वेदिका नितिन कळंत्रे

Romance

1.9  

वेदिका नितिन कळंत्रे

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

4 mins
2.4K


संध्याकाळ झाली होती ती गॅलरीत उभी होती नेहमी प्रमाणे मुलांची वाट बघत. आता तिची मुले मोठी झाली होती. लग्नाची 25 वर्षे कधी निघून गेली तिला कळलेच नाही

आज तिची मुलगी 20 वर्षांची झाली होती

आणि तिला स्वतःच्या भूतकाळात कुणावर तरी केलेल्या प्रेमाची आठवण झाली. तेच प्रेम ती आज आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहत होती आणि एक एक प्रसंग तिच्या डोळ्याभोवती तरळू लागले

ती 11/12 वर्षाची असेल तेव्हा तो तिच्या आयुष्यात आला. तिच्यापेक्षा 4/5 वर्षांनी मोठा होता तो. शेजारीच राहत असल्यामुळे रोज एकमेकांची नजरा नजर होत होती. तो खूप हुशार होता अभ्यासात. छान मैत्री झाली दोघांच्यात. नकळते वय होते. प्रेम, मैत्री, आकर्षण या गोष्टी तिच्यासाठी अनभिज्ञ होत्या तरीही तो तिला खूप आवडायचा. कारण तिला माहीत नव्हते. दोघेही मोठे झाली

एकदा तो संध्याकाळी तिच्या घरी आला ती घरात एकटीच होती. तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतले तिच्या ओठांचे चुंबन घेतले तिने त्याला अडविले नाही तिला ही तो स्पर्श हवा होता सगळंच पहिलं होतं पहिला स्पर्श पहिलं चुंबन आणि पहिली मिठी पहिल प्रेम आणि शेवटचं ही आणि अचानक त्याला काहीतरी आठवल्यासारखं केलं आणि तिला स्वतः पासून दूर करीत तो दाराकडे वळला आणि निघून गेला ती अनिमिष डोळ्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिली त्याने असे का केले तिला काही कळले नाही.

पुढे खूपवेळा भेटण झालं बोलणं झालं. त्यांच्या प्रेमात पावित्र्य होतं विश्वास होता

अचानक एक दिवस तो घरी आला त्याचे लग्न ठरलय सांगायला. ती मनातून खूप दुःखी झाली काय बोलावे काही सुचत नव्हते. काहीच न बोलता तिने मुकेपणाने स्वीकृती दिली. शेवटी न राहवून तोच बोलू लागला प्रेम ही मानसिक गरज आहे पण शारीरिक गरज प्रेमाने पूर्ण होत नाही. त्यादिवशी त्याने प्रेमाची तुलना शारिरीक गरजेशी केली होती. मग त्याने केलेले प्रेम एक खेळ होता का भावनांचा?

अखेर तू विवाहबद्ध झालास पण ती मी नव्हते. मी मात्र तुझ्या आठवणींना कवटाळून ठेवले होते. कारण त्या फक्त माझ्या होत्या आणि फक्त त्याच आयुष्यभर मला साथ देणार होत्या. अगदी जड मनाने मी तुझ्या सुखाची साक्षीदार बनले पण विवाहाचे प्रत्येक विधी बघताना जणू माझे प्राण कंठाशी आले होते माझ्या भावनांची चिता रचली जात होती मी जणू माझा स्वतःचा मृत्यु पाहत होते आणि स्वतःच्या मृत्यूवर मीच रडत होते. ते रडणं तुला दिसले नसेलही तुझ्या डोळ्यात नवीन स्वप्ने होती माझ्या हाती मात्र स्वप्नांची राख रांगोळी होती . तू आयुष्यात कुणासोबत तरी पुढे जात होतास यशाची शिखरे पादाक्रांत केलीस मी मात्र तिथेच उभी होते.

पुढे तिचे ही लग्न झाले. बघता बघता वैवाहिक जीवनाची 25 वर्षे निघून गेली. पण ती त्याला अजून विसरू शकली नव्हती. सगळं विसरायचं होतं तिला. मनातली मळभ त्याला बोलून दाखवायची होती. मनात अनेक विचार येत होते

आयुष्याच्या एक गोड वळणावर तू भेटला होतास सगळं छान चाललं होतं कुठेच काही कमी नव्हते पण तुझ्या येण्याने शांत असलेले मन अशांत झाले काही तरी वेगळं होत आहे हे जाणऊ पर्यंत ते क्षण हातातून निसटून गेले आपल्या नात्याला एक चौकटीत बसविले होते पण अचानक सगळं थांबलं तू कधी दूर गेलास कळलचं नाही. हातातून सगळंच निसटले माझी स्वप्नं, तुझी साथ, ते गोड क्षण. जाताना सगळं घेऊन गेलास मागे वळून न पाहता. तुला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे.मलाच तुझ्यात इतकं गुंतायला नको होतं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि ते आपण दोघांनीही स्वीकारल होतं. मला कशाचाही पश्चाताप नाही झाला मी माझ्या आयुष्यात पूर्ण समाधानी आहे.

झालेल्या चुका आणि चुकीचे निर्णय बदलता येत नाहीत. करण मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो. मग अपूर्ण राहिलेले प्रेम पुढच्या जन्मी पूर्ण व्हावे हा अट्टाहास का करायचा . या जन्मी जो विरह जे भोग भोगलेत ते पुन्हा पुढच्या जन्मी हवेतच कशाला. मनातील सगळे विचार बाजूला सारून तिने पत्र लिहायला सुरुवात केली

नाव लिहण्याचं मुद्दामच टाळलयं.खरतरं गरजच नाही आहे नावाचीही कारण आपल्यात कोणतेच नातं उरलं नाही आहे ते सांगण्याचीही गरज नाहीय आता कारण अजून आपण दोघंही ते समजू शकलो नाही .मी तरी नाही निदान.तसा तू माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यात नेहमीच होतास काळजी, मार्गदर्शन, माया,मित्रासारखी साथ हवी होती आणि नि:स्वार्थ बंधन नसलेलं प्रेम, अमर्याद,निखळ प्रेम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास... पण जाऊ दे मी फारच जास्त अपेक्षा केल्या होत्या तुझ्याकडून. तुझ्या गुण दोषां सकट तुला कायमचे स्वीकारले होते.

आज तुझं प्रेम काळाच्या पडद्याआड गेलाय मग ते माझ्याकडून की तुझ्या कडून माहीत नाही.

योग्य अयोग्य हे मला खरचं कळत नाही. माझ्या त्या प्रेमावरचा अवमान आहे का? गुन्हा केला आहे का? तेव्हा मनात प्रश्नांचे वादळ उठते. तुझ्या कडे या प्रश्नांची उत्तरे मागावी तुझ्याशी भांडावे मनातील मळभ दूर करावा असं वाटतं आणि नाहीच जमलं तर धाय मोकलून एकटीनेच रडावं.पण हे करताना मी हे विसरून जाते की, मी कितीही ठरवलं तरी तूला विसरणं खरंच शक्य नाहीय.मी कितीही आठवणींना दूर ढकललं तरी त्या परत येतील. माहीत नाही मला तुझ्या सोबत आयुष्य काढायच होत की नाही रिक्त होणे आलेला तू जाताना मात्र मलाच हिरावून घेऊन गेलास

या प्रेमात कसली अपेक्षा नव्हती कधी ते पूर्ण होईल का आपल्या नात्याच पुढे काय होईल खरचं काहीच माहीत नव्हते पण मनाने कधीच आपण वेगळे होऊ शकणार नाही असं वाटायचं .

पत्र लिहून झाले तशी ती भानावर आली जी चूक तिने केली होती ती चूक ती तिच्या मुलीला करून देणार नाही. आता फक्त तिला तिच्या मुलीला मायेनं सावरायचे आहे आधार द्यायचा आहे अस मनाशी ठरविते आता तिची मुलंच आता तिचं खरं प्रेम होत मनातील सगळी मळभ आता दूर झाली होती एक नवी उमेद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance