Meena Kilawat

Tragedy Inspirational

5.0  

Meena Kilawat

Tragedy Inspirational

कहाणी एका आजीची

कहाणी एका आजीची

3 mins
5.4K


 एका छोट्या खेडेगावात एक म्हातारी आजी रहायची.तिला कोणीच नव्हतं .ती कोणतेही काम करून उदा.धुणी-भांडी करुन किंवा झाडलोट करून, रात्री मंदीराच्या पायऱ्यावर झोपून जायची. तिला राहायला घरही नव्हतं.ती कुठली आहे,कोण आहे फारसं कोणाला तिच्याविषयी माहिती नव्हती.काम केले की कुणी खायला तर कुणी एक दोन रुपये देत असत.

    शाळेतुन मुलांना सुट्टी झाली की त्या आजीमागे लागायचे .तिची काहीतरी खोड काढायचे.गावातून येता जाता काही साहित्य पडलेल उचलून आणायची. विटा,बासे,बल्ली ही सर्व मंदीराच्या पाठीमागे थोड्या मोकळ्या जागेत जमा करायची.तिची इच्छा होती की तिला म्हतारपनी रहायला घर हव होत.आताशी तिच्याने जड काम होत नव्हते.दिवसेंदिवस ती जीर्ण होत होती. तिला आपली झोपडी बनवायची होती. पण नाइलाजास्तव बीचारी काही करु शकत नव्हती. 

      एक दिवस तिच्या डोक्यात काही विचार आला.मनाशीच पुटपूटली, दिर्घ श्वास घेतला.जवळच एक चिंचेचे भले मोठे झाड होते.तिने त्या झाडा कडे तिरप्या नजरेने उडता कटाक्ष टाकला. आणि मनोमन कहीतरी विचार केला.आणि कामाला लागली. तिने त्या मोकळ्या जागेत एका कोणट्यात छोटा खड्डा केला त्यात एक रूपयाचा सिक्का ठेवला.आणि मातीने झाकून दिला. त्याच लाईनमध्ये थोड्या दुरवर तिने खड्डा केला त्यात ही एक सिक्का ठेवला आणि मातीने झाकून दिला.चार कोणट्यात तिने दोन तीन सिक्के ठेवले आणि माती झाकून दिली. आणि कामाला त्वरेने निघुन गेली. हे सर्व करत असतांना, दररोज मुले त्या चिंचेच्या झाडा खाली खेळत असत. एका मुलाने म्हातारीला काही लपवतांना पाहीले.त्याने सर्व मित्रांना सांगितले.त्यातला एक मुलगा म्हणाला!चल आपण जावून पाहू! ती सर्व मुले त्या खड्ड्याजवळ आली आणि खड्डे उकरू लागली.

        त्या खड्डयातुन त्यांना काही सिक्के मिळाले.ती मुले आनंदाने नाचु लागली.आणि अजून खड्डे उकरुन पाहू लागली .जेव्हा त्यांना समाधान झाले तेव्हा त्या पैशाने आपन काही खावून घेवूया,अस  म्हणुन ती निघून गेली.म्हातारीने दुसऱ्या दिवशीपण हाच उपक्रम राबवला.तिने पाहिले मुलांनी बरेच खोल खड्डे केले होते. तिने चारही खड्डयात चार-चार सिक्के ठेवले,आणि कामाला निघून गेली.तिसऱ्या दिवशी पहायला गेली खड्डे पाहिजे तेवढे खोल झाले होते.मुल आता आजीच्या अवतीभोवती फिरायला लागली. कोणती मुले तर आजीशी बोलू लागली. 

       सहा दिवसानंतर म्हातारीला खड्डे बरीच खोल दिसली,तिने एका मुलाला आवाज दिला,मुलगा पटकन काय आजी म्हणुन जवळ आला,तिच्या जवळ कोणीतरी दिलेले पेरू होती.ती पेरू त्या मुलांना खायला दिलीत,व मोठी बल्ली उचलण्याचा प्रयत्न करू लागली .तोच मुल म्हणाली दे आजी मी काढून देतो.पटकन त्या मुलांनी ती बल्ली काढून उभी केली.आजी म्हणाली,लेकरा या खड्डयात टाकून दे जरा,दुसरी, नंतर रोज आजी तिथेच कुठेतरी रोज सिक्के लपवून ठेवायची.ती सर्वी मुले गरीब घरची असल्यामुळे त्यांना घरून कधी एक रुपया पण मिळायचा नाही, म्हणुन त्यांना त्या सिक्क्यांच भारी अप्रृप होत,पण त्या मुलांना आता आजीच्या प्रेमाची ओढ लागली होती.त्यांना सिक्के मिळाले तर ते सिक्के आजीला परत करायचे.पण आजी म्हणायची ,अरे पडले वाटते सिक्के ,जा वान्याच्या दुकानातून चीवड्याचे सामान घेवून या!मी तुम्हाला कच्चा चीवडा बनवून देते. ती मुल धावून साहित्य आणायची,आणि आजी रोज मुलांना काहीतरी खायला ध्यायची.

       अस करता करता तिसरी बल्ली चौथी बल्ली मुलांनी गड्डयात टाकून दिली. आजीची झोपडी बघता-बघता पांच सहा दिवसात मुलांनी बांधून तयार केली आजीची झोपडी तयार झाली होती. आजीची आपल्या हक्काच्या घराची इच्छा पुर्ण झाली होती.तिच स्वप्न पुर्ण झाले होते .तिच्या ह्रदयात जरी वेदना होत्या तरी तिच्या पाणावलेल्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. एक प्रकारच्या शांतीचा अणुभव तिच्या चेहऱ्यावर विलसत होता. 

       आजीच्या झोपडीत दिवावात लागत होती दिवसभर मुलांचे येणे जाणे चालू असायचे.काही महिने वर्ष गेले तशी-तशी आजीचा थकता काळ आला होता .पण आजीला आता कश्याची ही चींता नव्हती.आजी आता बरीच थकलेली दिसत होती. थकली असली तरी मुलांना ती आवडत होती. आता आजी कामालाही जावू शकत नव्हती.ती मुलेही आता समजदार झालेली होती.तेव्हा त्या मुलांनीच ठरवले होते.आता आजीची काळजी आपण घ्यायची.

         आजीला आता अनेक मुलांचा आधार होता. आजी आता जगायला व मरायला तयार होती.तिला स्मशानात न्यायला अनेक खांदे होते.ती लावारीस नव्हती . प्रेम देने अन् मिळवणे हेच तिच कार्य होतं .आता कशाचीच तिला कमी नव्हती.तिची स्वत:ची मुलं मात्र बेईमान झाली होती. पण आता ती समर्थपणे जगत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy