STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy

3  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy

मैत्रीची मुकी भाषा

मैत्रीची मुकी भाषा

1 min
415

शेवंता गाईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती आणि त्या गाईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. लग्न झाल्यापासून नवऱ्याची दारू पिऊन अर्वाच्य शिवीगाळ, मार झोड करणे हे अत्याचार ती सहन करतच होती. लग्न झाल्यापासून त्याने तिला एकदाही माहेरी जाऊ दिले नाही त्यात बाहेरच्या कोणाला भेटायचं नाही. बाहेरच कोणी घरी आलेलं त्याला चालायचं नाही. तिच्या मनाचं खूप कोंडमारा होई. 


एकटेपणा तिला नकोसा होई. मग ती गोठ्यात जाऊन गाईसमोर उभी राहून तिच्याशी बोलून आपलं मन मोकळं करी. तिच्या गळ्यात पडून मनभरून रडून घेई आणि तिच्या भावना त्या मुक्या जनावरापर्यंत पोहचत देखील होत्या. 


शेवंता खुश असली की ती देखील मान हलवून, शेपटी इकडे तिकडे हलवून प्रतिसाद देई आणि जेंव्हा ती दुःखी असे तेंव्हा तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागत. 


प्राणी माणसांपेक्षा जास्त प्रामाणिकपणे मैत्री निभावतात आणि शेवटपर्यंत साथ देतात.


©️Copyright

All rights reserved.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy