Kavita Mahamunkar

Inspirational

3  

Kavita Mahamunkar

Inspirational

पारिजात

पारिजात

2 mins
189


शुभ्र केशरी रंगाचा लेऊनी साज

माझ्या अंगणी फुलला पारिजात

 सडा पडला साऱ्या अंगणात

सुगंध पसरला साऱ्या परिसरात.


   माझं बालपण गावीच गेलं .आमच्या परसदारी विविध पुलझाड असायची,सकाळी सकाळी परसदार उघडला की विविध फुलांनी नटलेला परस मनाला ताजतवान करून टाकीत असे,हिरव्यागार पानातून डोकावणारी विविधरंगी फुल...जस

अनंत,मोगरा,अबोली,गुलाब आणि पारिजात डोळ्यांचं पारणं फेडणार सौंदर्य....सगळ्यांचा संमिश्र असा सुगंध हवेत दरवळत असे...किती आल्हाहदायक वातावरण ....

    पावसाळ्यात तर ते अजूनच सुंदर दिसत असे...सगळीकडे हिरवळ आणि त्या हिरवळीवर पावसाचे थेंब ..जणू हिरे चमकल्यावाणी चमकत असत ... पावसाळ्यात माझं लक्ष वेधून घ्यायचं ते पारिजातकाच झाड.. रोज सकाळी शुभ्र फुलांचा सडा पडलेला असायचा.

    आई देवाला वहायला फुले आणायला सांगायची, पारिजातकाची फुले वेचीत असताना राहून राहून वाटायचं...किती नाजूक आणि सुंदर मनाला तजेला देणारी फुल आहेत.... चिखलात पडलेली ती शुभ्र फुलं पाहून मनाला उगाच हळहळ वाटायची...क्षणभुंगुर आयुष्य आहे या फुलांचा...अस म्हणतात फुलांच्या पाकळ्या गळल्या की त्यांना मरण येत...काही फुलं पार कोमेजेपर्यंत झाडावरच असतात,मग या फुलांच काय...?उमलून किती काळ लोटला असेल... का अस झाडांनी अंग झटकाव आणि एका क्षणात त्यांना आपल्या पासून दूर करावं. का भार झाला असेल या नाजूक फुलांचा त्याला...त्या वयात हे सगळं समजण्याच्या पलीकडं होत.

  लग्न ठरल्या पासून जेव्हा जेव्हा मी पारिजातकाची फुल वेचायला जायची ..मला माझं जीवन ह्या फुलांन प्रमाणेच आहे असं वाटू लागलं...आता सासरच ते तुझं घर म्हणून एका झटक्यात सगळ्यांनी मला परकी केली अस वाटायचं....

    एकदा देवपूजा करताना आईनं बोलावून घेतलं, आणि म्हणाली बघ तू वेचलेली पारिजातकाची फुल किती छान दिसत आहेत मंदिरात ...झाडाला कितीही वाटलं ना तरी तो कायम स्वरूपी त्यांना जवळ बाळगू शकत नाही ..आणि चिखलात पडलेली फुले किती काळ टिकणार ..पायदळी तुडवली जाणार .. त्यांना देवाचारणी वाहिल्याने त्यांचं जीवन सार्थकी लागलं..बरोबर ना!

   मुलींचं जीवन ही अगदी तसच असतं ,या फुलान प्रमाणे ...एकेठिकाणी वाढायच आणि दुसऱ्या ठिकाणी सजायचं ...ही सजा नव्हे मुळीच..! या फुलांच्या सुगंधा प्रमाणे दोन्ही घरांना सुगंधित करायचं असत. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational