akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

लॉकडाउन -एक बंदीचा काळ

लॉकडाउन -एक बंदीचा काळ

2 mins
47


फेबुवारी महिन्यात कोरोनाच नाव कानी पडलं तेव्हा जरा विचित्र वाटलं कारण कॉम्पुटर व्हायरस अनुभवला होता पण माणसांना होणारा व्हायरस फक्त सिनेमा मध्ये पहिला होता मार्च पर्यत त्या वायरस ने आपले जाळे संपूर्ण जगभर पसरवले त्यात आपला देश हि अडकला.

त्या वायरसची होणारी वाढ माणसाचा निषाप्प बळी घेत होती त्याचा प्रकोप थांबवणे हेच आता लक्ष्य बनले होते आणि त्या व्हायरस चे जाळे तोडण्यासाठी मार्च महिन्यात अँटी व्हायरस म्हणून लॉक डाऊन चा शुभारंभ झाला.

संपूर्ण भारत देश लॉकडाऊन झाला रहदारीचे रस्ते मोकळे झाले बाजार पेठ व्यवसाय ठप्प झाले. सगळीकडे न असणारी शांतता पसरली. बाहेर पाडण्यासं मनाई असल्याने सगळेजण घरात बंदिस्त झाले काही वर्क फ्रॉम होम मध्ये गुंतले. तर काही आपल्या कुटूंबाबरोबर कधी हि न अनुभवले क्षण अनुभव्याला लागले त्यात भीतीची तलवार मात्र लटकत होती .

लॉक डाऊन मुळे व्यवसाय ठप्प झाले सगळ्यांना आपल्या भविष्याची चिंता लागली त्यात घर दार सोडून पोटापाण्यासाठी विस्तरलेल्या लोकांचं तर आयुष्य अंधारात होत काहींनी आपल्या गावी जाण्यासाठी पायवाट धरली.

लॉक डाऊन मुळे कधीही न एकत्र येणारी घरची मंडळी एकत्र आली गप्पा गोष्टी खेळ खेळणे नवीन पदार्थ करणे खाऊ घालणे चालू होते तर कुठे दुकाने बंद असल्याने घरातल्या सामग्री साठी चणचण भासली तर कुठे दिवसा रोजगारी वर असणाऱ्यवर उपासमारीची वेळ आली.

संपूर्ण देश एका कुलुपात बंद केला प्रमाणे होता आपले पोलीस बांधव आपल्या जीवाचे रान करून रस्त्यावर गस्त घालून लॉक डाऊन सफल व्हावा ह्या साठी पर्यंत करत होते. पण म्हणतात ना अति तेथे माती तसे काही लोक गरज नसताना बाहेर हिंडत होते आणि पोलिसांच्या दंडुकेचे फटके खात होते आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर फटके खाणारे विडिओ हि पसरत होते.

स्टे होम स्टे सेफ चा तर नारा असा पुकारला कि सोशल मीडियावर गाजला अनेक नावाजलेले मंडळी सुद्धा जाहिराती द्वारे लोकांपर्यंत पोहोचत होते.

सगळ्याच दररोज टाइम टेबल एकदम विस्कटले होते खूप जणांनी तर आराम करून आळशी झाल्याचे स्वीकारले. 

लॉक डाऊन ने सगळयांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली काही ना काही शिकवले काही ना काही गमावले लॉक डाऊन चा काळ सगळयांनीच अनुभवला आणि तो कायम लक्षात राहील.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy