Kavita Mahamunkar

Others

2  

Kavita Mahamunkar

Others

सप्तपदी

सप्तपदी

1 min
153


सप्तपदी चालताना थोडीशी घाबरलेली,बावरलेली ती...... आजूबाजूला चाललेला गोंधळ गडबड जस काही तिच्या कानीच नाही.... ब्राम्हण एक एक मंत्र उच्चारतोय ,प्रत्येक फेऱ्यागणिक तिचा माहेरशी असलेला बंध सैल होतोय.....


एका अनोळखी माणसासाठी वचनावर वचन देत त्याच्या पाठीमागून चालत आहे.फोटोग्राफर कुठला अँगल पकडू याचा विचार करत आहे.ताई थोडं हसा ना! ताईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. ..आज पासून आपल्याला नवरा नावाच्या अनोळखी माणसासाठी जगायचं आहे.

   सातफेरे घेताना प्रत्येक फेऱ्या मागे एक वचन देत आहे 'मी अस करीन' 'मी तस करीन'अमुक,तमुक ह्या मध्ये "मी" कुठे आहे, मी माझ्यासाठी काय करणार आहे ह्या पुढे.....

 

प्रत्येक वचनाचा अर्थ पाहिला तर..... पतीसाठी..…..कुटुंबासाठी....त्याचा वंश पुढे चालवण्यासाठी...ती वचनबद्ध होत आहे.मनात विचारांचं काहूर माजलं आहे...स्वतःला त्याच्या साच्यात ढाळण्याचा प्रयत्न चालू आहे,मधेच हॉल भर नजर फिरवीत पाहत आहे,बहिणीला करवली बनून मिरवताना, आईवडिलांना सगळ्यांना हात जोडताना,भावाला सगळ्यांची उठाठेव करताना,हे सगळं करत असताना ओठांवर हसू पण ठेवायचं आहे...आणि ही सप्तपदी मला रोज चालायची आहे हे मनावर बिंबवत आहे.


  आणि हळूहळू दुधात साखर मिसळावी तशी ती त्याच्या आयुष्यात मिसळून जाते. विवाह संस्कारात सात पावलं चालून सात जन्म निभावून नेण्याची ताकद आहे.जशी आई आपल्या बाळाला न बघताच त्याच्यावर त्याच्या जन्माच्या आधि पासूनच त्याच्यावर प्रेम करू लागते,त्याच कारण त्याची नाळ तिच्या बरोबर जोडलेली असते,तिच्या रक्ता मासापासून बनलेला तिचाच अंश,पण इथे सात जन्म एकाच माणसासाठी जगण्याचा "पण"हे 'तीच' 'त्याच' समरस होऊन जाणं ,हे समर्पण एकमेकांसाठीच म्हणजेच .....सप्तपदी


   आणि तिच्या,त्याच्या त्यागाची,समर्पणाची जाणीव असणं, एकमेकांच्या जाणिवेची जाणीव असणं म्हणजे संसार.......तिथे कुठलीच उणीव असता कामा नये.


Rate this content
Log in