STORYMIRROR

Savita Tupe

Horror Thriller

3  

Savita Tupe

Horror Thriller

माणसातला पशू

माणसातला पशू

2 mins
240

     नव्या नवलाईचे दिवस आत्ताच तर कुठे सुरू झालेले , पण सरू पुरती धास्तवून गेलेली .पहिल्या रात्रीची जी स्वप्न तिने पाहिली होती,ती पूर्ण तर झाली पण पहिल्या वेळेस असेच होत असावे असे समजून तिने ते सहन केले . पण या पाच सहा दिवसात मात्र दिवसासुध्दा होणाऱ्या त्या मनाविरुध्द घडणाऱ्या शारीरिक अत्याचाराने ती थकून जावू लागली.  

    घरात सासू सासरे दोघेच . एक नणंद होती तीही दोन दिवसांनी तिच्या सासरी गेली होती . बरं नवरा कुठे कामालाही जात नव्हता , वडिलोपार्जित घरची शेती आणि किरणामालाचे दुकान जवळच असल्याने तो मनात येईल तेव्हा घरी यायचा .

     नवीन आहे म्हणून सासू सासरे पण हसुन दुर्लक्ष करायचे . तिची कुचंबणा होत होती . इतर वेळेला नवरा तसा खुप छान वागत होता , फिरायला जाणे , तिची काळजी घेणे ,या गोष्टी तो खुप मनापासून करायचा त्यामुळे तिला त्याचे प्रेम कळतं होते .पण त्याच्यातला त्या क्षणी जागृत होणारा वासनेचा पशू तिला नकोसा होवून जाई , तिथे तिला हळुवार जपणे त्याला जमतच नसायचे . तिच्या शरीराचा जबरदस्ती ताबा घेत तो तिला अगदी चोळामोळा करून मगच शांत होत असे . 

  सरू या प्रकाराला घाबरून त्याच्यापासून लांब राहू लागली होती पण तो काही तिला सोडत नव्हता . एकदोन दिवस माहेरीसुध्दा तिला तो सोडत नव्हता . 

   दिवसेंदिवस ती खुप अशक्त आणि आजारी दिसू लागली .लग्नानंतर नव्या नवलाईचे चेहऱ्यावर येणारे तेज तिच्या चेहऱ्यावर मात्र दिसत नव्हते . 

   ती तिच्यासोबत काय घडते आहे ते कोणालाही सांगू शकत नव्हती . कारण नवऱ्याचा बाकीच्या प्रेमळ वागण्याचा प्रभाव सरू सोबतच इतरांवरही जरा जास्तच पडायचा . पण त्यामुळे सरूची मात्र मानसिक कोंडी होत होती .

     एक दोन महिन्याने तिला दिवस गेल्याची चाहूल लागली . घाबरत घाबरत तिने घरात सांगितले , सगळे खुश झाले , तिला मनातुन वाटू लागलं की आता बाळाच्या चाहुलीने , काळजीने तरी आता तीच्यावरचा अत्याचार थांबेल पण तिला जबरदस्त धक्का बसला . नवऱ्याच्या त्या पशू वृत्तीला तिच्या त्याही परिस्थितीमध्ये कुठेही फरक पडला नव्हता. त्याच्यातल्या वासनांध वृत्तीला समोर असणाऱ्या एका शरीराव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही पर्वा नव्हती .

   त्याचा परिणाम व्हायचा तो झाला आणि दोन महिन्याने तिला त्रास होवून , आताच कुठे आपले अस्तित्व दाखवणाऱ्या आपल्या गर्भाला मुकावे लागले .

    हॉस्पिटल मधून तिने मग आरामासाठी माहेरी जाण्याचा हट्ट धरला आणि सगळ्यांच्या आग्रहाने नवऱ्याने नाखुशीने तिला दोन दिवसांनी न्यायला येतो म्हणून परवानगी दिली .

    माहेरी आल्यावर मग तिने आईला सगळं सांगितलं आणि परत त्या शरिरपिपासू पशुकडे पुन्हा जाणार नाही म्हणून आईला आपला निर्णय ठामपणे सांगितला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror