एक अनोळखी लेखक

Romance Tragedy

3.4  

एक अनोळखी लेखक

Romance Tragedy

मृत्यु संवेदनांचा

मृत्यु संवेदनांचा

14 mins
838


6 जानेवारी ..काय ! 6 जानेवारी आहे का आज? प्रशांत आश्चर्यचकित होऊन बोलला पण तो आश्चर्यचकित याच्यासाठी की काही वेळाने एका वाईट दिवसाची आठवण होणार.आणि तोच दिवस आपण विसरलोच कसा ? या पाठीमागच्या भावना होत्या त्या.नेहमीच तो काम करत होता, पण त्याच मन मात्र त्याच्यावर नव्हतं पटापट तो काम आवरून तो बाथरूम कडे गेला. आकाश ची नेहमीच बडबड चालु होती, हो ला हो म्हणत प्रशांत नुसता हुंकार देत होता. त्याने हात धुतले आणि चेहर्यावरुन पाणी फिरवले. एकवार आरशात पहिले तोच त्याला त्यादिवशी रडणारा प्रशांत दिसला. प्रत्येक पाण्याचा थेंब आसवासारखा वाहतोय असे वाटायला लागले. त्याने आरशाला हात लावला , तोच आकाशचा हात खांद्यावर पडला .प्रशांत चकमकलाच आकाशचा आवाज कानावर पडला. काय र काय झालं ; काय नाही रे चेहरा चांगला दिसत नव्हता आरशात म्हणुन पुसनार होतो. पण जाऊदे म्हटल आणि मनाशीच या काल्पनेला हास्याने दुजोरा दिला. प्रशांत कंपनी मधुन बाहेर कसा पडला, हे त्याच त्याला च समजल नाही.आता रूमवर जाऊन निवांत झोपायचे या विचारात तो रूमवर निघाला होता. रात्रीचे 12 वाजले, 7 जानेवारी ... हातात मोबाइल होता त्यावर वॉट्सएप्प उघड आहे. नविन चैट्स वर जाऊन " स्विटी " टाकाव अस मनातून त्याला खूपदा वाटतय पण तिच्याकडे मोबाइल असेल का ? आणि असला तरी कोणी दुसर्यानेच मेसेज बघितला तर.... प्रोब्लेम होईल, या विचारानेच त्याचा हात मागे सरकत होता. शेवटी तसाच मोबाइल माघारी ठेवत तो अंथरुणावर पडला . पण झोप काही लागेना या कुशीवरून त्या कुशीवर फक्त पलटत होता . पण झोपेने मात्र त्याच्याशी द्वंद सुरु केल होत, आणि याच्यात मात्र प्रत्येकवेळी माती खात होता.


"गपर ....बाबा....गपय असं कुठ असत का? सांगायला लागलायस . ये बाबा फेसबुक वर अगोदरच पोरीच्या नावानं पोर बोलतात आणि त्यात उगाच असलं भलत काहितरी बोलू नकोस, काय म्हणे एक पोरगी पटवलीस फेसबुक वर."प्रशांत त्याच्या मित्रांशी बोलत होता. आणि त्याला ठामपणे हे सगळ माहीत असल्यासारख बोलत होता. पण त्याला कोठे ठाऊक होत की त्याच्या बाबतीतही असच काहितरी होणारय. प्रशांत चा तर फेसबुक वर काडीमात्रचा विश्वास नव्हता. फक्त मित्रांचे फोटो लाईक कर. कोणाच्या फोटो वर कमेंट कर. आणि आवडलाच एखादा फोटो तर टैग कर .... पण त्याला मात्र 700/800 पेक्षा जास्त लाईक्स मिळत होत्या . मित्रांमधे तो चॉकलेट बॉय होता. मित्रांसाठी तो कोठेही कधीही केव्हाही टक्कर द्यायला तयारच असायचा. त्यामूळे त्याचा मित्र परिवार भलामोठा होता. कुठल्याही गावात जा आहेच कोण ना कोणीतरी ओळखीच मग फिर पुर्ण गाव . फुल मज्जा मस्ती करणारं व्यक्तिमत्त्व म्हणुन पंचक्रोशीत ओळखीचा. अशाच लोकांच्या आयुष्यात जीवनाला कलाटणी देणार काहितरी घडत याची मात्र त्याला जाणीव न्हवती. कसतरी कॉलेज पुर्ण करायच आणि घरचीच शेती करुन निवांत राहु म्हणणारा पोरगा तो त्यात मामा आणि मामी आहेतच सोबत काही झाल तरी हार नको मानू म्हणणारे आई सारखी माया लावणारी मामी असल्यावर कोणत्या भाच्याला काही कमी पडतय .


प्रशांत एक दिवस असाच फेसबुक वर पोस्ट वाचत बसला होता. अचानक फ्रेंड रिक्वेष्ट च्या यादीमधे एक नाव समाविष्ट झालेल दिसल "Angel sweety" तो मनाशीच म्हणाला हे पण कोणत्यातरी मित्राच चाळे असणार. त्याने फोटो पहायला सुरुवात केली .खरच खुपच सुंदर दिसत होती ती. वैशिष्ट्यपूर्ण चालीत तिने फोटोही काढले होते. पण प्रशांत चा मात्र विश्वास काय बसेना एक मन म्हणत होत कशाला करतोयस कोणीतरी मित्रानेच असली मुलीची ìď काढली असणार. उगाचच काहितरी फालतुगीरी होईल.तर दुसर मन म्हणायच बघ काय होईल ते जर खरोखरच मुलगी असेल तर लागेल ना जॅकपाॅट आणि त्याने दुसर्या मनाच ऐकल . आणि त्याने फ्रेंड रिक्वेष्ट ऐक्सेप्ट केली. पण बोलायच काय हा तर रिप्लाई येइल का? हाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. या मनाच्या संदिग्ध परिस्थितीत हाय ... मेसेज टाकुन बोलायला सुरवात केली.रिप्लाई यायला मात्र थोडा उशीरच झाला. पण बोलणं मात्र चालू झालं . दररोज मेसेज वर बोलणं सुरु झालं.


फक्त मित्रांसाठी फेसबुक वापरणारा मुलगा 8-़8 तास फेसबुक वापरु लागला. सकाळी नास्टा ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त आणि फक्त फेसबुक आणि त्यावर फक्त " स्विटी " दुसरे कोणी दिसेना पण झाल आयुष्याशी निगडित छोट्या छोट्या गोष्टी तो स्विटी सोबत शेयर करु लागला. आता कोठेतरी 15 दिवस झाले होते. फ्रेंडशीप होऊन पण ते दोघे लहानपणापासूनचे मित्र आहेत असे त्या दोघांना पण भासू लागलं होतं. दोघाना एकमेकांची सवय जडली होती. जेवतानाही तीच ;झोपतानाही तीच अशीच फेसबुक वर फ्रेंड झालेली स्विटी कधीं त्याची बेस्ट फ्रेंड झाली समजलच नाही. "आज सलग 15 ते 20 दिवस झालेत. तिच्यासोबत बोलुन कोण म्हणले बेस्ट फ्रेंड व्हायला खुप दिवस लागतात. आम्ही तर झालो 4 ते 5 दिवसातच. आज सोमवार आहे, ती किती वाजता ऑनलाइन येणार हे माहीत असुनसुद्धा मी सकाळपासुन तयारी करतोय तिच्याशी काय बोलायचे याची काहिही म्हणा , एक मुलगी स्वतःहून आपल्याला बोलतेय हे म्हटल्यावर कधी कधी स्वतःवरच विश्वास बसत नाही. "कुछ तो बात है तुझमे " असे मनात आल की उगाच भाव येतो जणू आपण हीरो च झालोय याची भावना मनात निर्माण व्हायला लागते. माझ्याही बाबतीत असेच काहितरी घडत होत. मी स्वतःशीच आता गान गुणगुणू लागलो होतो. विनाकारण फेसबुक उघडून तिची ऑनलाइन यायची वाट बघत होतो. माझ्या घरी भाजी काय बनवलीय सांगीतल्याशिवाय आता ती भाजीपण खाऊशी वाटत नव्हती कदाचीत हेच प्रेम असावे ."


प्रशांत च्या हातून ग्लास पडला. तो स्वतःशीच हसला प्रेम शब्द बोलला तो पण तोंडातल्या तोंडात सुरज तिकडून ओरडला "जीव गेला की काय?" प्रशांत स्वतःशीच पुटपुटला "तसचं झालय भावा " आणि पडलेला ग्लास उचलुन गॅलरीत उभा राहिला. दोन दिवस झाले तरीही तिचा मेसेज नाही. या विचाराणेच प्रशांतचा जीव कसावीस झाला होता. जेवन करुशी वाटत नव्हत काही गोड आठवणी आठवून मनात उगाच रमायचा प्रयत्न करत होता. तिच्या आवडीच काही दिसल की लगेच तिची आठवण यायची. आणि तो 10 सेकंदात फेसबुक ला ऑनलाइन जायचा. हाय मेसेज खुप वेळा झालाय लास्ट सीन पण 2 डेज़ अगोदर दाखवतय म्हणून तो चिडत होता.तो मनातल्या मनात जळत होता .हे अस दु:ख होत जे तो कोणाला सांगू पण शकत नव्हता आज तो उपाशीच झोपण्याच्या तयारीत होता.गादीवर पडून मोबाइल चाळत होता.अचानक "हाय" म्हणुन मेसेज आला . नाव तिचेच होत तो ऊठूनच बसला हसू की रडू नाचू का? असा भाव निर्माण होत होता मनात .अचानक तिच्याबद्दलचा राग मनात आला . तो राग नव्हताच स्वतःला जो त्रास झाला त्याचा प्रतिध्वनी होता.आणि तो प्रतिध्वनी उमटायच्या आतच पुढचा मेसेज आला ," मला माहितेय तुला खुप त्रास झाला असेल असे मी अचानक ऑफलाईन गेल्यामुळे पण काय करु रीचार्जच संपला होता. सॉरी, आय एम रियली सॉरी , यार पुढच्या वेळेस मी नक्की सांगेन ." प्रशांत ने मेसेज केला : "हे स्विटी मला अस वाटतेय की I like you ....."

स्विटी: काय?

प्रशांत: अगं खरचं!

स्विटी: बरंर...


प्रशांत ला बोलायचे होते की तुला नाही का असे काही वाटत ! त्याने मेसेज टाइप केलेला पण डिलीट केला! पुन्हा टाइप केला "बर झाले का जेवण ?"

प्रशांत मनातच म्हटला तिला जर काही वाटत असते तर तिने लगेच रिप्लाई दिला असता. असे बर म्हणून रिप्लाय नसता दिला. आणि नसतेच काय तिच्या मनात तर "अस काही समजू नकोस We are just good friend "म्हणुन विषय क्लियर केला असता.

काय राव काय भानगड आहे ही.

महापूरुष म्हणतात ते खरय..'मुलींची मन कधीच कोणाला समजू शकली नाहीत." आणि स्विटी चा रिप्लाय आला, "नाही अजुन जेवणारय आता तू पण जेव आपण उद्या बोलू GNSD&TC....."


प्रशांत चकमकलाच आयला आपण जेवलो नाही हे तिला कसे समजले मी तर काही बोललो पण नाही. प्रशांतने स्वतःचा राग करत मोबाइल गादीवर आपटला. आणि डोळे झाकले आणि मनात पुन्हा विचार चक्र सुरु झाले." कशाला घाई करायची एवढी, आता रुसली का नाही बघ ती. आता बोलल का तरी ती. " उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग !"अशी अवस्था झाली बघ . दुसरे मन म्हणाले "वेडा आहेस का तू जे मनात आले ते बोलुन टाकल त्यात वावग काय आहे . उगाच बोललो नाही, म्हणून झुरत का बसायच.. ... त्यापेक्षा हे डायरेक्ट बोललेल चांगल ." हे असेच चालु राहणार म्हणुन प्रशांत ने एक उशी डोक्यावरुन घेउन तो झोपी गेला .पुन्हा 2 दिवस काही रिप्लाय नाही . आपण काही चुकीचे बोललो का आता यावरच शंका यायला लागली. तिला खूप दु:ख वाटत असेल का? यावर मन वारंवार नाराज होत होत.कॉलेज मधे असुनही नसल्यासारखा झाला होता.मित्रांनी पण खुप हसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश काही मिळाले नाही.


संध्याकाळची वेळ होती जेवणाला वेळ होता अजुन घरच्यांनीही आवडीचा मेन्यू बनवला होता.मी मात्र वर्तमानात नव्हतो . आणि अचानक मेसेज च्या आवाजाने भानावर आलो.फेसबुक वर मेसेज आला होता .... तो पण स्विटी चा "हाय .... " हाय म्हणून रिप्लाई पण दिला मी त्यावेळी जाणवले की ती बोलताना आपला आपल्या मनावर ताबा रहात नाही.नकळत तिला जे आवडते ते व्हायला लागत आपल्या हातून.पुन्हा तिचा मेसेज आला आणि टाइपिंग चालु होत ' तु परवा जे काही बोललास त्यावर मी खुप विचार केला आणि मला असे वाटते की ............................! '


पुन्हा टाइपिंग सुरु होत काय म्हणेल ती वाचण्यासाठी . जीव उतावळा झाला होता . जर ती नाही बोलली तर...मनाने शंका च काढली पण दुसरे एक मन म्हणाले. " तसे काही नाही ती पण आपल्याला लाइक करते." ती अशी बोलुच शकणार नाही .आणि जरी नाही बोललीच तर, फ्रेंड म्हणुन राहीलच ना तेच पुरेसे आहे माझ्यासाठी पुढचा मेसेज आला तो ओपन होईपर्यंत काळजाची धडधड वाढली होती.हा निकालच होता माझ्या आयुष्याचा मेसेज ओपन झाला ........


"खुपदा विचार केला मी की तू मला आवडतोस की नाही .पण नेहमी मला तुच आठवत होतास . तुझ्याशी बोललेली प्रत्येक वाक्य कानात वाजत होती. शेवटी मला उत्तर मिळाले , मला तु आवडतोस माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायला मला आवडेल ."


मला पुढे काय पाठवायचे समजेना झाले होते. मी नकाराची पूर्ण तयारी केली असता.हे सकारात्मक उत्तर मला वेगळ्याच उंचीवर घेउन गेल.मला उत्तर काय द्याव सुचेनासं झाल होतं. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हवेत तरंगण्याची भावना मला जाणवू लागली होती .इमोजी मध्ये मला समजावता येइना की मी किती आनंदित आहे ते. माझ्या चांगल्या दिवसांची सुरवात झाली होती. हे मात्र नक्की आता मला तिला भेटायची ओढ लागली होती. कधी मी तिला समोरासमोर भेटतोय. कधी मी तिला तळहाता एवढ्या अंतरावरुण बघतोय असे झाले होते. कोकिळेला जशी मृगाची वाट बघण त्रास देत. तशीच काहीशी माझी अवस्था होती. मला आठवल तिचा वाढदिवस येत्या 21मार्च ला आहे. पण त्यादिवशी तर तिला कसे भेटता येईल. तिला प्रत्येक जण भेटायला येईल. त्यादिवशी सगळे अशक्य होईल आणि तिही घाईगडबडीत असेल. काय आहेना माणसाला आता किती जरी जवळचा मित्र असेल त्याच्याशी बोलायला वेळ च नाही वॉट्सएप्प वर फक्त एक स्टेटस टाकायचा आणि आपल कर्तव्य पूर्ण केलेल्या आर्विभावात पुढच्याकडुन एक पार्टी मागायची की सगळं संपलं. खरंच एवढ्यानेच पोट भरत असेल का? वाढदिवस फक्त असाच साजरा व्हावा का? जाऊदे त्याने काय होणारय आपल्या विचाराने असा काय बदल घडणारंय...


यापेक्षा आपण काहितरी वेगळ करुयात आणि मी ठरवलं तिचा वाढदिवस आपण 2 दिवस अगोदर म्हणजेच 19 ला करायचा .मला ओढ लागली होती ती 19 तारखेची वाढदिवसाचे नियोजन करायच होत. वाढदिवस कोठे करायचा ? कोणता केक आणायचा? कोणाकोणाला बोलवायचे? आणि महत्त्वाच हॉटेल कोणत ठरवायच या विचारांनीच मी भरून गेलो. प्रत्येक मिञाला फोन करून हॉटेलची माहिती विचारत होतो .जेवायलाही उसंत मिळेना हे मात्र माझ मलाच समजल नाही.


तिच्या अंगावरचा गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आजही काळजाची घालमेल करुन जातो. त्या ड्रेस मध्ये मी तिला पहिल्यांदाच पाहिले.फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे का उगाच म्हणतात ? यावर मात्र माझा पुर्ण विश्वास बसला . कदाचीत तिला जाणवलही नसेल की मी पुर्ण दिवस फक्त आणि फक्त तिलाच बघत होतो.तिच्या लावण्यवती सौंदर्याला नजरेच्या कैदेत घेण्यासाठी रणांगणात उतरलो होतो.या पूर्ण वेळेत मला तिच्यापासुन 2 सेकंदाची उसंत नको होती. तो दिवस माझ्यासाठी सगळेच सण एकाच दिवशी असा दिवस मी कसा विसरेल . त्या दिवसापासुन मला माझ्या अस्तित्त्वाची चाहुल जाणवतच नव्हती मी फक्त ती बनलोय सगळे काही तिच्यापासुनच सुरु होत होत.माझी अवस्था तिच्याशिवाय कोमामधल्या पेशंटसारखी व्हायची . मी फक्त श्वासांवर चालणारे शरीर अशा शरीराला जाणीव कशाचीच नसते .मी याबाबतीत तिला खूपदा बोललो .. ती फक्त मला एवढेच म्हणायची की "तुझ्याशिवाय मी जगुच शकत नाही,तु फक्त कायम माझ्यासोबत राहा" तुझ्या तोंडावरच हसू मला नवीन संजीवनी देऊन जात ?


पण देवाला सगळे हे मान्य नसाव.त्याला मी असे आनंदात रहाव अस वाटत नाही .अचानक एके दिवशी मला तिचा फोन आला ." माझ लग्न ठरलय तु काहितरी कर वाटलस तर आपण पळून जावू. मला हे लग्न नाही करायच मला फक्त तुझ्याशी लग्न करायचय तू काहिही कर मला फक्त इथुन घेउन जा ." आणि तिचा रडणारा आवाज कानावर पडायला लागला. मला काहीच सुचत नव्हते. मी एवढेच बोलू शकलो की " ऐक यातुन काहितरी मार्ग निघेल. तुला तुझ्या आईचा पण विचार करायला हवा असे आपण अचानक गेल्यावर तुझ्या आईला हे सहन होणार नाही आपण हे सोडवू , तु फक्त स्वतःची कळजी घे रडू नकोस स्विटु प्लीज ."


तिला रडू नकोस म्हणणारा मी इकडे पुर्ण कोसळून गेलो .मला काहीच सुचेनास झाल होत. हा तिच्या लग्नाअगोदरचा शेवटचा फोन मी स्वतःला सावरत तिला समजावत राहिलो. की " तुझी आई खुप महत्वाची आहे.तुझ्या एका चुकीने तीच सगळे आयुष्य बदनामीत जाईल." हे सगळे समजावताना माझ जीव तिळ-तिळ तुटत होता.तिला माहीत होत की तिच्याशिवाय मी जगुच शकत नाही , आणि ती पण माझ्याशिवाय . पण केवळ माझ्या शब्दासाठी ती शांत बसत होती.जे काही होत होत त्याला वरल्या मनान संमती देत होती .लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता.तसतशी माझ्यातली सहनशीलता कमी होत होती.बेचैनिने तर बंड पुकारला होता शांततेशी. तीच लग्न होणार हे नक्की ठरल होत.तिला एकदा भेटाव ही इच्छा आता शांत बसवत नव्हती.भेटायला गेलोही तिच्या घरी पण काही बोलता आले नाही.नजरेने शेवटच बोलुन निघालो .सुरुवातीपासून जो माझ्यासोबत राहिला तो तिचा चुलत भाऊ माझ्यासाठी जिवाला जीव देणारा ....आता फक्त त्यच्यामुळे मला तिथून काहिही न होता निघुन येता आले.


अखेर तिच्या लग्नाचा दिवस उजाडलाच , लग्नाला जायच की नाही या भ्रमात मी कधी तयार झालो समजलच नाही.नववधूच्या साडीत तिला बघण्यासाठी जीव कासाविस होत होता. तिचा चुलत भाऊ सुरज आणि मी गाडीवर निघालो.तो म्हणाला "हे बघ तुला जायचय म्हणून मी चाललोय नाहीतर मी तिच्या लग्नालापण नव्हतो जाणार." गाडीवरचा प्रवास मला माझ्या मनाची समजुत घालण्यात गेला .अगदी लग्नाच्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो .तिच्या घरच्यांनी मला तिथे पहिले .तिचे दुसरे चुलत भाऊ त्यांची नजर माझ्यावरुण हलेना.भांडण करायचा त्यांचा पक्का निर्णय त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता .माझे लक्ष मात्र तिला बघण्यात लागले होते.लग्नाच्या शालूत ती एवढी सुंदर दिसत होती की मी मनाशीच म्हणालो " तुझीच नजर लागायची तीला " पण जसजसे लग्न आटोपत येत होत तसतशी जिवाची घालमेल होत होती. माझ्या हातातल्या तिच्या सोबतिच्या रेषा पुसुन जातायत .अंगातून जीव चाललाय. मी जवळजवळ डोक धरुन खालीच मान घातली .सुरज ने हात लावला मी भानावर आलो.तिथून बाहेर पडलो आणि गाडी काढली ती सरळ वाईन शॉप च्या दुकानात गेलो.आणि मी करायला सुरुवात केली .तिच्या कडवट चवीने थोड कसनुस झाल पण तीच लग्न समोर दिसत होत. एकापाठोपाठ एक असे 5 ते 6 ग्लास मी पिलो.तिच्या विरहाची नशा मात्र उतरेना. पुन्हा गाडी घेतली ते तिच्या लग्नातच.तीच लग्न उरकल होते .तिच्या डोळ्यात फक्त पाणीच दिसत होत .ते फक्त माझ्यासाठीच आहे याची जाणीव मला झाली.मला त्या अवस्थेत पाहिल्यावर तिच्या बाकीच्या भावात आग पेटली. जो तो मारण्याची भाषा करु लागला. पण सुरज त्यांना एवढेच बोलला "त्याला लग्नाला तिने बोलवलय म्हणुन तो आलाय . लग्न शांततेत होउद्या नाहीतर आम्हाला काही राडाच करायचा असता तर आजच्या दिवसाची वाटच पाहिली नसती आम्ही ." आणि तिथून आम्ही निघालो. तिच्याशी बोलायची खुप इच्छा झाली होती मला पण आता ती माझी स्विटी राहिली नव्हती.बाहेर येताना मी फक्त तिला एवढेच बोललो "congratulations खुश रहा तु फक्त." आणि तिच्या हातात हात दिला आणि आम्ही तिथून निघून आलो . येताना मात्र घरी येईपर्यंत माझ्या डोळ्यातून पाणी येत होते .घरी आल्यावर मी नॉर्मल झालो पण डोक्यात तिचाच विचार चालु होता चेहरा मात्र उदासच होता.


दोन दिवस झाले तरी मुलगा काही खाईना यामुळे मम्मी पप्पांना टेंशन यायला लागले .मी त्याना सतत टाळत राहिलो काय करणार..मी तरी माझ्या प्रत्येक शब्दात प्रत्येक कृतीत तिचीच आठवण यायची.तिच्यासोबत बोलण्यात घालवलेली प्रत्येक रात्र आठवत होती . मलाच आता सगळ्यातून निरस झालोय अस वाटायच.मम्मी पप्पानी मला मामा मामी कडे पाठवले . कॉलेजमध्ये माझ अस वाईट वागण बघून त्यांना वाटलेही असेल की मुलगा हातातून जाण्याआधी मामा मामी कडे पाठवावा.त्यांना माहीत होत की त्यांच्या कोणत्याही शब्दाला मी नकारात नाही. माझी अवस्था बघून मात्र मामा - मामी च्या चेहर्यावरच हसुच विरल .एके दिवशी मामीनी मला काय झाल विचारल .आणि मी काही न लपवता सगळे काही संगितल. त्यावर त्या बोलल्या की " हे बघ आपण जिवापाड प्रेम करतो एखादयावर , इथपर्यंत की आपण त्या व्यक्ती शिवाय राहुच शकत नाही . पण तूच सांगा प्रारब्धाला ही काही अधिकार नको का ? जर आपल्या मनाप्रमाने सगळ्या गोष्टी घडत राहिल्या तर दु:खाची झळ आपल्याला कशी जाणवेल आणि दुःखाची जाणीवच झाली नाही तर ती सोसायची कसे हे कस कळणार ? तू तुझे प्रेम निभावल तिने तीच प्रेम निभावल .तू सांगितल तसे ती वागली मग अजुन काय हवं तुला .नशीब समज तुझं तुला अशी व्यक्ती भेटली जिने स्वतःच्या भावनांचा काडी मात्र विचार न करता स्वतःच्या भावनांपेक्षा तुझ्या भावनांना जास्त महत्त्व दिल. नाहीतर तुच सांग या असल्या जगात कोण अस शब्द पाळत.


खर सांगू या जगात अशी भावनाविरहीतांची संख्या मोजायला गेल तर ती काहीच सापडतील .मुलांसाठी आपली स्वतःची आयुष्य मातीमोल करणारी मम्मी पप्पा कमी नाहित तू जसा तिच्या आईचा विचार केलास तसाच तुझ्या मम्मी पप्पांचा पण विचार कर. बघ तुला तुझ उत्तर नक्की मिळेल आणि मलाही अस वाटतं की , जेव्हा तू त्यांचा विचार करशील. तेव्हाच तुझ्या त्यागाला खरा न्याय मिळेल.आणि तू तस करशील यावर माझा यावर पूर्ण विश्वास आहे."मी माननेच होकार दिला पण डोक्यात मात्र एकच शब्द उरला म्हणजे " भावनाविरहित " आणि ते म्हणजे काय याच्या शोधात मी लागलो काही दिवस शोधण्यात गेले पण शेवटी त्याचा अर्थ सापडलाच .

"भावनाविरहीत म्हणजे संवेदना मरणे " कोणाविषयी कशाविषयी कोणत्याही प्रकारची भावना जागृत न होणे म्हणजेच तर भावनाविरहीत असाव.आणि मी ही तसच जगायच ठरवल .

"यापुढे कायतर कॉलेज मध्ये भांडण मारामारी कसतरी कॉलेज संपल.कामाला लागलो .का काम करतोय माहीत नाही?कशासाठी करतोय माहीत नाही? फक्त जगतोय .हा हा श्वासही का घेतोय माहीत नाही? फक्त जगायच ते ही भावनाविरहीताच जगायच याशिवाय दुसरे काही समजतही नाही .ना समजून घ्यायच . मम्मी पप्पा पण काही बोलत नाहीत.मी सेटल झालो कामाला लागलो म्हणुन ...


पण मनाच काय ते अजुन शांत बसत नाही , कोणत्याही मुलीकडे पाहण्याची इच्छा होत नाही .कोणत्या मुलीशी बोलण्याच मन होत नाही.फक्त जगत राहयच एवढंच कळतय."

"हे बघ प्रशांत कोणत्याही व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य संपत नाही. तु एवढा Handsome आहेस की उभा राहिला की मुलींच्या ओळी लागतील असे एकाकी जगण्यात काय मज्जा आहे. मुलींसाठी नाही पण तुला आई बापासाठी काहितरी करायला हव. आणि हे बघ पटतीय का एखादी पोरगी कंपनीतली.खूप मुली लाईन मारत्यात तुझ्यावर अस कळलय मला. हा काय विषय आहे ." मी विषयांतर करण्याच्या हिशोबाने बोलला.

"काय नाही रे ते असेच तुला तर माहीत झालय ना आता सगळ मग का लोड घेतो जाऊदे ." पोरींचा नाद नको रे बाबा " प्रशांत ने शेवटचा घोट घेतला आणि निघाला .

मी जाता जाता त्याला विचारले. दररोज घेतो का रे तु ? तो म्हणाला " नाही रे किरण फक्त याच दिवशी घेतो ते पण थोडीच. अस्सल बेवडा नाही आपण , पण काय करु आठवण अशी गोष्ट आहे जी नाही म्हटली तरी येतीच " .. बर जाऊदे चल बाय ... ! उद्या फ़स्ट शिफ्ट आहे लवकर उठाव लागल. बाय गुड़ नाइट .

     

तो गेला पण काहितरी सांगून गेला. भावनाविरहीताच जगण म्हणजे 'मृत्यु संवेदनांचा' असंच असाव. जमेल का ते आजकालच्या मुलांना मनातल्या मनात कवितेच्या पहिल्या ओळीही लिहिल्या...

विनापाण्याची तहान

भरते काही श्वासांनीच

प्रयत्न करत आहे मी

जगणं भावनाविरहीताच...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance