Madhuri Sharma

Romance

3.5  

Madhuri Sharma

Romance

जिवलगा

जिवलगा

5 mins
327


तु माझ्याशी खोटं वागलास प्रितम??...

मी कधी कल्पना देखील केली नव्हती की तू असा काही वागशील...

अगं,मायरा प्लीज माझं एकदा फक्त ऐकून तर घे...

स्वतःच्या डोळ्यांने तुम्हा दोघांना सोबत बघितल्यावर काय ऐकुन घ्यायचं आणि बोलायचं बाकी राहलंय....

एवढ्या वर्षांच्या आपल्या संसारात कुठे कमी पडले मी

सांग ना...

तू म्हणालास म्हणुन नौकरी केली,माझ्या आई-बाबांना दुखवुन तुझ्याशी लग्न केलं. तूझ्या आई-वडीलांना सांभाळून घेतलं. मग का म्हणून तु असं वागलास...

आहे का उत्तर...

मायरा....

हात सोड माझा..

मला एक चान्स तर दे

मी काय म्हणतो ते ऐकुन तर घे..

प्रितम, तुझ्यात आणि माझ्यात जे काही होतं ते मी आज संपवते.

इथुन पुढे तुझा-माझा काडीमात्र संबंध नाही.

मायरा, तू जे बघितलं ते खरं नव्हतं यार कसं समजवू मी तूला...

हे बघ तू रडायचं थांब आधी हे घे पाणी पिऊन घे..

मला काहीही नकोय..

मी जातेय आणि पून्हा कधीच येणार नाही...

मायरा प्लीज एकदा मी काय म्हणतो ते ऐकून तर घे...

मी सांगितलं ना मला आता काही बोलायचं नाहीए.....

Have a happy life with your beloved Trisha....

And don't try to contact me...

Hey, Myra just listens to me...

          प्रितम...

आई-बाबा तुम्ही ईथे कसं काय?

अरे मायराचा फोन आला होता ती म्हणाली ती कामानिम्मित जरा बाहेरगावी आहे म्हणुन आम्ही ईथे येऊन राहू असं.

तू बरा आहेस ना प्रितम?

हो आई मला काय होणार..

मी येतोच जरा बाहेर जाऊन..

हँलो, दिपक मला आपल्या कट्टयावर ये भेटायला महत्तवाचं बोलायचंय तुझ्याशी

का?काय रे काय झालं?

तु ये मग सगळं सविस्तर सांगतो.

बरं लगेच निघतो मी...

       भैय्या दो कटींग देना...

हाय,प्रितम कसा आहेस?

दिपक अरे मी बिल्कुल बरा नाहीये सध्या तरी...

काय रे प्रितम काय झालं?

माझं चुकलं यार मी तुझं ऐकायला पाहीजे होतं

मायराने मला आणि त्रिशाला सोबत बघितलं आज...

काय बोलतोस? तरी मी तुला म्हणत होतो, त्रिशामध्ये जास्त गुंतु नकोस, मायराचं खुप प्रेम आहे तुझ्यावर तिला असं फसवू नकोस, पण नाही त्यावेळी तु माझं काही ऐकलं नाही मग आता का बोलवलंय मला?

दिपक, यार प्लीज मी आता आधीच इतक्या टेन्शन मध्ये आहे आणि तु पण आता मलाच ऐकवतो आहे.

हो मान्य आहे मला मी चुकलो पण यार ती मला सोडुन गेली आहे.

काय बोलतोस? वहिनी तुला सोडून गेली?

हो ना माझं काहीच न ऐकता ती निघुन गेली.

प्रितम तुच कारणीभुत आहेस या सगळ्याला

हो पण मग आता काय?

मी काय म्हणतो मी बोलू का तिच्याशी?

अरे तिचा फोनच लागत नाहीये.

मग आता काय करायचं?

वहिनीची कोणी मैत्रीण आहे का?जेणे करून कोणाकडुन तरी त्याच्याविषयी कळेल असं...

किंवा त्या माहेरी तर गेल्या नसतील ना...

तुला काय वाटतं रे‌..‌.

हे सर्व माझं करून झालंय ती तिच्या माहेरी ही नाही आणि तिच्या कुठल्याही मैत्रीणीला तिची काही कल्पना नाही.

मग तर आता एकच पर्याय आहे तू त्यांच्या ऑफिसमध्येच याची माहिती घे.

नाही यार जर तिला हे कळलं ना तर अजुन ती चिडेल माझ्यावर...

बरं तू थांब मला त्यांच्या ऑफिसचा नंबर दे मी काढतो माहिती

मला हे काही योग्य वाटत नाही.

अरे मग कसं कळेल आपल्याला त्यांच्या विषयी? तू थांब मीच करतो......

Hello..

Hi...

, I am pritam here,myra's husband, can I talk to myra?

Sorry sir, but myra mam informed us that she is resigning the job.

Pritam- oh ok thanks.

यार दिपक मायराने तर job resign केला पण...

काय बोलतोस यार मग वहिनी कुठे गेल्या असतील?

तेच मला कळत नाहीये, लग्नाच्या एवढ्या वर्षांमध्ये जाॅबमुळे ती साधं तिच्या माहेरी ही गेली नाही आणि आज अचानक एकदम कुठे गायब झाली.

तिच्याशिवाय जगण्याचा मी विचारदेखील करू शकत नाही.

दिपक- ह्या सर्वांचा तू त्रिशा सोबत लफडं करण्याच्या आधी विचार करायचा होतास

प्रितम- अरे हो मान्य आहे माझं चुकलं पण माझं प्रेम तर मायरावरच आहे रे, त्रिशासोबत माझं फक्त टाईमपास चालु होता....

दिपक-हो का!

हे असं कसं प्रेम आहे रे तुझं

आज हिच्यावर, उद्या तिच्यावर,

तुला माझं मित्र म्हणायला सुद्धा लाज वाटते मला

प्रितम- तु हे सर्व मला नंतर बोल रे, आधी मला मायराला शोधायला मदत कर

दिपक- पोलीस complaint करू या का?

प्रितम- तो शेवटचा पर्याय त्या आधी आपण नाही का काही करू शकत?

दिपक- थांब जरा विचार करू दे...

टिंग टींग टींग टींग

तुझा फोन वाजतोय प्रितम...‌‌

प्रितम- हो, माझं लक्षचं नव्हतं....

Hello, हा त्रिशा बोल...

प्रितम तु मला न सांगता गोव्याला काय करतोय?

ए त्रिशा काही ही काय बोलते गं मी इथेच आहे मुंबई ला...

काय बोलतोस? मग मायरा एकटी गेलीय का गोव्याला?

तुला कसं माहीत ते

असा काय रे तु?

फेसबुक बघ ना तिने स्टेटस अपडेट केलयं 'चिलिंग इन गोवा'

काय बोलतेस?

बरं त्रिशा मी तुला नंतर काॅल करतो.....

अरे पण प्रितम......‌‌

दिपक कळलं मला यायला गोव्याला गेली आहे...

वाह! वहिनी तर भारी निघाल्या रे‌.....‌

डायरेक्ट गोव्याला...‌..

दिपक जरा तोंड सांभाळून ती माझी बायको आहे अजून......

हो, साॅरी......

चल मला निघायला हवं ....

अरे हो पण तुला कळलं कसं ते तरी सांग...

अरे त्रिशाने सांगितलं मायराने फेसबुक ला पोस्ट टाकली आहे तशी

काय बोलतोस?

वहीनी ने आजपर्यंत कधी काही टाकलं नाही आज डायरेक्ट पोस्ट केली म्हणजे बघायलाच पाहीजे

हा बघ ना मी पण बघतो नेमकी गोव्याला आहे तरी कुठल्या रिसोर्टला ती...

हम्म्म....

दिपक..‌

प्रितम..

अरे हा वहिनी सोबत फोटोंमध्ये

अरे हा मामला सोबत कोण आहे?

म्हणजे एवढे दिवस मायरा सुद्धा मला फसवत होती.....

म्हणुन ती एका क्षणात माझं काही न ऐकता निघून गेली.....

आणि मी आपला सतत अपराधी वाटुन घेत होतो....‌

दिपक - थांब प्रितम, तूझं हे चुकतंय बरं का? जर वहिनीचा तु त्या माणसासोबत फोटो बघितला नसता तर तू कसं ही करुन त्यांना आणलंच असतं ना..‌‌

हो पण आता त्याची काही गरज नाहीये कारण ती तुझी वहिनी त्या माझ्या प्रेमाच्या लायकीची नाहीये...

हो का! अरे वाह!!! म्हणजे तु त्रिशासोबत सर्रास लफडं करायचं अजुन वर म्हणायचं की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे अजून वाह रे वाह किती नालायक आहेस रे तू....

आणि तेच वहिनीचा कुठला तरी एक फोटो बघुन ठरवुन घेतलं की वहिनी अशी आहे......

खरं म्हणजे वहिनी ने तुला त्रिशासोबत बघित्यानंतर सर्वात पहिले मलाच काॅल केला...

आम्ही दोघे भेटलो

त्यांनी माझ्याकडून कन्फर्म करुन घेतलं मग मीच त्यांना खरं सांगू न टाकलं तुला अद्दल घडावी म्हणुन मग आम्ही दोघांनी मिळून हा सर्व प्लॅन केला

तू जो वहिनीचा फोटो बघितला ना तो वहिनीचा मावस भाऊ आहे जो गोव्यालाच राहतो....

तुझ्यासारखा माणुस नाही बघितला मी...

प्रितम- रडत रडतच....‌‌

काय यार....

माझं खरंच चुकलं..‌.

मायरा येईल ना परत..

त्या येतीलच रे

कारण त्याचं फार फार प्रेम आहे तुझ्यावर त्या तुझ्याशिवाय जगूच शकत नाही त्या तर तुला लगेच माफ करत होत्या इतक्या प्रेमळ पण तू पून्हा अशी चूक करावी नाही म्हणून हे सर्व केलं आम्ही

खरंच रे माझे डोळे उघडले...

तीला कसं वाटलं असेल याची जाणीव झाली

थैंक यु दिपक ...

तु माझा खरा मित्र आहेस..

ते सोड रे, आणि पळत जा वहिनी वाट बघतेय तुझी...

ह़ो..

आणि हो अजुन एक

काय आता?

तू बाबा होणार आहेस...

वाह !

आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही....

लव यु मायरा......

माझी "जिवलगा"


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance