Avni Khandale

Crime Thriller inspirational

4.0  

Avni Khandale

Crime Thriller inspirational

ओली बाळंतीण - भाग १

ओली बाळंतीण - भाग १

8 mins
245


     नेहमीच आतंकवाद्यांचा सुळसुळाट असणाऱ्या कितीतरी देशांपैकी एक म्हणजे सीरिया. सतत हल्ले होत असणाऱ्या या देशात आतंकवाद्यांना आपला खेळ मांडणं अगदी सोयीचं होतं. याच देशात भारताचा शेजारी देश पाकिस्तान मध्ये तयार झालेल्या आतंकवाद्यांची देखील खूप मोठी चैन होती. इथे बाहेरील देशात राहून हे आतंकवादी नवनवीन लोकांना तयार करत होते. शिवाय भारताला नेस्तनाभूत करण्याच्या वेगवेगळ्या योजना देखील इथेच बनवल्या जात होत्या आणि इथेच त्यांना खतपाणी देखील मिळत होते.


    याच पाकिस्तानी आतंकवाद्यांचा म्होरक्या होता अहमद. याचं फक्त एकच स्वप्न होतं लहानपणापासूनच.... भारताची बरबादी. 

आता तो भारताचा इतका तिरस्कार का करत होता याच कारण मात्र आजवर कोणालाही कळलं नव्हतं.


कदाचित काही कडू-वाईट अनुभवल्यानंतर किंवा कदाचित बालवयात झालेल्या गैरसमजामुळे.....

  


  आज मात्र या अहमद भाईच्या अड्ड्यावर एकच गोंधळ माजला होता........


    "भाई.....भाई...."

     

   "क्या हुआ अब्दुल ? तू इतना डरा हुआ क्यू है?"


   "अहमद भाई ... वो...वो....."


   "क्या वो ..वो... कर रहा है ? जल्दी बक! क्या मांजरा है ?"

  

   "अहमद भाई ....वो औरत कही मिल नही रही है भाई ।" अब्दुल


   "कौन सी औरत ? इतना डर के क्यू बता रहा हैं ? " अहमद


    "भाई वो ...वो जो हमने अपने वेयरहाउस पे रखी थी वो हिंदुस्तानी औरत "    अब्दुल


    "वो हिंदुस्तानी? अरे क्या मतलब है कही मिल नही रही ? "

  अहमदच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. अब्दुल ला आधीच याची कल्पना होती. आता आपले काय होणार या भीतीने त्याचे पाय लटपटत होते. 


    "भाई ,मैंने सब जगह ढूंढा । वो साली कही भी नही हैं । लगता है वो भाग गयी ।" 

   

अब्दुल चे हे बोलणे ऐकून मात्र अहमद ने आता रागाने त्याच्या डोक्यावर आपली बंदूक लावली. 


     "भाग गयी? पागल हो गए हो तुम ! अरे 2 दिन हो गए उसने एक बच्चे को जन्म दिया हैं। ऐसे हालात में एक औरत कैसे भाग सकती हैं? वही होगी वो कमिनी , ढूंढो उसे। अपने सारे आदमियोंको काम पे लगालो ।" अहमद


    "हा ...हा भाई " अब्दुल


    "जाओ....जब तक वो नही मिलती,तब तक हमारे नजरोंके सामने मत आना ।" अहमद जोरजोरात ओरडत होता. अब्दुल तसाच तिथून पळत निघाला.


    आता आणखी काही वेळ अहमद जवळ थांबणं म्हणजे आपल्याच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे हे त्याला कळून चुकलं होतं. त्याने अहमदच्या अड्यातून बाहेर पडताच आपलं नेटवर्क ॲक्टीवेट केलं. एक आत्ताच आई झालेली स्त्री आपल्या बाळाला घेऊन फार

दूरवर नाही जाऊ शकत . ती एक तासभरातच आपल्याला सापडेल याची अब्दुलला खात्री होती. त्यामुळे त्याने आपल्या लोकांना इंस्ट्रक्शन्स दिल्या आणि बार मध्ये निघून गेला. 

      

   पण दुसरीकडे अहमदला मात्र जेवण जात नव्हते, त्याची झोप उडाली होती. जी पळून गेली तिला पुन्हा पकडने एवढी साधी गोष्ट नाही . आणि ती जर का पुन्हा तिच्या घरी पोहोचली तर मात्र त्याचं आणि त्याच्यासारख्या कितीतरी आतंकवाद्यांच दुकान कायमच बंद व्हायला वेळ लागणार नाही याची त्याला पुरेपूर जाणीव होती. 

    

   तिची इतकी भीती अहमदच्या मनात बसली होती की तो अब्दूलला दर ५-५ मिनिटाला फोन करून तिच्याबद्दल विचारत होता. त्या टेन्शन मध्ये आज चक्क तो नाबालिक मुलींना त्रास देण्यासाठी म्हणून जनानखान्यात सुद्धा गेला नव्हता. 


     आज दोन दिवस झाले होते. अब्दुलच्याच काय पण खुद्द अहमदच्या प्रयत्नांना सुद्धा यश आले नव्हते. सीरिया मधल्या अहमद सारख्याच कितीतरी पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या अड्ड्यावर एकच गोंधळ चालु होता. त्यांच्या कोणाच्याच नेटवर्कला ती सापडत नव्हती. पूर्ण सीरिया आणि आजूबाजूच्या देशात तिचे फोटोज् पसरवले गेले. प्रत्येक आतंक्याच्या डोक्यावर आता एकच जबाबदारी येऊन पडली होती....त्या स्रीला शोधणे . प्रत्येकजण हातातले काम सोडून त्या एकाच गोष्टीच्या मागे लागले ही होते. कारण अहमद भाईला नाही म्हणायची हिम्मत कोनामध्येच नव्हती. 


      अहमदच्या अड्ड्यावर.....


    " दो दिन हो गए । अपने ना कुछ खाया है ना पिया है ।"    अहमदची माशुका त्याच्यासाठी जेवणाच ताट घेऊन आली होती. 


   " मुझे भूख नहीं हैं।" अहमद रागात होता. 


   "ऐसे कैसे भूख नहीं हैं? थोड़ा खा लो , एक मामूली औरत के लिए इतना परेशान कब से होने लगे आप!" 


   "मामूली औरत? मामूली मामूली केहकर ये साले आराम से बैठे रहे और वो कुतीया हमे ही घोड़े लगाके चली गयी।" आत्तापर्यंत अहमद ने तिच्या हातातले जेवणाच ताट उडवून लावलं होतं. त्याची माशूका घाबरून आत निघून गेली होती आणि अहमद मात्र पुन्हा एकदा हताश होऊन त्याच्या बैठकीवर बसला होता.


 " सालो! मुझेही उसपे नजर रखनी चाहिए थी । मामूली समझकर नजरंदाज किया। वो इतनी चालू निकली की उसने आजतक अपना नाम तक पता नहीं लगने दिया हमे। कहा जा सकती है २ दिन के बच्चे को लेकर । " अहमद त्याच्याच विचारांमध्ये हरवला होता . 





  ८ दिवसांनी ......इंडियन एम्बसी इस्राईल मध्ये....



     पहाटेचे ३ वाजता एक २३-२४ वर्षांची मुलगी हातात एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन एम्बसीच्या बॅक गेट मधून एंटर करते. काही क्षणासाठी तिथला गार्ड गोंधळून जातो पण काहीच क्षणासाठी.... तिच्या हातातील कार्ड पाहताच तिला तिथले चारही गार्ड आदराने तिला सल्यूट करतात.


    एम्बसीचा नाईट स्टाफ तिला पाहून चक्रावतो . हातात एक लहान मूल , शरीरात असंख्य वेदना असताना देखील तिच्या चालण्यातला दरारा , नजरेतील करारीपणा कोणालाही कापरे भरवेल असा होता. मागच्या एक वर्षातली तिची या ठिकाणी ही तिसरी विझिट होती. मागच्या २ विझिट मध्ये तिला स्टाफ ने प्रेग्नंट पाहीली होती. प्रग्नन्सी मध्ये सुद्धा तिने तिचे प्रत्येक काम अगदी चोख पार पाडले होते. 

     

      उंची ५.८ फूट , जिम् ने कमावलेली परफेक्ट फिगर , उजव्या गालावर एक मोठा तीळ , चकाकणाऱ्या काळया केसांमधून निघालेल्या २ च लाल केसांच्या कर्ली बटस्. पाहताक्षणी कोणीही दोन क्षण हरवून जाईल असे आकाशी डोळे आणि डाव्या गालावर पडणारी खळी. तिच्या रूपावरून तिच्या प्रोफेशनचा कोणीच अंदाज लावू शकणार नाही अशी ती.


    आज मात्र तिची अवस्था थोडी वाईट वाटतं होती. केस बरेच विस्कटलेले होते, नेहमी जीन्स किंवा शॉर्ट्स मधे असणारी आज सलवार कमीज मधे आली होती. चेहऱ्यावरून बरीच थकलेली दिसत होती. पण म्हणून तिचा दरारा कमी झाला नव्हता. 


    थोडं अंतर पुढे गेल्यावर ती एम्बसीच्या वाॅशरूम जवळ आली. तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून ती एका ठरलेल्या वाॅशरूम मध्ये शिरली. आतला फ्लश टँक ओपन करून तिने त्यातले एक बटण प्रेस केले. वाॅशरूम च्या मागची भिंत दोन साईड ला उघडली गेली. आत मध्ये एक लिफ्ट दिसत होती. लिफ्ट ला फक्त डाऊन साईड चे बटन होते. ते प्रेस करून तिने लिफ्ट उघडली व लोअर ग्राउंड फ्लोअर ला गेली. तिथंही लिफ्ट एका मोठ्या वाॅशरूम मध्येच उघडत होती. 

      

      वॉशरूम मधून बाहेर येताच तिला दोन गार्ड दिसले. त्यांनी तिला बघताच सॅल्यूट केला व एका केबिन कडे घेऊन गेले. 

    

    "मे आय कम इन सर?"


   "येस येस! प्लिज ! ". मिस्टर सिंघानिया तीचीच वाट पाहत गेला एक आठवडा एम्बसी मध्येच थांबून होते .

तिची ती अवस्था पाहून त्यांना भरून आले. त्यांनी पटकन पुढे होऊन तिच्या हातातून त्या लहान जीवाला स्वतःकडे घेतले आणि तिला सोफ्यावर बसवले. मिस्टर सिंघानिया नी लगेच च केबिन मधल्या लॅन्डलाइन वरून एक कॉल लावला.

   " सीताबाईंना पाठवून द्या लगेच " इतके बोलून त्यांनी फोन ठेवला . 

   तेवढ्यात हातातल्या बाळाने चुळबुळ सुरु केली तसं त्यांचं लक्ष त्या गोड परिकडे गेलं. काही क्षण ते तिच्याकडे पाहतच राहिले . ती छोटी परी अगदी तिच्या आई सारखीच दिसत होती. तिचे निळे डोळे आणि डाव्या गालावरची नाजूक खळी जणू ती तिच्या आईचीच परी असल्याची साक्ष देत होते. 

     

     "मे आय कम इन सर?" सीताबाईंची हाक ऐकू येताच ते भानावर आले. 

     

   "येस! कम इन क्विक !"


   साठीच्या घरात असलेल्या सीताबाई आत आल्या. आपल्या सरांच्या हातात एक छोटं बाळ पाहून त्या थोड्या गोंधळल्या होत्या. 


   "सीताबाई.... या बाळाला स्वच्छ करून त्याला दुधाची वगैरे व्यवस्था करा लगेच ."     सिंघानिया सर


   सीताबाईंनी पुढे होऊन बाळाला घेतले. त्यांनी सोफ्यावर एक नजर टाकली . बाळाची आई डोळे मिटून शांत बसली होती. आई असताना बाळाला बाहेरचं दूध देणं ही गोष्ट सीताबाईंना रुचलेली नव्हती. 


   " ती आता थकली आहे . या बाळाची जबाबदारी आजपासून तुमची ." सिंघानिया सीताबाईंना म्हणाले तशी त्यांनी आनंदाने मान डोलावली आणि बाळाला घेऊन बाहेर निघून गेल्या. 


    सीताबाई जाताच सिंघानिया उठून सोफ्याजवळ गेले. 


  " ओजस्वी....!"


 तिच्या खांद्यावर हलकेच हाथ ठेवून त्यांनी हाक मारली. त्यांना तिची अवस्था पाहवत नव्हती. तिने हलकेच डोळे उघडुन पाहिलं. त्यांच्या डोळ्यातील करुणा, त्यांच्या डोळ्यातील बापाचे प्रेम क्षणभर तिला हवंहवसं वाटलं. पण क्षणातच तिला जाणीव झाली की समोरच्या माणसासाठी सुद्धा आधी स्वतःचा देश आणि त्यांच्या पोस्ट ने त्यांच्यासाठी वाढून ठेवलेलं कर्तव्य जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही क्षणी प्रश्नांची सरबत्ती आपल्यावर होऊ शकते या विचारानेच ती सावध झाली . 


   "अम्.... आय निड सम टाइम. कॅन यु? प्लिज? " ओजस्वी ने विचारलं. 


   तिला खरोखरच थोड्या एकांताची गरज आहे हे सिंघानिया देखील समजत होते. 


   " शुअर.... टेक युर् टाईम . वुई विल टॉक इन द मॉर्निंग." 


इतकं बोलून ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ओजस्वी तशीच सोफ्यावर आडवी झाली आणि क्षणातच ती निद्राधीन झाली . बऱ्याच महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर आज तिला थोडी का होईना पण शांत झोप मिळत होती. 


    



त्याचवेळी 


सीरिया ची राजधानी दमस्कस येथील फाईव स्टार हॉटेल ' फोर सीझन्स ' च्या सर्वात वरच्या मजल्यावर एक सिक्रेट मीटिंग चालु होती. 


     "जल्दी बोलो अहमद भाई । आपने ऐसे अचानक मुझे यहां क्यूं बुलाया?" सीरियन पुलिस फोर्स चा एक ऑफिसर अहमद समोर बसला होता. 


 " घबराओ नहीं । तुम्हारे यहां होने का किसी को पता नही चलेगा ।" अहमद


 " फिर भी भाई .... क्या काम था ? " तो आता बराच घाबरलेला वाटतं होता. 


  " एक हिंदुस्तानी औरत भाग गयी है हमारे यहासे । उसे पकड़ने में तुम्हारी मदद चाहिए।" अहमद


   " हि...हिंदुस्तानी ? मैं क्या मदद कर सकता हुँ भाई ? "


  " सीरियन पोलिस में तुम्हारे जितने आदमी है उन सबको ये फोटो दे दो । जहा भी दिखे उसे जिंदा पकड़के लाने को बोल।" अहमद


  " मगर ...."  


 " तेरी सिस्टम को मैं संभाल लुंगा। उपर से कोई सवाल नही करेगा तुझे . "अहमद


  "ठीक है भाई । मैं अपने आदमी काम पे लगा देता हुँ ।"  तो आता थोडा रिलॅक्स झाल्यासारखा वाटत होता. 


"ये ले उसकी फोटो । एक हफ्ते पेहले ही उसको बच्चा हुआ है।" अहमद


 "सूरत से तो ४०-५० साल की लगती है, ऊपर से इस उमर में बच्चा ।" तो ऑफिसर विचार करत होता.


 " क्या केहना चाहते हो?" अहमद


" उमर ज्यादा है और अभी अभी माँ भी बनी है तो ज्यादा भाग नही पाएगी वो... ये तो सांफ है । हो सकता है किसी बस्ती में किसी से आसरा लिया होगा उसने ।"


" इसीलिए तो तुम्हे बुलाया है। तुम पोलिस हो ,कही भी जा सकते हो, रेड मार सकते हो। " अहमद


"आप टेंशन मत लो भाई । जल्द से जल्द ढूंढ निकलता हुँ मै उसको। " 


"ये ले तेरा एडवांस। काम होने के बाद डबल मिलेंगे। बस उस कमिनी को ढूंढ निकाल। "  


अहमद ने त्याच्या समोर पैशांची बॅग उघडली . सीरियन पाउंडस् ने भरलेली ती बॅग पाहून त्या ऑफिसर चे डोळे चमकले. त्याने पटकन ती बॅग उचलली.


" चलता हूँ मै भाई ।"


" हमम.... " 


अहमदला आता फक्त ती स्त्री पाहिजे होती जिच्यामुळे गेल्या ८ दिवसात त्याच्या आयुष्यातलं सुख चैन सगळं हरवल होत . ती समोर आल्यानंतर तिला कसा त्रास द्यायचा . तिने केलेल्या या कृत्याची शिक्षा तिला कशी द्यायची या विचारात तो गढला होता. 


    काही तासातच प्रत्येक सीरियन पोलिसच्या मोबाईल वर एका स्त्रीचा फोटो वायरल झाला . साधारण ४५ वर्ष वयाची , डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा , बऱ्यापैकी पांढरे झालेले पण तेल लाऊन चापून बांधलेले केस, किंचित कमरेत वाकल्यामुळे कळून न येणारी उंची , काळेभोर डोळे, ९ व्या महिन्यांच्या प्रेगणन्सी मुळे वाढलेलं पोट आणि डाव्या गालावर पडलेली खळी. 


    या हिंदुस्तानी महिलेचा शोध घेण्यासाठी आता सीरियन पोलिस फोर्स आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांची पुर्ण चेन सज्ज झाली होती. ठीक - ठिकाणी छापे मारले जात होते. प्रत्येक महिलेला तिच्या चेहर्यावरील बुरखा काढून तपासले जात होते. बस स्टँड , एअर पोर्ट , रेल्वे स्टेशन्स, चर्च, मस्जिद, शाळा, हॉस्टेलस्, जनानखाने, वस्त्या आणि वस्त्या आता झोडपून काढल्या जात होत्या...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime