Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

रोशन नवघरे

Drama Horror Children


1  

रोशन नवघरे

Drama Horror Children


नकळत भेटलेली नवीन वर्षाची भेट

नकळत भेटलेली नवीन वर्षाची भेट

1 min 164 1 min 164

दररोजप्रमाणे आज दिवस होता पण, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. सकाळी 6 च्या सुमारास लवकर उठून आज एका गावी जायचे होते, आम्ही मित्र मंडळी 7 ला बीडमधुन एका गावी निघालो. थंडीचा गारवा आणि निसर्गरम्य नजारा पाहून मन कसे प्रसन्न वाटत होते. सकाळी काही वेळातच आम्ही सगळे त्या गावी पोहोचलो आणि शेतकरी मंडळीची भेट घेत होतो.


असे आमचे काम चालू असताना मी एका घराजवळ पोहोचलो तर तिथे काही लहान मुलं-मुली घरासमोर बसून फुलांचे गुच्छे तयार करत होते. त्यांच्यासमोर एक बसण्याचा पाट आणि सुई दोरा, पेन आणि कागद घेऊन नवीन वर्षाची त्यांची तयारी चालू होती. त्यांची तयारी चालू असताना मी त्यांच्या समोर आलो असताना त्या लहान मुलींनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मला एक फुल दिले. हे पाहुन मला खूप छान वाटले, मी पण त्या चिमुकलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. ते पाहून मला त्या मुलीचे नवलच वाटले की ही मुलगी मला ओळखत पण नाही तरी तिने मला पाहताच हे घ्या सर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा....


मला त्या मुलीकडे पाहून खूप छान वाटले आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता हा दिवस मी कधीच विसरू नाही शकत. नकळत मला भेटलेली नवीन वर्षाची ती अविस्मरणीय भेट ठरली.


त्या मुलीचे नाव मानसी चंद्रकांत वाशीम आहे. गाव पाली तालुका अडाळ जिल्हा बीड.


Rate this content
Log in

More marathi story from रोशन नवघरे

Similar marathi story from Drama