आठवणी
आठवणी


पायात काटा मोडल्याचं दुःख
काहीस आठवणीं सारख असतं ना..
म्हणजे बघ ना,
जोवर पायात आहे तोवर दुखत राहातं
पाय टेकवला की जरा जास्तच.
कधी कधी नुसता सलतो.
पण कधी असह्य वेदना
खर म्हणजे किती खोलवर रुतलाय त्याच्यावर असत नाही का हे.
आणि ना काढून टाकायचा म्हटलं की विचारुस नकोस.
कितीही जपून काढ
डोळ्यात पाणी आणेल एवढं दुखतच बरका.
कधी नुसते डोळे भरून येतील
कधी धारा लागतील डोळ्याला
न कधी नुसती वेदनेची लकेर उमटून जाईल डोळ्यात.
हां, आता हे तुम्ही काढता कसा त्यावर अवलंबून असत.
दुसर महत्त्वाच म्हणजे काढून झाला तरी थोडं दुखत राहात.
आता हेही किती कोरलत काढ़ताना त्यावर ठरलेलं.
पण एक सांगू...?
पायात आहे तेही सहन होत नाही
अन काढून टाकतानाच्या वेदनाही.
ह्म्म्म ...पण म्हणून तसाच नाही हा ठेवायचा पायात.
कुरूप होत म्हणतात.
कुरूप, माहितिये ना.
खूप खोल असत ते
काट्यापेक्षा जास्त.
ते नाही काढता येत मग सहजासहजी
त्या पेक्षा काटा काढून टाकावा.
थोडं दुखत.
पण मग बर वाटतं
डोळ्यातून वाहून गेल ना पाणी
की हलक वाटतं
अन् पायातून काटा गेला की ही.