कश्मिरी शेख - भाग १
कश्मिरी शेख - भाग १
कश्मीरी शेख ही पिशाच्च विश्वातील एक अंडरग्राउंड माफिया.
तिला त्या विश्वात राज्य करायचे होते. त्यामुळे ती कुठल्यापन पातळीवर जात असे.
तिचे स्वतःहाचे तीन अटी लागू केल्या होत्या.
१. एक १८ वर्षा खालील मुलगी.
२. जो कोण ते काम देणार त्याचे रक्त.
३. ५ पेट्या.
असे तिचे तीन अटी होत्या.
ती फक्त पिशाच्च नाही तर मानवजातीला पण ती मारत असे.
ती पहिली चर्चेत आली ती स्वतःच्या जन्मदात्या बाबाना मारून ती या गादी वर विराजमान झाली होती.
ज्या कोणी त्या वेळेला विरोध केला होता. त्यांना क्रूर पद्धतीने सगळ्या समोर त्याला मारून आग लावली होती. त्याच बरोबर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकायची कारण त्यांच्यातला पुढे जाऊन तिच्या विरोधात कोणी उभे राहू नये म्हणून.
म्हणूनच तिने आपल्या बाबान बरोबर आपले तीन भाऊ आलम, अरबाज आणि नूरला मारले होते.
म्हणून कोणी तिच्या विरोधात गेले नाही. सगळयांना समजले होते हिच्या विरोधात जाऊ नये.
..
विरोधात जाणार तरी कसे तिचे खरे रूप कोणी बघितलेच नव्हते.
ती दिसते कशी हे कोणी बघितलेच नाही . ज्यांनी बघिलते ते सर्व दुनियेतून गेले होते.
एकदा तिच्यावर दुसऱ्या जातीच्या पिशाच्चने हमाल केला होता. त्यात अफवा पसरली की ती त्या हमल्यात मेली पण झाले उलटेच.
दुसऱ्या दिवशी ज्या पिशाच्चने हमला केला होता त्यांचे मान कापून ती दुसऱ्या रूपात येऊन तिने सांगितले.
जो कोई मेरे खिलाफत मे जायेगा उसका हर्ष इससे भी बरा होगा समजे.
जो काम तुम करते हो ओ करते रहो. मे तुम्हारे काम के बीच नही दखलंदाजी करूनगी आप सभलोग मेरे काम मे दखलंदाजी नही करेंगे, सिर्फ मेरे कोटा हर महिने मिळना चाहीये बस.
जिस्को मारना हे उसको मारो, समजोता तोडणा पडेगा तो बोलो अभि. बादमे पिछेसे नही बोलेना असे म्हणून ती अदृश्य होते.
....
तिला फक्त दोन जणांची भीती वाटत होती. पण ते सगळे सोडून आपले जीवन जगत होते.
......
ती आपले काम स्वतःहून करायची. ती गादी विराजमान झाली तेंव्हाच तिने पाहिले काम घेतले ते.
मानव जातीतील पिशाच्च असलेल्या रघुनाथ चाकण ह्यांना मारायचे.
ते सगळ्यांचे जन्मदाते होते. तिला ते आवडले नव्हते की मानवजाती बरोबर त्यांनी करार केला होता.
....
त्यांना पण तिने फसवून मारले होते. त्यांच्या नातीचे रूप घेऊन त्यांना मारले होते.
......
चाकण याना काही संशय येण्या अगोदरच तिने त्यांच्या मानेत दात घुसवत त्यांना खाली फेकून बोलते.
लावण्याने चुकी केली जन्मतःहा आपल्या मुलीला तिने एका ठिकाणी ठेवले आहे. तिला वाटले तिने सागळ्यांची स्मृती काढली.
फक्त त्या मुलीचे नाव समजले गिरीजा अशोक राऊत. पण तिला पण कोणी बघितले नाही आहे.
चला मरता मरता ते तरी समजले तुला असे बोलून त्यांना आग लावते.
....
आता ती एवढी बलाढ्य झाली होती त्यांना मारून. तिचा हात आता कोणीच पकडणारा उरला नव्हता.
म्हणून ती आता बिनधास्त मानव जातीचे ही मारायचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली होती.
.....
एक दिवस तिचा मानव जातीचा हेर खालिद एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन हरीष कुलकर्णीला घेऊन आला होता पिशाच्च जागेवर.
.....
हरीष, खालिदला विचारतो आपण कुठे आलो आहोत आणि कोणाला भेटायला.
....
खालिद बोलतो कश्मीरी शेख हिला भेटायला. घे ती आलीच बघ.
....
हरीष बोलतो कुठे आली ती इथे तर कोणी दिसत नाही आहे.
.....
कश्मीरी समोर उभी राहत बोलते बोल हरीष कोणाला मारायचे आहे.
....
हरीश घबराट पाठी जात बोलतो. खालिद ही कोण आणि कुठून आली अचानक. माझे नाव कसे माहिती हिला.
.....
कश्मीरी, खालिदला बोलते जरा वेळ ह्याच्या गाडीत बस मला ह्याच्याशी एकट्या मध्ये बोलायचे आहे.
कश्मीरी बोलते घाबरू नकोस बेबी दाखव फोटो मला ती कोण आहे.
.....
हरीष घाबरत तिला फोटो देत बोलतो हिला असे बोलून आजूबाजूला बघतो.
....
खालिद येत बोलतो ती गेली चल अगोदर इथून नाही तर आपलाच गेम होईल. बोलून दोघे गाडीत बसत खालिद बोलतो. मी तुला जाताना सांगतो गाडीत ह्यांनच्या व्यवहार काय असतो.
.....
हरीष गाडीत बसून, गाडी स्टार्ट करून मुंबई रोड वर आणत बोलतो बोल व्यवहारच्या बाबतीत.
....
खालिद बोलतो पहिले त्यांना १८ वर्षाची मुलगी पाठवायची.
दुसरे तुझे रक्त पाठवायचे एका इंजेवशनमध्ये.
.....
हरीष बोलतो आजून काही नाही ना.
.....
खालिद बोलतो हो आणि एक अकाउंट नं देत बोलतो ह्यात ५ पेटी टाकायचे.
......
हरीष बोलतो हे काम कधी पर्यंत होणार आणि काम झाले ते कसे समजणार.
तेवढ्यात हरीश गाडीचा ब्रेक मारत बोलतो. समोर कोण आहे एवढ्या सुमसान रस्त्यावर.
......
तेवढ्यात त्याच्या गाडीच्या बोनेट वर एक शरीर पडत.
हरीष बोलतो अरे ही तर कामिनी आहे. बोलून समोर बघतो तर.
एक सहा फुठाची आकृती दिसते त्याला शरीराच्या पाठच्या बाजुला भले मोठे पंख, जस जसे ती आकृती पुढे येत जाते तसे त्याचे रूप त्याला दिसते.
.....
कश्मीरी आपल्या ओठावर जीभ फिरवत गाडीच्या समोर येऊन उभी राहते आणि हाताने खुणावत बोलते बाहेर येण्यास.
....
तसा खालिद बाहेर येत हरीषला बोलतो बाहेर ये. नाही तर ती आत येणार .
.....
दोघे बाहेर येत हरीष तिला बघतच बसतो.
तिचे डार्क निळे डोळे, दाताचे दोन सुळे बाहेर आलेले. हाताचे तीक्ष्ण नख, करली केस.
.....
कश्मीरी आपल्या नॉर्मल रूपात येत बोलते.
हीच ती आहे ना तू मला फोटो दिला होता तो.
हिला तू पण मारले असते रे.
......
खालिद बोलतो हो बरोबर मारले असते पण पोलीस केस वगैरे तुला तर माहिती असेलच ना.
.....
ह्याला सांगितले ना सगळे. नही तो मालूम हे ना. जे इसके साथ हुआ वो, इसके साथ हो सकता हे. रात के बारा बजे तक सब होना चाहीये.
बोलून अदृश्य होते ते शरीर घेऊन.
......
हरीष बोलतो तीने ते शरीर का नेले आणि कुठे नेले तिने खरच मारले का.
.....
खालिद बोलतो ती शब्दांची पक्की आहे.
आता तुझी बारी आहे. चल गाडीत बस आणि चल घरी टाईम खूप झाला आहे.
.....
हरीष, खालिदला सोडून घरी येत दरवाजा खोलून आत येत घरच्या लाईट चालू करून. दरवाजा बंद करून तो फ्रेश होऊन आपल्या बेड वर झोपतो.
त्याला सतत जाणवत असते की कोणी तरी त्याच्या आजू बाजूला आहे.
रात्र खूप झाली होती म्हणून तो लगेच झोपी जातो.
......
दुसऱ्या दिवशी तो सकाळी ७.०० वाजता उठून बघतो तर समोर टेबलावर एक एनवलप ठेवला होता.
तो उचलून. वाचायला चालू करतो
'आज १२ वाजे पर्यंत तुला घेण्यास येत आहे तयार रहा.'
तुझी आणि फक्त तुझी
कामिनी
......
ते वाचून त्याला घाम सुटला होता. काही तरी किचनमध्ये पडले तसा तो दचकून तो भानावर येतो.
तसा फोन घेऊन तो खालिदला फोन लाऊन घरी बोलावतो.
.....
खालिद अर्ध्या तासात घरी येत बोलतो काय रे कशाला बोलवले सकाळी मला.
.....
हरीष त्याला चिठी देत बोलतो वाच हे.
.....
खालिद चिठी वाचून बोलतो. हे कसे शक्य आहे.
एक काम कर जा फ्रेश हो आणि आपण बँकेत जाऊया तिचा व्यवहार करून टाकू.
मग रात्री ८.०० वाजता बाकीचे करू. जा फ्रेश हो बाहेरच नाष्टा करून मग बँकेत जाऊ.
.....
दोघे व्यवहार करून आपापल्या ऑफिसात जातात.
(क्रमशः)


