जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो।
जन्मलिखीत — आप सिर्फ हमारी हो।
Part9
आपण इथ का आलोयेत?
कोण होता तो?
कालचा गँगस्टर तुम्ही कसकाय ओळखता त्याला? एकमिनीट मेन गोष्ट त्याने रूम मध्ये जाऊन काय सांगितल तुम्हाला?
काय जादू टोणा केला त्याने?
का कोणत्या गोष्टीवरून ब्लॅक मेल केल त्याने?
मला तर वाटतय ऐकशे एक टक्का त्याने तुमच्यावर ना करणी केलीऐ. चला आपण घरी जाऊ. आख्खा खानदानाचीच दृस्ट काढते आता. अशी काढेल ना की परत लागनारच नाही. हा......"
"चुप्प एकदम चुप्प. ब्र जरी निघाला ना तोंडातुन तर मार खाशिल फुकटचा. गप्प पणे जे आहे समोर ते खा." पुनम तिला बोट दाखवत.
सियार," अग पण मम्मी....." विक्रांत सोडून, सगळे एका सुरात हात जोडत," अग आमची मागच्या जन्मातली छळ करनारी सासू तुला सगळ सांगतो नाश्ता झाल्यावर आता खा आणि खाऊ दे सुखाने."
सियारा,"हेय हेय चील गाईज मी तर फक्त असच....." सगळे तिच्याकडे खाऊ की गिळु नजरेने बघतात. ते बघत सियारा शांत राहनेच योग्य समजते आणि नाश्ता करू लागते. तेवढ्यात कालचा एक माणूस त्यांना भेटायला येतो.
"सुनीये आप सबको मेंशन मे ले जाने के लिऐ हम यहाँ आपको लेने आऐ है। आप सब सामान पॅक करके प्लिज हमारे साथ चलिऐ ऐसा बडी मॅम ने कहाँ है।" जॅक एकदम अबदीने त्यांना सांगतो.
सियारा त्याच्या कडे वरून खाली पर्यंत बघत,"तु भी उस गँगस्टर का आदमी है क्या?"
जॅक,"येस मॅम।"
राजेश," ठिके हम अभी निकलते है।" जॅक निघून गेल्यावर
पुनम,"ऐ आवरा लवकर लवकर. सियारा बेटा आपण तुझ्या होणार्या सासरी जातोयेत तर जरा निट कपडे घालून ये. जिन्स टॉप आजपासून बंद. आता फक्त सुटस आणि साडी समजल?" सियाराला हे एकताच जोराचा ठसका लागतो. ती पटक्यान पाण्याचा ग्लास हातात घेते आणि एका घोटात संपवते.
पाणी पिल्यामुळे तिला दम लागतो म्हणून ती मोठमोठ्याने श्वास घेतघेत बोलते," वॉटऽऽऽऽ? साडी अँन्ड सुट नो वे... मी अजिबात घालणार नाहिये ते. ते सुटस ओ माय गॉड... तेना A to Z फुल गळ्याचे आणि साडी घालू मी आजपासून....? शक्यच नाहीये... मला नाही आवडत साडी... त्याच्यात पाय अडकवून तोंडावर पडली म्हणजे? झाला... आख्खा खेळ खंडोबा झाला माझ्या चेहेर्याचा गेमच वाजला समजा...!"
पुनम, "સારું! मग तुझी बहीण कशेकाय काम करती बर घरातले. शिक जरा तिच्याकडून काहितरी. ते सुटस तु फक्त दिवाळीत एकदा जेव्हा नविन आणले होते तेव्हा फक्त फोटो काढण्यापुरते घातले होते. त्याच्या नंतरूण जे कपाटात तु ते कोंबले ते कधी लास्टच बाहेर काढल आठवतय का?
सियारा वरती बघत विचार करते,"हा आठवतेय ना आता मागे गणपतीत घातला होता एक दिवस आणि कॉलेजमध्ये पण घालुन गेली होती मी गणपती होते तेव्हा."
पुनम, " कारण तेव्हा मी सांगितल होत की सनावाराच्या दिवशी जरा निट कपडे घाल म्हणून. सगळे तुला त्याच त्याच कपड्यांवर पाहून वैतागतिल म्हणून. मम्मीच शेवटचे वाक्य एकूण सगळे हसायला लागतात.
सियारा एक आय ब्रो वर करत सगळ्यांकडे बघत मम्मीला,"जोक होता हा?" पुनम हो मध्ये मान हलवतात.
सियारा," सगळ्यात भंगार होता. आणि हो मी खरच सांगतेय मी त्या लोकांसाठी स्वताला बदलणार नाही. आता तुम्हाला काय करायच करा... पण त्या आधी मला सगळ काल सकाळी त्या रूम मध्ये काय घडल मला समजेल अस सांगा. स्टारटिंग टू and. आणि हो नो गुजराती...."
राजेश तिला काल कायकाय घडल ते सगळे सांगायला सुरूवात करतात. सियारा आणि पायल, विक्रांत कान देऊन सगळ ऐकत होते.
राजेश," तर काल अस झाल होत की.....
