STORYMIRROR

Rutuja Gavali

Drama Romance Classics

4.2  

Rutuja Gavali

Drama Romance Classics

जुळले मन बावरे..

जुळले मन बावरे..

26 mins
47

         


ऑफिस मधून बाहेर तिने डोकावून पाहिलं तर मुसळधार पावसाळा सुरवात झाली होती .. क्षणात तिच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या .. तिच्या कलिग्स तिला सोबत चलण्यास म्हणाल्या तेव्हा , पाऊस थांबल्यावर निघते असं सांगून ती अजून थोडा वेळ तशीच आपल्या चेअर वरती बसली .. कधी काळी  हव्याश्या वाटणाऱ्या पावसाला पाहून आज प्रिया ला राग येत होता .. पाऊस म्हणलं कि ; चिंब व्हायचं एवढंच माहिती असणारी ती आज पावसात भिजायला नको म्हणून जास्त वेळ काम करत होती ... कारण , कारण काही कटू आठवणी ... पाऊस आला तो तिला  त्याच्या आठवणी सोबत घेऊन !! पण आता त्या आठवणींचा हि तिला त्रास व्हायला लागला होता . इच्छा नसताना त्या आपसूक यायच्या आणि प्रिया च्या डोळ्यात अश्रू आणायच्या ... थोडासा पाऊस कमी पडला आहे , असं जाणवताच ती उठली आणि ऑफिस मधून बाहेर निघाली .... काहीच अंतर चालून ती ऑफिस च्या बाहेर असणाऱ्या रिक्षा स्टॉप वर आली . पण हे काय ..आज स्टॅन्ड वर एकही रिक्षा नव्हती .. आता रिक्षा नाही ...तर बस मिळते का ते पाहावं असा विचार करून ती तिथून थोडंस दूर असणाऱ्या बस स्टॉप ला आली ...आणि बस ची वाट पाहू लागली ... तेवढ्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली , आणि तिच्या मागून कुणीतरी तिला धक्का देऊन बाहेर च्या बाजूला गेलं ... त्या धक्क्यामुळे तिची बॅग पडतच होती कि ; तिने सावरली .. खूप राग आला होता , तिला त्या धक्का देणाऱ्याचा .. त्याला काहीतरी बोलायचं या हेतूने तिने पुढे त्याच्या कडे पाहिलं तर तो आपले दोन्ही हात पसरवून पावसाच्या सरी आपल्या अंगावर घेत होता ... " बालिश कुठला " आपसूकच त्याच्या तोंडून बाहेर पडलं ... तेवढ्यात तो मागे वळला ...त्याचा तो गोरापान पावसात भिजलेला देह पाहून आपसूकच तिला तिच्या त्याची आठवण झाली ... "कृष्णा ... " तेवढ्यात तिच्या बाजूने कुणीतरी आवाज दिला तस त्या मुलाने भुवया उंचावून काय ?? असा इशारा केला .. त्याच नावं ऐकताच नकळत तीच हृदय धडधडायला लागलं ... ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली ... तेवढ्यात त्याची नजर हि तिच्यावर पडली तशी ती बावरली आणि तिने पटकन मान दुसरीकडे वळवली .... आणि स्वतः ला तिने सावरलं... बस आली , तशी ती लगबगीने बस मध्ये चढली आणि तिने धडधडणाऱ्या हृदयावर हात ठेवून त्याला शांत राहण्याची तंबी दिली ... पण त्याने काही ऐकलं नाही.... " कृष्णा .." आपसूकच तिच्या तोंडून हि त्याच नाव बाहेर पडलं ... आणि मागून ' ह्म्म्म ' असा हुंकार आला ..तिने दचकून मागे वळून पाहिलं तर तो चं उभा होता . तसे तिचे डोळे मोठे झाले.. "तुम्ही मला बोलावलं का ?" त्याने विचारलं ... तशी तिने नकारार्थी मान हलवली . तेच बस थांबली .. ती पटकन बस मधून खाली उतरली ... घरी जेवणांनंतर ती बेड वरती बसली होती ...हातात त्याचा फोटो घेऊन ... " कृष्णा ...आज त्याला असं पावसात भिजताना क्षणभरासाठी वाटलं तूच आहेस !! तुलाही असच पावसात भिजायला आवडायचं ना .. म्हणून तर प्रेमात पडले होते तुझ्या !! कृष्णमय झाली होती हि प्रिया .... !! पण तुझ्यानंतर हा पाऊस मला हि आवडत नाही ..त्याच्याकडे पाहण्याची हि इच्छा होत नाही माझी !! ! " प्रिया स्वतःशीच बडबडत त्या फ्रेम कडे पाहून अश्रू ढाळत ती कधी झोपली तिलाही कळलं नाही ... दुसऱ्या दिवशी ती जेव्हा ऑफिस ला आली तेव्हा त्याच स्टॉप ला उतरली आणि आपसूकच तिची नजर आजूबाजूला गेली .. "काय करतीये मी ..त्याला का शोधतीये ? " मनातच म्हणत ती ऑफिस च्या दिशेने निघून गेली .. ऑफिस मध्ये येऊन जेव्हा ती तिच्या डेस्क वरती बसली ... तेच तिला केबिन मधून तिच्या टीम लीडर ने बोलावलं ...ती पटकन आतमध्ये गेली तर समोर तिच्या टीम मधील बाकीचे मेम्बर्स सुद्धा प्रेजेंट होते ... " गुड मॉर्निंग गाईज ..तुम्हाला तर माहितीच आहे , सध्या आपलं JN  कंपनी सोबत मिळून एक प्रोजेक्ट चालू आहे ..तर JN  कंपनी मधून २ जण आपल्या कंपनी मध्ये प्रोजेक्ट पूर्ण होई पर्यंत म्हणजे पुढचे २ महिने आपल्या सोबत मिळून काम करणार आहेत ! ! काल तर आले होते पण तुमची ओळख करून द्यायला वेळ मिळाला नाही .... तर मीट मिस्टर साई कापसे अँड मिस्टर कृष्णा मोहिते !" टीम लीडर ने ओळख करून दिली ... कृष्णा नाव ऐकताच , प्रिया चे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं ... तिने स्वतःला सावरत अलगद नजर वर करून समोर पाहिलं तर तिची नजर त्याच्या नजरेशी धडकली ... ती आतमध्ये आल्यापासून चं तो तिच्याकडे पाहत होता ...आणि आता जेव्हा तिची नजर त्याच्या नजरेला धडकली ...त्याचा हात आपोआप त्याच्या हृदयावर गेला ... त्याची ती हरकत पाहून तिच्याही नकळत तिचे कानशिलं गरम झाले ...तिने पटकन मान खाली घातली .... सगळी टीम , त्या केबिन मधून बाहेर आली आणि आपापल्या डेस्क वरती बसली . प्रिया ने चेअर वरती बसल्यावर तिच्या पीसी च्या जवळ ठेवलेल्या गणपती च्या मूर्तीला हात जोडून , डोळे बंद करून नमस्कार केला .. तिच्या सगळ्या गोष्टी कृष्णा एका कोपऱ्यातून ओठांवर स्माईल करत पाहत होता .. .तेच साई त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला.. "काय भाऊ ..काल पासून बघतोय हवेत आहेस एकदम... ! कालपासून बघतोय मी ... तुझी नजर कुणावर तरी वारंवार कुणावर तरी जाऊन थांबतीये !!" साई म्हणाला त्याच बोलणं ऐकून कृष्णा च्या ओठांवर स्माईल आली ... त्याला काल ची तिची नजर आठवली ... तिच्या मधुर आवाजात त्याच नाव घेणं ... आणि जेव्हा त्याने विचारलं तेव्हा गडबडून जाणं सगळ्या गोष्टी त्याच्या नजरेसमोर येत होत्या .. त्याची नजर एक टक समोर बसलेल्या तिच्याकडे जात होती ..ती मात्र तिच्या कॉम्पुटर मध्ये कामात होती ... याच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही असं समजून साई त्याच्या जागेवर जाऊन बसला .. कृष्णा सुद्धा काम करत होता.. पण राहून राहून त्याची नजर प्रिया कडे जात होती .. प्रिया ला हि वारंवार जाणवत होत कि ; कुणाची तरी वारंवार नजर तिच्या येत आहे .. पण तिने साफ दुर्लक्ष केलं होत ... दुपारी , प्रिया उठली आणि तिच्या कलीग सोबत जेवणासाठी कँटीन मध्ये गेली . गप्पा मारत त्यांचं जेवण चालू होत तेवढ्यात तिची नजर कँटीन च्या दरवाज्यातून येत असलेल्या कृष्णा कडे गेली .. तो तिच्याकडे च पाहत होता.. आणि एक एक पाऊल टाकत तिच्याकडे च येत होता .. " हा माझ्याकडे बघत असा इकडे का येतोय ?? हा माझ्याजवळ येऊन बसण्याचा विचार करतोय का काय ??" तिने मान खाली घातली आणि अस्वस्थपणे हातातील चमचा हलवायला लागली.... तो तिच्या जवळून मागे निघून गेला.. " प्रिया.. अग जेव ना ... लक्ष कुठेय तुझं ??" तिची एक कलिग म्हणाली.. प्रिया भानावर आली आणि तिने पाहिलं तर तो तिच्या जवळ बसला नव्हता.. तो कुठे गेला ? या पडलेल्या प्रश्नामुळे आपसूकच तिची मान मागे वळली ... तर त्याची नजर तिच्यावर च होती ‌‌... जसं तिने त्याच्याकडे पाहिलं, तसं त्याच्या ओठांवर स्माईल दिसली तिला...  आणि ती स्माईल पाहून , का कुणास ठाऊक पण, तिला तो चिडवतोय असं तिला वाटून गेलं. तिने पटकन नजर पुढे फिरवून घेतली .... प्रिया आणि तिच्या मैत्रिणीचं जेवण झालं व त्या तिथून कामासाठी निघून गेल्या .. कृष्णा आणि साई ऑफिस मध्ये येऊन दोन आठवडे झाले होते . दोघेही छान रुळले होते त्या ऑफिस मध्ये .. सगळ्यांसोबत छान मैत्री झाली होती .. पण कृष्णा च्या मनात फक्त एकच खेद होता तो म्हणजे , खूपदा प्रयत्न करूनही प्रिया त्याच्याशी जास्त बोलत नव्हती . आणि जे काही बोलायची ते फक्त औपचारित ..कामासाठी !!! कंपनीकडून कृष्णा आणि साई ला राहण्यासाठी एक फ्लॅट देण्यात आला होता .. जो कोइन्सीडन्सली प्रिया च्या घरापासून काहीच अंतरावर होता . ते नेहमी एकाच बस ने जायचे .. कृष्णा ने येण्याची वेळ हि ; तिच्या घरातून निघण्याच्या वेळेनुसार मॅनेज केली होती , जेणेकरून सकाळी सकाळी तिला पाहता येईल ... आणि खर म्हणायचं तर , प्रिया ला हि आता सवय झाली होती त्याच्या दिसण्याची . सकाळी जाताना .. ऑफिस मध्ये .. लंच साठी .. आणि परत घरी येताना , त्याची नजर आपल्यावर स्थिरावलेली असते हे तिला माहिती होत .. ती सुद्धा त्याला पहायची पण तिने कधी त्याला ते दाखवून दिल नाही .. आज प्रिया दुपारी च घाई गडबडीतच ऑफिस मधून बाहेर आली..  गावाहून आई बाबा येणार असल्याने तिला त्यांना घ्यायला स्टेशन कडे जाव लागणार होतं ... त्यासाठी तिने हाफ डे ची सुट्टी घेतली होती.... डायरेक्ट रिक्षा करणं च तिला योग्य वाटल .. जेणेकरून येताना ही प्रॉब्लेम होणार नाही.. स्टॅंड वर आली आणि तिने रिक्षा पकडून स्टेशन ला पोहोचली तर आई बाबा वाट‌ पाहत च उभा होते ... त्यांना घेऊन ती परत घरी आली... इकडे , ती अचानक अशी गडबडीत निघून गेल्यामुळे कृष्णा ला काहीच कळत नव्हत .. ती अशी का गेली ? काय झालं असेल ? ती ठिक असेल ? की काही वेगळा प्रॉब्लेम ?? अशा खूप साऱ्या प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले होते... कामात तर काडीच लक्ष लागतं नव्हतं.. कधी एकदा ऑफस संपतय असं झालं होतं त्याला ... जस ऑफिस संपल तसा साई चा हि विचार न करता कृष्णा ने बॅग घेतली आणि जवळजवळ धावतच ऑफिस मधून बाहेर पडला .. आज काही ती बस मध्ये नाहीये , हे माहिती असल्यामुळे त्याने बस ची वाट पाहायची तसदी घेतली नाही . डायरेक्ट रिक्षा केली आणि निघाला .. तिच्या घरासमोरच त्याने रिक्षा थांबवली ..पैसे दिले आणि दरवाज्यासमोर येऊन उभा राहिला .. जेव्हा बेल कडे नजर गेली , तेव्हा थोडासा तो अडखळला पण काळजी पुढे बाकी कुठल्याच गोष्टीच महत्व नव्हतं .. कधी एकदा तिला नीट समोर पाहतोय असं झालं होत त्याला ... त्याने बेल वाजवली आणि आतून दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला ... काही क्षणातच दरवाजा उघडला ..आणि त्याने समोर पाहिलं तर त्याच्या बाबांच्या वयाचे एक गृहस्थ समोर उभा होते ... "कोण हवं आहे ?" त्यांनी विचारलं . "नमस्कार ..मी , कृष्णा ... प्रिया आहेत का ? मी त्यांच्या ऑफिस मध्ये काम करतो .. " त्याने हात जोडत नमस्कार करत विचारलं .. "हो आहे ना , या आतमध्ये तुम्ही !!" बाबा म्हणाले .. कृष्णा ने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या मागे मागे आत मध्ये आला .. आत येताना नकळत तो घर पाहत पाहत आतमध्ये येत होता .. " बसा ... मी प्रियाला बोलावतो !" सोफ्याकडे इशारा करून ते म्हणाले आणि तिथून आतमध्ये निघून गेले ... "प्रिया .. बाळा तुझ्या ऑफिस मधून कुणीतरी आलं आहे !!" ते प्रियाला आवाज देत म्हणाले ..त्यावर उत्तर म्हणून प्रिया चा  "आले बाबा " असा आवाज आला . आणि तिचा फक्त आवाज ऐकून कृष्णा ला बरं वाटलं ... हात आपल्या ओढणीला पुसत प्रिया बाहेर आली .. समोर कृष्णा ला पाहून तिला धक्काच बसला होता .. "हा इथे का आलाय ?" हा सगळ्यात पहिला प्रश्न तिच्या मनात आला ... "तुम्ही ?" आपसूकच तिच्या तोंडून बाहेर पडलं .. "हाय ... ऍक्च्युली , ते जरा काम होत ...पण तुम्ही लवकर आलात ना टीमउळे म्हणलं , तुमच्या घरी येऊन बोलावं !!" तिला समोर पाहून खूप आनंद झाला होता ...पण तो चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घेत ..कृष्णा म्हणाला .. डायरेक्ट तर तिला सांगू शकत नव्हता कि ; तुम्ही दुपारी गेला ..आणि काळजी वाटली म्हणून आलो ... "बरं , बाळा तुम्ही कामच बोलत आहात , तोवर मी जाऊन जरा आडवा होतो !!! पाहुण्यांच्या नाश्तापाण्याचं बघ ..." बाबा म्हणाले आणि आतल्या बाजूला निघून गेले .. ते गेले तसा , कृष्णा पटकन उठला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला .. तो असा अचानक समोर आल्याने प्रिया दोन पाऊले मागे सरकली आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली ... " अशी कशी काहीही न सांगता तू ऑफिस मधून निघून गेलीस ??मला किती टेन्शन आलं होत ...काय काय विचार येत होते डोक्यात !!! तू सांग , तू ठीक आहेस ना ? तू अशी दुपारी का गेली ? तुला बरं वाटत नाहीए का ? आपण डॉक्टर कडे जायचं ?" कृष्णा ने एकामागोमाग एक प्रश्न विचारले .. ती मात्रा थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होती ... " रिलॅक्स ..तुम्ही एवढे हायपर का होताय..आणि मला काहीही झालं नाहीए !! आई बाबा ना आणायला स्टेशन ला जायचं होत म्हणून हाल्फ दे काढला होता मी !" ती स्पष्ट केलं ... "ओह्ह ओके .." तो थोडा रिलॅक्स झाला .. "काय काम होत ?" तिने विचारलं .. "काम ?" त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत उलट प्रश्न केला .. "तुम्हीच म्हणालात ना ऑफिस च काम होत !" ती स्पष्टीकरण देत म्हणाली .. "नाही काम काहीच नव्हतं .. ते तुझे बाबा होते म्हणून .." तो बिनधास्तपणे बोलला आणि सोफ्यावर बसला .. ती मात्र त्याच वागणं पाहून कोड्यात पडली होती ... "म्हणजे , तो फक्त ती दुपारी निघून गेली म्हणून काळजीने इथे आलाय ?" हा प्रश्न तिच्या मनात आला , एक अनामिक शहारा तिच्या अंगावर आला . . गाळ लाल गुलाबी झाले ... त्याची नजर आता कुठे नीट तिच्यावर पडली . आज तिने साडी नेसली होती , जिचा पदर खोचला होता ...केस एकत्र करून वरती बांधले होते तरी काही अवखळ चेहऱ्यावर आलेच होते .. बहुतेक किचन मध्ये काहीतरी काम करता करता आली होती ती ...चेहऱ्याला आणि हाताला लागलेलं पिठावरून त्याने अंदाज बांधला ... त्याची एकटक असणारी नजर तिच्या हृदयात कालवाकालव करत होती ... "थोडं पाणी मिळेल ?" भानावर येत  त्याने विचारलं आणि तिने होकारार्थी मान हलवली व लगेच आत , किचन मध्ये निघून आली .. किचन मध्ये येऊन ती कट्ठ्याला ला पकडून काही वेळ तशीच थांबली ... मोठे श्वास घेऊन त्यांना कंट्रोल केलं .. तिने स्वतःला कसबस सावरलं आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि त्याला पाणी दिल .. तिने चहा कॉफी साठी विचारलं होत .. त्याच काम झालं होत ...पण तिच्यासोबत अजून थोडा वेळ घालवावा म्हणून त्याने चहा आणायला सांगितला... चहा पिऊन तो जायला उठला ..तशी ती त्याला सोडायला दरवाज्याजवळ आली .. " तुम्ही खरंच फक्त माझी चौकशी करायला आला होता ?" तिने पुन्हा बाहेर आल्यावर त्याला प्रश्न विचारला .. '' अर्थात ...कामात लक्ष च लागत नव्हतं माझं !!" तो बोलून गेला आणि त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ..  तर पुन्हा ती  त्याला ब्लश करताना दिसली .. "बाय !!" पटकन बोलून तो निघून गेला .. पण जाताना अनेक वेळा त्याने मागे वळून पाहिलं होत .. आणि ती तशीच दरवाज्यात उभी होती ... कृष्णा त्याच्या घरी आला तेच शिटी वाजवत ..गाणं गुणगुणत !! लॉक काढून आत आला आणि टाय लूज करत तसाच स्वतःशीच हसत सोफ्यावर पडला  .. "आलास भेटून प्रियाला ?" मागून साई चा आवाज आला "ह्म्म्म " तिच्या धुंदीत असणाऱ्या त्याने होकारार्थी मान हलवली .. तेच एक पिलो जोरात त्याच्या अंगावर येऊन आपटली तसा कृष्णा भानावर आला .. त्याने साई कडे रागाने पाहिलं.. "मला काहीही न सांगता ऑफिस मधून निघून आलास ना परस्पर ...!!" साई रागाने म्हणाला आणि आता कृष्णा च्या लक्ष्यात आला कि ; तिला पाहायला जायच्या चक्कर मध्ये तो , साई ला विसरून आला होता .. साई त्याच्या कडे खाऊ कि गिळू अश्या नजरेने पाहत होता .. तो मारायला त्याच्या अंगावर झडप घेणार च होता कि ; कृष्णा ने पटकन स्वतःला वाचवलं आणि धावत रूम मध्ये निघून गेला .. व दरवाजा लावून घेतला ... इकडे , तो दिसेनासा झाला , तशी ओठांवर गुलाबी हसू घेऊन प्रिया मागे वळली .. कुणीतरी आपली काळजी करतंय हे पाहून तिला खूप बरं वाटत होत ... तिने समोर पाहिलं तर, रागाने तिच्याकडे आई उभा होत्या... त्यांच्या नजरेतील राग पाहून घाबरून तिने आवंढा गिळला‌....                                त्यांची रागीट नजर पाहून प्रिया ने घाबरून मान खाली घातली ... "काय चाललंय हे ? काय गुण उधळायची चालू आहेत आमच्या माघारी ?? " आई नी विचारलं .. "तुम्ही समजतंय असं काहीच नाही आई ..." प्रिया सांगण्याचा प्रयत्न करत होती ..तेच त्यांनी हात दाखवून तिला बोलणं थांबवण्याचा इशारा केला .. "काहीही बोलायची गरज नाहीये ...जे काही पाहायचं होत ते मी पाहिलं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आणि ऐकलं स्वतःच्या कानांनी ! ! एक विधवा असताना कुठल्याही परपुरुषासोबत असं लाजून मुटकून बोलायला तुला जराही लाज वाटत नाही का ग ...!! आग बाकी कशाचा नाही,,, पण निदान माझ्या मेलेल्या मुलाचा तरी विचार करायचा होतास !! का तो आता मेलाय ...म्हणजे तुला रान मोकळं झालंय ??" आई कुत्सित पणे बोलत होत्या .. त्यांचा प्रत्येक शब्द , प्रिया च्या जिव्हारी लागत होता .. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या . ती गुपचूप मान खाली घालून उभा होती आणि त्यांची बोलणी ऐकत होती .... आत मध्ये असणारे बाबा , आपल्या पत्नीचा चढलेला आवाज ऐकून बाहेर आले ... "काय चालू आहे इथे ? तुझा आवाज एवढा का वाढलाय ?" त्यांनी बाहेर येऊन आपल्या पत्नीकडे रागाने पाहून विचारलं .. "काही नाही बाबा ..आईंचा गैरसमज झाला आहे ..!! आई , खरंच तुम्ही विचार करताय तस काहीच नाही ...‌ तुम्हाला वाईट वाटलं असेल मला माफ करा !!" असं म्हणून गालावरचे अश्रू पुसत प्रिया तिथून आपल्या रूम कडे धावत निघून गेली .... आई सुद्धा ताडताड पाऊले टाकत तिथून निघून गेल्या ... प्रिया तिच्या रूम मध्ये आली आणि  रूम चा दरवाजा बंद केला .. तिने टेबल वरचा त्याचा फोटो घेतला आणि त्याच्याकडे पाहत बेड वर बसली .. "हे काय झालं होत मला ... अशी वाहवत का गेले मी ? माझं फक्त तुझ्यावर प्रेम असताना कृष्णाबद्दल अशी भावना का आली माझ्या मनात ??? नाही .. हे चुकीचं आहे ...मी फक्त तुझी आहे .. आणि तुझीच राहीन !!" असं म्हणून तिने तो फोटो आपल्या उराशी कवटाळला आणि तशीच बेड वरती पडली . त्यात तिला कधी झोप लागली समजलंच नाही .... दुसऱ्या दिवशी अलार्म च्या आवाजाने तिला जाग आली...डोळे उघडले  आणि घड्याळ पाहिलं तर सात वाजून गेले होते..   ती  लगबगीने उठली  आणि  अंघोळीला बाथरूम मध्ये शिरली..  आंघोळ वगैरे आटपून बाहेर आली तर ,   आई किचनमध्ये चहा बनवत होत्या... आणि बाबा डायनिंग टेबलवर पेपर वाचत बसलेले होते.. "  माफ करा आई ,  उठायला थोडासा उशीर झाला...  कळलंच नाही कसं ते "   प्रिया ,   ओढणी  कमरेभोवती बांधत  कणिक मळायला घेत म्हणाली.. "  इथे काय , तु तुझ्या मनाची मालकीण आहेस...  आम्ही तुला आता काय बोलणार ??  जे वाटतंय ते कर तू !!"   आई ,   नाक मुरडत   म्हणाल्या आणि  तयार केलेला चहा दोन कपात गाळून कप बाहेर आणून  त्यांनी बाबांना दिला.. व स्वतः ला एक घेऊन बसल्या... त्यांचे हे सगळं बोलणं  डायनिंग टेबल वरून बाबा ऐकत होते... "  तू अशी का बोलतीयेस प्रिया सोबत ?  कालपासून बघतोय मी , काय झाले तुमच्या दोघींमध्ये ?? आणि  तू फक्त दोन कप चहा का केलास ?? प्रिया साठी चहा नाही केलास का  ?? "   बाबांनी रागाने आपल्या पत्नीकडे पाहत विचारल.. काल त्यांना झोप लागली होती ,  त्यामुळे त्यांना नक्की काय विषय होता ते कळल नव्हतं... "    नाही बाबा .. इथे आहे चहा..."     पातेल्यात चहा नसतानाही प्रिया मुद्दामून म्हणाली... "  बरं ...  एक काम कर प्रिया , चहा घे आणि तुझ आवर... आमच्या जेवणाचं वगैरे काही बघू नकोस .  ही बनवेल जेवण...  तुला कामाला जायला उशीर होत असेल ना !!"   बाबा म्हणाले "असं का म्हणून  ? घरी सून असताना मी कशाला जेवण बनवायला पाहिजे ?"   आई   धूसपूसत म्हणाली.. "  गावी पण तू बनवतेस ना ..मग इथे बनवलीस म्हणून काय झालं..??  आणि एकटी ती काय काय काम करणार.. !!   नोकरीमध्ये काय कमी  डोक्याला ताप नसतो...  आणि घरात रिकामीच बसली असणार तू..  काय होते बनवलं म्हणून ???"  बाबा म्हणाले तशा  पुन्हा तोंड वाकडं करत चहा पिऊ लागल्या...‌ "  बाबा,‌ जास्त उशीर झाला नाहीये..  मी बनवते पटकन !!  आणि मलाही टिफिन न्यायलाच असतो..."  प्रिया म्हणाली आणि तिने जेवनाला सुरुवात केली ... सकाळी मस्त आवरून  कृष्णा  नेहमीच्या वेळेत  घरातून बाहेर पडला..   कालच तिचा लाजणं अजूनही त्याच्या  नजरेसमोर येत होतं...एक उमेद निर्माण झाली होती त्याच्या मनात..   स्टॅन्ड वर येऊन कितीतरी वेळ थांबला , पण ती काही अजून आली नव्हती..   जवळ जवळ अर्धा तास उलटून गेला होता तरीही तिचा काही पत्ताच नव्हता... आतापर्यंत कितीतरी वेळा घड्याळ पाहून झालं होतं...  साई तर  केव्हाच निघून गेला होता,  पण त्याला काही तिच्याशिवाय जाऊ वाटेना... त्यामुळे तो तसाच वाट पाहत थांबला.   एकदाची प्रतीक्षा संपली  आणि ती समोरून   लगबगिने चालत येताना दिसली . तसा ,   एवढा वेळ कोमजलेला त्याचा चेहरा  फुलला...    प्रिया स्टॅन्ड कडे निघाली होती तर समोर उभा असलेला कृष्णाला पाहून थोडीशी गडबडली...  काल रात्री तिने ठरवलं होतं की,   त्याचा अजिबात विचार करायचा नाही.  त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही आणि आता तो समोर उभा होता.. ते ही‌ हसऱ्या चेहऱ्याने तिचं स्वागत करत होता...   मनातल्या मनात रात्री केलेला निर्धार  पुन्हा एकदा आठवत ती मान खाली घालून बसची वाट पाहू लागली ...   कृष्णाची नजर वारंवार तिच्याकडे जात होते आणि हे तिच्या सुद्धा लक्षात येत होतं पण तिने मात्र एकदाही त्याच्याकडे वळून पाहिलं नाही ...   कृष्णा तिच्याशी बोलायला पुढे येणार ,  तेच एक बस त्यांच्यासमोर येऊन उभा राहिली तशी ती लगबगिनी बस मध्ये चढली... कृष्णा सुद्धा बस मध्ये आला... ही बस थोडी ची उशिरा असल्यामुळे ,  बसायला जागा होती.. नाहीतर नेहमी त्यांना उभा राहूनच जावं लागायच.    प्रिया पटकन जाऊ नका  सीट वरती बसली...   कृष्णाच्या मनात तिच्या शेजारी जाऊन बसायचा विचार आला ,  पण  तिला काय वाटेल  हा विचार करून तो थांबला.. "   अरे दादा , तिथे जागा आहे जाऊन बसा ना.."  तिकीट काढणारा कंडक्टर त्याला म्हणाला‌...   कृष्णाने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या शेजारी जाऊन बसला..   तो  तिच्या  शेजारी बसला , तसे तिचे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं .. खिडकीतून बाहेर पाहतच  तिने डोळे घट्ट मिटून घेतले व दीर्घ श्वास घेऊन..  मनाला सावरलं. "  प्रिया...:  तेवढ्यात  त्याचा आवाज कानावर पडला आणि घट्ट बंद केलेले डोळे झटकन उघडले..  त्याची ती हलकेच साद शरीरात कितीतरी रोमांच देऊन गेली... तिने आपल्या बाजूला पाहिलं , तर तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता...  त्याच्या नजरेतील ते प्रेम पाहून  आपोआपच तिची नजर झुकली.. "  हाय..."  कृष्णा  म्हणाला..  त्यावर तिने फक्त हलकेसे ओठ रूंदावले ... आणि पुन्हा बाहेर पाहू लागली...   तिचं असं इग्नोर करणं ,  त्याला थोडंसं विचित्र वाटत होत...  तिला अचानक काय झालं हेच त्याला समजत नव्हतं... "  प्रिया ,  मला तुझ्याशी  काहीतरी बोलायचं आहे !!"  तो म्हणाला.. त्याला काय बोलायचं असेल याचा अंदाज तिला आधीच होता..   ती फक्त शांतपणे  बसलेली होती...  "  मला   मला...   असं विचारायचं होतं की,   आय मीन ,  सांगायचं होतं तुला की....  माझं तुझ्या...."  तो बोलतच होता,  तेवढ्यात बस थांबली  आणि कंडक्टरने त्यांचा स्टॉप आला असल्याचं सांगितलं तशी ती पटकन उठली आणि लगबगीने  तिथून निघून गेली...   तो सुद्धा हा निराश श्वास सोडत उठला आणि बसमधून खाली उतरला... बाहेर पाहिलं तर ती  लगबगीने ऑफिस च्या दिशेने चालत निघाली होती...   त्यानंतर ,    पुढे  चार-पाच दिवस  असेच निघून गेले..   घरी आई-बाबा असल्यामुळे  काम करता करता प्रियाला ऑफिसला जायला उशीर व्हायचा..    रोज रोज कृष्णा तिच्यासाठी थांबू शकत नव्हता त्यामुळे  येण्या-जाण्याची वेळ पूर्णपणे  बदलली होती...   ऑफिसमध्ये सुद्धा कृष्णा तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायचा  , पण ती मात्र त्याला टाळत होती .. घरी जाताना  कुणासाठीही न थांबता कुणाशीही न बोलता ती  लवकरच निघून जायची...   तिचा असा इग्नोर करणं कृष्णाला खूप त्रास देत होत.. काय करावं ? काहीच कळत नव्हतं त्याला... त्याचा अस्वस्थपणा दिवसेंदिवस वाढायला लागला होता...  खूप वेळा त्याने  कुणाच्यातरी मार्फत तिला विचारण्याचा प्रयत्न केला की ;  नक्की काय प्रॉब्लेम आहे ?  घरी काही झालेल आहे का ?  पण त्याच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला मिळाला नव्हतं ..ती स्वतःहून तर बोलायला येणं शक्यच नव्हतं.... आज ऑफिस मधून तो सुद्धा जरा लवकरच निघाला .. आज काहीही झालं तरी ,  तिच्याशी बोलायचं  हे त्याने ठरवलेलं होतं... ती गेली , तसा तो ही  उठून पटकन ऑफिस मधून बाहेर पडला..  प्रिया चालत चालत  स्टॅन्ड पर्यंत पोहोचली होती,  तेवढ्यात बस आली... प्रिया बस मध्ये चढली. बस मध्ये अजिबात बसण्यासाठी जागा नव्हती ... त्यामुळे तिला उभच राहायला लागलं...   अचानक तिला तिच्या खांद्यावर कुणाचा तरी हात  जाणवू लागला  . तिरक्या डोळ्यांनी तिने  मागे पाहिलं,  तर एक   व्यक्तीच्या मागे थांबला होता...  जो मुद्दाम  तिला  स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. प्रिया हलकेच पुढे सरकली..  आणि तिने ओढणी सावरली  , पण त्याचा काहीही फायदा झाला नाही .. तो व्यक्ती सुद्धा पुढे सरकला आणि पुन्हा त्याचे ते चाळे चालूच राहिले..   इकडे मागे उभा   असलेला कृष्णा हे सगळं पाहत होता..    तो माणूस अशा प्रकारे प्रिया ला स्पर्श करत आहे हे पाहून आपोआपच त्याच्या रागाने मुठी आवळल्या..  तो पुढे आला आणि त्याने  त्या व्यक्तीचा हात पकडला ...  त्याला मागे फिरवून एक साणकन कानाखाली त्याला लगावली.. "  हे तुझी हिम्मत कशी झाली मला मारायची ..‌"  तो व्यक्ती म्हणाला "  तुझी हिम्मत कशी झाली ,  तिला असं स्पर्श  करायची..."  कृष्णा म्हणाला आणि त्याने पुन्हा एकदा  त्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली...  तसा तो  व्यक्ती सुद्धा भडकला आणि त्याने ही कृष्णा  कॉलर पकडून त्याला मारायला सुरुवात केली.. चालत्या बस मध्ये दोघांची चालू असलेली मारामारी  पाहून प्रिया घाबरली.. सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते...   प्रिया ने पुढे येऊन  कृष्णा ला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला...  पण कृष्णाचा राग  टोकाला गेलेला होता .  जो कमी थांबायचं काही नाव घेत नव्हता..   त्यांच बस मध्ये चालू असलेला धिंगाणा पाहून कंडक्टरने बस थांबवली आणि तिघांनाही बसमधून खाली उतरवलं... बस मधून जसं उतरवलं , तसा कृष्ण पुन्हा एकदा त्या माणसाला मारायला निघाला...     प्रिया ने पटकन पुढे येऊन कृष्णाचा हात पकडला.. "  काय करताय तुम्ही कृष्णा...??   प्लीज बंद करा हे ...!!"     प्रिया त्याच्या हाताला घट्ट  जवळजवळ मिठी मारून  त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती..  . कृष्णाला मात्र  तिचाही खूप राग आला होता,  त्याने तिला झटकून बाजूला केलं..‌ "  तुझ्यामुळे घडला आहे हे सगळं...  का वागतेस तू माझ्यासोबत अशी  ?? किती त्रास होतोय मला तुला कळत नाहीये का....???  किती बोलायचा प्रयत्न करतोय तुझ्याशी , पण तू मला इग्नोर करतीयेस... काय झाल आहे ?? असं काय घडलं आहे..??   तुझं इग्नोर करणं,   मला खूप त्रास देत प्रिया... "   कृष्णा रागाने  आणि हातबलतेने  तिच्यासमोर ओरडत होता... "  कशाला बोलायचे तुम्हाला माझ्याशी ?? काय संबंध आहे आपला ... ??  हे बघा  तुम्ही माझ्यापासून दूर राहा !!"   प्रिया  त्याला बोट दाखवून म्हणाली आणि पुढे बघून निघाली..   तिला असं जाताना पाहून कृष्णा  लगबगीने तिच्याकडे आला आणि त्याने तिचा दंड पकडून तिला वळवून स्वतःकडे खेचलं...  ज्यामुळे ती त्याच्या  छातीवर आपटली.. "  दूर राहा..???   नाही... शक्य आता ते !! तुझ्यापासून मी दूर राहणं शक्य नाहीये...  प्रिया माझ प्रेम आहे तुझ्यावर !!! ज्या क्षणी तुला पाहिलं , त्या  क्षणापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय...!!"   कृष्णा तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला..   त्याच हे बोलणं ऐकून प्रिया मात्र जोर जोरात रडायला लागली.. तिने संपूर्ण ताकतीने त्याला धक्का दिला आणि स्वतःपासून दूर केला.. "  काहीही काय बोलताय .. तुम्हाला माहिती काय आहे माझ्याबद्दल ?    मी एक विधवा आहे...  लग्न झालं होतं माझं ,  माझ्या कृष्णासोबत...  खूप सुखात होतो आम्ही ...   पण नशिबाने खेळ मांडला आणि  तो गेला माझ्यापासून दूर !!   मी मात्र जोपर्यंत जिवंत आहे फक्त आणि फक्त त्याची आहे... !!  मी माझं फक्त आणि फक्त त्याच्यावर प्रेम आहे... दुसऱ्या कुणाशी ही प्रेम नाही करू शकत मी !!! त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलण्याचा माझ्यासमोर येण्याचाही प्रयत्न करू नका !!"   ती म्हणाली आणि  मागे वळून धावतच तिथून निघून गेली..   काही अंतर पुढे गेल्यावर तिला एक रिक्षा मिळाली ज्यात  बसली... तो मात्र अजूनही त्याच ठिकाणी  पुतळ्या सारखा उभा होता.   ती जे काही बोलली ते सगळं वारंवार त्याच्या कानावर आपटत होतं...   तो अचानक असा ऑफिसमधून बाहेर पडल्यामुळे , साई त्याला शोधत शोधत पुढे आला होता.. आजूबाजूला तो कुठे दिसला नाही म्हणून त्याने  रिक्षा पकडली व घराच्या दिशेने निघाला तर रस्त्यात थोडं पुढे आल्यावर ती  एका बाजूला उभा राहिलेला  कृष्णा त्याला दिसला..   साईने पटकन रिक्षा थांबवायला लावली आणि कृष्णा जवळ आला.. "  कृष्णा काय झालं तू??  असा इथे का उभा राहिलास ...???   कृष्णा...  !! कृष्णा "   साई  त्याला बोलवत होता... खूप प्रश्न विचारत होता  ,  पण कृष्णा मात्र  काहीही हालचाल न करता काही न बोलता तसाच उभा होता..  शेवटी साईने ओढतच त्याला रिक्षाकडे नेलं रिक्षा मध्ये बसवून  त्याला घेऊन घरी निघाला... घरी आल्यावर साई ने पुन्हा त्याला‌ खुप‌ वेळा विचाण्याचा‌ प्रयत्न केला पण कृष्णा ने काहिच सांगितल नाही... कृष्णा गेले काही दिवस स्वतः च्या च कोशात होता ... कुठेही त्याच लक्ष नव्हतं.. तिचे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते... ऑफिस मध्ये ती त्याला पुर्ण इग्नोर करत होती.. आणि कृष्णा सुद्धा तिच्या वाट्याला जात नव्हता... या काळात साई ने त्याला खूप वेळा विचारल पण , उत्तर कृष्णा कडे च नव्हतं तर तो त्याला काय देणार होता.... प्रिया , दाखवत नव्हती पण तिला मात्र खूप वाईट वाटत होतं... खरंतर उगाचच तिला आस होती की ; सगळं काही सांगितलं तरी कृष्णा येईल आणि म्हणेल की....'' मला तुझ्या भुतकाळाचा काही फरक पडत नाही..." पण मग दुसरा प्रश्न तयार असायचा..... " जर हे नातं नकोय तर ही आस का ??" कृष्णा ना दिसला ..ना त्याच्याशी संबंधित काही घडल‌ त्यामुळे आई‌ आता पुर्व पदावर आल्या होत्या... पण , तरीही कधी कधी टोमणा रुपी चपराक बसायची ... जी सवयी ने प्रिया इग्नोर करायची ... प्रोजेक्ट पुर्ण झाला आणि कृष्णा साई चे या ऑफिस‌ मधले दिवस ही संपले होते.. शेवटच्या दिवशी, त्याची आणि तिची एकमेकांपासून चोरून वारंवार एकमेकांवर जायची .... बोलत नसले तरी एकमेकांच्या समोर होते.. त्यामुळे बघायला मिळायच....  उद्यापासून तो‌ दिसणार नाही या कल्पनेने वारंवार तिचे डोळे  भरून येतं होते .. " हे गाईज आम्ही उद्या निघणार आहोत... त्यामुळे आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे... या दोन महिन्यांत आपली खूप चांगली मैत्री झाली... म्हणून आज रात्री आम्ही घरी छोटिशी पार्टी अरेंज केली आहे... तर सगळ्यांनी यायच ...." साई ने सगळ्यांना सांगितलं... कृष्णा ने तिच्याकडे पाहिले... त्याच वेळी तिची ही नजर तिच्याकडे गेली.‌‌ त्याच्या नजरेत प्रश्न साफ दिसत होता की ; ती येईल का पार्टीला ??? तिने पटकन त्याच्या नजरेत अडकलेली आपली नजर सोडवली आणि दुसरीकडे पाहिलं..... प्रिया घरी आली आणि तिच्या रूम मध्ये बसली ... ७ वाजता पार्टी होती आणि आता‌ ६ वाजले होते.... तिला काय कराव कळत नव्हत ...‌ काही शेवटची वेळ होती त्यांच्यासोबत ची ... उद्या तर तो जाणार होता... पुन्हा कधीच भेट होणार नव्हती ... पण मग जावं का ??? आई‌ना काय सांगायचं ? ?? अशा खूप विचारांनी तिच्या मनात थैमान घातल होत .. " आज चहा मिळणार नाही का ?" बाहेरून आई चा आवाज आला तशी ती भानावर आली आणि धावत किचन मध्ये गेली.... वारंवार नजर घड्याळाच्या पळणाऱ्या काट्याकडे जात होती ... ज्यामुळे कामात लक्ष लागत नव्हत ... चहा केला आणि तिने बाहेर येऊन आई बाबांनी दिला ... आईनं पहिला घोट घेतला आन तसाच कपात  थुंकला ... बाबांच ही तसच झालं... " आग हे काय ? साखर आणि मीठातला फरक पण समजायचा बंद झालाय का आता तुला ???" आई ओरडल्या प्रिया ला का काहीच समजलं नाही..तिने आपल्यासाठी घेतलेला चहा एक घोट घेतला आणि तिचं तोंड वाकडं झालं ... तिने चहात साखरेऐवजी मीठ टाकलं होतं... " सॉरी आई..मी दुसरा करते ..!" म्हणून ती कप घेऊन आत गेली आणि दुसरा चहा बनवू लागली..‌ ती आत मध्ये गेली आणि पुन्हा एकदा चहा बनवून आणला .. तिचे सासरे तिची अस्वस्थतः पहात होते ..तिच्या मनातील घालमेल त्यांना दिसत होती . तीच घड्याळाकडे वारंवार जाणार लक्ष त्यांच्या नजरेतून सूटत नव्हती .. "प्रिया .. इकडे ये !" बाबा म्हणाले आणि ती त्यांच्या समोर आली . "बाबा काही हवंय का तुम्हाला ?" प्रिया ने विचारलं . त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि तिला आपल्या शेजारी बसण्याचा इशारा केला . ती थोडी संकुचित होत त्यांच्या शेजारी बसली . "त्या दिवशी तुझ्या ऑफिस मधला तो मुलगा आला होता ..."बाबा म्हणले आणि त्यांच्या एवढ्या वाक्याने तीच काळीज धडधडायला लागलं .. "त्याच नाव काय ?" बाबांनी विचारलं .. तिने त्यांच्याकडे  भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं .. त्यादिवशी घडलेलं सगळं काही बाबांनी आतल्या खोलीतून ऐकलेलं होतं ... हे आता तिच्या लक्षात आलं . " कृष्णा ..." आणि  उच्चारली .. जे ऐकून , बाबांचे हे डोळे  गहिवरले . त्यांनी  तिच्या डोक्यावर  हात ठेवला . "  जीवापाड प्रेम करतो ना तो तुझ्यावर ?  आणि तू ही ....!!" बाबा म्हणाले .. आणि रडतच तिने  मान खाली घातली . त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायचं म्हणजे त्यांच्या हृदयावर आघात करण्यासारखा आहे .  त्यांच्या मुलाची बायको ...  त्याच्या जाण्यानंतर दुसऱ्या कुणाचा विचार करते ,      किती वाईट वाटेल त्यांना याचं ... खोटं ती बोलू शकत नव्हती...  त्यामुळे गप्प राहणच  तिने पसंत केलं  . पण कितीही गप्प राहण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यातून वाहणारे अश्रू सगळं काही सांगत होते .... बाबांचं बोलणं ऐकून तिथे बसलेल्या सासूबाई  लगेच उठल्या आणि  हातातील कपबशी त्यांनी जवळजवळ जमिनीवर आपटलीच ... " अहो काहीही काय विचारताय ?  सून आहे ना ती तुमची ... असं तुमच्या सुनेने दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा विचार  केल्यावर  , इतक्या प्रेमाने विचारतात का ? आणि काय ग ये ... तुला सांगितलं होतं ना त्याच्यापासून लांब राहायचं म्हणून !!" सासूबाई पुढे येऊन  तिचा हात  ओढून म्हणाल्या ... त्यांनी अचानक ओढल्यामुळे  हात दुखायला लागला ... तशी ती पटकन उठली .. " आ आई ... खूप दुखतय हो !"  प्रिया म्हणाली " माझ्या मुलाला धोका देताना .  त्याचा विश्वासघात करताना नाही दुखलं का तुला !"   सासुबाई  तावा तावाने  बोलू लागल्या .. अचानक , बसलेले  तिचे सासरे उठले आणि त्यांनी  जोरात कानाखाली सासूबाईंना लगावली ... " अग तुला जरा तरी काय लाज वाटते का नाही ...  सोन्यासारख्या सुनेवर हात काय उचलतीयेस !!  आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करेन तुझी ... आणि काय चुकीचं वागली येथील ? मन मारून जगतच आहे ना  आपला लेक गेल्यापासून एकदा तरी हसलेले बघितलेस का तू तिला ...!! आणि , होत असेल तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात तर तुला   काय त्रास आहे ग ...!! मला खात्री आहे माझ्या  मुलाला सुद्धा  हेच हवं असेल ... तिच्यावर जिवापाड  प्रेम करणारा ... आयुष्यभर साथ देणारा जीवनसाथी भेटत असेल  तर  तुला आनंदच व्हायला हवा ...!!  अशी विधवा म्हणून किती दिवस जगणार आहे ती ... आणि  आयुष्यभर आपण बोलणार आहोत का तिला !! आता तरी कुठे आहोत आपण तिच्यासोबत ... सगळ्या गोष्टी एकटीच  बघतीये ना !!"  बाबा तवा तावाने म्हणाले .. " अहो पण .. ." सासुबाई ,  गालावर हात ठेवून  त्यांच्याकडे  आश्चर्याने पाहू लागल्या . " गप्प बसायचं  इथून पुढे  ... खूप ऐकून घेतलं तुझं !! आता बास झालं ..."बाबा म्हणाले .... " तुम्हाला काय करायचे ते करा  पण एक लक्षात ठेवा  जर , ही त्या मुलासोबत गेली ... तर आयुष्यात पुन्हा कधी तोंड दाखवायचं नाही  हिने मला !!"  सासूबाई म्हणाल्या आणि सरळ आत मध्ये निघून गेला ...   प्रिया तोंडावर हात ठेवून जोरजोरात रडायला लागली .तेच  तिच्या खांद्यावर  तिच्या  सासर्‍यांनी मायेचा हात ठेवला ...  "प्रिया बाळा .. . जा !! नवीन आयुष्य सुरू कर .. सुखाने  संसार कर त्याच्यासोबत .... !! "  बाबा म्हणाले आणि ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली .. त्यांच्या नजरेत  त्यांचा मनापासून होकार अगदी स्पष्ट दिसत होता .. जो पाहून , प्रियाला खूप आनंद झाला . "पण आई ... "  प्रिया ने  प्रश्नार्थक नजरेने  म्हणाली " तिचं सोड ग .. . उद्याच गावी निघून जातो तिला घेऊन  !! काळजी करू नकोस ... ती असो वा नसो , कन्यादान करायला  मी नक्की असेल !!"  बाबा  तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले ..   प्रिया हसली  आणि  वाकून तिने त्यांना नमस्कार केला . इकडे  जसजशी रात्र सरत होती  कृष्णाच्या मनात  आता निराशा घर करू लागली होती ... वाटलं होतं , निदान शेवटचा भेटायला का होईना पण ती येईल .... पण  ती मात्र आली नव्हती !!  आलेले  सगळेजण आता  निघाले होते ... पार्टी नंतरचं सगळं सामान साई आवरून ठेवत होता  आणि  कृष्ण हतबल होऊन तिथेच सोफ्यावर बसलेला होता ... उद्या सकाळी च त्यांचं  तिकीट बुक करण्यात आलं होतं कंपनीकडून ... म्हणजे आता तीन  कधीच दिसणार नाही ... हा विचार करत च  त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ... साईला त्याची अवस्था समजत होती ,  पण ..सध्या त्याला  एकांताची गरज आहे समजून  तो त्याच्या खोलीत निघून गेला .. दरवाजा बंद करण्यासाठी ,  कृष्णा उठतच होता की ; अचानक त्याची नजर समोर पायऱ्यावरून धावत येत असलेल्या प्रियाकडे गेली आणि त्याचा चेहरा  आनंदाने उजळला .. प्रिया सुद्धा अश्रूं आडून  त्याला पाहत होती ... धावत ती  त्याच्यासमोर येऊन उभा राहिली  ... "खूप उशीर झाला का ?"  तिने विचारल .. ज्यावर , त्याने   नकारार्थी मान हलवली ... दोघांचेही डोळ्यातून  अश्रू वाहत होते ... ज्यातून , एकमेकांसाठी  प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं... " मला माफ करा ... मी त्या दिवशी तुम्हाला असं बोलायला नको होतं  पण ..."  ती बोलतच होती की त्याने  तिच्या तोंडावर बोट ठेवलं . आणि  नकारार्थी मान हरवली ... "  झालेलं विसरून ... पुढे जाऊया  !! प्रिया  , लग्न कराल माझ्याशी ?"  त्याने  तिच्या डोळ्यात पहात विचारलं .. ज्यावर ,  हसून तिने होकारार्थी मान हलवली . व पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली .

 समाप्त ✨                                                                                              


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama