Pratibha Barhate

Comedy

4  

Pratibha Barhate

Comedy

फेसबुक अकाउंट हॅक होते तेव्हा

फेसबुक अकाउंट हॅक होते तेव्हा

7 mins
383


        नमस्कार मंडळी, आजकाल बऱ्याच मित्रमंडळींचे फेसबुक हॅक झाल्याचे माहिती पडत आहे, त्यावरून पैशाची मागणी होते. कधीकधी ब्लॅकमेल केले जात आहे. कुठे सुरक्षितता राहिलेली नाही. एकंदरीत हे खरं आहे की नाही ते सांगा. माझी कथा अगदी या संदर्भातच आहे. सुनिताचे फेसबुक अकाउंट हॅक होते आणि तिचा पती सदानंद याला सुनिता कशी आपल्या तालावर नाचते, ही सांगणारी ही एक आंबट गोड कथा.

             "ये दुनिया ये महफिल! मेरे काम की नही, मेरे काम की नही", दुःखात हे गाणं म्हणत ,सुनिता खिडकीमध्ये बसून बाहेर बघत गाणं म्हणत होती. सदानंद हे पाहवले जात नव्हते, पण करणार काय? सुनिता एवढी जिद्द होती की, तिच्यापुढे ब्रह्मदेव येऊन जरी बसला तरी ती मात्र त्यालाही झुकविणारी होती.

      "अगबाई! अशी उदास गाणे म्हणू नको ग !लोक काहीतरी विचित्र समजतील, मी हात जोडतो, बाई !तुला लागेल तर हा माझा मोबाईल घे, बनव बाई दोन-तीन अकाउंट तुझ्या नावाचे माझ्या मोबाईलमध्ये", सदानंद सुनीताला हात जोडून म्हणत होता.

      "तुम क्या जानो? सदानंद बाबू! फेसबुक खोने से क्या होता है?", सुनिता अगदी फिल्मी डायलॉग हिरोइन सारखी बोलत होती. सुनिता आणि सदानंदाचा संवाद चालू असताना महान कळीचा नारद विनोद तिथे येऊन पोहोचला.

        "काय सदानंद बाबू आणि सुनिता भाभी! आज काय ,एकदम पिक्चरचे डायलॉग बोलत आहे, काय विशेष का ?आम्हाला पण सांगा ना!", विनोद चेष्टा करत बोलला.

     "अरे बाबा काही नाही तु जा ना! तुझ्या कामाला ,काही नाही जा जा बाबा जा", सदानंद त्याला दरवाज्याकडे ढकलत म्हणाला.

      "आता तर मुळीच जाणार नाही. दाल में कुछ काला जरूर है ",असं म्हणत विनोद सुनीताकडे वळला.

       सुनिताचे सुजलेले डोळे लाल झालेले होते आणि तिचा रडवेला चेहरा पाहून कुणालाही तिच्या चेहऱ्यावरील दुःख समजेल मग विनोद तर होता तो तर असे चान्स सोडणार थोडीच होता. सुनीताने तिचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे विनोदला सांगितले आणि विनोदने पोलीस स्टेशनमध्ये केस फिर्याद करायचा सल्ला दिला व तेथून आगीमध्ये तेल ओतल्यासारखे करून निघून गेला. शेवटी विनोदचा सल्ला आणि सुनीताची जिद्द सदानंद आणि सुनीताला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. पोलिसांपासून चार हात लांब राहणारा सदानंद चक्क आपल्या बायकोसह त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर उभा होता आणि पोलिस स्टेशन मधील जवळजवळ चार पोलिस त्याला सराईत गुन्हेगाराला सारखे पाहात होते.

        "काय बताऊ साहेब! तुम्हाला, अहो! माझा एक फोन आणि त्यामध्ये एकच फेसबुक अकाउंट .नवीन फोटो काढून त्यामध्ये पोस्ट करायची आणि प्रत्येक फोटोला छान छान कमेंट येत होत्या ,पण आता सगळं काही संपलं", सांगता सांगता आज सुनीता मोठ्यामोठ्याने घरातला मोठा प्रिय व्यक्ती मेल्यासारखं तेथे रडू लागली.

        सुनिता जोराने रडायला लागली आणि समोरचा पोलीस रागाने सदानंदकडे बघायला लागला.

     "अहो !बघता काय? त्यांना थांबवा ना!", पोलीस सदानंदवर ओरडला.

   "साहेब! या जन्मात तरी ते माझ्याकडून शक्य होणार नाही, ते तुम्हीच पहा", सदानंद हात जोडून म्हणाला.

     "बापरे! प्रकरण फारच भयानक आहे", दुसरा पोलीस सदानंद कडे पाहून म्हणाला.

      "काय आहे ,आम्ही मोठे मोठे बॉम्ब, बंदुकी ,गोळ्यांशी खेळणारे पोलीस, बाईमाणसाच्या रडण्यासमोर एकदम नतमस्तक होऊन जातो, म्हणून बाईला रडणं थांबवायला सांगा", तिसरा पोलीस सदानंदला म्हणाला.

        "काय साहेब सांगू तुम्हाला, आता मी इथे पोलीस स्टेशनमध्ये अगदी दगड ठेवून आली", सूनिता आपलं रडणं थांबवत बोलली.

      "कशावर मोबाईलवर दगड ठेवून आल्या की काय?", तिसरा पोलीस चेष्टेने सुनीताला विचारू लागला.

     " नाही हो! मोबाईलवर दगड नाही ठेवला, मनावर दगड ठेवला ",सुनिता डोळे मोठे करत पोलिसाकडे पाहून बोलली.

      "बरं बाई !तुमचा कुणावर संशय आहे का?", समोरच्या पोलिसाने सुनिताला विचारले.

     "तसा संशय असता तर, मी तुमच्यापर्यंत कशाला आली असती? मीच त्याच्या घरी जाऊन, त्याला मारला असता ना? साहेब", सुनीता हातातल्या बांगड्या मागे सावरत पोलिसाकडे पहात म्हणाली.

       "तुम्हाला कसे व कधी? कळाले की, तुमचा फेसबुक हँक झाले आहे ,म्हणून ",पोलिसाने सुनीताला विचारले.

     "मला नाही कळाले ! मला माझ्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की, माझ्या नावाच्या ठिकाणी कोणत्यातरी भलत्याच माणसाचे नाव माझ्या अकाउंट वर आहे, म्हणून सांगितले", सुनीताने पोलिसांना सांगितले.

      पोलिसांनी सुनीताची तक्रार नोंदवून घेतली व सदानंद व सुनीताला घरी घरी जाण्यास सांगितले. घरी जात असतानाच रस्त्यामध्ये सुनीताला आपली प्रिय मैत्रीण ममता भेटली सुनीताने तिला सुद्धा आपली दुःख भरी कहानी अगदी रडतच सांगितली. थोडे पुढे जातो तेच देशमुख काका सुनीताकडे पाहून कोणी गचकले का? असे विचारणा करू लागले, तेव्हासुद्धा सुनीता अगदी काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखे, अभिमानाने आपल्या फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी सांगू लागली.

        "मी ही मोबाईल दहा वर्ष झाले वापरत आहे पण माझ्या बाबतीमध्ये असा हलगर्जीपणामुळे झाला नाही .आज कालच्या मुलींना ! घर तर सांभाळता येत नाही. 24 तास हातात असणारा मोबाईलमधले एक साधे फेसबुक अकाउंट सुद्धा सांभाळता आले नाही ",असा देशमुख काकूने सुनीताला टोमणा दिला.

       "अगदी खरं बोलला काकू तुम्ही !",सदानंद बोलला पण सुनीताकडे पाहिल्यानंतर मात्र किंचित घाबरला.

   " चला घरी तुम्ही ! दाखवते तुम्हाला चांगला इंगा ",सुनिता सदानंदला खेचत पुढे निघाली. घरी जाऊन कुलूप उघडते न उघडते तेवढ्यातच आजूबाजूच्या चांगल्या दहा बाया अचानक घरी आल्या.

     "सुनीता ! मला कळलं तेव्हापासून मला ना फारच काळजी वाटली ग! बाई तुझी", तांबेताई बोलल्या.

     "तुला आठवण आली तर माझ्या मोबाईल मधून तुझ्या फेसबुक वरचे जुने फोटो कमेंट वाचून घेत जा, बघून घेत जा ,जेवण वगैरे केलं की नाही? भुकेली मुळीत राहायचं नाही", कधी नव्हे ते सरला काकू सुनिताशी प्रेमाने बोलत होत्या.

      कुलकर्णी काकू म्हणाल्या," अग! मी तुला कालच सांगितलं होतं की, तुला राहू आणि मंगळाने वेढलेला आहे, त्यामुळे नक्कीच तुझ्याबरोबर काहीतरी विचित्र घडणार आहे .त्यातल्या त्यात काल शनिवार होता म्हणजे शनिचा सुद्धा मारा झाला तुला".

        कुलकर्णी काकूंचे बोलणे ऐकले आणि सुनीता त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागली, आता पुढे काय करू ?

       "फारशी नाही पण आता येणाऱ्या शनिवारी कुणालाच उलट बोलायचे नाही. सकाळी आणि संध्याकाळी फक्त मुगाची डाळ खायची व जमले तर पाच लहान मुलांसोबत व 5 वयोवृद्ध व्यक्तींसोबत फोटो काढून त्यावर चांगल्या चांगल्या कॉमेंट मिळवायच्या म्हणजे तुझी शनी आणि राहू ,मंगळ दशा कमी होईल," कुलकर्णी काकूंनी उपाय सांगितला.

      "सुनिता, आमच्या चुलत काकाच्या मुलीला असेच निनावी फोन आणि पैशांची मागणीसुद्धा झाली, जेव्हा तिचे फेसबुक हॅक झाले होते तेव्हा ,असेच बरेच काही तिच्यासोबतसुद्धा घडले", निशा सुनिताला म्हणाली.

       "मी नाही घाबरत, येऊ दे ना! कोणाचाही फोन?",सुनिता पदर खोचत बोलली.

       सगळ्यांचा चहापानाचा कार्यक्रम संपला आणि जो तो आपापल्या घरी निघून गेल्या .आता घरात सुनीता आणि सदानंद पुन्हा आपल्या दुःखात.

     "मला एक कळत नाही ,तुम्हीपण तर फेसबुक वापरतात, आता पर्यंत तुमचा का नाही? कधी फेसबुक अकाउंट हँक झाले ",सुनिता संशयाने सदानंदकडे पहात म्हणाली.

      "तुला काय म्हणायचंय! मी केलं?", सदानंद तिला रागांमध्ये बोलला.

   "अगदी तुम्ही नाही, परंतु तुमचा एखादा मित्र!", सुनिता अगदी पोलीससारखी तपास करत बोलली.

     " बरं! समजा मी केलं! तर मला त्याच्यातून फायदा काय होणार?", सदानंद तिला विचारू लागला.

  "बायकोला त्रास देण्यासारखी आणि तिला रडतांना पाहण्यासारखे जगामध्ये दुसरे सुखच नसते, तुमच्या सारख्या नवर्‍यांना ", सुनिता रागाने सदानंदला म्हणाली.

     तेवढ्यात सुनीताचा मोबाईल वाजला व सुनीता मोबाईल मध्ये आपल्या बहिणीशी बोलू लागली.

     " काय बाई ! माझं नशीबच खराब आहे, आधी असा गावंढळ नवरा आणि आता हे फेसबूक अकाउंट सुद्धा हँक झाले. मी कशी जगत आहे? मलाच माहिती. त्यातल्या त्यात तू सुद्धा एवढी लांब मला आता फक्त तुझ्याशी बोलता येईल ,असू दे," सुनीता तिच्या बहिणीला सांगत होती.

       कधी नव्हे तो! सुनीता आणि तिच्या बहिणीचा रडारडीचा कार्यक्रम अर्धा तासात संपला आणि सुनीताने आपला मोर्चा पुन्हा सदानंदाकडे वळवला.

    "अगं सुनिता! एवढं कशाला रडायचं? आणि कसलं दुःख? चल ,आपण दुसरे अकाउंट बनवू या आणि तू पुन्हा पुन्हा छान छान फोटो काढून त्यामध्ये टाक. बघ? तुला छान छान कमेंट येतील आणि बरं वाटेल ",सदानंदाने सुनीताला सल्ला दिला.

       "तुम्हा पुरुषांना, एक तुटलं की दुसरं बनवायला काही वेळ लागत नाही पण आमचं स्त्रियांच! तसं नसतं. आम्हाला अचानक एका टोकावरून दुसऱ्यावर जाणं कधीच होणार नाही आणि जमणारही नाही", सुनिता त्याच्याकडे प्रेमाने पहात बोलली.

  

      "मग आता किती वेळ हे असं चालणार? चल.... ये माझ्या जवळ..... आपण दुसरा ई-मेल बनवू या, दुसरा पासवर्ड आणि दुसरे फेसबुक अकाउंट बनवू या!", सदानंद सुनिताचा हात आणि सुनीताचा मोबाईल आपल्या हातात घेत बोलला.

       ठरल्याप्रमाणे ई-मेल आणि नवीन पासवर्ड सुनीताच्या मनाप्रमाणे सदानंद ने बनवून दिला आणि नवीन फेसबुक अकाउंट खोलण्यासाठी एक छान चा फोटो लागणार म्हणून तिला गॅलरी मधून फोटो कोणता सिलेक्ट करू असे विचारले.

       "नाही नाही.... नवीन अकाउंट आहे .....तर नवीन फोटो सुद्धा काढून..... आता", असं म्हणत कपड्यांच्या कपाटात जवळ गेली आणि साडी शोधू लागली.

         बऱ्याच वेळ साड्या शोधल्या परंतु एखाद्या साडी वर परफेक्ट असे ब्लाऊज सापडले नाही तर सारं काही जमलं परंतु मॅचिंग बांगड्या सापडल्या नाही. एका साडीवर तर चक्क मॅचिंग टिकली सापडली नाही. सुनिताचा मूड डाऊन झाला.

        सुनिता रागाने पलंगावर जाऊन बसली सदानंद तिच्याजवळ गेला व म्हणाला ,"काय गं !आता तर फोटो काढण्यासाठी बोलली आणि इकडे काय? रागाने येऊन बसली.... चल लवकर तयार हो.... मीच काढतो तुझा छान फोटो",.

         "तुम्ही तर छान फोटो काढतात परंतु माझ्याकडे छान नवीन साडी तर पाहिजे", सुनीता कपाटाकडे बोट दाखवत त्याला म्हणाली.

         "हे काय? किती सार्‍या साडया आहेत, कोणतीही साडी घाल...... फोटो तर काढायचा आहे ना....... सदानंद आपल्या हातात पैठणी घेऊन आला आणि तिला देत म्हणाला ,"हीच घाल छान दिसते तुझ्यावर".

         "नाही हो ! पहिल्या फेसबुक अकाउंटमध्ये हीच पैठणी घालूनच फोटो काढला होता आणि पाहिलं ना! काय झाले ते? आता मला दुसऱ्यांदा ही चूक पुन्हा करायची नाही. चला आत्ताच्या आत्ता दुकानात .....जाऊ या....... आणि पुन्हा ......एक नवीन छान पैठणी घेऊ या ......सुनिता सदानंदाला बोलली.

      बिचारा सदानंद चांगलाच फसला होता काय करणार सुनिता बरोबर दुकानात गेला आणि पाच हजाराची नवीन पैठणी घेऊन आला.

       नवीन पैठणी मग त्यावर मॅचिंग ब्लाऊज बांगड्या टिकल्या चप्पल सुद्धा असा पूर्ण खर्च जवळजवळ सहा हजाराचा झाला.

शेवटी बाईच्या म्हणण्याप्रमाणे सारे काही झाले.

         "आता बघ! तुझ्या म्हणण्यासारखे झालेले आहे.... चल...... लवकर .....पटकन तयार हो. मी काढतो तुझा छान फोटो ......",सदानंद पुन्हा तिला म्हणाला.

      " आता नाही ....अहो! अजून तर .... पार्लरमध्ये जायचे राहिले....... उद्या सर्व काही झाल्यानंतर....... नक्कीच तुम्हीच काढा, माझा फोटो", असं म्हणत सुनीताने आनंदाने पार्लरचा रस्ता धरला.

     सुनिता पार्लरकडे जात होती आणि सदानंद तिच्याकडे पाहातच राहिला व मनातल्या मनात विचार करत राहिला की एक फेसबुक अकाउंट हॅक झाल्यामुळे सुनीताचे तर काहीच नुकसान झाले नाही परंतु त्याचा मात्र खिसा रिकामा झाला व तो देवाला प्रार्थना करू लागला...... अरे देवा ! ........पुन्हा कधीच कोणत्याच स्त्रीचे फेसबुक अकाउंट हॅक होऊ नको देऊ.......जगातल्या सार्‍या पुरुषांचे होउ दे ..... चालेल परंतु स्त्रियांचे नको...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy