Raosaheb Jadhav

Inspirational

5.0  

Raosaheb Jadhav

Inspirational

मी उजळून घेतो नाती.

मी उजळून घेतो नाती.

1 min
15.8K


अर्थांच्या पणत्यांवरती

शब्दांच्या पेटता वाती

जिव्हाळा उजेड होतो

मी उजळून घेतो नाती...

या अवसेच्या काळोखाचा

गर्भ आकाशकंदील होतो

कधी जगतो होऊन पणती

अन काळोख तोलून धरतो...

वाऱ्याची सोसत भीती

कधी असणे सावरून धरतो

कोणी भूक पेरली होती 

कोणी जगणे उगवत असतो..

असे चंद्र हरवले काळीज

जेव्हा आभाळतारा होते

मातीच्या ओल्या गर्भी

हळू आभाळ पेरत येते...


Rate this content
Log in