Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

धनाजी बुटेरे

Romance


4.4  

धनाजी बुटेरे

Romance


मिठीतील मिठास

मिठीतील मिठास

10 mins 8.9K 10 mins 8.9K

.. ...मित्रहो आज मी माझ्या आयुष्याची चितरकथा सांगणार आहे. मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती. आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली. स्वप्नात मला कोणी तरी. येऊन चुरगळून जायचा ; ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतवू लागले. दिवसा रात्री उरात काहूर माजू लागले. माझं नटनं मुरडणे आरशात पहाणे वाढू लागले. कोणीतरी मला खुणावत आहे. आसा सारखा भास व्हायचा. कुणी तरी मला साद घालत आहे. सारखे वाटायचे. रात्री पुन्हा कुणी तरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा. आता हे रात्रीचे चारपाच दिवसातून एकदा तरी व्हायचे. हेच सुख मी शोधत होते. आज ते अवचित ओंजळीत मोती पडावेत .मला ही ते हवे हवे वाटायचे.हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का ?माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची. कोण हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकली बरं ?माझा शोध सुरु झाला. आणि शेजारी माझ्याच घराशेजारी संजय मला गवसला .जी स्त्री या धनाच्या शोधात आपले आख्खे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाले. खरंतर मी खूप भाग्यवान. कधी मी त्यांच्या मिठीत सामावले मला कळलंच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कुणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवून लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केली. ऐन यैवनाच्या सुरवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय .केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली. त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्या साठी माणसाचा जन्म असतो. ते मला अलगद मिळत होते. किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा किती जपावे.असं सारखं वाटायचे. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पहात होते.मला ते रोज हवे वाटू लागले. पण कुठे मीठाचा खडा पडला.अन् नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो शेजारी रहात असलेल्या अरूणनाना ने मला नि संजयला नग्न पाहिले. तृप्तीचा ढेकर येण्या आधीच भरलेले ताट पुढ्यातून कुणी काढून न्यावे. नि जेवण करणारा हिरमुसला व्हावा असे माझे झाले होते. आता. आईला माहित झाले तर. ...?या शंकेने माझी आख्खी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारीत पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात. तेच कळत नाही. आता मला पुरुषाची सवयच लागली होती. कामपूर्ती हेच माझे वेसन झाले होते. संजयच्या विरहाने मी असाहाय्य झाले.मला तो कधी भेटतो म्हणून मी असूसलेली झाली होते. मग असाच संजयच्या निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धूणं घेऊन एकटी जायची तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगाचा.शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा.पुन्हा दुसर्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलना चे वेड लागले होते. आणि संजयला माझे वेसन. तो मला फार आवडायचा.त्याच्या सारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य येऊन गेले. पण संजय ची सर कुणालाच आली नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझे कौमार्य लुटले.पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजला भेटायला जायची तो बोलावली तेथे माझी जाण्याची तयारी असायची. त्याच्या कडून लुटावं असं वाटायचं. तो मजसाठी असूसलेला असायचा. मला ही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते. आगदी कापूरा सारखे भरभर उडून जात होते. माझी भूक वाढली होती.सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा त्याची सिसाटी यावी .तसंच संजय बद्दल वाटू लागले. मी दुसरा चेहरा शोधू लागले. माझा कामायनी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता. राजा ययाती मला माझ्यात दिसू लागला. मी कामातूर झाले. बेचैन झाले.

संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशाच वेळी आमच्या शेजारी राहून नावाचा सोळा सत्रा वयाचा तरुण पाहूणा म्हणून रहायला आला होता. वयाने एकदोन वर्षाने लहान होता. पण मला तो आवडू लागला.त्याचा राजबिंडा चेहरा मला हवाहवासा वाटू लागला. त्याचे येणे आमच्या कडे सुरू झाले.ओळख वाढली. परिचय दुढ् झाला. एकट्या दिवशी घरात कुणीच नव्हते. राहूल ने मला विचारले " तू मला आवडतेस "मी त्याला तसंच म्हटले. झाले. त्याने मला मिठीत घेतले. आह.......अशी ऊबदार मिठी. घरात कुणीच नव्हते. कपड्यांची बंधनं सैल झाली .अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला .ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली. किती मोती वेचावे मी हरवून जायची. राहूल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा. संजय पेक्षा तो सरस वाटू लागला.आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहूलने एक छान से ग्रेटिंग आणले होते ते तिच्या हाती पडले.पण तीला आमची ही रास लीला मान्य होती.बरे झाले. नाही तर राहूल पण हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छीते.राहूल बरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचे. पण तो उपभोगून झाला होता.मला जुन्या जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी राहूल कधी संजय ते सांगतील तेथे माझी जायची तयारी असायची. मी आईला काही ही थाप मारून बाहेर पडत असायची. मला हवे ते पदरात पाडून घ्यायची.दिवस कापूरा सारखे भरभर उडून गेले. मी दहावी पास झाली. काॅलेजात जाऊ लागली. येथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामा कडे राहू लागली. येथे एक नवा संवंगडी भेटला. राजा दिसायला काही खास नाही.पण मला तो हवावासा वाटू लागला.मामाचे घर म्हणजे. शांत जंगलाततील संकेत संकेतस्थळ जणू. मनात वाटायचं राहूल आला तर...काय मजा येईल.संजयने तरी यावे.पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती.एक दिवस राजाने मला. मिठीत घ्यातले.पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडविली.त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला.मग दुसर्या दिवशी घरात कुणीच नव्हतं राज हीच संधी पहात होता. तो लगेचच घरी आला. आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली.मिठी सैल झाली. तेंव्हा मी भाणावर आली. आता डोळ्यात फक्त नि फक्त राजा येत होता.राजा माझ्या दिल्यावर राज करणारा तिसरा पुरुष. तीन जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज असेल.पण संजय माझं पहिले प्रेम. तो मला विसरू शकला नाही. तो मामा कडे कधी काॅलेज मधे गुपचूप भेटायला यायचा.तो बोलला तरी बरे वाटायचे. पण भेटीत तृप्ती नसायची काहीतरी हरवल्या सारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे.थोडे चुरघळावे.आणि तो क्षण आठवत झोपी जावे. माझी त्याच्या बरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते. आयुष्याचे सोने केले होते.कसे दोन वर्षे गेली मला कळलेच नाही.

आता मी परीक्षा देवून घरी आली.आणि पुन्हा संजय नि मी एकांतात कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात. बस संजय नि मी जगात कुणीच नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली पण मोज पत्ता उलट केला. तो संजयच माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भाव सुध्दा देत नाही. पण तरी सुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधी तरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची.

आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली.मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेली. आपल्या होणार्या नवर्याला आपल्या शरीर समंधाची कल्पना आली तर.मस्ती केली पण ज्याच्यासाठी हे राखायचं असते.त्याला हे पहिलेपण अनुभवायला नाही मिळणार .तो या गोष्टी पासून दूर राहील.पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात आपली बायको फक्त नि फक्त कायमची आपली हवी. ती जर दुसर्याची क्षणभराची जरी झाली. तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर ते त्या स्त्री बरोबर नफरत करतात. कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही. आणि ती स्त्री आयुष्यभर खर्या प्रेमाची पारखी रहाते. अनंत कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले. पण वासना कुणाला कधीच स्वस्त बसू देत नाही. माझंही तसेच झाले होते. मला दुःख वाटते ते संजय, राहूल,राजा.सारेच माझे सुखाचे सोबती.सोडून जावे लागणार होते.ते आले की सुखाची बरसात करायचे.

आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचं ती वेळ आली.माझं लग्न एका सर्व साधारण दिसायला असणार्या तरूणा बरोबर जमले.मला तो कोणताही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती.एवढीच एक जमेची बाजू.ना दिसायला चांगला ना रूप माझ्या पेक्षा सर्वसाधारण मी म्हणजे सौंदर्य मी म्हणजे तारूण्य. मी म्हणजे बहार तो म्हणजे नुसता बोर .असो आईने ठरविले. म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमान मान तुकविली.झालं एकदाचं लग्न मुलगा खूष होता. त्याला माझ्या सारखी सुंदर बायको मिळाली होती.

आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच बैचन होता. दिवे मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला. पण मला हे बिलकूल नवीन नव्हते. तो खूप भावनिक झाला. मी हे सूख उपभोगले होते. नविन ते काय.कपडे उतरले गेले. मनाची दारं उघडली गेली.श्वासात श्वास मिसळून गेले.ह्यदयाची धडधड वाढली. आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले. आपण हे सारे आगोदर मिळवून काय मिळविले. ?आज हे मिळणार च होतं.

दोन दिवसात मी माहेरी आले.विचारात गढून गेले.मनात वादळ तयार झाले.संजय,राहूल,मागे पडले.राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले.रात्री नवर्याने मिठीत घेतले. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता आले नाही. मझ्या कडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा.पण जे मी मिळविले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा. त्यांच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता.मी संजयला विसरू शकत नव्हते. राहूल तर यारच होता. राजा अवचित सापडलेले धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे.

नवरा नोकरी निमित्त बाहेर असायचा. मला ते गतकाळातले क्षण हवे होते. तो राहूल,संजय,राजा. जे अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते.नवरा फक्त नावाने पुरता होता मी मंगळसुत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हक्कदार वेगळी माणसं होती. मी एकले आहे "जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पहातो आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच रहातो."मला विवस्त्र प्रथम पहाणारा संजय नंतर मला ज्याने नखशिखांत विवस्त्र पाहिली तो राहूल.हे दोन पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही.घरी एकटी असायची. कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायच्या. नवरा दूर देशी. नही तरी त्याला आठवण्या सारखं त्या कडे काय होते.?

कधी तरी त्याने मला एकदा विचारलं होतं.तू कुणा सोबत जोडली गेली होती का?. पण मी त्याला त्याचीच शपथ घेऊन निरुत्तर केले.पण शेवटी त्याला माझ्या विषयी कायम वाटत राहले मी लुटलेली स्त्री आहे. आता नव-याच्या मनातून मी पार उतरली होती. कारण मी होतेच तशी.मला बाहेरची सवय होती. नवीन तेवत मला रस होता. रोज नवं हवं असे वाटे.पण ते आता वरिल होत चालले होते. मला संजय राहूल कधी भेटतात असे झाले होते.मी माहेरी जायला नेहमी अतूर असते तिथे संजय माझी वाट पहायचा मी गेले की, तो ही मला एकदा तरी मिठीत घेतोच घेतो.ही दौलत मला सहा सात महिने पुरायची.अधून मधून राहूल पण यायचा. मी तृप्त व्हायची.

नव-याला माझा दाटसंशय यायचा पण तो बोलत नसायचा.मला आठवत नाही. त्याने कधी. मला मनापासून. जवळ घेतले आहे. तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला. बाकी सारे पुरुष सारखेच.राहूल काय नि संजय काय. फक्त त्यांना स्त्रीया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात. बाकी काही नाही "प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच प्रकरणाचा दिले की झाले. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरविले म्हणून लग्न केले.

आज सहा महिने उलटून गेले पण ना राहूल ना संजय ना राजा ना नवरा जवळ आला होता. नव-याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता. या सहा महिन्यांनी संजयचे लग्न झाले. होतं. राहूल कुठे तरी नोकरीला दूर गेला होते.मी तडफडत होते. राजा ना भेट ना गाठ मला कुणी ही हवा होता. नवरा सुद्धा, पण तो ढुंकूनही बघत नव्हता. मला त्यांचा प्रचंड राग येऊ लागला.मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घेरले. मी त्या बरोबर वाद घालू लागली. नवरा आता माझ्या कडे व घरी ही लक्ष देत नव्हता.मी एकटी पाडली होती.मी असूसलेली होते.कधी राहूल चा फोन येई.फक्त अश्वासन मिळे लग्न झाल्यावर राहूल संजय भेटत राहिले. पण वरवर मनात कालवाकलव होत होती. मी नवीन नाते जोडून पहात होते. पण आडचणी नव्याची येत होती. भूक होती ताट होते. जेवन होते.पण उपभोग घेता येत नव्हते. नव-याला मनोमन शिव्या देत होते.मला राहूल चा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली दिवस ठरला.आज बर्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता. नवरा कामा वर निघून गेला.मी बाहेर पडली.दिवसभर राहूल च्या मिठीत विसावले वाटत होतं.दिवस मावळूच नये.संध्याकाळी मी लगबगीने घरी आले.नवरा वाट पहात असेल असे वाटले पण दारावर तेच कुलूप होते. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले. पण नवरा आलाच नाही. मी खूपच उशिरा पर्यंत वाट पहिली. सकाळी तरी येईल. पण सारे व्यर्थ.चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आले "मला शोधू नकोस आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिली.असो,पण तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी? म्हणून दूर निघून जात आहे.म्हणजे मी मारणार नाही.तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला. कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न भयानक होते. मी इतका खोल विचार केंव्हाच केला नव्हता. घाईघाईत राहूल ला फोन केला. आपण लग्न करू.त्याने असे काही उत्तर दिले.की कानात कुणी तरी लाव्हा राहूल ओतावा असं वाटलं.राजाला फोन लावला त्याला सर्वच सांगितले पण तो म्हणाला अगं प्रेम वगैरे काही नव्हतं ती फक्त मजा होती. आणि फोन ठेवला. संजय चे लग्न झाले होते. माझ्या समोर फक्त अंधार होता. वाटा रुसल्याचं होत्या. आईला काय सांगू वडिलांना काय उत्तर देऊ.प्रश्न अनेक उत्तर काहीच नव्हते. क्षणभंगूर सुख साठी मी खरं सुख हरवून बसले होते.आता काय उपयोग नव्हता.वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळमोक्ष करते.मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते.


Rate this content
Log in

More marathi story from धनाजी बुटेरे

Similar marathi story from Romance