STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

पार्थ..

पार्थ..

1 min
177

    भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. देवाचे आपल्या या भक्तांवर विलक्षण प्रेम होते. अर्जुनाजवळ असे काय होते की ज्याच्यामुळे त्याच्यावर देवाधिदेव सदैव प्रसन्न असायचे ? त्याच्या नावातच या रहस्याचा उलगडा व्यास महर्षींनी केलेला आहे.

    ऋजुता म्हणजे सरळपणा , यालाच आर्जव असा दुसराही शब्द आहे. ज्याच्याजवळ मनाचा सरळपणा आहे ; किंचितही आत-बाहेर किंवा वाकडेपणा नाही अशा संपूर्ण सरळ मनाच्या व्यक्तीला अर्जुन असे म्हणतात. अर्जुन म्हणजे सरळ मनाचा मनुष्य. अशी सरळ मनाची माणसे देवाला खूप आवडतात.

    राधेने एकदा मुरलीला विचारले , " काय ग ! तू अशी काय पुण्याई किंवा तपस्या केलीस कि ज्याच्यामुळे देव तुला सदैव आपल्याजवळ बाळगतात ? " मुरली म्हणाली , " काही नाही. पण तू एकदा मला निरखून पारखून बघ. तुला काही आढळते का ? राधेन मुरलीला नीट निरखून पाहिली. काय आढळणार तिच्यात ? मुरली म्हणजे पोकळ नळी , आतून संपूर्ण पोकळ , अगदी सरळ , दुसरे काही नाही. मुरली म्हणाली , " माझ्यात तुला काही ' ' विशेष ' आढळलं का ? राधेने ' नाही ' म्हणून उत्तर देताच मुरली म्हणाली , हेच रहस्य आहे. मी आतून पोकळ आहे. माझ्या अंतरंगात काहीही किल्मिष , कल्पना अथवा स्वतःचा विचार नाही. म्हणून देवाने मला सतत आपल्या सान्निध्यात ठेवलं आहे. याशिवाय , मी सतत देवाच्या हातात निमूटपणे पडून राहते. काही चुळबुळ करीत नाही. त्यामुळे मी देवाला खूपच आवडते आणि तो माझ्यातून सुरेल संगीताचे स्वर काढतो.


जय श्री कृष्ण


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational