माझा चंद्र
माझा चंद्र
विजय त्याच्या भावाच्या लग्नाला त्याच्या जन्मगावी म्हणजे देगावला आला होता. आला कसला त्याला आणला होता. विजयचा जन्म याच गावचा तोच काही विजयचा या गावाशी संबंध ! असे साऱ्या जगाला वाटत होते पण तसं नव्हतं विजयचं या गावाशी एक गूढ नातं होत. ते गांव विजयच्या आठवणीतून कधीच पुसलं गेलं नव्हतं, पुसलं जात नव्हतं त्यामागचं रहस्य काय असावं याचा विजयलाही मागील कित्येक वर्षापासून शोध होता. तो शोध अजूनही संपत नव्हता चार दिवसापूर्वीच विजयच्या भावात लग्न झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी निघून गेल्यावर विजय थोडा मोकळा झाला होता आणि येथे प्रशस्त घरासमोरच्या मोकळ्या जागेत विजय आराम खुर्ची टाकून वर एक टक आकाशातील चंद्राकडे पहात होता. त्या चंद्राकडे पाहून तो स्वतःशीच हसला मी या चंद्रासारखाच आहे नाही शांत शीतल आणि डागाळलेला...दुसऱ्याच क्षणी त्याची नजर समोरच्या घराच्या अंगणात खुर्ची टाकून बसलेल्या तरुणीवर स्थिरावली ती ही त्याच्याकडेच पहात होती एकटक ! ती विजयच्या प्रेमात वगैरे पडलेली नसावी बहुदा पण तिच्या मनात विजयची जी प्रतिमा होती त्यापेक्षा विजय किती वेगळा आहे याच तिला आश्चर्य वाटत होत. ती स्वतःहून त्याच्याशी बोलायला घाबरत होती पण तो स्वतःहून बोलला तिच्याशी तिला वाटलं होत विजय म्हणजे कोणी ओबड - ढोबड दिसणारी व्यक्ती असेल पण त्याच एखाद्या चित्रपटातील नायकासारखं दिसणं तिला कोड्यात टाकत होत. तो अविवाहित होता याचं तिला आश्चर्य वाटत होत कारण कोणी याच्या प्रेमात कधीच पडली नसेल याची तिला शक्यताच वाटत नव्हती कारण जो माणूस चाळीशीत इतका सुंदर दिसतो तो विशीत किती सुंदर दिसत असेल ? हा प्रश्न तिला सतावत होता हा प्रश्न त्याला विचारावा असा विचार अनेकदा तिच्या मनात आला असेल पण तिची हिंमत झाली नाही पण तिची त्याला जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता काही कमी झालेली नसावी. म्हणून तिने त्याच्या आईकडे त्याच्याबद्दल विषय काढला असता त्याच्या आईने बोलता बोलता जगाला माहित नसणार एक गुपित तिला सांगितलं की विजयला घरातील सर्व कामे करता येतात भांडी घसण्यापासून ते पोळ्या लटण्यापर्यत हे कळल्यावर ती स्वतःशीच म्हणाली, कोणी सामान्य मुलगी याला जाणून घेऊन याच्या प्रेमात नाही पडू शकत. याच दिसणं, असणं आणि वागणं या तिन्ही मध्ये असणारी तफावत सामान्य माणसामध्ये कधीच नसते. विजय तिच्याकडे पाहून हसला ! मग ती ही हसली !! खरं तर त्याच्याशी बोलावं असं तिला खूप वाटत असलं तरी काय बोलावं हे कळत नव्हतं कारण विजय समोर बोलताना बोलबच्चन असणाऱ्या लोकांचीही बोबडी वळते...फार कठोर, गूढ आणि नेमकं बोलतो तो ! हा साऱ्या जगाचा अनुभव होता. जो तिने ऐकला होता पण विजय तिला तसा अजिबात वाटला नव्हता. मग ती स्वतःशीच म्हणाली, बऱ्याच वर्षांनी गावी आला आहे उगाच कोणाच्या मनात अडी निर्माण व्हायला नको म्हणून आपल्या चेहऱ्यावर याने एखादा नवीन मुखवटा तर चढवून घेतला नाही ना ? तिला पडलेला प्रश्न चुकीचा नव्हता. खरचं ! विजय गावाला निघतानाच स्वतःच्या चेहऱ्यावर एक निर्विकार भोळसटपणाचा मुखवटा चढवून घेतो...जो मुखवटा तो मुंबईला गेल्यावर उतरवून ठेवतो...तिलाही तो उतरवलेला मुखवटा ती मुंबईला गेल्यावर पहायला मिळणारच होता...
अवघ्या काही दिवसाचे आपल्या गावातील आपले वास्तव्य आटपून विजय मुंबईला परतला. विजयची गावाला आणखी काही दिवस राहायची खूप इच्छा होती पण त्याच्या गावात त्याच्या मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे त्याला माहितीच्या मायाजालापासून दूर राहावं लागत होत. पण तिथेही त्याने अनेक छायाचित्रे मात्र त्याच्या मोबाईलमध्ये न चुकता कैद केली. फेसबुकवर अडीच हजार मित्रमंडळी असणारा विजय फार काळ मनात असूनही इंटरनेटपासून दूर राहू शकणार नव्हता. मुंबईला आल्या आल्या विजयने आपला फेसबुक पेज उघडलं तर त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती आणि ती रिक्वेस्ट तिचीच अर्थात कविताची होती जी त्याला गावी भेटली होती. विजयने तिची विनंती मान्य केली आता त्याच्या हजारो मैत्रिणींपैकी तीही एक झाली होती. त्याच्या मैत्रिणीत काही मोठं मोठी नावेही होती. विजयला तिच्या वागण्याचे अजिबात कुतूहल नाही वाटले वाटले असते जर तिने असे केले नसते. विजयला खात्री होती की ही मुंबईला गेल्यावर ती आपल्याबद्दल अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करणार माझ्या बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता तिला शांत बसू देणार नाही. विजयने गावी काढलेले फोटो इंटरनेटवर अपलोड केले ते सर्वच्या सर्व तिने लाईक केले पण जेव्हा तिने त्याचे इतर फोटो पहिले तेव्हा ती त्याची भक्त झाली...ती त्याचा आदर करू लागली कारण तिला माहित असणारा विजय तिच्या महितीपेक्षाही खूप मोठा होता विद्वान होता. ज्या लोकांना भेटण्याचा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा ती स्वप्न पहायची त्या व्यक्तीसोबत विजयचे मित्रवत संबंध होते आणि सर्वात महत्वाचे फेसबुकवरील सर्व मित्र विजयने जमवले नव्हते तर कमावले होते. विजयसोबत चर्चा न करून तिने किती मोठी संधी गमावली होती हे तिच्या लक्षात आले होते. त्यांनतर मात्र ती अधून मधून त्याच्या एखाद्या फोटोला लाईक करू लागली. विजयबद्दल तिच्या मनात ज्या काही भावना निर्माण झाल्या होत्या त्या तिने तिच्या मनातच दाबून टाकल्या होत्या आणि कदाचित विजयसोबत आपलं निदान मैत्रीचं नातं असावं या निर्णयापर्यत ती पोहचली होती जशा यापूर्वी अनेकजणी पोहचल्या होत्या विजयची जिला प्रेयसी म्हणावी अशी एकही मैत्रीण नव्हती पण त्याच्या ज्या मैत्रिणींना त्याला प्रियकर म्हणण्याची इच्छा होती अशा बऱ्याचजणी त्याच्या आयुष्यात आजही होत्या पण त्यांची परिस्थिती फार काही वेगळी नव्हती या कवितासारखीच होती फक्त कविता त्यांच्यात सगळ्यात तरुण होती सुंदर नव्हती...सुंदरतेत ज्यांना परी म्हणावे अशा त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या.
कवितामुळे कधी नव्हे तो विजयच्या मनात एक प्रश्न घोळू लागला होता कवितासारखी इतकी तरुण मुलगी जर माझ्या प्रेमात पडू शकते असे गृहीत धरले तर यामिनीच काय ? ती ही पडली असेल का माझ्या प्रेमात ? नाही तसे नसेल बहुतेक नाहीतर एव्हाना ती तुझी फेसबुक अथवा व्हाट्स अँप मैत्रीण असायला हवी होती नाही ? तिचा माझ्याकडे अथवा माझा तिच्याकडे साधा मोबाईल नंबरही नाही. नाही ! कसा नाही ? कधी गरज भासलीच तर आपण तिचा मोबाईल नंबर आपल्या डायरीत लिहून ठेवलेला आहेच की . आणि आपला नंबर तर जग जाहीर आहे मग ! कदाचित तिच्याकडे आपला मोबाईल नंबर असेल. विजयने हिंमत करून आपल्या डायरीतील तिचा नंबर शोधला आणि तिचा नंबर आपल्या मोबाईल मधे सेव्ह केला तेव्हा त्याला लक्षात आले कि त्याचा मोबाईल नंबर तिच्या मोबाईल मध्ये पूर्वीच सेव्ह होता. आश्चर्य म्हणजे पुढच्या क्षणाला व्हाट्स अँप वर त्याचे स्टेट्स तिने पहिले होते ? या सगळ्याचा नेमका अर्थ काय पकडावा हे विजयला कळत नव्हते. त्यानंतर तो जो काही चांगला वाईट स्टेट्स टाकत राहिला तो ती पहात राहिली त्या व्यतिरिक्त काही नाही...मध्येच एखाद्या दिवशी तिने त्याचा स्टेट्स नाही पहिला की विजय व्याकुळ व्हायचा, त्यात ती ऑन लाईन असतानाही जर तिने कधी त्याचा स्टेट्स पहिला नाही तर मात्र त्याला तिचा भयंकर राग येऊ लागला. मग तो स्वतःलाच समजवायचा आपल्यात असं काहीच नातं नाही ज्यामुळे आपल्याला तिच्या वागण्याचा राग यावा किंवा आपण तिच्याकडून कसली अपेक्षा करावी. ती तिच्या स्टेट्सवर कधीच काही टाकत नसे फक्त आपला प्रोफाइल फोटो दोन चार दिवस आड करून बदलत असे तो ती नक्की का बदलत असे हे एक कोडं होतं. विजय ते कोडं सोडविण्याच्या प्रयत्नात होता. पण तिच्या प्रोफाईलवर फक्त तिचाच फोटो असावा अशी विजयची अपेक्षा होती कारण रोज तिला पहाता यावं ! मागील कित्येक वर्षापासून यामिनी विजयच्या समोर आहे पण कधी त्याला तिच्याबद्दल न वाटलेले आकर्षण अचानक कोठून आणि कसं निर्माण झालं ? हे ही एक न सुटलेलं कोडं होतं. विजयने मनाशी ठरवून टाकलं आपल्या आयुष्यात इतक्या सुंदर स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल जे कधीच वाटलं नाही ते यामिनी बद्दल का वाटतंय ? तिच्यात असं काय वेगळं आहे ? तसं म्हणायला गेलं तर माझ्या स्वप्नातील प्रेयसीच्या ती जवळ- पासही नाही मग आमचं काही गेल्याजन्मीचं काही नातं आहे का ? जेंव्हा जेंव्हा आम्ही एकमेकांच्या समोर येतो तेव्हा नजर चोरतो असं का होत ?
साऱ्या जगाच्या डोळ्यात डोळे घालून बोलणाऱ्या विजयला यामिनीच्या डोळ्यात पहायची हिंमत होत नाही. पण तो दूर असताना यामिनी मात्र त्याच्याकडे एक टक पहात राहायची. नेहमीच विजयला यामिनीच्या डोळ्यात एक वेगळेपणा दिसायचा जो त्याच्या सोबत असणाऱ्या इतर मुलींच्या डोळ्यात कधीच दिसला नाही. तरी विजय कधीच तिच्या प्रेमात वगैरे पडला नाही. विजयवर प्रेम करणाऱ्या ज्या मुलींच्या प्रेमाची विजयने साधी दखलही घेतली नव्हती त्यांच्यापेक्षा यामिनी डावी होती सर्वच बाबतीत. विजयच्या आयुष्यातून क्रमाक्रमाने त्याच्या सर्व मैत्रिणी लग्न करून निघून गेल्यावर विजय एकटा पडला म्हणून तो यमिनीचा विचार करू लागला का ? तर असं म्हणायलाही वाव नव्हता. त्याने ज्यांच्या प्रेमात पडावं अशा कित्येकजणी आजही त्याच्या आजूबाजूला होत्या. विजयच्या डोळ्यात आपला जोडीदार असला तर तो कसा असावा याच एक चित्र साठवलेलं होत यामिनी त्या चित्राच्या जवळपास जाणारी होती म्हणून असेल कदाचित ! विजय रोज त्याच्या व्हाट्स अँप वरील स्टेट्सवर शुभ सकाळ , शुभ दिन आणि शुभ दिनाच्या शुभेच्छा देणारी चित्रे टाकत असे पण ती फक्त ती पहायची कधी तिने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्याचवेळी विजयचे स्टेट्स तिच्यासारखेच सकाळ संध्याकाळ पहाणाऱ्या आणखी तीन तरुणी होत्या त्यामुळे विजयच्या मनात नराहून एक प्रश्न निर्माण झालाच की ही त्या तीन मुलींसारखीच एक नसावी ना ? तस असेल तर आपण तिच्याबद्दल जो विचार करतोय त्या विचार करण्याला काहीच अर्थ नाही ! तिच्या मनात तसं काही असत तर ती एकदा तरी तुला शुभ सकाळ, शुभ दिन अथवा शुभ रात्री म्हणाली असती नाही का ? कदाचित तुझे तिला आवडलेले स्टेट्स ती दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड करत असेल आणि तिचा स्टेट्स तुला दिसत नाही म्हणजे तिचा स्टेट्स तुला दिसावा अशी तिची इच्छा नाही ! ती अनेकदा तुझ्या समोर आली पण तुझ्याप्रति तिच्या वागण्यात तुला काही बदल जाणवला का ? तर नाही ! ती तुझा स्टेट्स पहाते याचा अर्थ तुझे विचार तिला आवडतात फक्त आवडतात तू आवडत नाहीस ! हे सत्य पचवायला जड असलं तरी तेच सत्य आहे ! हे खरं आहे तिच्यापेक्षाही तरुण हुशार आणि सुंदर तरुणी तुझ्याकडे आकर्षित होतात ! पण यामिनी त्यातली नाही ! एक दिवस विजयने यामिनीच्या प्रोफाईलवर तिचा साडीतील फोटो पहिला आणि विजयने काय अर्थ लावायचा तो लावला ! विजयला कळून चुकलं होत यामिनी त्याच्या आयुष्यात आलेलं आणखी एक फुलपाखरू होतं ! त्यांनंतर क्रमश: काही तरुण मुलांसोबतचे तिचे पिकनिकचे वैगरे फोटो पाहिल्यावर विजयच्या मनाची खात्री झाली आणि त्याने तिच्या सोबत तिच्या आठवणीत तिच्या प्रेमात केलेला एकाकी प्रवास विसरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर विजयने आपल्या स्टेट्सवरील सर्व फोटो डिलिट मारले दोन दिवस त्याने स्टेट्स टाकले नाहीत त्यादरम्यान त्याने स्वतःशीच विचार केला माझ्या हृदयात मी यामिनीला प्रवेश दिला तिला याची कल्पनाही नाही ती तिच्या जगात आंनदी आहे तू कशाला उगाच विनाकारण तिला आठवून दुःखी होतो आहेस आणि ती तुझ्या आयुष्यातून अशी वजा झालेली पहिली मुलगी नाही ! आठव असा तू एक महिन्यासाठी किती जणींच्या प्रेमात पडला होतास ? त्यांची नावेही आठवत नसतील तुला आता ! तसाही तू अविवाहित राहण्याचा पक्का निर्णय घेतला होतास तुझा तो निर्णय यामिनीमुळे थोडा डळमळीत झाला होता हे जरी खरं असलं तरी त्यामुळे तुझ्या आयुष्यावर फार काही परिणाम होण्याची गरज नाही तसं पहाता यामिनीच्या प्रेमात पडणं ही तू स्वतःशी स्वतःच्या विचारांशी केलेली तडजोडच ठरणार होती ! यापूर्वी तुझ्या आयुष्यात आलेल्या तरुणी सर्वच बाबतीत यामिनीपेक्षा अधिक होत्या मग ! तू त्यांचं प्रेम का नाकारलंस ? यमिनींन तुझं प्रेम न स्वीकारणं ही तुझ्या त्या पापाची शिक्षा समज ! यामिनीसारख्याच आताही त्या तीन तरुणीही तुझा स्टेट्स दिवस रात्र पहात होत्या यामिनीपेक्षाही जास्त आणि इतकंच नव्हे तर त्यांचा स्टेट्स तुझ्यासाठी खुला होता याचा अर्थ त्या तुझ्या प्रेमात होत्या आणि तू तुझ्या प्रेमात नसणारीच्या प्रेमात बुडाला होतास ! विजयने लगेच आपला नवीन स्टेट्स अपडेट करायला सुरुवात केली यमिनीने लगेच पहिला पण त्या तिघीनी मात्र पहाणं बंद केलं होत आणि स्टेट्स टाकणं ही विजयला लक्षात आलं होतं यामिनी नकळत माझ्या भावनांशी खेळत राहिली पण मी मात्र समजून उमजून त्या तिघींच्या भावनांशी खेळत राहिलो. त्या तिघीच माझ्यावर इतकं प्रेम होत की त्या तिघीना कळून चुकलं होत की मी कोणाच्यातरी प्रेमात आहे आणि दोन दिवस स्टेट्स न टाकल्यावर त्यांना हे ही कळलं होत की माझा प्रेमभंग झाला आहे.
सुंदरतेत ज्यांना परी म्हणावे अशा विजयच्या अनेक मैत्रिणी होत्या. विजयशी मैत्री करण्याची इच्छा असणाऱ्या कित्येकींना त्याला फोन करण्याची हिंमत होत नाही पण ज्या ती हिंमत करतात त्या स्वतःशीच म्हणतात "आपण उगाचच घाबरत होतो ! किती साधा , सरळ आणि प्रेमळ आहे हा ? विजयबाबत अनेकांची अनेक मते आहे प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि वेगळा भासतो. विजय समोरची व्यक्ती कोण आहे ? तिची बौद्धिक क्षमता काय आहे ? समाजातील त्या व्यक्तीचे स्थान काय आहे ? हे पाहून त्याप्रमाणे स्वतःत काही तात्पुरते बदल करून त्याच्याशी संवाद साधतो...असं ही म्हणता येईल की विजय एखाद्या सरड्यासारखे रंग बदलतो पण ते चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने म्हणता येईल...कारण विजय जितका भाऊक आहे त्यापेक्षा किती तरी अधिक कठोर आहे, तो जितका शांत दिसतो त्यापेक्षा कित्येक पटीने रागीट आहे. राग नेहमी त्याच्या नाकावरच असतो कारण त्याला अन्याय सहन होत नाही मग तो अन्याय करणारा कोणी का असेना ! लोक विजयच्या कविता, कथा आणि लेख वाचून त्याच्या प्रेमात पडत पडतात पण विजयला वाचनं मात्र कधीच कोणाला शक्य झालं नाही. त्याच्यासोबत आयुष्य काढणाऱ्यांनाही असंच वाटत की विजय आपल्याला अजून कळला नाही. मग अवघ्या चार- पाच दिवसात काही मिनिटे विजय सोबत बोललेली कविता आणि विजय सोबत एक शब्दही न बोललेली यामिनी विजयला कशी काय ओळखणार होती ? कविताच विजयच्या प्रेमात पडणं विजयसाठी एक सामान्य गोष्ट होती पण यामिनीने त्याला टाळणं त्याला नेहमीच खटकत होतं म्हणूनच तो तिचा थोडा अधिक विचार करू लागला होता आणि एका क्षणाला त्याला वाटलं की तो तिच्या प्रेमात पडला आहे. पण विजयला हे असं वाटणं ही त्याच्यासाठी नवीन नव्हतं. यामीनीशी त्याचा काहीच संवाद नव्हता पण त्याच्याशी काही मिनिटे बोलायला आतुर असणाऱ्या लोकांचीही कमी नव्हती...यामिनीच विजयच्या प्रेमात पडणं न पडणं विजयसाठी अजिबात महत्वाचं नव्हतं पण तिचं त्याच्याशी अबोल राहणं त्याला नेहमीच खटकायचं ! कोणाच्या तरी प्रेमात पडणं त्याला आवडायचं पण वेड्यासारखं प्रेम करण अथवा प्रेमात वेडं होणं त्याला कधीच जमलं नव्हतं आणि जमणार नव्हतं ! ते जर जमलं असत तर विजयला जी आज ओळख आहे ती नक्कीच नसती. कविता काय किंव्हा यामिनी काय त्याच्या मेंदूचा ताबा फार काळ घेऊ शकत नव्हत्या. विजयच्या तोडीच्या असणाऱ्या असामान्य तरुणींनीही विजयसमोर गुडघे टेकले होते तेथे कविता आणि यामिनी अंत्यत सामान्य सर्वसाधारण तरुणी होत्या कविताचं विजय प्रतीचं प्रेम हे अल्लड प्रेम होतं पण विजयच यामिनी प्रतीचं प्रेम अलौकिक , गूढ, अगम्य आणि रहस्यमय होत. यामिनीच विजयच्या आयुष्यात येणं सहज झालं नव्हतं ते होण्यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया पार पडलेली होती. आतापर्यत विजयने यामीनीच त्याच्या आयुष्यात येण सहज घेतलं होत पण मागच्या काही वर्षात त्याच्या आयुष्यात झालेल्या घडामोडी आणि यामिनी यांचा काहीतरी सबंध आहे हे लक्षात आल्यावर मात्र विजय बेचैन झाला. यामिनी सहज त्याच्या आयुष्यातून दूर गेली तर त्याच त्या
ला फार दुःख होणार नव्हतं कारण ते आता त्याला सवयीच झालं होत. पण तस खरचं झालं तर विजयचा एक शोध थांबणार होता आणि त्याच जगणं मार्गी लागणार होत...
विजयच व्हाट्स अँप वर स्टेट्स टाकणे सुरु होत आणि यामिनीच ते सारखं पहाणं. एका क्षणाला विजयच्या मनात विचार आला आपला स्टेट्स यामिनीला दिसू नये म्हणून तिच्यासाठी ब्लॉक करूया का ? पण दुसऱ्याच क्षणी तो स्वतःशीच म्हणाला आपण का उगाच तिच्यासाठी वेड्यागत वागायचं ? यामिनी विजयचे स्टेट्स कधीच सलग वाचत नव्हती थोड्या थोड्या अंतराने पहायची दिवसातून पाच वेळा सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री आणि झोपण्यापूर्वी तीच हे करण्यात सातत्य होत. सुरुवातीला ती तिचे प्रोफाइल फोटो रोज बदलायची पण आता ती नेमकेच फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवायची ज्यात एक तिचा फोटो, एक तिच्या आवडत्या हिरोचा फोटो, एक विजयच्या आवडत्या मालिकेतील हिरॉइनचा फोटो, एक देवीचा फोटो आणि एखाद्या फुलपाखरांचा फोटो. यमिनींने विजयबद्दल तिला जे काही वाटतं ते या फोटोच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नव्हता ना ? यामिनीची बहीण दामिनी मात्र विजयची चांगली मैत्रीण होती ती विजयला नेहमी व्हाट्स अँपवर चांगले चांगले मेसेज पाठवत असे पण कधी - कधी ते असं काही पाठवत असे की त्या तिच्या आवडीच्या गोष्टी नसून यामिनीच्या आवडीच्या आहेत असे वाटे आणि तो त्या मेसेजेसला छान उत्तरे देत असे. एक दिवस अचानक यमिनीचा विजयच्या मोबाईलवर फोन आला पण गडबडीत विजयला वाटले की चुकून त्याच्याकडून तिला फोन लागला की काय ? म्हणून त्याने फोन उचलला नाही पण परत परत फोन आल्यावर विजयने फोन केला आणि समोरून कोणी काही बोलण्यापूर्वीच तो म्हणाला चुकून फोन लागला असेल त्यावर समोरून दामिनी म्हणाली, तुझा फोन नाही लागला चुकून मीच तुला फोन करत होते माझा मोबाईल बंद होता म्हणून मीच यामिनीच्या फोनवरून तुला फोन केला. माझं एक काम आहे तुझ्याकडे ! दामिनीच्याच कामासाठी जेव्हा विजयने पुन्हा यामिनीच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा यमिनीने फोन उचलला आणि कोण बोलतंय विचारलं असता विजयने ओळख देताच ती किंचित बावचळली. पण विजयने दामिनी सोबत बोलायचंय म्हटल्यावर ती भानावर आली. दामिनीशी चर्चा करतात करता विजय दामिनीला म्हणाला तुझा व्हाट्स अँप तर बंद आहे आता मी तुला ती माहितीचा व्हाट्स अँप कसा करू ? तर ती म्हणाली," यामिनीच्या व्हाट्स अँप वर कर नाहीतर ती कोठे व्हाट्स अँप बघते दोघींचे व्हाट्स अँप मीच तर बघते. विजय ठीक आहे उद्या भेटूया त्यावर दामिनी म्हणाली, उद्या नको उद्या मी दिवसभर कामासाठी बाहेर जाणार आहे आपण पर्वा भेटू ! त्या दुपारपर्यंत विजयने टाकलेले स्टेट्स यमिनींने पहिले नाहीत तेव्हा विजयची खात्री पटली की आपल्या स्टेट्सला दामिनीच उत्तर देत होती याचा अर्थ यामिनी या सगळ्यात कोठेच नव्हती. आता मात्र विषय स्वतःशीच हसला ! पण त्याच हसणं फार काळ नाही टिकलं कारण थोड्याच वेळात त्याला दामिनीचा फोन आला ती त्याला म्हणाली, ती माहिती यामिनीच्या व्हाट्स अँपवर नको माझ्या व्हाट्स अँपवर पाठव तिचा व्हाट्स अँप आज बंद आहे ! विजयने कपाळावर हात मारला पुढच्याच क्षणाला विजयचे स्टेट्स यमिनींने पहिले होते. विजय मग भराभर स्टेट्स पाठवत राहिला आणि यामिनी भराभर पहात राहिली . विजयने लगेच दामिनीला करायचा व्हाट्स अँप यामिनीला केला सहाजिकच यामिनीने काही प्रतिक्रया न दिल्यामुळे त्याने तिला फोन केला. त्यावर दामिनी बाहेर गेल्याचे ती म्हणाली पण यामिनीच्या बोलण्यात एक गोडवा होता हे विजयने हेरले. आता यामिनीही त्याचे स्टेट्स बघते याची त्याला खात्री पटली. पण मग नवीन प्रश्न उभा राहिला मग यामिनी मला सरळ व्हाट्स अँप का नाही करत ? यामिनी आणि विजय व्हाट्स अँपच्या माध्यमातून संपर्कात आहेत हे फक्त त्या दोघानाच माहित होत इतरांना त्याची माहिती मिळणार नव्हती. यामिनीच्या मनात आपल्याबद्दल काही वेगळं असावं का ? आणि असेल तर त्याची खात्री कशी करून घ्यावी ? त्यांनतर विजयने स्टेट्सवर प्रेमाचे संदेश टाकले की त्याला उत्तर दामिनीच्या स्टेट्स वरून मिळत असे. हा सर्व काय खेळ सुरु आहे काही म्हणजे काही विजयला कळत नव्हतं ! यामिनी आणि दामिनी यांच्या कात्रीत तो सापडला होता दोघींनाही स्पष्ट विचारू शकत नव्हता. तेव्हा विजयने एक गोष्ट केली त्यांने यामिनी आणि दामिनी शक्यतो कोणत्या वेळी एकत्र नसतात याची खात्री करून घेतली आणि स्वतःला समजावलं फक्त या वेळेत पाहिलेले स्टेट्स यामिनी पहाते आणि इतर वेळचे कोणीही पाहिलेले असतील. यामिनीला एकदाच स्पष्ट विचार विजय हे सार क्षणात संपवू शकला असता पण त्याने विचार केला आपण शेकडो प्रेमकथा लिहिल्या पण त्यातील प्रेमाचा अनुभव इतरांचा होता आपण प्रेम इतरांच्या नजरेतून अनुभवलं होत त्याच्या प्रत्यक्ष अनुभूती घेतली नाही ती घेण्याची नामी संधी चालून आलेली आहे यामिनीच जर आपल्यावर खरं प्रेम असेल तर जग इकडचे तिकडे झाले तरी आपण तिच्या प्रेमाचा स्वीकार आपण करूच पण तसं काही नसेल तर खऱ्या प्रेमाची अनुभूती, प्रेमात होणारी तडफड, प्रेमाची व्याकुळता, प्रेमाचा विरह सारं अनुभवता येईल. यामिनीलाही कोणाच्यातरी प्रेमात पडल्यावर मिळणारा आंनद अनुभवायचा नसेल तर कोणाच्या तिच्या प्रेमात पडण्याचा तर आनंद घेता येईल. सुरुवातीला विजयने त्याचं यामिनीवरील प्रेम मनावर घेतलं होत पण आता तो सावरला होता आता त्याने हे सर्व खेळीमेळीने शांतपणे अजिबात डोक्यात कोणताच राग न ठेवता घ्यायचं ठरवलं होतं. विजयच्या नजरेत यामिनी एक चंद्र होती आणि दामिनी त्या चंद्राजवळ असणारी चांदणी तर कविता त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या असंख्य चांदण्यांपैकी एक होती. विजयने यामिनीच्या आपल्या प्रेमाच्या काल्पनिक जगातील एक चंद्र मानला आणि मग त्याने एक खेळ सुरु केला तो यमिनीचा उल्लेख " माझा चंद्र " असा करू लागला म्हणजे यामीनीने व्हाट्स अँपवर त्याचे शुभरात्री हे स्टेट्स पहिले की तो पुढचा स्टेट्स टाकत असे माझा चंद्र मला शुभरात्री म्हणाला. अशा प्रकारे माझा चंद्र याला केंद्रस्थानी ठेऊन तो यामिनी बद्दलच आपलं प्रेम व्यक्त करू लागला. यामिनी अथवा दामिनी दोघींपैकी एक स्टेट्स वाचताना अथवा पाहताना त्या स्टेट्सवर नेहमी थांबत. कित्येकजण त्याच्या या स्टेट्सचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते आणि विजयचा चंद्र कोण असावी याच्या शोधात होते.
विजयच्या चंद्र हा विजयच्या जवळच्या व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय ठरत होता पण एकदा विजयनेच एक स्टेट्स टाकून माझा चंद्र ही एक कवी कल्पना असल्याचे सांगितल्यावर सर्व शांत झाले असे विजयला वाटत असले तरी तरी तसे झाले नसावे कारण विजय विनाकारण काहीच करत नाही हे सर्वाना माहित होते. यामिनीने अथवा दामिनीने विजयच्या चंद्राला उत्तर म्हणून विजयची आवडत्या मालिकेतील हिरॉइनचे फोटो स्टेट्सवर टाकायला सुरुवात केली. त्या मालिकेतील हिरॉईन आणि यामिनी यात बरचं साम्य होतं हेच कारण नव्हतं ती मालिका विजयला प्रचंड आवडायला तर त्या मालिकेतील नायकाच व्यक्तिमत्व त्याच्यासारखच होतं. पण त्या मालिकेतील नायक प्रेमवेडा होता विजय तसा नव्हता तो प्रेमकडे डोळसपणे पहायचा त्याला एकतर्फी प्रेम मान्य होत पण त्या एकतर्फी प्रेमात वेडं होणं मान्य नव्हतं...विजय या विश्वातील गूढ गोष्टीची उकल करण्याच्या प्रयत्नात होता. यामिनी त्याच्या प्रेमात असेल तर तो तिच्या प्रेमाचा स्वीकार करायला तयारच होता पण तिला त्याला जबरदस्तीने मिळवायचे नव्हते. त्याच्या मते प्रेम हे कोणाच्याही आयुष्यात अगदी हळुवार यायला हवं एखाद्या फुलपाखरासारखं वेगवेगळे रंग घेऊन ...
यामिनी खरोखरच माझा चंद्र आहे का ? नाहीतर आकाशातील चंद्राच्या प्रेमात तर सारेच पडतात! तसा तर मी तिच्या प्रेमात नाही ना पडलो ? विजयच्या मनात या अशा असंख्य प्रश्नांचं काहूर उठलं होतं. विजयला एक प्रश्न नकळत सतावू लागला जर ती तुला ओळखते तर ती व्हाट्स अँपवरील तुझे फक्त स्टेट्स का पहात राहील ? ती तुला एखादा संदेश व्हाट्स अँपवर पाठवू शकली असती. जसा तुझ्या इतर मैत्रिणी तुला रोज सकाळ संध्याकाळ पाठवतात. तशी संधीही तू दिली होतीस तरी त्या संधीचा तिने फायदा उचलला नाही याचा अर्थ तुला वाटतं तसं तिला तुझ्याबद्दल काही वाटत नसावं. विजय स्वतःला समजावत होता पण त्याचवेळी त्याला आणखी एक गोष्ट लक्षात आली तिने त्याला आवडणाऱ्या मालिकेतील नायिकेचा फोटो त्याच्यासाठी नाही तर स्वतःच प्रतिनिधित्व करण्यासाठी टाकला होता आणि त्या मालिकेतील नायकासारखा कोणीतरी तिच्या आयुष्यात होता अथवा तिला तिच्या आयुष्यात हवा होता. तो फोटो पाहून विजयचा गैरसमज झाला आहे हे बहुदा तिच्या लक्षात आले की नाही ते रहस्यच होत पण त्यांनतर तिने टाकलेला फोटो मात्र तसं स्पष्ट बोलत होता की तिच्या स्वप्नातील पुरुष विजय नव्हता. विजय त्याच्या जवळपासही जाणारा नव्हता . विजय खरोखरच तिच्या खूप प्रेमात होता पण त्याची प्रेमाची मर्यादा ठरलेली होती ती तो ओलांडून जाऊ शकत नव्हता. विजयने खूप विचार केला सर्व गोष्टीचा अगदी सर्व बाजूंनी आणि यामिनीचा नाद सोडायचा निर्णय घेतला. यामिनीला विसरणं त्याला जड जात होतं कारण पुन्हा एकदा त्याच्या हृदयाचे तुकडे होणार होते. विजयने स्वतःलाच समजावलं बरं झालं आपल्याला वेळीच लक्षात आलं नाहीतर तिच्या प्रेमात खूपच पुढे गेल्यावर आपल्याला माघारी फिरणं अवघड होऊन बसलं असतं. तिच्या प्रेमात पडल्यावर विजयने त्याच्या मनाला विचारांना खूपच आवर घातला होता त्याच्या स्वभावा विरुद्ध जाऊन ! कोणाची कशासाठी वाट पहाणं आणि दुसऱ्यांना वाट पहायला लावणं त्याला जमलं नव्हतं पण यामिनीच्या प्रेमात पडल्यावर मात्र तो हळवा होत गेला. यामिनी जिच्यावर आपण सर्वाधिक प्रेम केल, आपल्या विचारांशी तत्वांशी तडजोड करण्याची तयारी ठेवली ती आपली होऊ शकत नाही या कल्पनेने विजयसारख्या वाघाचं काळीज असणाऱ्या पुरुषालाही रडू कोसळलं पण विजयच्या बाबतीत एक विचित्र गोष्ट होती की तो हलवा होऊन जेव्हां जेव्हां रडला त्यांनतर तो अधिक कठोर झाला आणि आता तर तो वज्राहूनही कठीण झाल्याची चाहूल लागत होती. आता पुढचे बरेच दिवस विजयचा चांगुलपणा त्याच्यातील साधाभोळा प्रेमळ पुरुष कोणालाच दिसणार नव्हता कारण यमिनीने नकळत त्याच्यात खोलवर दडलेला रुद्र पुन्हा जागृत केला होता. आता विजयला प्रेमात पाडणं कविता किंवा यामिनीलाच काय साक्षात मेनकेलाही अवघड जाणार होतं. मागील कित्येक दिवस विजयने फक्त आणि फक्त यमिनीसाठी स्वतःच्या चेहऱ्यावर प्रेमाचा मुखवटा चढवला होता तो त्याने उतरवला आणि त्याचे डोळे पुन्हा आग ओकू लागले. भल्या - भल्याना त्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची हिंमत होत नाही. त्याला आलेला राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही पण डोळ्यात दिसतो. आता विजय कोणाशीच पुढेचे काही दिवस प्रेमाने बोलणार नव्हता त्याच्या डोळ्यातील आग शांत होईपर्यत पण तोपर्यत तो काय बदलेल आणि काय करेल याचा काही नेम नव्हता. आता तो स्वतःला कशात तरी गुंतवून घेणार हे नक्की होतं पण यावेळी तो स्वतःला कशात गुंतवून घेतो हे येणारा काळच ठरवणार होता. विजय लोकांशी जास्त हसून बोलायला लागला की समजायचं की हा प्रचंड चिडलेला आहे जेव्हा तो शांत असेल तेव्हा समजायचं त्याच सारं सुरळीत सुरु आहे.
विजय एकूणच प्रेम आणि स्त्रियांच्या बाबतीत फारच कठोर होता. प्रेम आणि स्त्री हे त्याचे अभ्यासाचे विषय होते आकर्षणाचे विषय कधीच नव्हते. यामिनीमुळे तो बदलू पहात होता पण कदाचित नियतीला हे मान्य नसावं ! तो जर या सगळ्यात जास्तच गुंतून पडला तर त्याच जीवित कार्य पूर्ण कसं होईल असा प्रश्न नियतीला पडला असेल कदाचित ! कोणतीही सामान्य स्त्री त्याचं प्रेम होऊ शकत नव्हती. इतकंच नव्हे तर ! विजय सारख्या आगीच्या गोळ्याला कोणतीही सामान्य स्त्री आपल्या पदरात घेऊ शकणार नव्हती. यामिनीत ती क्षमता आहे की नाही या बद्दल विजय पूर्वीपासूनच संभ्रमात होता. पण त्याला मिळाले संकेत असं सांगत होते की ती स्त्री जी त्याला आवरू शकते त्या स्त्रीचे वर्णन यमिनीशी मिळते जुळते आहे म्हणूनच तो तिच्या प्रेमात पडत गेला नाहीतर यामिनीबद्दल कधीच त्याला शारीरिक आकर्षण ज्याला म्हणावं ते कधीच वाटलं नव्हतं त्याला नेहमीच असा आभास होत राहिला की यामिनी आणि त्याचं नातं अलौकिक आहे. पण सध्याच्या परिस्थिती तो विजयचा भ्रमच ठरला होता.
कठोर झालेला विजय आता कशानेच वितळणार नव्हता. रागाच्या भरात विजयने यामिनीला आता आपल्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नसल्याचा संदेश व्हॉट्स अँपच्या माध्यमातून तिच्यापर्यत पोहचवला होता. पण बहुतेक तो तिला कळला नव्हता. आता विजय तिच्यासाठी कोणताही स्टेट्स व्हॉट्स अँपवर टाकणार नव्हता. त्याप्रमाणे तीन दिवस त्याने त्याच्या व्हाट्स अँपवर कोणताच नवीन संदेश टाकला नाही पण दरम्यान इतरांचे स्टेट्स वाचताना एक वाक्य त्याच्या वाचनात आलं इतरांसाठी स्वतःला बद्दलण्यापेक्षा तुम्ही आहात तसे तुम्हाला स्वीकारणारे कोणीतरी शोधा ! ते वाक्य वाचले आणि विजय डोक्यात नवीन विचार चक्र सुरु झाले जणू त्याला काशाचातरी शोध लागला होता तो स्वतःलाच म्हणाला यामिनीपेक्षा कित्येक पटीने हुशार सुंदर आणि आपला आदर करणाऱ्या कित्येक तरुणी आपल्याशी मैत्री करायला एका पायावर तयार असताना त्या यामिनीच्या मागे लागणे हा आपला गाढवपणाच असावा. खरं म्हणजे तिने आपलाच नाही तर आपल्या प्रेमचाही अपमान केला आहे. आपल्याला जसं वाटतं तशी जर आपण तिच्या प्रेमात पडणं हि नियतीची योजना असेल तर मग आपण का व्यर्थ दुःखी होतोय ते नियतीवरच सोडायला हवे ! विजयने यामिनी हा विषय कायमचा बंद करून इतरत्र लक्ष देण्याचा ठाम निर्णय घेतला पण त्याचवेळी आपण दुखावलोय हे यामिनीला कळूही द्यायचे नाही असे त्याने ठरवले आणि पूर्वीप्रमाणेच काही स्टेट्स टाकून तो खूपच व्यस्थ असल्यामुळे व्हाट्स अँपपासून दोन - तीन दिवस दूर असल्याचा सांकेतिक स्टेट्स टाकला तो पाहून यामिनीला बहुतेक वाटलं की विजयला आपला संदेश कळला नाही म्हणून तिने पूर्वी प्रमाणे विजयचे सर्व स्टेट्स पहिले पण तिने तिचा प्रोफाइल फोटो मात्र बदलला नाही. त्यामुळे आता विजयला काहीच फरक पडणार नव्हता. पूर्वी एखादा स्टेट्स टाकताना यामिनी त्याचा काय अर्थ घेईल असा विचार तो करायचा पण आता त्याने तो विचार करायचा सोडून दिला. तो ही आता त्याच्या स्टेट्सवर सुंदर सुंदर तरुणींचे फोटो टाकू लागला. त्याच्या सकाळी दुपारी रात्रीच्या शुभेच्छांची जागा आता सुविचारांनी घेतली. पण यामीनीने मात्र त्याचे स्टेट्स पहाणे सोडले नाही. विजय तिच्यासाठी म्हणून स्वतः लिहिलेले खास संदेश स्टेट्सवर टाकणे बंद केले. विजय यामिनीच्या प्रेमात पडल्यामुळे माणसात येत होता त्याचा फुलपाखरू होत होता पण यामिनीमुळे त्याचा यंत्रमानव होण्याकडे उलटा प्रवास पुन्हा सुरु झाला. भाव-भावना, प्रेम, आपुलकी आणि नातेसंबंध याकडे बुद्धीने पहाणारा ! ज्याच्या बुद्धीचा कधी हृदयाशी संबंधच येत नव्हता, जगाच्या नजरेत पाषाण हृदयी असणारा ! पण सुकोमल चेहरा मन आणि हृदय असणाऱ्या विजयला एखादा यंत्रमानव कोणी केलं ? विजय लहानपणापासून एखाद्या यंत्रासारखाच वयाने वाढत गेला आपले कार्य चोख बजावत सार्यांनी त्याचा यंत्रासारखाच वापर करून घेतला. तो यंत्र असल्यामुळे त्याच्या भावना नाहीत हे साऱ्यांनी गृहीत धरले होते. यामिनी थोडी वेगळी आहे, आपल्या स्वप्नातील चंद्र " माझा चंद्र " आहे असे विजयला आतुन वाटत होते पण ती ही शेवटी त्याला पाषाण हृदयी यंत्रच समजली आणि त्याला आपल्या मनोरंजनाच साधन म्हणून त्याच्या हृदयाशी खेळत राहिली त्यामानाने कविताच त्याच्याप्रतिच आकर्षण खूपच निर्मळ, निरागस, निस्वार्थी आणि प्रेमळ होत. बऱ्याच वर्षांनी विजयला त्याचा चंद्र सापडल्याचा आनंद होत होता पण तो चंद्र त्याचा नव्हताच हे कळल्यावर मात्र विजय कोलमडला पण यंत्राला तस करता येत नाही त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी त्याला सतत चालावेच लागते. विजय सावरला आणि पुन्हा नव्याने उभा राहिला त्याचा " माझा चंद्र" शोधण्यासाठी...