मार्ग
मार्ग
मोबाईल हातात धरून मी बिछाण्यावर उतानी पडलो होतो आणि एका फोनची कधी नव्हे इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो. फोन आला तर आनंदाने बेहोश होणार होतो आणि नाही आला तर स्वतःला गमावून बसणार होतो. रात्रीचा एक वाजला तरी मोबाईल काही खणखणला नाही आणि माझी आतुरता संपली. क्षणात माझा चेहरा निस्तेज पडला शरिरातील ताकद नाहिशी झाली. माझ्या जवळील सर्वात महत्वाची गोष्ट गमावल्याची ती सूचना होती. डोळ्यात आलेले अश्रू फुसून मी बिछाण्यावर उठून बसलो आणि तिच्यासोबत काल झालेला संवाद आठवू लागलो. आम्ही दोघे हातात हात घालून रिक्षात बसलो होतो अचानक माझ्या हातातील हात सोडवत प्रतिभा मला म्हणाली, ’विजय उद्या मला पाहायला मुलगा येणार आहे. तिचे हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले पण स्वतःला सावरत मी म्ह्णालो,’ मुलगा चांगला असेल तर होकार दे कारण शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे ! पण तुझ्या आणि माझ्या प्रेमाचे काय ? या तिच्या प्रश्नावर स्वतःला सावरत मी म्ह्णालो,’ प्रेम वैगरे ठिक आहे पण तुझे आई - बाबा तुझ्या भावांच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असणार त्याचे काय ? माझ्यासारख्या मुंबईत स्वतःच घर नसणार्याला तुझे आई - बाबा आपला जावई म्ह्णून स्वीकारतील का ? खरं आहे की आपल्या मैत्रीच रुपांतर हळूहळू प्रेमात झालयं पण तुझ्यासोबत लग्न करण्याच्या परिस्थितीत सध्या मी नाही आणि अजून एक - दोन वर्षात मी तुझ्यासोबत लग्न करण्या योग्यतेचा मी होईन असे मला वाटत नाही. तोपर्यंत मी तुला कोणत्या तोंडाने थांबायला सांगू अगं आताच तुझ वय सव्वीस वर्षे आहे. कोणते आई – बाप आपल्या सव्वीस वर्षाच्या मुलीचे लग्न अजून दोन – तीन वर्षे लांबवतील त्यात मी तुझ्याहून दोन वर्षांनी लहान म्ह्णजे ते माझ्यावर विश्वासही ठेवणार नाहीत. तरी मी तुला सुरुवातीलाच सावरायला सांगत होतो आणि स्वतःलाही सावरण्याचा प्रयत्न करत होतो पण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आपण वाहत गेलो. माझे विचारचक्र सुरू असतानाच मोबाईलची रिंग खणखणली पण रॉग नंबर होता मी मोबाईल बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, बिछाण्यावर आडवा पडलो असतानाच मी पुन्हा विचार करू लागलो आणि मला प्रतिभा आणि माझी पहिली भेट आठवली.
त्या दिवशी प्रतिभा ज्या ऑफिसात कामाला होती त्याच ऑफीसात मी मुलाखतीसाठी गेलो होता. तेंव्हा त्या ऑफीसात माझी आणि प्रतिभाची पहिल्यांदा भेट झाली होती. त्या ऑफीसात ती कॉम्प्युटर ऑपरेटर होती. ते ऑफीस ज्या कंपनीच होत त्या कंपनीत माझी सहाय्यक अभियंता म्ह्णून नियुक्ती झाली होती. कंपनीच्या कामानिमित्त मी सदा फिरतीवर असे जेंव्हा खास काही काम नसेल तेंव्हाच मी ऑफीसात बसत असे. ऑफिसात माझी प्रतिभासोबत आणि इतर स्टाफ सोबत बर्यापैकी ओळख झाली नंतर हळूहळू आमच्यात बर्यापैकी मैत्रीही झाली. या दरम्यान मी अविवाहीत आहे हे समजल्यावर प्रतिभा माझ्यासोबत जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या या प्रयत्नाना यश आलं कारण मलाही ती आवडू लागली होती. या ना त्या कारणाने ती मला फोन करू लागली. एक दिवस काही कामानिमित्त ती आणि मी कंपनीच्या कारमधून जात असताना तिनं माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्या संपुर्ण शरिरात एक अनोळ्खी लहर निर्माण झाली कारण मी प्रथमच कोणा तरुणीने माझा हात हातात घेतला होता. तिच्या हातातील माझा हात सोडवून घ्यावा असा साधा विचारही माझ्या मनात आला नाही. माझा हात तसाच आपल्या हातात ठेवून तिनं माझ्याबद्दल जुजबी माहिती विचारली आणि मी तिला ती काही नलपविता सांगितली. त्यानंतर एक दिवस मी गोडावून चेक करत असताना ती सर्वांची नजर चुकवून आत आली आणि मला म्ह्णाली,’ आज ऑफीस सुटल्यावर तुला माझ्यासोबत यायचंय. मी हो! म्हटल्यावर ती निघून गेली. ऑफीसमधील आमच्या इतर सहकार्यांबरोबर तिच जरा जास्तीच मोकळेपणानं वागणं मला अजिबात आवडल नव्हतं त्याबद्दल मी तिला आज स्पष्ट सांगणार होतो. ऑफीस सुटल्यावर आम्ही रेल्वेस्टेशनवर न जाता हायवेवर आलो आणि रिक्षात बसलो. रिक्षा अर्थातच प्रतिभाच्या घरासमोर थांबणार होती. रिक्षात मी तिच्याजवळ मला खटकणारा विषय काढला असता आता अशी चूक होणार नाही असं आश्वासन तिने मला अगदी सहजच दिलं आणि माझ्या खांदयावर हळूच आपलं डोक टेकवत मला बिलगून बसली त्यामुळे मला नक्की काय होतय ते माझं मलाच कळत नव्ह्तं. हे असच तीन – चार वेळा झाल्यानंतर एक दिवस आम्ही रिक्षाने प्रवास करत असताना तिने मला चक्क मिठी मारली. मिठी कसली मगर मिठीच मारली आणि तेंव्हाच मला मी तिच्यात पुरता पुरता आडकलो गेल्याची प्रथम जाणीव झाली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर तिने कहरच केला मी कंपनीच्या गोडावून मधे एकटा असताना ती सर्वांची नजर चुकवून आत आली आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे एक दिर्घ चुंबन घेतले. त्या दिवसापासून मी भानावर आलो आणि आपण कोण आहोत ? आपल्या जवळ काय आहे ? आपले ध्येय काय आहे ? या सर्व गोष्टींचा आपल्यालाच विसर पडलेला आहे याची मला जाणीव झाली. प्रतिभा जेंव्हा जेंव्हा माझ्यासमोर लग्नाचा विषय काढायची तेव्हा मी तिला टाळायचो पण ही गोष्ट तिच्याही लक्षात आली होती. याबाबतीत ती मला दोष देऊ शकत नव्हती कारण मी तिच्याशी लग्न करू शकत नाही असं मी तिला स्पष्ट सांगितल्यानंतरही तिने ठिक आहे ! म्ह्णून मला भेटणे, माझ्यासोबत फिरणे, प्रेमाच्या गप्पा मारणे तसेच सुरू ठेवले होते. हळूहळू मी ही तिच्या प्रेमात पार डुंबल्याची मला जाणीव होऊ लागली होती. आज अचानक माझ्या समोर तिला पाहायला मुलगा येणार आहे हा बॉम्ब टाकला पण त्या ही परिस्थितीत मी तिच्यासोबत सध्या लग्नाला नकार देतोय हे पाहिल्यावर ती मला म्ह्णाली, आज मला पाहायला येणारा मुलगा पसंत पडला तर मी तुला फोन नाही करणार पण पसंत नाही पडला तर फोन करेन. तिचा फोन आला नाही याचा अर्थ तिला मुलगा पसंत पडला होता.
दुसर्या दिवशी लाल झालेल्या डोळ्यासह निस्तेज चेहरा घेऊन मी ऑफीसात गेलो. प्रतिभा आपल्या कामात होती त्यामुळे मी काही म्हणालो नाही. मग ती स्वतःच माझ्या जवळ येऊन मला म्ह्णाली,’ तुझी तब्बेत ठिक आहे ना ? चेहरा बघ कसा काळवटलाय ? मला वाटत रात्रभर झोपला नाहीस. तुला जर बरं वाटत नसेल तर बॉसला सांगून घरी जा ! मी नको म्ह्णून कामाला लागलो संध्याकाळी आम्ही दोघं पुन्हा रिक्षात बसलो पण सुरक्षित अंतर ठेऊन तिने काल तिला पाहायला आलेल्या मुलाबद्दल सविस्तर सांगायला सुरूवात केली आणि मध्येच तोल सुटून मला मिठी मारत म्ह्णाली,’ माझ्या समोर तो बसला होता रे ! पण मला त्याच्या जागी ही फक्त तुच दिसत होतास. मी तिला माझ्यापासून दूर करत म्ह्णालो, आवर स्वतःला आणि उदयापासून आपण असं एकत्र फिरायच नाही उगाच कोणी पाहिल तर वाद व्हायला नको. त्या रिक्षाने तिच्या घरापर्यत न जाता मी रस्त्यातच उतरलो. त्यानंतर मात्र प्रतिभा आता आपली राहिली नाही या कल्पनेने माझी झोप उडाली आणि थोडयाच दिवसात सततच्या जागणाचा त्रास होऊन मी आजारी पडलो. डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्ह्णाले, तू शरिराने नाही मनाने आजारी पडला आहेस ? मानसिक त्रास थोडा कमी घे ! तू बरा होशील तोपर्यंत झोप लागावी म्ह्णून काही औषधे घेत रहा. काही केल्या माझ्या डोळयासमोरून तिचा चेहरा आणि मनातून तिची आठवण जात नव्हती. ऑफीसात कामावर मन लागत नव्हत. हे माझ्या सिनिअरच्या लक्षात आलं तेंव्हा तो मला एकांत घेऊन म्ह्णाला, तू आजारी वैगरे नाहीस हे मला कळतयं ! तुला नक्की काय होतय याचीही मी कल्पना करू शकतो, असाच एक प्रसंग माझ्याही आयुष्यात आला होता तेंव्हा मी तर आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यत पोहचलो होतो पण विष पिण्यापूर्वी एकदा माझ्या आईकडे पाहिले आणि मी माझा निर्णय क्षणात बदलला कारण माझ्या आईच्या प्रेमासमोर माझं तिच्यावरील प्रेम काहीच नव्हत हे माझ्या सहजी लक्षात आलं म्ह्णून नाहीतर हे तुला सांगायला मी आज या जगात नसतो. तू तर मानसिकदृष्टया माझ्यापेक्षाही मजबूत आहेस. तू स्वतःला सहज सावरू शकतोस. तुझ्या आई - वडिलांनी तुला शिकविण्यासाठी उपसलेले आपार कष्ट आठव, तुझ्या भावंडांच्या तुझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आठव, तुझं स्वप्न काय होत ते आठव. त्याच म्हणणं मला पटत होत पण पचत नव्हतं. प्रतिभाला विसरण्याचा माझ्याकडे एकच मार्ग होता तो म्ह्णजे ! ही नोकरी सोडून दुसरी नोकरी शोधणे अथवा कायमचे गावाला जाणे पण ते ही सहजी शक्य नव्हते....
Attachments area