कच्चे शेंगदाणे
कच्चे शेंगदाणे


"योगायोग"
काल माझ्या एका Wapp ग्रुप वर एकाने खालील जोक पाठवला होता. तो आधी *खाली* देत आहे.
आणि नंतर माझ्या बरोबर प्रत्यक्षात घडलेली सत्य घटना, जी आदल्या दिवशी घडली, ती पण देत आहे !!.....
जोक -
सकाळी चहा घेताना कप हातातून निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो "वाचला".
बायको मला म्हणाली.. वाचलास..!"
आणि ती माझ्याबरोबर घडलेली सत्य कथा.
काल बायको भाजी आणायला गेली. कधी नव्हे ते कच्चे शेंगदाणे खायची हुक्की आली. उठलो.
शेल्फ वर २ लिटर transpant बरणीत गुलाबी शेंगदाणे खुणवत होते.
बरणी झाकणाला धरून उचलली. झाकण हातात.....
बरणी आधी माझ्या पाय जवळ आणि काही क्षणात जवळच्या तीन रूम मध्ये पसरली....
पण पसरण्या आधी -
शेंगदण्याचा अभिषेक पायावर घालण्यास नाही विसरली !!
त्यातल्या त्यात अलगत ४-५ शेंगदाणे तोंडात टाकले आणि बायको यायच्या आत सगळ्या काचा आणि शेंगदाणे भरून काढले.
वेळेचे बंधन होते. बायको भाज्या फार लौकर घेते.
गेल्या कित्येक वर्षात येवढे प्रामाणिक काम केले नव्हते !!
पाठ दुखत होती. आणि बेल वाजली......!!
जेवढे शक्य आहे तेवढे "त्या गावचा नाही" अशि अक्टिंग करत टीव्ही पहात राहिलो.
बायको आत आली.
कधी नव्हे ते मला *शेरावाली* दिसली तिच्यात.....
मला इशाऱ्यात विचारले. "काय बघताय?"
मी तोंडाने "काही नाही".
हातातली पिशवी मी घेतली, पाण्याचा ग्लास दिला आणि इथेच फसलो.
बायको वकील आहे हे विसरलो.
प्रश्नार्थक, संशयी नजरेने ती आत गेली.
*आणि घात झाला....*
२ मुर्दाड शेंगदाणे शेल्फ जवळ बायकोच्या नजरेस पडले......
*आणि मग काय....*
पुढे सांगायची गरज आहे? अगदी कालच्या सत्य घटनेवर आधारित. तुम्ही हसत अहात.....
*विलक्षण योगायोग*
पाठी बरोबर आणखी काही अवयव दुखत आहेत, आज.
C/o बायको.......