STORYMIRROR

Kalidas Ajegaonkar

Others

3  

Kalidas Ajegaonkar

Others

अमावस्या

अमावस्या

2 mins
697


-ऐक ना! काही मनातल्या गोष्टी आज तुझ्याशी शेयर करायच्या आहेत!

-माझ्या आडून तिच्यासाठी कविता, चारोळ्या लिहितोस, कळलंय मला तुला कोणाविषयी बोलायचंय. जेव्हा गोष्टी गुलाबी असतात तेव्हाच इतकी प्रस्तावना दिली जाते. कारण तो नाजूकपणा आपल्यात असल्याशिवाय गुलाबीपण शोभत नाही. अरे! लाजतोयस का? 

-ती फारच लाजरी आहे रे! एक तर अजबच अट घातली आहे तिने! आपण फक्त पंधरा दिवसांत एकदाच भेटू म्हणते आहे. नवीन ओळख असल्याने कदाचित तिला मला चाचपडून बघायचं असेल.

-शक्यता नाकारता येत नाही. कारण त्या गुलाबीपणाचं प्रतिक असलेल्या गुलाबालाही, प्रत्यक्षात सत्यतेचे काटेरी कुंपण असते. काही मदत हवी आहे का?

-हो! तू आमच्या भेटीच्या वेळेत थोडं ढगांच्या आड लपून बसशील का रे? तिला तुझ्या प्रकाशात आमचं मिलन म्हणजे ओशाळल्यागत वाटत होतं. ती म्हणते! आपलं मिलन हा आपला सोहळा आहे आणि तो कोणी चोरून पाहावा हे पटण्यासारखंच नाहीये!

-मी फक्त तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी इतका लख्ख उजेड देतो.

-ती म्हणाली! अंधारात ठेचकाळल्याशिवाय आपल्याला आपल्या वाटा दिसणार नाहीत. आपल्या प्रेमात ती ताकद नक्कीच निर्माण व्

हायला हवी. आपल्या दिशा आपण शोधू. म्हणून हा प्रस्ताव मांडलाय. आणि उद्या नेमका पंधरावा दिवस आहे.

-मलाही पटतंय. मी एक काम करतो ना! मी महिन्यातून एक दिवस उगवतच नाही. त्या दिवशी मी आराम करतो. उगाच पार्ट टाईम कशाला ना? सुट्टी म्हणजे पूर्ण सुट्टी. तू मनसोक्त उतरवून घे तिला तुझ्यात.

-जमेल तुला हे?

-का नाही जमणार? बाकी दिवस मी माझ्या मर्जीप्रमाणे उगवत राहीन, म्हणजे कसंय तुलाही माझ्याआडून तिच्यासाठी काहीतरी लिहिता येईल, आणि होणारे रुसवे फुगवे दूर करता येतील.

-अरे! भारी आहे आयडिया! पण तुला तुझं अस्तित्व विसरता येईल पूर्ण एक रात्र?

-का नाही? अशी याचना करणारा तू एकटाच नाहीयेस. प्रत्येकाचंच चाचपडणं चालू आहे. म्हणून तर मागचे 14 दिवस मी कलकलाने कमी होतोय.

.

आज वामकुक्षी जरा जास्तच वेळ लागली. 

सात वाजलेत. भेटायला उशीर झाला तर? याची कल्पनाच करवत नाही.

पंधरा दिवसांच्या सगळ्या सेकंदांचा हिशोब तयार असतो. ती सगळी थकबाकी चुकवायची असते आणि परत कोऱ्या पानावर नवी तारीख लिहायची असते.

निघावं लागेल.

.

खिडकीतून डोकावलं तर चंद्र गायब???


Rate this content
Log in