वेदिका नितिन कळंत्रे

Romance

1.7  

वेदिका नितिन कळंत्रे

Romance

इंटरनेटवाला लव

इंटरनेटवाला लव

4 mins
1.3K


श्यामली आजारी होती म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. पण नुसतं झोपून तिला कंटाळा यायचा म्हणून मोबाईलवर इंटरनेट सुरू केले. तिथे तिची ओळख दिपेश या व्यक्तीशी झाली. सुरुवातीला ती त्याला टाळत होती. पण हळू हळू त्याच्या मेसेजचे उत्तर देऊ लागली . ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघे भिन्न भाषिक होते. . ती मराठी भाषिक आणि तो गुजराती भाषा बोलायचा. त्यामुळे ते हिंदीतून चॅटिंग करायचे. दोघांची खूप छान मैत्री जमली. दिपेश हिऱ्यांचा व्यापारी होता तर श्यामली एक मध्यम वर्गीय कुटुंबातील होती. दोघेही विवाहित होते दोघांनीही वयाची चाळीशी ओलांडली होती. कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या दोघांनी चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर स्वतःसाठी विरंगुळा म्हणून ते इंटरनेट वापरत होते. दोघेही एकमेकांना सुख दुःख सांगत होते. आपापल्या संसारात सुखी ही होते पण कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना देखील समजले नाही. दिपेशने प्रथम पुढाकार घेतला आणि आपल्या मनातील गोष्ट तिला सांगून टाकली. तिलाही तो आवडायचा तिने ही ती गोष्ट स्वीकारली. कामातून वेळ मिळेल तेव्हा दोघे गप्पा मारायचे. पण त्यांनी या मैत्रीला कधी कुटुंबाच्या मध्ये येऊ दिले नाही. दोघेही विवाहित होते त्यामुळे त्यांच्यात नात्यात काही बंधनं होती किंबहुना त्यानी ती स्वतःच घातली होती. आपआपल्या जोडीदाराला सोडायचे नाही आपले बाह्य नाते आपल्या वैवाहिक आयुष्यात येऊ द्यायचे नाही. थोडावेळ आभासी जगात जगायचे आणि आणि पुन्हा आपल्या जगात परत जायचे हा त्यांचा दिनक्रम होऊन गेला. एका मागून एक दिवस जात होते आणि त्यांच्यातील भावनिक जवळीक देखील वाढू लागली पण कधी त्यानी एकमेकांना वचनात बांधून घेतले नाही. दीपेश श्यामलीला आपली अर्धांगिनी मानू लागला तसे त्याने एकदा बोलून दाखवले देखील पण हे फक्त आभासी जगात. ते प्रत्यक्ष कधीच सोबत राहू शकणार नव्हते. एव्हाना तीन महिने लोटले त्यांच्या मैत्रीला. श्यामलीचा वाढदिवस जवळ आला होता. यावेळी तुला छानसं गिफ्ट देईन मी ते तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस असं आश्वासन देखील दीपेशने श्यामलीला दिले होते. ती त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत दिवस मोजू लागली. पण अचानक दीपेश श्यामली पासून दूर राहू लागला. तिला टाळू लागला ती ऑनलाईन आली की तो ऑफलाईन जायचा.

तिला काहीच कळेना दीपेश असा का वागतोय तिने खूप मेसेज केले विचारण्याचा प्रयत्न देखील केला पण त्याने काहीच उत्तर दिले नाही काही झाले नाही इतकंच तो बोलायचा.

नंतर नंतर त्याने उत्तर देणे ही सोडून दिले. कदाचित त्याचे प्रेम सीमे पलीकडे गेले असावे पत्नी आणि श्यामली या दोघींची तो तुलना करू लागला असावा. स्वतःला दोघींचा गुन्हेगार समजू लागला. अपराधीपणाची भावना त्याच्यात दिसू लागली होती.

अशावेळी ती दोघेही एकाच वेळी ऑनलाईन असली तरी त्यांच्यामध्ये फक्त शांतता असायची मुक संभाषण असायचे दोघे फक्त एकमेकांचा ऑनलाईन असल्याचा ग्रीन सिम्बॉल तासनतास पहात राहायचे. पण काही मेसेज नाही करायचे. न राहवुन एक दिवस श्यामलीने त्याला विचारले "मुझसे कोई भूल हुई है क्या? क्या हुवा है? तुम मरे मेसेज का जवाब क्यू नाही देते? तरीही दीपेश काहीच बोलला नाही तो ऑफलाईन जाईल म्हणून तीच म्हणाली "बस पांच मिनिट रुक जाओ मेरे सवालों के जवाब तो देते जाओ फीर चाहे कभी भी मुझसे बात ना करना तूम्हे मेरी कसम हे" ती खूप कळवळीने बोलत होती. शेवटी न राहवुन त्याने उत्तर दिले "अपना साथ यही तक था जब शाम को घर जाता हूं और अपनी पत्नी का चेहरा देखता हूं तो मुझे मेरा प्यार गलती लगने लगता है. जैसे मैने उसका विश्वास तोडा है उससे बेवाफाई की है उससे नजरे नही मिला पाता बहोत बेबस मेहसुस करता हूं. तुम बहोत अच्छी हो साफ दिलकी हो हमने जो किया गलत किया हमारा रिश्ता आगे चलके हमारी शादीशुदा जिंदगी को खराब ना कर दे इसलीये मे सब खतम कर रहा हूं. तुम अपनी जिंदगी मे खुश रहना. तुम्हे सब कूछ मिले ये दुआ करता हूं". हे सगळं वाचताना ती खूप रडू लागली. तिने मग उत्तर दिले " जनमदिन का बहोत खूब तोहफा दिया है तुमने सच कहा था तुमने जिंदगीमे कभी भूल नहीं पाउंगी... शुक्रिया .. तुम भी खुश रहो हमेशा.. तुम्हे दुनियाभर की सारी खुशी मिले. अलविदा... दीपेशने मेसेज केला", मेरे पास सब कुछ है किसीं बात की कमी नही है तुम्हे जिंदगीमे किसीं बात की जरूरत या मदत की जरूरत हो मुझे मेसेज करना में अपने हैसियत के मुताबिक तुम्हारी मदत जरूर करुंगा". हें वाक्य श्यामलीच्या जखमेवर मीठ लावल्यासारखे वाटले ती निशब्ध होती तिला जाणवलं आपल्या दोघात गरीब श्रीमंतीचे अंतर आले आहे त्याने हे वाक्य जाणून बुजून बोलले असावे जेणे करून ती त्याच्यावर तिरस्कार करेल जाता जाता तो शेवटचे वाक्य टाईप करू लागला " दुआ करना मेरी किस्मत अगर ताज होगी तो अगले जनम मे हम फिर मिलेंगे एक दुसरे के जीवनसाथी बनेंगे कभी जुदा नही होंगे ".. .अलविदा


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance