Kalidas Ajegaonkar

Tragedy

3  

Kalidas Ajegaonkar

Tragedy

जखम

जखम

4 mins
729


दुपारची वेळ. स्वप्नांचं शहर. उकाडा नेहमी सारखाच आपल्याच धुंदीत. BEST ची बस पकडायची होती. एका वर्दळीच्या stop वरून आतमध्ये शिरलो. बसच्या seats पूर्ण भरल्या होत्या. उभं राहायला असणारी दोन्ही seatsच्या lines मधली जागा रिकामीच होती. म्हणून बस खर तर मोकळी वाटत होती. नाहीतर एखाद्या मधमाश्यांच्या पोळ्या मध्ये एक वेळ जागा मिळेल, पण बस मध्ये तर अशक्यच! इतक्या गर्दीच्या बस मधून उतरणाऱ्या प्रवाश्याला direct स्वर्ग गाठल्यासारखा वाटत असेल.


मी चढलो. पुरुष्यांच्या queue च्या seats पूर्ण भरल्या होत्या. म्हणून माझी नजर फक्त महिलांसाठी राखीव असणाऱ्या seat कडे गेली. त्यातली एकदम मागची एकाच seat रिकामी होती. पण दोघांसाठी असणाऱ्या एकावर एक तरुणी बसली होती. ती स्वतःच्या चेहऱ्यावर आरश्यात बघून powder लावत होती.

‘तरुणी’ हा शब्द आला कि डोळे विस्फारतात आणि लगेच डोक्यातले विचार आसमंत गाठतात. ती होतीच तशी. छे ! मी काय वर्णन करणार तिचं? विधात्यानेच तिला इतकं सुंदर बनवलंय कि शब्द अपुरे पडावेत.


माझ्या हातात रोजच्या पेक्षा जास्त समान होतं. उकाड्यामुळे माझा घसा कोरडा पडला होता. मी आणखी बस च्या gate मधेच उभा होतो. समान टेकवलं आणि वाऱ्याशी गप्पा मारत होतो. मागून हलकेच आवाज आला,

‘Hey! You can seat here. Come.’


मी seat वर बसलो. मला घामाघूम झालेलं बघून, तिने तिच्या जवळचं पाणी मला दिलं. मी पाणी पिऊन thank you असे दोन कोरडे शब्द तिला दिले.


मिच तिला विचारलं,

‘काय करतेस तू? आणि तुला कसं कळलं मला तहान लागली आहे ते?’ माझ्या प्रश्न संपल्या बरोबर तिने ताडकन उत्तर दिलं.


‘पुरुषांना कधी कोणती तहान लागते. हे मला चांगलंच माहित आहे.’

तिच्या या उत्तरावर मी दचकलोच. प्रतिसाद म्हणून फक्त इतकच विचारलं,


‘म्हणजे?’


‘म्हणजे काही नाही. भागली ना तहान तुझी त्याच्याशी कारण. पाणी कुठंच पण असो.’


मला काही कळतंच नव्हत. माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळाचे हावभाव बघून तिच म्हणाली,


‘sorry ! मी जरा रागात बोलले तुम्हाला. पण मी असंच बोलते.’


‘its ok ! काय करतेस तू? नौकरी का शिक्षण?’ संवाद पुढे चालू ठेवण्यासाठीचा नामी प्रश्न.


‘शिकून नौकरी लागते?’


‘हो लागते ना. पण फार कमी लोकांना हे पण तितकंच खरं आहे.’ मी जरा मूड हलका करायचा प्रयत्न केला.


‘काही वेळा तुमचा कौशल्य तुम्हाला उपयोगात येतं शिक्षणापेक्षा.’


‘हो ! कौशल्य पण लागतच म्हणा.’ माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नव्हतं. मी परत तोच प्रश्न विचारला,


‘ते सगळं ठीक आहे गं. पण तू करतेस काय?’


‘मी bar dancer आहे.’ मी डोळे उघडून तिच्याकडे बघतच राहिलो. तिला वाटलं मला ऐकायला आलं नसावं. तिने परत स्पष्ट केलं,


‘मी bar मध्ये dance करते.’ आणि निर्ढावलेल्या हास्याची लकीर

तिच्या चेहऱ्यावर उमटली.


तिच्या उत्तरावर काय बोलणार?

‘okay.’ इतकंच बोललो.


‘फक्त Okay? मला वाटलं माझा रेट विचारशील. माझ्या नकारावर,


‘हर चीझ कि एक किमत होती है !’ असा dialogue मारशील? पण तू, फक्त Okay?’ तिलाच माझ्या उत्तराचं जास्त आश्चर्य वाटलं.


मी दबक्याच आवाजात म्हणालो,

‘असा नाही गं. काय बोलणार ना आता मी?’


माझा दबका आवाज ऐकून ती आणखी चवताळून बोलली,

‘कायद्याने dance bar बंद आहेत. पण दारा आडून चालूच असतात. हीच तर खरी शोकांतिका आहे. दारा आड का? रस्त्यावरच लावा ना. बंदीचा उगाच आव आणायचा. अहो ! कपडे घालायचे, का तर नागडं दिसू नये म्हणून?’


मला आता कळून चुकलं, तिच्यातला रोष बोलणार आहे.

‘अगं ! पण तू इतकं तडका फडकी कसं काय बोलू शकतेस?’

‘तडका फडकी काय त्यात? वेदनेला पण वाचा असतेच ना. आणि कसंय, चार चौघांनी माझ्या अब्रूचा बाजार मांडण्यापेक्षा मीच खरं बोलून मोकळी होते.’


‘पण तुझ्या खऱ्या बोलण्याने मला काय फरक पडणार आहे?’


‘फरक कोणालाच पडणार नाही. मलाच पडेल.’


‘तो कसा?’


‘मी माझ्या कामाची स्वतःला सारखी आठवण करून देत असते. ते सारखं टोचत राहत आणि मनावरची जखम ताजी राहते.’


‘त्या जखमेवर फुंकर मारणारा नसतो का कुणी?’


‘असतो ना ! रोज रात्री त्या जखमेवर कुणीतरी वेगळाच फुंकर मारतो. फुंकर मारणारा बदलतो पण जखम ताजीच राहते. आणि रोज सकाळी तो घाव तसाच ताजा दिसतो.’


‘तुझ्या अश्या बोलण्यानेच, तूच तुझ्यावर शिंतोडे उडवीत आहेस असं वाटत नाही का तुला?’


‘त्या शिंतोड्यांचा हिशोब मी करत नाही. साध उदाहरण आहे. एखाद्याचा बलात्कारी म्हणून लागेला बट्टा न्यायालयात मिटून जाऊ शकतो. पण आम्ही कोणत्या न्यायालयात दाद मागायची?’

तिचा dialogue continue राहिला,


‘समाजाने लावलेला डाग कधीच मिटत नाहीत. तिथे सगळे फैसला करणारेच judge असतात. समाज्याशी लढून आपणच हरण्यापेक्षा गुन्हा कबुल करून मोकळं व्हायचं.’


‘तुझं बोलणं, तुझ्याच मनावर ओरखडे मारत नाही का गं?’


‘दगडावर कधी पडतात का ओरखडे?’

तिचं प्रत्येक उत्तर मी सुन्नपणे ऐकत होतो. माझ्या कानात ओतल्या जाणारं ते शब्दरूपी गरम तेल, पडतच राहिलं.


‘म्हणजे?’


‘मी अगदीच दगड झाली आहे रे. माझ्या अंगावर पडणाऱ्या प्रत्येक नजरेमुळे, गर्दीत शरीरावर नको तिथे होणाऱ्या स्पर्श्यामुळे. माझ्यावर उधळल्या जाणाऱ्या पैशांमुळे. ती प्रत्येक नोट घाव घालते रे माझ्यावर आणि मला माझ्या मजबुरी ची सतत आठवण करून देते.’


‘कसली मजबुरी?’


‘इतिहास सांगितला असता. पण परत भूतकाळात डोकावले ना आजचा वर्तमान खराब होतो. जाऊ देत सोड !’


तिचं वाक्य संपेपर्यंत माझ्या लक्षात आलं माझा stop जवळ आलाय. मी उठून उभं राहिलो. तेव्हा तिने bag मधला काढलेल्या रुमालामुळे तिच्याकडे बघायला मन धजावतच नव्हतं. सामन गोळा केलं. बस थांबली. पायऱ्या उतरताना तिला शेवटचा प्रश्न केला,


‘आणि english?’


‘BA english करतेय. open university मधून. रोज जायला वेळ नसतो. dance ची practice असते ना !’

बसच्या पायऱ्या पण संपल्या आणि तिचे शब्द पण....Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy