Avni Khandale

Crime Inspirational Thriller

4  

Avni Khandale

Crime Inspirational Thriller

ओली बाळंतीण भाग ३

ओली बाळंतीण भाग ३

9 mins
328


       

      संपुर्ण केबिन मधे शांतता पसरली होती . तिथल्या प्रत्येकाचे एकमेकांसोबत खूप जवळचे संबंध होते. तेच एकमेकांसाठी एकमेकांची फॅमिली होते. इतक्या दिवसांनी आपल्यातल्या एका ऑफिसरला मरणाच्या दारातून सही सलामत बाहेर आलेलं पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला होता. पण तरीही इमोशनल होणं त्यांच्यासाठी अलाऊड नव्हतं.

     तिथल्या प्रत्येकासाठी त्यांची डुटी, त्यांची देशनिष्ठा आणि त्यांचा देश सगळ्यात जास्त महत्वाचे होते.


     शेवटी शांततेचा भंग करत चिफ नी बोलायला सुरुवात केली.

      

      " सो मिस ओजस्वी , तुमच्या केअरलेस वागण्याचे काही एक्सप्लनेशन आहे तुमच्याजवळ ?" डेविड

      " माझ्या नेमक्या कोणत्या स्टेप ला केअरलेस हा टॅग लावला जात आहे ते मला कळेल का सर ?" ओजस्वी.

       " स्वतःला आणि परिणामी देशाला संकटात टाकण्याची जी चूक तुमच्याकडून झाली आहे तो केअरलेसपणा नव्हता तर काय होतं?" डेविड

       " संकट? मी तिथून सुटून आज आठ दिवस झाले आहेत. अद्याप तरी ना माझ्यावर कोणतही संकट ओढावल आहे ना देशावर सर! " ओजस्वी

 

      "ओह रिअली ? तुझा फोटो प्रत्येक सिरिया पोलिस च्या मोबाईल मध्ये आहे आज. तो इस्राईल पोलिस पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. "  डेविड आता थोडे रागात बोलत होते.


     " एका फोटोवरून जर आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य असतं तर मग आम्ही रॉ च्या स्पेशल ग्रूप चा पार्ट असण्याला काय अर्थ आहे सर ?" ओजस्वी.

      " आलराईट!" डेविड नी सुस्कारा सोडला आणि पुढे बोलु लागले

" प्रत्येक बाबतीत ओव्हर कॉन्फिडेंट असणं ठीक नाही ऑफिसर. या मिशन साठीच मी तुला पुर्वीच नको म्हणलो होतो. तरी देखील तुम्ही सर्वांनी माझ्या गैरहजेरीचा फायदा घेत तुम्हाला हवं तेच केलं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्सच नडला ." डेविड


      " आय एम वेरी सॉरी फॉर दॅट सर ." ओजस्वी

      " आय वॉन्ट एक्सपलनेशन फॉर युवर एव्हरी मिस्टेक ." डेविड

     " सॉरी टू से सर बट या माझ्या मिस्टेक आहेत असे तुम्हाला वाटत असेल पण माझ्यासाठी मात्र विचार करून टाकलेल्या स्टेप्स होत्या." ओजस्वी


     " वेल ! आय वॉन्ट एक्स्पलनेशन फॉर युवर स्टेप्स ." डेविड.

    " शुअर सर ." ओजस्वी

    " गो अहेड ." डेविड


   " सर.... ८ महिन्यापूर्वी मला अचानक समजलं की मी प्रेग्नेंट आहे. इट वॉज नॉट अट ऑल प्लॅनड. आय वॉज

डॅम् शुअर दॅट आय वॉन्ट टू अबॉर्ट धिस बेबी.

   पण मी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच मला न्यूज मिळाली की या बाळाचा डॅडा, माय लव अँड चाईल्डहूड फ्रेंड इज नो मोअर.

   रक्षित त्यावेळी याच सिरीयन मिशन वर काम करत होतो. पण आपल्याच देशातील काही वरच्या पदांवरच्या गद्दारांमुळे त्याचा जीव गेला.

      या न्यूज नंतर तुम्ही अर्जंट मीटिंग बोलावली आणि या कामासाठी करण ला अपॉईंट केलं. त्याचवेळी मी तुम्हाला मला बेबी हवं आहे हा डिसिजन सांगितला होता.

 

     यू रिस्पेक्टेड माय डिसिजन पण तुमची एक अट होती. माझी डिलिव्हरी होऊन पुढचे सहा महिने होईपर्यंत मी पूर्णपणे रॉ आणि एस जी पासून लांब राहायचं. अँड आय वॉज कम्प्लेटली फाईन विथ इट." ओजस्वी


          " एस ! यू वेर कम्प्लेटली फाईन विथ इट. म्हणूनच तर मी तुला ही प्रेगनन्सी कॅरी ऑन करण्याची परवानगी दिली होती. पण माझ्या रजेच्या काळात तुम्ही आपापसात एक डिसिजन घेतलात आणि याची मला कल्पना सुद्धा दिली नाहीत. माझ्या गैरहजेरीत सिंघानियांनी एस जी ची जबाबदारी घ्यावी हा माझा डिसिजन चुकला असं जाणवून देताय का तुम्ही मला ?" डेविड आता खूप रागात दिसत होते.


           "शांत व्हा चिफ प्लीज. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणे असतात. " सिंघानिया डेविड ना समजावण्याचा प्रयत्न करत होते.


          " देन टेल मी द ब्लडी रिझन डॅमिट !" डेविड नी रागात आपला हात टेबल वर जोरात आपटला.


 " मी ३ च दिवसांपूर्वी रिजॉइन झालो आणि रिजॉइन झाल्या झाल्या हा एवढा मोठा मॅटर समोर आला आहे. आय हॅव कॅबिनेट सेक्रेट्रीएट अबाव्ह मी टू एन्सर. गिव मी द ब्लडी एक्सप्लनेशन्स. कम ऑन स्पीक अप !" डेविड चा राग वाढतच होता.


     "येस सर! तुमच्या अटीनुसार मी कॅबिनेट सेक्रेट्रीएटस ना माझ्या रजेचा आणि डिसिजन एक्सप्लनेटरी चा अर्ज दिला.

    त्यांच्या परमिशनने मी नेपाळ ला मुव्ह झाले. पुढचे किमान एक वर्ष मला माझ्या कॉन्टॅक्ट मधील प्रत्येक व्यक्ती पासून दूर, नेपाळ मधील 'शिवालय आश्रम' मध्ये राहायचे होते.

    दर महिन्याच्या २ तारखेला मला सूर्या किंवा सिंघानिया सर कॉल करतील व तिकडे सर्व ठीक असल्याचे कळवतील शिवाय मी देखील ठीक असल्याची खात्री करून घेतील . इट वॉज डिसायडेड इन युर प्रेझेंस ओन्ली ." ओजस्वी


       "येस, आय नो दॅट .". डेविड


      " ३ महिन्यापूर्वी मला सूर्याचा कॉल आला. माझ्यासाठी तो फक्त एक रूटीन कॉल होता कारण तो त्या महिन्याच्या २ तारखेचा होता.

     पण त्यावेळी सूर्या खूप काळजीत वाटत होता. बरीच रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने मला सांगितले की तुम्हाला मेजर हार्ट अटॅक आला आहे आणि तुम्ही हाॅस्पीटल मध्ये एडमिट आहात.

    

     हे सगळं आम्हा सर्वांसाठी शॉकिंग होत. तुमच्या बायपास नंतर सुद्धा बरेच हेल्थ कॉम्पलिकेशन्स असल्यानं डॉक्टर्स नी तुम्हाला सक्तीची रजा घेण्यास बजावले होते . शिवाय फोन वापरण्यास पुर्णपणे बंदी घातली होती. " ओजस्वी


   " नेहमी हॅप्पी गोइंग नेचर असणाऱ्या माणसाला अचानक आलेला अटॅक एस जी मध्ये कोणालाच पचला नव्हता. बऱ्याच इंवेस्टिगेशन्स नंतर सूर्या आणि विराटच्या हाती बरीच माहिती लागली . काही पाॅलिटीशन्सनी पाकिस्तानी टेररिस्टना हाताशी धरून तुमच्या विरुद्ध कट रचायला सुरुवात केली होती.

    त्यांच्याकडे तुमच्या प्रत्येक डेली रूटीनची इतंभुत माहिती होती. एस जी च्या चिफ बद्दल काही ठरावीक लोक सोडून कोणालाच जास्त माहीती नाही.

   इन्फॅक्ट तुम्ही खरे दिसता कसे हे देखील कित्येकांना माहीत नाही इतकी तुमची रूपे आम्ही आणि जवळच्यांनी पाहीली आहेत.

    पण इतकं सगळ सेक्युअर असताना देखील काही पोलिटीशन्स च्या मोबाईलवर , इतकंच काय काश्मीर आतंकी सुलेमानच्या लॅपटॉप वर देखील तुमचा फोटो आणि स्केच विराटला मिळाले. "   

ओजस्वी


       "व्हॉट?" डेविड आता सुन्नपणे ऐकत होते.

      

    " येस सर! तुम्हाला या गोष्टी इतक्या डिटेल मध्ये जरी माहीत नसल्या तरीही एक गोष्ट तुम्हाला पक्की समजली होती. "   ओजस्वीची नजर आता डेवीडवर रोखली होती.


     " माझा स्वतःचा मुलगा , माझ रक्त त्यांना जाऊन मिळालं होतं..." डेविड शून्यात नजर लाऊन म्हणाले.


       " एक्झॅक्टली सर! अँड दॅट वॉज द रिझन यू गॉट अ मेजर हार्ट अटॅक ." ओजस्वी


      " एस ते खरं आहे. " डेविड


   " तुमच्या डिस्चार्ज नंतर सुध्दा डॉक्टर्स नी अचानक तुमची तब्बेत अजून ही गंभीर असण्याबद्दल सांगणे, तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप पासून दूर करणे, कॅबिनेट कडून तुमच्यासाठी नर्स अपॉइंट होणे या गोष्टी आमच्या मनाला पटत नव्हत्या.

     पण तुमच्या जीवाची रिस्क आम्ही घेऊ शकत नव्हतो. कधी ना कधी तुम्ही रजा संपवून परत याल तेंव्हा आपण बाकी इंवेस्टिगेशन करू असे विराट आणि सूर्याने ठरवले. त्यामुळे तुमच्याकडे जे चालु आहे ते तसंच चालु राहू द्यायचं आणि तुमच्या मुलाला फक्त फॉलो करत राहायचं असं एकमताने ठरलं." ओजस्वी


     "अँड ?" डेविड ना सुद्धा आता बऱ्याच गोष्टी ऐकायच्या होत्या.


    " १५ दिवसांनी मला सूर्याचा पुन्हा कॉल आला. त्याने हे सगळे वृत्त मला सविस्तर सांगितले. तुमचा मुलगा धैर्य हा अगदी नॉर्मल वागायचा पण प्रत्येक चार दिवसातून एकदा मात्र त्याच्या वागण्यात खूप बदल जाणवून येत होता.

  तो बदल अगदी चार ते पाच तासांसाठीच असायचा. त्या काळात त्याला तुमचा, स्वतःच्या आयुष्याचा , या देशाचा भयंकर राग यायचा. पुन्हा चार ते पाच तासानंतर तो पुर्ववत येत होता. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नव्हती की तो काही स्त्रोतांकडून हीप्नोटाईज होत असावा.

    

    त्याच दरम्यान पुन्हा एक खबर एस जी ला मिळाली. ती म्हणजे सिरिया मिशन वर असणारा करण सुद्धा मारला गेला. त्याला मारण्याची पद्धत सुद्धा अगदी तशीच होती ज्या पद्धतीने रक्षितला मारल गेलं होतं.

       

       याचा अर्थ सरळ सरळ होता सर, एस जी च्या ऑपरेशनस बद्दल एस जी ची टीम, रॉ चे काही ऑफिसर्स आणि सेक्रेट्रीएटस चे काही लोक यांना सोडून बाकी कोणालाही माहिती नसते. पण तरीही आपल्या या आजपर्यंतच्या सर्वात महत्वाच्या मिशन वर कोण गेले आहे,कुठे राहते आहे, आणि कोणत्या वेशात आहे याची पुरेपूर माहिती आतंकवाद्यांना मिळत होती. हकनाक दोन व्यक्तींचे बळी गेले होते.

  

         देशासाठी स्वतःचा जीव कुर्बान करण्यासाठी आपण सगळेच नेहमीच तयार असतो सर पण या अश्या गद्दारांमुळे देशाच्या कर्तव्यनिष्ठ सैनिकांच्या जीवाशी खेळणे कितपत बरोबर आहे? काही पैशांसाठी किंवा एखाद्या पदासाठी हे असे गद्दार लोक कोणत्याही थराला जातात . फक्त आपल्यासारख्या सैनिकांच्याच नाही, तर देशातील प्रत्येक निर्दोष नागरिकांच्या जीवाशी ते खेळत असतात. ".  ओजस्वी


       " आणि म्हणून तू हे मिशन अनओफिसिअली करण्याचा निर्णय घेतलास ?" डेविड


       तिने नाही सर ! हा आम्हा सर्वांचा एकत्र घेतलेला निर्णय होता." सुर्या


      " एक्स्पलेन " डेविड ना परिस्थिती आणि त्यांच्या टीमच असं वागण्यामागच कारण कळत होतं पण वरच्या लोकांसमोर जर का ही गोष्ट व्यवस्थित मांडायची असेल आणि या अनओफिसिअल निर्णयाला विचारपूर्वक वळण द्यायचे असेल तर त्यांना ते नसताना घडलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय सविस्तर माहिती करून घेण्याची गरज होती. यासाठीच ते आपल्या टीम कडून एक्स्पलेनेशन मागत होते.


         "शुअर सर ! सर आधीच २ टीम मेंबर्स शहीद झाले होते. याचा अर्थ ऑफिसियल प्लॅन्स ची माहिती कोणीतरी बाहेर सांगत होतं. काय करावे हे कोणालाच कळत नव्हते, कारण पुढचा डिसिजन घेण्यासाठी आमचे हेड आमच्यासोबत नव्हते.

  तुम्ही या एस जी चा आधार स्तंभ आहात पण वेळ अशी होती की तुमच्याशी संपर्क करणे धोक्याचे होते. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार मॅडम नी तुम्हाला दिल्लीपासून बाहेर शांत ठिकाणी शिफ्ट केलं होत. आणि तुमच्या जीवसोबत खेळ करणं आम्हा कोणालाच मान्य नव्हतं.

      

        अश्यातच एका पासपोर्ट आणि स्टॅम्प मेकर बद्दल मला खबर मिळाली . तो नेपाळ मधे एका ठिकाणी असल्याची खबर होती. त्यासाठी मला आणि सूर्याला नेपाळला जावे लागणार होते.

    तुमची अवस्था आणि करण व रक्षित सोबत घडलेला प्रकार यांमुळे सर्वांनाच नकळतपणे एकमेकांची काळजी वाटू लागली होती. त्याच काळजीपोटी मी आणि सुर्याने ओजस्वीला भेटायचे ठरवले. अनायसे आम्ही नेपाळला जातच होतो आणि ओजस्वी तशीही कोणत्या मिशन वर नव्हती. आम्ही आधी आमचे काम आटोपून शिवालय आश्रमात जायचे ठरवले." विराट



       "त्या दोन तारखेला मला कोणाचाच कॉल आला नाही. मला वाटले पंधरा दिवसांपूर्वीच बोलणं झाल्यामुळे आणि कदाचित कामात बिझी असल्यामुळे कोणी कॉन्टॅक्ट केला नसावा.

      पण दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या एक मावशी अगदी पहाटे चार वाजताच माझ्या रूम ची बेल वाजवत होत्या. सकाळी उठण्याची वेळ पाच वाजताची असल्याने मी गाढ झोपेत होते. आवाजाने अचानक झोप मोड झाली . दरवाजा उघडला तर मावशींनी सांगितलं की माझे आजोबा आणि त्यांचे मित्र मनाली वरून मला भेटण्यासाठी आले आहेत.


     मी नेमका अंदाज लावू शकत नव्हते की नक्की आपल्या डिपार्टमेंट मधून कोणी मला भेटायला आले असेल की दुष्मनांच्या गोटातून कोणी आलं असावं. पण पाहणं तर गरजेचंच होतं.

  मी लगेच फ्रेश होऊन खाली गेले....." सांगता सांगता ओजस्वी च्या डोळ्या समोरून तो दिवस तरळुन गेला.



     पहाटेची वेळ होती. ओजस्वी ला गाढ झोप लागली होती. अचानक तिच्या कानावर बेल चा आवाज आला. दोन तीन वेळा बेल वाजली त्यामुळे ती खडबडून जागी झाली.

   तिने आपला मोबाईल चेक केला. पहाटेचे चार वाजले होते. आता या वेळेला कोण आलं असेल या विचारातच ती बेड वरून उठली.

    आता तिचा सातवा महिना संपत आला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांभाळून करावी लागत होती. दोन वेळा खोलवर श्वास घेऊन तिने स्वतःला शांत केलं आणि दरवाजा उघडला.

       दारात आश्रमाच्या बिंसा मावशी उभ्या होत्या. त्याही अर्धवट झोपेतून आल्या सारख्या वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव स्पष्ट दिसत होते. ओजस्वी देखील थोडी गोंधळली होती.


   "काय झालं मावशी ? तुम्ही आत्ता या वेळेला ? " ओजस्वीने नेपाळी भाषेत विचारले.


     " तुमची लोकं आमची झोपमोड करतात म्हणुन आम्हाला तुमची करावी लागते मॅडम!

   आश्रमात मनःशांती साठी यायचं असत तर मग येताना नात्यागोत्यातल्या लोकांनासुद्धा पत्ता सांगून कसे काय येता? तुमच्या सारखे शिकले सवरलेले लोकच असे वागायला लागले तर कसं चालेल?" बिंसा मावशींच्या तोंडाचा पट्टा थांबतच नव्हता.


     "मावशी... काय झालं आहे सांगाल का? मला समजेल अस काहीतरी बोला प्लीज ." त्यांचं बोलणं मध्येच थांबवून शेवटी ओजस्वीनेच विचारलं.


       "महत्वाची गोष्ट सांगायचीच विसरले मी... देवा..." बिंसा मावशींनी डोक्यावर हात मारून घेतला .


   " ते तुमचे दोन आजोबा आलेत तुम्हाला भेटायला ." बिंसा


  " आजोबा? तेही दोन ?" ओजस्वी विचारात पडली.


   " अहो मॅडम तुमचे आजोबा आणि त्यांचे मित्र मनालीहुन आलेत तुम्हाला भेटायला. चला लवकर खाली." बिंसा


   नेमकं कोण भेटायला आलं असेल आणि ते देखील इतक्या पहाटे या विचारात ओजस्वी हरवली होती. काहीच प्रत्युत्तर नाही हे पाहून मावशींनी तिला परत हाक मारली.

   

" मॅडम... येताय ना?". बिंसा


 " अं?....हा .. मी येते लगेच. तुम्ही व्हा पुढे." ओजस्वी विचार करत पुन्हा आत निघून गेली आणि मावशी खाली निघून गेल्या.


     आपल्याला भेटण्याकरिता शिवालयमध्ये जे दोन सो कॉल्ड आजोबा आलेत ते आपल्याच डिपार्टमेंट चे कोणी असतील की दुष्मनाच्या गोटातून कोणी आपल्यापर्यंत पोहोचले असेल याचा अंदाज ओजस्वी ला लावता येत नव्हता.

     सध्याची परिस्थिती पाहता तिचा असा गोंधळ उडणे व अतिविचार करणे साहजिक होते. आजकाल त्यांच्या डिपार्टमेंट चा कोण माणूस कोठे आहे, काय करतो आहे याची खडा न् खडा माहिती बाहेर पडत होती. त्यामुळे सध्या तिच्या जीवाला धोका असण्याची देखील शक्यता होती. विचार करत करत ती फ्रेश व्हायला निघून गेली.

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime