Avni Khandale

Crime Inspirational Thriller

4  

Avni Khandale

Crime Inspirational Thriller

ओली बाळंतीण भाग २

ओली बाळंतीण भाग २

7 mins
364




   ओजस्वी नुकतीच झोपून उठली होती. तिने स्वतःचा मोबाईल चेक केला तर सकाळचे ८ वाजले होते. सिंघानिया सरांकडे एकांत मागितल्यानंतर पुन्हा तिला तिथे कोणीही डिस्टर्ब करायला आले नव्हते.

    बराच वेळ लोटला होता. अंगात थोडी कणकण जाणवत होती. ती उठून बसली, थोडं पाणी पिल्यानंतर तिला बर वाटलं असावं...

  

पण आता मात्र तिला आपल्या बाळाला पाहण्याची ओढ सतावत होती. तिने लगेचच सिताबाईंकडे जायचे ठरवले. केबिन चा दरवाजा उघडताच तिला जाणीव झाली की ती इमोशन्स मधे अडकू शकत नाही किंबहुना तिला तसे वागणे अलाउड नव्हते.

  आपल्या सीनिअरस् ना आपण रिपोर्टिंग करणं आत्ता सध्या अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात येताच ती दरवाजातून मागे वळली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली.

       

   फ्रेश होऊन ओजस्वी ने सिंघानिया सरांना कॉल केला. २ कॉल केले तरी त्यांच्याकडून रिस्पॉन्स नाही म्हंटल्यावर ते कुठेतरी बिझी असतील असा विचार करून तिने एक टेक्स्ट मेसेज ड्रॉप केला

" I am better now. Waiting for you in your cabin."

मेसेज करून तिने मोबाईल ठेवून दिला आणि सरांची वाट पाहत खुर्चीत स्वतः ला झोकून दिले. अंगावर गरम पाण्याचा थोडा शेक मिळाल्यामुळे आज तिला फार बरे वाटत होते.

       तेवढ्यात एक नोकर तिच्यासाठी कॉफी आणि ब्रेकफस्ट देऊन गेला.

      

      " उम्म.. फेवरेट नाष्टा ....!

म्हणजे सडू सिंघानिया नी आधीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या आहेत तर ! How sweet !"

   खाता खाताच ती विचार करत होती . बऱ्याच दिवसांनी आवडीच अन्न पोटात गेल्याने पोटासोबत मनाची भूक सुद्धा भागली होती.

         

तासाभरातच सिंघानिया त्यांच्या केबिन मधे आले.

       " गूड मॉर्निंग ऑफिसर !"

    " गूड मॉर्निंग सर !" आज ओजस्वी चा चेहरा कालच्या पेक्षा कितीतरी बरा वाटतं होता. तिची स्माईल पाहून सिंघानिया च्या चेहऱ्यावर समाधान पसरले... ते ओजस्वी च्या नजरेतून सुटले नाही.

   " डोन्ट वरी . आय एम मच बेटर टुडे. " हलके हसत तिने ग्वाही दिली.

    " गूड टू नो . चिफ विल बी हियर इन अँन होर. त्यांच्या इंक्वारी ला तुला सामोरं जावं लागेल . " सिंघानिया

     " हो. मला कल्पना आहे त्याची. आय एम रेडी सर ." ओजस्वी

      "तुझा फोटो आता सीरियन पोलिस मध्ये देखील फिरतोय. प्रत्येकजण आता फक्त तुला पकडण्यासाठी धडपडतोय . "

         सिंघानिया आता थोडे काळजीत वाटत होते.

      " ओ कम ऑन! त्यांना जे हवं ते करू देत. मला पकडणं इतकं सोपं नाही हे तुम्हालाही माहीत आहे." ओजस्वी मोठ्याने हसत म्हणाली .

        "अच्छा! हे बोलणं आता तुला शोभत नाही ओजस्वी. विसरू नको काही दिवसांपूर्वी तूच त्यांच्या कैदेत होतीस . ते ही एक दोन नव्हे तर १५ दिवसांसाठी"  सिंघानिया तिरकस हसत म्हणाले.

       " हो. ते मी नाकारलं नाहीच आहे सर." ओजस्वी

     "तरीही तू असं म्हणतेस की तुला पकडणे त्यांना शक्य नाही?" सिंघानिया

   " हो! ती कैद नव्हतीच मुळी!" ओजस्वी

   " मग काय होत ते? " सिंघानिया

    " काही क्षणासाठी स्वतःची केलेली सोय " ओजस्वी ठामपणे म्हणाली.

     " दुष्मनाच्या गोट्यात?" सिंघानिया

    " येस सर! अस म्हणतात की सोनं जर चोराच्याच उशाखाली लपवून ठेवलं तर ते त्याला कधीच सापडत नाही . इट्स द सेफेस्ट प्लेस टू हाईड. आणि माझ्याकडे तर सोन्यापेक्षाही मौल्यवान काहीतरी होतं...."

       ओजस्वी च बोलण ऐकून सिंघानिया च्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली.

      " हे सगळ चिफ ना एक्स्प्लेन करू शकशील? " सिंघानिया

     " ऑफ कोर्स! आणि मला नाही वाटत त्यांना फार वेळ एक्स्प्लेन करावं लागेल. एकदा त्यांचा राग शांत झाला की ते सगळं ऐकून घेतील. आफ्टरऑल ही इज अ चिफ फॉर अ रीझन !"

     ओजस्वी चा कॉन्फिडन्स पाहून सिंघानिया ना समाधान वाटले. तिची कालची अवस्था पाहता ती इतक्या कॉन्फिडन्टली काही फेस करेल याची त्यांना शंका वाटत होती .

   " प्राऊड ऑफ यू !" ते ओघात बोलून गेले .

    "थँक यू ! ऐसेही हसते रहिये मिस्टर सिंघानिया ।

सेहत केलिये अच्छा होता है।"   ती हळूच त्यांच्या कानाजवळ म्हणाली आणि दोघांच्या हसण्याचा आवाज पूर्ण केबिन मधे पसरला. 

     चिफ यायला अजून तासभर वेळ असल्यामुळे ओजस्वी सिंघानिया ची परवानगी घेऊन आपल्या परी ला भेटण्यासाठी गेली.

    ग्राउंड फ्लोअर च्याच एका केबिन मधे सीताबाई व बाळाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती . ओजस्वी ने केबिन चा दरवाजा उघडून पाहिलं तर सीताबाई बाळाला तेलाने मसाज करत होत्या. सोबतीला त्यांच्या गोड आवाजातील अंगाई गीते सुद्धा चालूच होती . ते चित्र पाहून ओजस्वी क्षणभर दारातच थबकली.

        सीताबाईंचं लक्ष दरवाजाकडे जाताच त्यांनी हाक मारली .

"पोरी , दारातच का उभी आहेस? " 

ओजस्वी आत येऊन सीताबाई जवळ बसली .

     " सीताबाई तुम्ही केंव्हा आलात? " ओजस्वी चा आवाज आता त्या १० दिवसांच्या चिमुकलीला चांगलाच कळू लागला होता. तिचा आवाज कानावर पडताच तिने रडायला सुरुवात केली .

     " आधी हिला घे ." अस म्हणत सीताबाई नी बाळाला एका कापडात गुंडाळून ओजस्वी कडे दिले. ओजस्वीनेही

तिला गडबडीने जवळ घेऊन दूध पाजायला सुरुवात केली.

       " मागच्या महिन्यात सरांचा अचानक कॉल आला . म्हणाले तुमची अत्यंत गरज आहे . एक माणूस आणि पासपोर्ट पाठवतो , त्याच्या सोबत लगेच निघून या." सीताबाई म्हणाल्या

        " ओह! म्हणजे एक महिना झाला तुम्ही इकडेच आहात ." ओजस्वी

       "हो. सर म्हणाले होते तुम्ही डिलिव्हरी च्या आधी एक - दोन आठवडे इथे पोहोचाल पण सगळं विपरीतच झालं ." सीताबाईंच्या डोळ्यातले अश्रू ओजस्वी ला स्पष्ट दिसत होते.

     " चालायचंच सीताबाई. आम्ही दोघीही आत्ता सुखरूप आहोत हेच महत्वाचं. " ओजस्वी

     " हो ते आहेच . पण पोरी ,अश्या अवघडलेल्या अवस्थेत काम करण्याची काय जरुरत होती? बर तेंव्हा नाही ते नाही पण आत्ता तरी निदान विश्रांती घे. या चिमुकलीला महिनाभर तरी तुझ्या अंगावरच दूध पाज." सीताबाई कळकळीने सांगत होत्या.

      " सीताबाई , देशापेक्षा मोठं आणि महत्वाचं काहीही नाही आहे माझ्यासाठी. सध्या देशाला माझी गरज आहे. आणि या परीचं म्हणाल तर तुम्ही आहातच की हिच्यासाठी! तुम्ही असताना मला हीची काळजी नाही. " ओजस्वी.

   " अग पण पोरी ...ओली बाळंतीण आहेस तू ." सीताबाई काळजीने म्हणाल्या.

      " त्या आधी आणखी ही बरीच कर्तव्य आहेत माझी सीताबाई. आणि मी स्वतःला इतकी जपत बसले तर माझ्यासारख्या कितीतरी ओल्या बाळंतिणी त्यांचा जीव गमवून बसतील. हे तुमच्या इतकं दुसर कोणीही समजू शकत नाही."

ओजस्वी ने बोलता बोलता सीताबाई च्या खांद्यावर हात ठेवला आणि सीताबाई ना भरून आले. कदाचित भूतकाळातल्या बऱ्याचशा आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून तराळून गेल्या असाव्यात .

      "सीताबाई... आर यू ऑलराईट?" ओजस्वी च्या आवाजाने त्या भानावर आल्या . त्यांनी अलगद आपल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या.

     " आ....हो....ही बघा झोपली वाटतं." बाळाकडे पाहत त्यांनी विषय बदलला आणि हलकेच हसल्या.

    " अरे हो की!..." ओजस्वी ने देखील हसून तिला बाजूला केले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तेवढ्यात ओजस्वी चा मोबाईल वाजला.

    " चला मला निघायला हवं. दुपारी येईन ." तिने बाळाला सीताबाईंकडे दिले . पुन्हा एकदा तिला डोळे भरून पाहिले आणि लगेच सिंघानिया सरांच्या केबिन कडे निघून गेली.

      " देवा तुझी कृपा दृष्टी ठेव रे बाबा पोरीवर ." सीताबाईंनी वर पाहून हाथ जोडले आणि बाळाला अंघोळ घालण्यासाठी निघून गेल्या.


         सिंघानिया च्या केबिन मध्ये.......


" चिफ वर एम्बसी मध्ये आलेत. येतील च इतक्यात खाली." सिंघानिया

" या फाईन." पुढे काय बोलायचे आणि चिफ कनविंस होतील का या विचारात ओजस्वी आणि सिंघानिया दोघेही हरवले होते.



    तिकडे सीरिया मध्ये....

एका विश्वासू खबरी कडून सीरियन पोलिस ना अशीच हुबेहूब दिसणारी एक स्त्री लहान बाळाला घेऊन जाताना लेबनॉन च्या बॉर्डर जवळ तिथल्या लोकल लोकांनी पाहील्याची पक्की खबर मिळाली होती.

      त्यामुळे साहजिकच अहमद ने तासाभराच्या आतच त्याच्या पूर्ण चैन ला लेबनॉन बॉर्डर आणि आसपासच्या एरिया मध्ये तिचा शोध घेण्याच्या कामाला लावले होते.

या खबरी नंतर मात्र अहमद भलताच खुश होता . आता ती हिंदुस्तानी कमिनी काही आपल्या हातातून निसटून जाऊ शकत नाही याचा त्याला पूर्ण विश्वास होता. त्या खुशीत आज तो इतक्या दिवसांनी जेवला सुद्धा होता.

 

   पण तो हे विसरला होता की जिला तो शोधतोय ती खरंच एक हिंदुस्तानी आणि 'कमिनी' ऑफिसर होती. जिला त्याच्या स्वभावाचा आणि प्रत्येक संभाव्य चालीचा पुरेपूर अंदाज होता. म्हणून तर ती एक सच्ची देशभक्त होती आणि तो... तो फक्त एक हरामी टेररिस्ट ! म्हणून तर सध्या ती इंडियन एम्बसी मध्ये अगदी सुखरूप होती आणि तो मात्र तिला दुसऱ्या टोकाला. ..लेबनॉन च्या सीमेवर पूर्ण फौज घेऊन शोधत होता.


       त्याला खात्री होती ती सापडेल आणि तिला विश्वास होता की याच आंधळ्या खुशीत तो तिचा नको तिथे शोध घेईल आणि पुढचे निदान २ दिवस तरी दुसरे कोणतेही पाऊल उचलणार नाही .


         सीरियन पोलिसनी सुद्धा लेबनॉन च्या सीमेजवळ छापे मारायला , गाड्यांची झडती घ्यायला सुरुवात केली होती. या अचानक चालु झालेल्या प्रकारामुळे सीमा भागातील नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले होते.


     अहमद च्या लोकांनी तर आता ज्या ज्या घरातून लहान मुलांचे आवाज येतात , त्या त्या घरात डायरेक्ट घुसून तपास घ्यायला सुरुवात केली होती.

  

         टेररिस्ट आणि पोलिसांच्या या खेळात सामान्य जनता होरपळून निघत होती. ओजस्वी ला या सगळ्या गोष्टींचा अंदाज होताच. थोडा वेळ यांचा खेळ चालू द्यायचा आणि इकडं चिफ सोबत बोलणे झाले की मग आपल्या पद्धतीने या गोष्टी हॅण्डल करायच्या असे तिने आधीच ठरवले होते.

     

         त्यासाठी तिने लेबनॉन मधल्या तिच्या लोकांशी व खबऱ्यांशी आधीच कॉन्टॅक्ट करून ठेवला होता. सिंघानिया ना सुद्धा खात्री होती की त्यांच्या चेली च्या डोक्यात पुढचा पूर्ण प्लॅन तयार असेल . त्याशिवाय ती इथे येणार नाही....


अर्ध्या पाऊण तासाने एक पन्नाशीच्या आसपासचा सध्या वेशातील व्यक्ती दोन तरुणांसह सिंघानियांच्या केबिन मध्ये आला.


       त्या व्यक्तीला पाहताच सिंघानिया व ओजस्वी दोघांनीही त्यांना सॅल्यूट केले.

     सिंघानिया नी बाहेरच्या गार्डस् ना इशारा केला आणि पाच एक मिनिटात तो पूर्ण फ्लोअर मोकळा केला गेला.


आता त्या फ्लोअर वर फक्त पाचच लोक होते.


 स्पेशल ग्रूप (एस जी ) इंडिया चे चिफ मिस्टर डेविड.

  रॉ मिडल ईस्ट पार्टचे हेड अशोक सिंघानिया

    एस जी चे तीन मोस्ट इफिशियंट सीनिअर आणि प्राऊड ऑफिसर्स ....ऑफिसर विराट बक्षी , ऑफिसर सूर्या भोसले आणि एस जी, इंडिया मधील एकमेव महिला ऑफिसर ओजस्वी सिंघानिया .


      पूर्ण केबिन मध्ये शांतता पसरली होती . तिथल्या प्रत्येकाचे एकमेकांसोबत खूप जवळचे संबंध होते. तेच एकमेकांसाठी एकमेकांची फॅमिली होते.

   इतक्या दिवसांनी आपल्यातल्या एका ऑफिसरला मरणाच्या दारातून सही सलामत बाहेर आलेलं पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला होता. पण तरीही इमोशनल होणं त्यांच्यासाठी अलाऊड नव्हत. तिथल्या प्रत्येकासाठी त्यांची डुटी , त्यांची देश निष्ठा आणि त्यांचा देश सगळ्यात जास्त महत्वाचे होते....


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime