Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sunita madhukar patil

Tragedy Others


4.7  

Sunita madhukar patil

Tragedy Others


मोकळं आभाळ तिच्या हक्काचं-भाग२

मोकळं आभाळ तिच्या हक्काचं-भाग२

4 mins 310 4 mins 310


( भाग - २ )


डॉ.स्मितानीं आरतीच्या नवऱ्याला आणि सासुला बोलावुन घेतलं. त्यांचं समुपदेशन करावं, त्यांना समजावुन सांगावं हाच त्यांचा हेतु होता." स्त्रीला शक्ती का म्हणतात? आज स्त्री पुरुषाची प्रत्येक कामे करू शकते पण पुरुषाला स्त्रीची कामे जमतीलच असं नाही. कधी आई बनुन तर कधी मुलगी, कधी पत्नी बनुन ती सगळ्या जवाबदऱ्या अगदी चोख पार पाडते. स्त्रीला समाजात तिच्या कुवतीला साजेसे महत्त्व आजही मिळत नाही. या वास्तवात बदल व्हायला हवा. स्त्रीने स्त्रीचा छळ न करता तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ रहायला हवं." आणि बरंच काही त्या सांगत होत्या. आता यातलं त्या दोघांनी कितपत मनावर घेतलं ते त्यांचं त्यांनाच ठाऊक होतं. डॉ. स्मिताने त्या दोघांना आरतीला भेटायला सांगितले.

राजीव पहिल्यांदाच लेकीला पाहणार होता. राजीव आणि त्याची आई आरती होती त्या रूम मध्ये गेले. तिथे कोणी नाही हे पाहुन राजीवने आत जाताच तिचे केस पकडले आणि धमकीच्या सुरात बोलु लागला." काय सांगितलंस तु डॉक्टरला आमच्याबद्दल, आम्ही तुला छळतो काय? तक्रार करतेस आमची, तु घरी चल तुला बघतोच." आणि जोरात तिचा हात मुरगाळला.

बाळाला कुशीत घेऊन तिला प्रेम करणं तर सोडाच तिच्याकडे बघितलं देखील नाही त्या दोघांनी. आणि आल्या पावली दोघे निघुन गेले.

आरती उशीर पर्यंत रडत होती. तिला तिच्या बाळाची काळजी वाटत होती. 

चार पाच दिवसात तिला डिस्चार्ज मिळाला. ते ही डॉ. स्मिताला फोन करून राजीवला सांगाव लागलं की उद्या आम्ही आरतीला डिस्चार्ज देणार आहोत. आरतीला घरी जाताना स्मिताने आपला फोन नंबर दिला आणि सांगितलं काही गरज भासल्यास मला या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. आरतीला कोणी भेटायला येत नाही समजल्यानंतर स्मिता रोज सकाळी आणि संध्याकाळी जाऊन तिला भेटत असे, तिच्या बाळासोबत थोडा वेळ घालवत असे त्यामुळे त्या दोघींमध्ये डॉक्टर आणि पेशंट यापलीकडे एक नात तयार झालं होतं.

आरती घरी आली तिचं काही कोडकौतुक झालं नाही,बाळंतीण म्हणुन तिची कोणी काळजी घेतली नाही. राजीव तिला नेहमीच त्रास देत असे. तिला माहेरीही पाठवत नसे. त्यामुळे बाळंतपणात ही त्याने तिला माहेरी जाऊ दिले नाही. तिला मारणे, दारू पिऊन घाणेरड्या शिव्या देणे. सारं काही ती निमुटपणे सहन करत होती. बाळाचं नाव देखील कोणी ठेवलं नाही. आरती स्वतःच तिला ऋग्वेदी म्हणू लागली. 

तिची सासु ऋग्वेदीला अवदसा कुठली !!! दळभद्री जन्माला आली, वंश बुडवी, बापाला खर्चात घालण्यासाठीच जन्माला आली आहे. न जाणे आणखी काही बाही बोलायची. आरतीला उठताबसता शिव्या घालायची. बिचारी एकटी बाळाला सांभाळत घरातील सगळी काम करायची.

ऋग्वेदी आता जवळजवळ दोन महिन्याची झाली होती. एक दिवस अचानक ऋग्वेदीची तब्येत बिघडली. ती उलट्या करू लागली आणि अचानक बेशुद्ध पडली. राजीवला तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ती विनवु लागली पण त्याने साफ नकार दिला. " मेली तर मरू दे. माझ्या मागची कटकट संपेल. ग्रहण बनुन लागली आहे माझ्या नशिबाला. मी नाही नेणार तिला दवाखान्यात. " असे म्हणत तो बाहेर निघुन गेला. 

तिने सासूला विनवले " तुम्ही तरी समजावा ना त्यांना, काय म्हणतायत बघा. चला ना आपण दोघी जाऊ." 

" बरोबरच बोलतोय तो, मरु दे मेली तर, अवदसा कुठली!!! दळभद्री मेली. नाही नेणार आम्ही तिला दवाखान्यात. तुला काय करायचं ते कर." सासुच उत्तर ऐकुन आरतीला काहीच कळत नव्हतं काय करावं. तिच्याकडे साठवलेले थोडे पैसे होते ते तिने घेतले आणि ऋग्वेदीला घेऊन घरातुन लगबगीने निघाली. तिच्याकडचे पैसे बाळाच्या उपचारासाठी तरी पुरतील की नाही यात शंकाच होती. तिने धावतच डॉ. स्मिताच हॉस्पिटल गाठलं आणि बाळाच्या उपचारासाठी तिला विनंती करू लागली. स्निताने देखील वेळ न दवडता ताबडतोब ऋग्वेदीवर उपचार सुरू केले. 

दोन तासानंतर ऋग्वेदी शुद्धीवर आली. 

आरती ने स्मिताचे आभार मानले आणि घरी जायला निघाली. तेंव्हा " काही अडचण आल्यास मला फोन कर म्हणुन सांगण्यास स्मिता विसरली नाही. काळजी घे बाळाची आणि लक्ष ठेव तिच्यावर!!! आज जे काही घडलं तो विषबाधेचा प्रकार होता. याचा अर्थ तुला समजतोय का?"

" म्हणजे माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय? पण कोण? राजीव आणि आई!!! ते दोघे इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. अहो हा लहानगा जीव हिने कोणाचं काय बिघडवलंय. सगळे जीवावर उठले आहेत माझ्या लेकराच्या." असं म्हणत आरती रडू लागली.

आरती घरी आली तिने नवऱ्याला याबद्दल जाब विचारला असता तो तिला मारू लागला " आम्हाला जाब विचारतेस, ती माझी पोरगी आहे तिला मी मारीन नाहीतर जिवंत पुरेन, तुझा काय संबंध. गप्प गुमान दोन तुकडे खायचे आणि आपल्या लायकीत रहायचं...समजलं!!! तो काहीतरी असबंध बडबडत होता. सासु ही त्याचाच सूर ओढत होती."आलीस परत अवदसेला घेऊन माघारी, तिकडेच खपवुन यायचं नाही का? आमच्या गळ्याला उगी फास कशाला."

आरती आपल्या पोटच्या गोळ्याला उराशी कवटाळून ओक्साबोक्शी रडत होती. ती हतबल होती. माहेरच्यांना देखील राजीव तिला भेटू देत नसे. कोणी तिकडंच आलंच तर तो त्यांचा अपमान करून घालवुन देत असे.

दिवसांमागुन दिवस सरत होते, ऋग्वेदी आता सहा महिन्याची होत आली होती. कधीतर दिवस बदलतील या आशेवर आरती दिवस ढकलत होती. पण परिस्थितीत काहीच बदल होत नव्हता. तिच्यावरचे अत्याचार तसेच चालु होते. मध्ये मध्ये ती डॉ. स्मिताशी फोन करून आपलं मन मोकळं करत होती.


तर मैत्रिणींनो मला असं वाटत जोपर्यंत एक अबलाच सबला बनुन स्त्रीशक्तीला छळणं सोडत नाही तोपर्यंत महिला सबलीकरनाची ज्योत उजळणार नाही तुम्हाला काय वाटत तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा.


क्रमशः


© सुनीता मधुकर पाटील.


पुढे ऋग्वेदी आणि आरती सोबत काय घडतं. त्या दोघीनां त्याच्या हक्काचं आभाळ मिळेल का भरारी घेण्यासाठी पाहुयात पुढील भागात.


( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, आवडल्यास नक्की लाइक, शेअर आणि कमेंट करा.)


पोस्ट नावासहित शेअर करावी.Rate this content
Log in

More marathi story from Sunita madhukar patil

Similar marathi story from Tragedy