नरक चतुर्दशी कथा
नरक चतुर्दशी कथा
आज नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, असे आपण ऐकले, वाचले.पण श्रीकृष्णाने आपल्या सोबत सत्यभामेस का नेले होते याचा उल्लेख कुणीही केला नाही.
सत्यभामा ही पूर्वजन्मी भूदेवी (पृथ्वी) होती. वराह अवतारात भगवंतांनी तिला नरकासुर हा पुत्र दिला होता. ज्याला देवाकडून अभय असते व जो पर्यंत भूदेवी त्याला मारा असे म्हणणार नाही तो पर्यंत त्याला कोणी मारू शकणार नाही. कृष्णावतारात सत्यभामा जेव्हा श्रीकृष्णा बरोबर नरकासुराचा वध करण्यास येण्याचा आग्रह धरते तेव्हा भगवंतास ते माहीत असते.ते तिला घेऊन जातात. जेव्हा नरकासुर श्रीकृष्णाच्या प्रत्येक अस्त्राचे उत्तर देतो आणि श्रीकृष्णावर प्रहार करण्यास येतो, तेव्हा सत्यभामा त्याला ठार मारा असे सांगते, झाले श्रीकृष्णास एवढेच हवे असते म्हणजे ते वचनातून मुक्त होतात आणि नरकासुराचा वध करतात. त्याचा वध झाल्यावर पृथ्वी त्याला आपल्या उदरात घेते व श्रीकृष्णापुढे येऊन त्याला सदगती दिल्या बद्दल त्याचे आभार मानते व माता अदितीची कुंडले वापस करते.अशा रीतीने सत्यभामा ही नरकासुराचा वध होण्यास कारणीभूत ठरते.
