STORYMIRROR

Padmakar Bhave

Inspirational Others

3  

Padmakar Bhave

Inspirational Others

जत्रा

जत्रा

2 mins
161

काल अंबरनाथची शिवयात्रा होती,आवडीने दर वर्षी आम्ही तिघे या जत्रेत सहभागी होते,गच्च भरलेले रस्ते,पु...पु वाजणाऱ्या कर्कश्श पिंगाण्या,सारे वातावरण कसे भारलेले होते,दरवर्षी हाच उत्साह भक्तांच्या ठिकाणी दिसतो,प्रचंड गर्दी असूनही,कुठेही भांडण,मारामाऱ्या,ढकला ढकली, दिसली नाही,सारे शिस्तबद्ध! जत्रा म्हटली की मात्र बालपण आठवते,ती मजा मात्र आता काही केल्या नाही,

माझ्या छोट्या खेड्यातील ती भव्य नकटी भवानी ची जत्रा.लांब लांबून लोक जत्रेला यायचे,सारं गाव गजबजून जायचं.नानांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून मी सारी जत्रा फिरायचो.जत्रा बघण्यासाठी माझी, नानांच्या खांद्यावरून यात्रा सुरू व्हायची. दुतर्फा लागलेल्या दुकानांच्या ओळी मन आकर्षित करून घ्यायच्या,गाव छोटंसं असल्याने जत्रेशिवाय वस्तू मिळत नसत,मग मोठा उत्सव सुरू व्हायचा.जत्रेत मला सगळ्यात जास्त मौज यायची ती डोंबऱ्याचा खेळ बघायची,"बच्चा लोग ताली बजाव" असा आवाज कानी पडला की,मी नानांच्या खांद्यावरून कडकडून टाळ्या वाजवायचो,कालही डोंबऱ्याचा खेळ होताच,जेमतेम पाच सहा वर्षाच लेकरू स्वतःचा तोल सांभाळत दोरीवरची कसरत करत जात होतं,बालपण जाग झालं,डोळे भरून आले,*कधी संपणार ही कसरत???* मग काही पैसे *टिकवल्यावर* त्या पोरीने वाकून नमस्कार केला,टचकन आसवांचा थेंब मनगटावर ओघळला, पोट माणसाला किती हतबल करतं??जत्रेत अनेक माणसं होती,कुणी शंकराचा मुखवटा घातला होता,कुणी माकडाचा,कुणी जीभ बाहेर काढलेल्या काली मातेचा,कुणी शिंग असलेल्या राक्षसाचा.मुखवटेच मुखवटे,*आता तरी वेगळं काय आहे म्हणा*

मग दिसल्या त्या हातगाडीवरच्या तिळ गुळाच्या रेवडया.मन पुनः बालपणाच्या गावी गेलं,मी लहानपणी प्रचंड म्हणजे प्रचंड हट्टी होतो,असं माझे सारेच बुजुर्ग नातेवाईक आजही म्हणतात,त्यांनी कशाला म्हणायला हवं म्हणा,मला आठवतात मी केलेले हट्ट.अमुकेक गोष्ट हवी म्हणचे हवीच,आता रेवड्या पाहिल्या आणि रेवड्यांचा माझा हट्ट आठवला,नानांनी मग 20 पैशाच्या मूठभर रेवड्या घेऊन दिल्या,मला आजही रेवड्या खूप खूप आवडतात,कालही जत्रेतून रेवड्या आठवणीने आणल्या,50 रु पाव.माझी कन्या म्हणाली "काय बाबा रस्त्यावरच्या उघडया पाघड्या रेवड्या खाताय,धूळ बघा किती बसलीये" *आता तिला काय सांगू*? पिझ्झा, खाणाऱ्या या पिढीला रेवड्यांची आठवण काय सांगणार?मग जत्रेत दिसली ती ढोलकी,मी लहानपणी त्याला 

*ढूमढूम* म्हणायचो,नानांना म्हटलं "मला ढूमढूम पायजे" नानांनी मग त्या ढूमढूम वाल्याला किंमत विचारली,त्या काय किंमत सांगितली आता आठवत नाही,पण नाना काही न बोलता तिथून पुढं निघाले.झालं...आमची स्वारी बीनसली मी नानांच्या खांद्यावर बसूनच मोठमोठ्याने भोकाड पसरलं, मग नानांनी मला रागाने खांद्यावरून खाली उतरवलं,मी तिथेच भर रस्त्यात ,भर गर्दीत जत्रेतच जमिनीवर फतकल मारली,काही केल्या उठलो नाही,

बोंबाबोंब सुरू केली,पाय आपटले,भोकाड पसरलं मग हतबल होऊन नानांनी मला ढूमढूम घेऊन दिलं, लगेच रडणं बंद, जसं काही झालंच नाही, मग सात दिवस ते ढूमढूम बडवत बडवत गल्ली बोळात, मित्रांसमोर फुशारक्या मारत फिरत होतो,घर डोक्यावर घेणे म्हणजे काय तर ते असं. आठव्या दिवशी ते ढूमढूम फुटलं,आणि माझ्या अंगातलं जत्रेचं भूत उतरलं....काल पुन्हा जत्रेत जाऊन बालपण जगून आलो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational