राहायला आलेलो नाही माझे सामान आणि हिस्सा घेऊन मी निघणार आहे"" कुठे जाणार आहे तू"?" मी फ्लॅट भाड्याने घेतला आहे अरे पण स्वतःचा घर असताना तू असा वेगळा का राहशील?"" मला तुमच्या घरात नाही राहायचं"" अरे हे तुचंच तर घर आहे ना"" माझं जीव गुदमरतोय इथे ""नको थांबू त्याला जाऊ दे घे हे ५०लाख रुपये आणि निघ "" अहो पण"" सीमा त्याला आपली गरज नाही आहे आपण त्याला चालायला शिकवलं पण आता तो पळू शकतो सो जाऊ दे त्याला आणि हो गौरव ह्या पुढे मदत मागणयासाठी ह्या घरात पाय ठेऊन नकोस आजपासून आम्ही तुझे कोणी लागत नाही ""अहो "सीमा तू शांत रहा उचल तो चेक आणि निघ"
त्या दिवसापासून ना तो घरी परतला ना फोन केला मनातून दिनकर आणि सीमा तुटलेले पण एकमेकांना धीर देत होते दिनकर ने तर गौरवच्या आठवणी एका कपाटात बंद करून टाकल्या होत्या आणि सिमाला ते कपाट न उघडण्यास बजावले होते पण आईचा जीव दिनकर घरात नसले कि ती अल्बम उघडून फोटो पाहत रडत बसायची
त्याच्या दोघांच्या हातात गौरवाचा इवलासा पाय धरून एक सुंदर फोटो त्यानी त्या वेळी काढलेला तो फोटो पहिला कि तिला भरून यायचे आज तो इवलासा पाय त्याच्यापासून पळून कुठे तरी दूर गेला होता आज गौरवचा वाढदिवस होता पोर असून समोर नाही ह्यची खत तिला नेहमी वाटायची त्याचा अश्या वागण्याला आम्ही पालक म्हूनन जबाबदार आहोत असे तिला वाटे तेव्हाच एवढे लाड न केले असते तर पण वेळ निघून गेली होती
दिनकर बाहेर गेलेले ते यायच्या आधी अल्बम कपाटात ठेवायचा होता तिला. दाराची बेल वाजली लवकर तिने डोळे पुसले सोफा खाली अल्बम लपून ठेवला आणि दरवाजा उघडण्यास गेली.