पाऊस
पाऊस
अचानक गजर वाजला आणि गाढ झोपेतून मी ताडकन उठली. बाहेर जोरात पाऊस आणि वारा सुरु होता.खोलीतली खिडकी ताड ताड वाजत होती.तरी पण इतक्या वेळ मला जाग कशी आली नाही?मी तर एका तासासाठी म्हणून झोपी गेली होती. ४ वाजता उठून ६ वाजता मला डॉक्टर कडे अपौइन्टमेंट होती. माझ्या डोकं दुखीच्या गोळ्या संपल्या होत्या. विशेष म्हणजे मीराने का नाही उठवला मला. तिला मी सांगितला होत कि मला डॉक्टर कडे जायचा आहे.जाब विचारायलाच हवा तिला.तेवढ्यात खिडकी आणखीनच जोरात वाजू लागली.वातावरण तसा भयाचं होता पण घरात दोघी दोघी असल्या मुळे भिण्याच काही कारण नव्हत.
“मीरा.....मीरा” असा ओरडत मी किचनमध्ये आली.ती दिसताच, “मीरा मला उठवला का नाहीस तू? तुला माहिती होत माझ्या गोळ्या संपल्या आणि आज डॉक्टर शीतलला भेटणं आवश्यक होता.”
काहीच रीस्पोंस न आल्यामुळे,
“मीरा मी का विचारात आहे...”आता माझं राग अनावर झाला होता.
“आज न मस्त गरम गरम नुडल्स विथ फ्राइड राइस चा बेत आहे. छान सुगंध येतो आहे न?”,मीरा म्हणाली.
मी महत्वाचं बोलत असतांना हि हे असं उत्तर देते आहे?तिच्या पाठमोर्या प्रतिमेकडे मोर्चा वळवून तिच्या खांद्यावर हाथ ठेऊन तिच्यावर शाब्दिक हल्ला करणार तितक्यात दाराची बेल वाजली. मनामध्ये परत येऊन हिला बघतेच असा बोलून मी दाराकडे प्रस्थान केलं. दार उघडलं तर तिथे कोणीच नाही!. सोसायटीच्या मुलांनी इतक्या पावसात मस्करी करावी हे पाटण्या लायक नव्हत.तरी असेल केली अस म्हणत मी दार बंद करायला जाताच दाराच्या फाटीमध्ये...चार बोटं आपोआप अडकलेले दिसले.त्यातनं रक्त पण वाहत होत. घाबरून मी मीरा ला मदतीसाठी हाक मारत किचन मध्ये गेली.तर तिथे मीरा कुठेच नव्हती. धावतच मीराच्या खोलीत गेली तर तिथेही ती नव्हती. काळजात धडकी भरली होती.हृदयाचे ठोके खूप वेगाने ऐकू येत होते. शेवटी काही न सुचल्याने खोलीत जाऊन फोन आणून शेजारच्या मंदारला बोलवून घेते अस मनात येताच जिना चढून खोलीत फोन कडे धावली.फोन हातात घेताच माझ्या असा लक्षात आला कि काही वेळा पूर्वी ताड ताड वाजत असलेली खिडकी आता बंद आहे आणि बाहेरच्या पावसाचा मंद मंद आवाजचं फक्त त्या खोलीच येत होता.बाकी स्मशान शांतता! स्वतःशी ठरवला कि आता मंदारला बोलवूनच घ्यावा...पहिले खोलीचा दरवाजा आतून बंद केला...जेणे करून चोर किवा कुणीही माझ्यापर्यंत पोहोचू नये.मंदार ने अखेर फोने उचलला.
“मंदार. बारा झालं तू फोन उचललास.मला खूप भीती वाटते आहे रे.काहीच समजत नाहीये.आधी मीरा होती आता नाहीये...बाहेर बेल वाजली कोणी नव्हत..मग ती चार बोटं.” एका श्वासात मी सगळ झालेल त्याच्याकडे फोनवरच रीत केलं.
“मीरा आग हळू...आधी शांत हो,पाणी पी..मग सांग काय झाला.इतका घाबरलेली का वाटत आहेस? सगळा ठीक आहे न?”
“नाही बिलकुल नाही.तू ये न.काहीतरी चुकीचा वाटत आहे.”
“बर तू शांत हो मी येतो”
मंदार येई पर्यंत मी एका कोपर्यात देवाचा नाव जपत उभी राहिली. काही न सुचल्याने,कोणी हल्ला केला तर pepper spray ड्रावर मधून काढला आणि काहीही आवाज न करता मंदार कधी येतो याची वाट बघू लागली. तेवढ्यात दार खूप जोर-जोर्याने ‘ठक ठक ठक ‘ वाजण सुरु झालं. मी कोण, असा दोन वेळा विचारल्यावरही काहीच आवाज आला नाही.नक्कीच कोणी तरी मला मारण्याचा प्रयत्न करतो आहे असा वाटून मी तो spray वापरायला तयार अश्या अवस्थेत घेऊन दार उघडायला सज्ज झाली. हळूच दार उघडून स्प्रे मारणार इतक्यात समोर मंदार होता. खूप हायसं वाटल.
”मंदार तू? तुला आवाज द्यायला काय झाला होत.किती घाबरले मी”.
“मी पूर्ण घरात तुला आवाज देताच शोधात होतो. मला वाटला इथे कोणी चोर आला असेल म्हणून फक्त दार वाजवल. मी पण थोडं घाबरतोच न.” हसतच म्हणाला.
“बर झालास तू आलास मला सतत असा वाटत आहे कि कोणी तरी मला घाबरवण्याचा किवा मारण्याचा प्रयत्न करतो आहे.आणि हि मीरा हि पण एका एकी गायब झाली आणि हा इतका पाऊस.मला खूप भीती वाटते आहे रे”
“तू घाबरू नको आता मी आलो आहे न. मीरा इथेच कुठे गेली असेल.आणि काय झाल ते तू नीट सांग मला आधी”
मी उठल्यानंतरच्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या.पण तो हसू लागला.”तुला भास झाला असेल काही बोटं नसतील ते आणि खिडकी तूच बंद केली असेल.तू खूप दमली आहेस.आराम कर. मला आईने काम सांगितल होता ते करून मी येतो.”
मंदार जायच नाव काढताच मला धाडकी भरली.” तू कुठे जाऊ नकोस.मला आज प्रचंड भीती वाटते आहे.”
“काहीही होणार नाही.तुला भास होतो आहे बाकी काही नाही.ऐक माझं जेवण कर.तोपर्यंत मीरा येईलच आणि मग झोपून जा. उद्या जा डॉक्टर कडे” असा म्हणून तो जाण्यासाठी परत वळत असतांनाच लाईट गेली. मी पटकन “थांब मी flashlight लावते असा म्हणत चाचपडत चाचपडत पलंगावरचा फोन घेऊन लाईट ओन करून बघते तर मंदार तिथे नव्हताच!
“मंदार,मंदार,....”अशा घाबर्या आवाजात त्याला हाक देत होती पण मंदार कुठेच नाही.आश्चर्याची गोष्ट अशी कि हा इतक्या लवकर कुठे गेला असेल.
खाली जायला निघताच खोलीतली खिडकी परत आवाज करत फ्रेम ला आदळत होती.आता जास्त जोऱ्यात!
’तिथे कोणी तरी होत...नक्कीच...’ माझे धाबे दणाणले होते.पटपट जिना उतरत खाली गेली आणि घराच्या बाहेर जाते असा ठरवून दरवाजा उघडायला गेली तर दार उघडेच ना.कोणी तरी बाहेरून लावला होता.आता माझ्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या होत्या.त्या फोनच्या छोट्याश्या लाईट मध्ये, इतक्या मोठ्या घरात मुसळधार पावसात मी माझ्या काळाचा सामना करत होती.आज हि माझी शेवटची रात्र हे मला कळून चुकल होत आणि अचानक डोकं भयानक दुखायला लागला. tumour असतांना गोळ्यांमध्ये हाई-गाई होणा मला परवडत नाही हे मला कळून चुकल होत.तशीच निपचित लाईट बंद करून मी दारालाच टेकून खाली कोसळली आणि यमराजाची वाट पाहू लागली. डोक्यामध्ये प्रचंड दुखत होत.सगळ्या चांगल्या वाईट घटना डोळ्यासमोर आणून शांत बसली होती.
आणि अचानक डोळे उघडले तर मी माझ्या खोलीत पडली होती आणि मीरा डॉक्टरशी बोलत होती
“डॉक्टर काय झाल.?मी ऑफिस मधून घरी येताच दारात आली तर हि बेशुद्ध होती.मला फार काळजी वाटते आहे.”
“सगळ ठीक आहे.फक्त गोळ्या संपल्यामुळे थोडं त्रास झाला असावा. tumour मध्ये पथ्य औषध पाणी सगळा जपावा लागेल.आज अपौइन्टमेंट असून सुद्धा आली नाही हि.म्हणून हे झाले.असा वारंवार होता कामा नये मीरा.तू तिची मैत्रीण म्हणून आता पूर्ण काळजी घेतली पाहिजे.”
“हो डॉक्टर आज खरतर मला पावसामुळे उशीरच झाला आणि मी सुद्धा विसरली कि आज तुमच्याकडे यायचा होता.असा नंतर कधी होणार नाही”
काहीच प्रकार लक्षात न आल्याने मी मीराला विचारल,”मला काय झाल.तू कुठे गायब झाली मघाशी आणि मंदार कुठे आहे.मला एकटीला टाकून गेला. माझं डोकं फार जड वाटतंय अग..”
“शांत हो...सगळ ठीक आहे. मंदार तर बाहेर गावी गेला, कालच आपण भेटलो कि त्याला आणि मी आता आली घरी तर तू दरवाजाजवळ निपचित पडली होती.आता काळजी घ्यायला हवी आपण.गोळ्या न विसरता घेत जा.आज पावसाने कहरच केला.”
आता माझ्या काही काही लक्षात येऊ लागला होत.जास्त काहीच विचार न करता मी त्या पावसच्या सरींच म्युसिक कानावर घेत झोपी गेली....