Sandip Khurud

Comedy Drama Tragedy

3  

Sandip Khurud

Comedy Drama Tragedy

पाठमोरं सौंदर्य

पाठमोरं सौंदर्य

5 mins
321


         बसस्थानकातील पक्याची टपरी आमच्या चार-पाच मित्रांचा लाईन मारण्याचा अड्डाच होता. अभ्यास करता करता कंटाळा आला की, मी पण त्यांच्या आंबट-चिंबट गप्पा ऐकण्यासाठी बसस्थानकात येणाऱ्या पोरी पाहण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायचो. पक्याची टपरी म्हणजे असं एक माहिती केंद्र होतं जिथे गावातल्या, गावाबाहेरच्या, राजकारणातल्या, लफडयांच्या सगळया गोष्टी माहिती व्हायच्या.

           एके दिवशी असचं पक्याच्या टपरीत पलीकडे बसलो असताना बस मधून कोणीतरी स्त्री उतरली. तिचा चेहरा पलीकडे असल्याने मला काही दिसला नाही. पण तिचं पाठमोरं सौंदर्य अप्रतिम होतं. एखाद्या कलाकारानं एखाद्या साच्यातून सुंदर लावखणीची मुर्ती साकारावी त्या साच्यातील सुंदर मुर्तीच्या आकृती प्रमाणेच किंबहुना त्याहून सुरेख रेखीव शरीर होतं तिचं. तिच्या अशा पाठमोऱ्या सौंदर्याने मी मोहीत झालो. तिचा चेहरा पाहण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात प्रकट झाली. पण ती थेाडया वेळात माझ्या नजरेआड झाली. तसं माझं मन बेचैन झालं. मित्रांना कलटी मारुन मी बसस्थानकाच्या बाहेर आलो.

           ती मला रिक्षात बसताना ओझरतीच दिसली. तिचा चेहरा मला काही दिसला नाही. मी पटकन गाडी काढली अन् रिक्षाचा पाठलाग करु लागलो. रिक्षाच्या बरोबरीनं जावून तिचा चेहरा पहावा तर रस्ता अरुंद होता. शिवाय रस्त्यात खुप गर्दी होती. रिक्षा थेाडा वेळ डोळयाआड होताच माझं मन बेचैन होत होतं. पुन्हा मी वेगानं गाडी चालवून रिक्षाला गाठत होतो. रिक्षावाला पण जोरात रिक्षा पळवत होता. एखादा शिकारी जसा आपलं सावज टिपण्यासाठी तीक्ष्ण नजर ठेवतो. त्याप्रमाणे मी रिक्षावरली नजर किंचीतही ढळू देत नव्हतो. रिक्षा शिवाजी महाराज चौकात आला. तेवढयात माझा मित्र सच्या रस्त्याच्या कडेला उभा राहिलेला दिसला. त्याच्यासाठी थांबावं तर रिक्षा डोळया समोरुन नाहीसा होईल. अन् मग मला त्या सुंदरीचा चेहरा दिसणार नाही. या विचारात मी त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं तरी त्यानं मला बघीतलचं. आणी तो मला मोठयानं हाका मारु लागला. तेव्हा तर मी मुद्दाम वेग वाढवला.

           रिक्षा आता एका जागेवर थांबला त्या सुंदरीनं पैसे काढून रिक्षावाल्याला दिले मी रिक्षाच्या मागेच थांबलो पण तिचा चेहरा पलीकडे असल्यामुळे मला ती दिसु शकली नाही. ती सुंदरी आता एका बोळीतून चालू लागली. मी पण रस्त्याच्या बाजूला गाडी लावली, व ती कुठं जाणार? तिचं घर कुठं आहे? याबाबत माझ्या मनात कुतुहल जागं झालं. मी तिच्या मागं मागं चालू लागलो. चालता चालता तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळू लागलो. तिचं ते पाठमोरं सौंदर्य पाहूल माझं मन आणखी तिच्याकडे आकृष्ट झालं.

           मी तिच्या पुढं जावून तिचा पाहू शकलो असतो पण मला तिचं घर माहिती करुन घ्यायचं होतं. म्हणून मी तिच्या गतीनचं तिच्या मागेच चालत होतो. तेवढयात माझे वडील मला समोरुन येताना दिसले. आता मला कुठं चाललास म्हणून विचारतेल? यामुळं मी पटकन एका किराणा दुकानात शिरलो. सुदैवानं माझ्या वडीलांनी मला पाहिलं नव्हतं. तेवढयात दुकानदारानं मला विचारलं काय देवू? काही घ्यायचं नसताना मी असेच दोन चॉकलेट घेतले. वडीलांना थोडं दूर जाऊ दिलं. पुन्हा इकडं रस्त्याकडं पाहिलं तर ती सुंदरी अदृश्य झाली होती माझ्ं मन बेचैन झांलं. त्या रस्त्यानं मी जोरात चालू लागलो. सुदैवान ती मला रस्त्याच्या उजव्या बोळीत शिरताना दिसली. त्यामुळे काहीतरी हरवून गवसल्यावर जसा आनंद व्हावा. तसा अनंद मला त्याक्षणी झाला.

           तिच्या जवळ जाईपर्यंत मी चालण्याचा वेग वाढवला. तिच्या जवळ जाताच तिच्या सारख्या गतीनं थेडया अंतरानं मी चालू लागलो. वाटेतला प्रत्येक माणूस तिला पाहत होता त्यावरुनच तिच्या सौंदर्याचा अंदाज लागत होता. थोडं अंतर चालून गेल्यावर ती आणखी डाव्या बोळीमध्ये शिरली आणी माझ्या मनात तिच्याविषयी आणखी कुतुहल जागं झालं. कारण ती ज्या बोळीमध्ये शिरली होती. ती बोळी देहविक्रय करणाऱ्या वेश्यांची होती. मनामध्ये आलं इतकी सुंदर असणारी स्त्री या मार्गाला कशी आली असेल?

           ती तर त्या बेाळीमध्ये शिरली होती. पण मला आत जावं असे वाटेना? जर मला कोणी इथं पाहिलं तर लोक काय म्हणतील? सगळीकडं आपली बदनामी होईल? हे विचार माझ्या मनात आले पण तिचा चेहरा पाहण्याच्या कुतुहलापोटी मी इकडं तिच्याकडं पाहत तिच्या मागं मागं चालू लागलो. तेवढयात मला वडीलांचा फोन आला बहुतेक त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली गाडी पाहिली असावी. मी पहिल्यांदा फोन उचलला नाही. परत त्यांचा फोन आला. आता जर नाही उचलला तर घरी गेल्यावर बोलणे खावे लागतील. म्हणून मी फोन उचलला. त्यांनी एकाच दमात मला तीन प्रश्न विचारले, “कुठे आहेस? फोन का उचलत नव्हता? अन गाडी इथं रस्त्यात का लावलीस?” आता तिन्ही प्रश्नांचं काय उत्तर द्यावं? हे मला कळेना. तरी मी म्हणलं, “मी इकडं मित्राच्या घरी आलो आहे, गाडी लावली इथून जवळच मित्राचं घर आहे.” तेवढयात वडील म्हणाले, “बरं पटकन ये बरं इकडं, मला जरा महत्वाचं काम आहे, गाडी पाहिजे.” आता काय करावे? मला काही सुचेना “बरं येतो.” म्हणालो,आणी फोन ठेवून दिला.

           एक मन म्हणत होतं. आपले वडील आधीच रागीट स्वभावाचे आहेत. आणी आपण तर गाडी जेथे लावली तेथून बऱ्याच अंतरावर आहोत. आपण जर लवकर नाही गेलो तर वडील चिडतील. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे त्यामुळे त्यांना पटकन गाडी पाहिजे आहे. त्यामुळे आपल्याला पटकन तिकडं गेलच पाहिजे. तर दुसरं मन म्हणत होतं, जिचा चेहरा पाहण्यासाठी आपण इतक्या लांब आलो अहोत. तो सुंदर चेहरा पाहता नाही आला तर त्या गोष्टीची रुखरुख आपल्या मनाला लागून राहील. मनाची अशी द्विधा मन:स्थिती असताना काही झालं तरी तिचा चेहरा पाहूनच परत जायचं असं ठरवलं. अनं मोबाईल बंद करुन टाकला.

           मी झपाझप पावलं टाकीत तिच्या जवळ गेलो.तिचा चेहरा पाहणार तितक्यात आमच्या गल्लीतले आंबट शैाकीन रम्या आणी जन्या मला समोरुन येताना दिसले. तेवढयात मी पटकन एका खोलीत शिरलो. त्या खोलीमध्ये दहा-पंधरा सुंदर मुली गिऱ्हाईकाची वाटच पाहत होत्या.मला पाहताच त्या छेडू लागल्या. एक दोघी जणी तर अंगाला खेटु लागल्या. मला असला कधीच अनुभव नव्हता. तशा प्रकारानं माझं हदय जोरजोरानं धडकु लागलं. तेवढयात माझ्या दुर्देवाने रम्या आणी जन्या त्याच खोलीत आले. त्यांनी मला पाहिलं अन् मला म्हणाले, “का?, संदीपराव, इकडं कसा काय?वाट चुकले काय?” मला काय बोलावे सुचेना. मी काही न बोलता तेथून पटकन पळ काढला. रस्त्याला आलो तर जिच्यासाठी जिवाचा आटापिटा केला ती पुन्हा अदृश्य झाल्याने मी अजून निराश झालो. पण मी तिला पाठीमागून पाहिलं होतं. तिच्या पाठमेाऱ्या आकृतीवरुन व तिच्या लाल साडीवरुन मी तिला ओळखु शकणार होतो. मी तिला पाहिल्या शिवाय परत जायचचं नाही असे ठरवून तिचा शोध घेऊ लागलो. मी त्या गल्लीतल्या प्रत्येक खोलीत जावून तिला शोध घेऊ लागलो. आणी शेवटी एका खोलीमध्ये मला ती दिसली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरुनच मी तिला ओळखलं हिच ती सुंदरी जिच्यासाठी आपण एवढी धावपळ केली. माझ्ं मन आनंदून गेलं. आता तिचा चेहरा पाहण्याची वेळ आली होती. मी तिच्याजवळ गेलो आणी तिचा चेहरा पाहिला. क्षणभर काय करावं मला सुचेना. कारण जिचा पाठमोऱ्या सौंदर्याने मोहीत होवून मी चेहरा पाहण्यासाठी एवढी धडपड,धावपळ केली ती सुंदरी नसून एक तृतीयपंथी होता.

           मी तात्काळ तेथून पळ काढला. त्या गर्दीतून उडून पटकन बाहेर पडावं असं वाटु लागलं. मी जोरानं पळत सुटलो. अचानक मला वडीलांची आठवण झाली. ते तिथं माझी वाट पाहत उभे आहेत. मनामध्ये एक एक विचार येऊ लागला. रम्या आणी जन्यानं आपल्याला इथं पाहीलं ते नक्कीच आपलं नाव वडीलांना सांगणार सगळया गल्लीत आपली बदनामी होणार आपण काही केलं नसताना उगाच आपण बदनाम होणार. माझं मन माझ्यावर चिडलं होतं. फक्त एक चेहरा पाहण्यासाठी आपण आपला मित्र एवढचं काय आपल्या वडीलांकडेही दुर्लक्ष केलं होतं. आता वडीलांना काय उत्तर द्यावं याच विचारात मी चालत होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy