STORYMIRROR

Anuradha Kadam

Inspirational

3  

Anuradha Kadam

Inspirational

नाती..

नाती..

1 min
8.8K


    माणसांच्या बाजारात पारखून निरखून घ्यावीत का नाती?

 कपडे घ्यायला जातो तेव्हा कापड पारखून घेतो तशी.. त्याचा रंग, पोत, नक्षी आणि आपल्याला शोभणारं. सगळचं आवडणारं हवं. मुख्य म्हणजे किंमत, परवडणारी पाहिजे. कित्येकदा आवडलेलं परवडत नाही आणि परवडलेलं आवडत नाही.

  त्यातून हौस म्हणून पाहिजे की गरज, हा मुद्दा राहिलाच. हौस म्हणून निवडायचं झालं तर मग खूप पर्याय आहेत पण गरज म्हणून असेल तर तडजोड अपरिहार्य.

कधी कधी गरज नसतानाही अचानक हव तस असतं समोर. जणू आपल्या मनातलं. मग मोह होतो ते आपल्याजवळ असण्याचा; काय करावं अशा वेळी? आवडल म्हणून घ्यावं, की टाळावं गरज नाही म्हणून. आणि समजा; झालाच मनाचा निर्णय तर आवडीच्या गोष्टी कडे संशयानं पाहिल्याच पाप मनात ठेवून उलगडून पहावी का घडी? आतल्या पदराला कसर नसेल का म्हणून? की विश्वासाने घेऊन जावं तसचं? आणि पाहिलच उलगडून, नसलचं कुठे काही; तरीही भिती उरतेच. आपण ल्यायल्यावर फाटलं तर...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational