Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Anuradha Kadam

Inspirational


2  

Anuradha Kadam

Inspirational


अगतिकता

अगतिकता

1 min 8.8K 1 min 8.8K

कॅन्सर झालेल्या माणसासारखं झालय आयुष्य. मरण समोर दिसत ना त्याला तसच. मलाही दिसतं समोर तुझ दूर जाणं. हो तुझ दुरावणंही मरणासारखच. फरक फ़क्त इतकाच की ते मरण सुटका करणार असतं.

आणि हे मरण...जन्मठेपेची शिक्षा जणू.

कितीही उपाय केले तरी इतकं पक्क माहितिय् 2 - 4 महीने, वर्ष, बोनस मिळतील आयुष्याचे.पण इलाज़, इलाज़ नाहीच यावर. मरण अटळ आहे.

तू म्हणशील मरणार तर सगळेच आहोत आपण एक ना एक दिवस.

हो माहितीये मला ते.

पण कधी ते आपल्याला नसतं ना ठाऊक?

इथे मात्र मला स्पष्ट दिसतो मृत्यू.

अवघ्या काही अंतरावर.

आणि त्याच्या जाणिवेने रोजच मरण येत कणाकणाने जवळ...

सगळेच असतात आसपास.

धीर देणारे.

तरीही असाह्य असतो आपण...

अगदी एकटे...

नको वाटते ही असाह्यता...

इतकी हतबलता...

खरच कोणी इतकं महत्वाच असतं?

एकटे असतो आपण

आणि एकटेच राहणार असतो.

तरीही, ही अगतिकता का?

 


Rate this content
Log in

More marathi story from Anuradha Kadam

Similar marathi story from Inspirational