STORYMIRROR

Kavita Mahamunkar

Others

2  

Kavita Mahamunkar

Others

ओघळणारा दव

ओघळणारा दव

1 min
33

पहाटेच्या गारव्यात हिरव्यागार गालिच्छावर पसरलेलं धुकं पाहिलं की जणू अवनी नवतरूणीगत भासते, तीचं हे लोभस रूप डोळ्यांना किती सुखद अनुभव देतं.लवलवणाऱ्या पातींवर सोनपीवळी किरणे,श्रावणातील हे विलोभनीय दृश्य पाहून मन अगदी हर्षुन जातो.

ऊन पावसाचा लपंडाव वाऱ्यासंगे डोलणारी वनराई ,हिरव्याकच पानावर पडलेले दव बिंदू जणू मोत्या प्रमाणे चमकतात.

*अळवावरच्या पाण्यात*

 *थोडाच वेळ चमकला*

*शिंपल्यातील मोती*

 *कुणी नाही बघितला*.

अधून मधून येणारी पावसाची सर कौलांवर पडणारे पाण्याचे थेंब पागोळीवरून खाली सरकताना ताला सुरात थबकतात.

*टपटप कौलांनवर थेंब* *पावसाचा हळूहळू घेई ठाव हा मनाचा*.


*सरीवर सरी सरसर पडती पागोळीवर पागोळीच संगीत पावसाच्या तालावर*.

पहाटे फुललेला प्रजक्तांचा सडा दवात न्हाऊन निघतो.

डोंगर दऱ्यांवर पसरलेली धुक्याची चादर ,हळुवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी नुसार तिचं बदलणार रूप.


*किती वर्णावा तो श्रावनाचा थाट धुक्यातुन वाटे सापडू नये वाट*


*ओघळणाऱ्या दवात अवघी अवनी न्हाली धुक्याची चादर ओढून आली पहाट आली.*


पहाटेच्या प्रहरी दवात न्हालेलं धरेचं हे मलमली तारूण्य सूर्याला ही आकर्षित करत बहुतेक म्हणून तो सोन पिवळ्या किरणांनी अजून तिला नटवतो.


Rate this content
Log in