जिव्हाळा...
जिव्हाळा...
ते मांजर आणि तिची ती चार पिल्लं. ती शाळेला जाताना मोठ्या परातीत घट्ट दूध आणि ताजा भात कालवून ठेवायची. ती पण बरोबर तिच्या शाळेला जायच्या वेळेला ओरडायची. सकाळ झाली आणि दूध आलंकी त्यांचा धिंगाणाच असायचा दोराला अक्षरशः ओरखडायची पिलं. ती उठायची झोपेतनं आणि मस्ती चालायची त्यांची, खूप खेळायची... मग ती आवरून निघताना रोजचं रूटिन झालं होतं. ती मांजर, तिची पिल्लं आणि ती रोजच खेळायचे, सोबत जेवायचे. धमाल मस्ती. ती ड्युटीला गेली तरी तिचं लक्ष मांजरातच असायचं. पण ती शाळेत गेली की मांजरांना घरमालकीन हाकलायची वाटतं. वाटतं काय खरंच ती हाकलायची, हाती येईल त्या वस्तू फेकून मारायची हे दुसर्याकडून समजलं.
तिला फार वाईट वाटायचं. घरमालकीनीला काय बोलायचं? तरीही ती म्हणाली, माझं मांजर पिल्ले दिसतच नाहीत. पण तिनं उत्तरच दिलं नाही. शेजारी म्हणायचे, तुम्ही जेव्हा नसता ना घरी तेव्हा ती दाराजवळ येऊन ओरडायची. दोन दिवस तिला पिल्लं दिसलेच नाही. ती खूप उदास झाली. तिला रडायलाच आलं होतं. तिसर्या दिवशी मग सकाळीच मांजराचा आवाज आला की तिनं पटकन दार उघडलं. तिन्ही पिल्लांना पाहून ती खूपच आनंदी झाली. त्या दिवशी तिनं त्यांच्या H.M.ला फोन करून सुट्टी घेतली. खूप खेळली सर्वच..
कालांतराने तिने नोकरी सोडली. तिचं लग्न झालं. नंतर तिचं तिकडं जाणंच झालं नाही. पण तिकडं ती आवर्जून फोन करते मांजरासाठी.
एक अतुट नातं होतं आणि आहे जिव्हाळ्याचं तिचं आणि मांजराच्या पिल्लांचं. त्या आठवणीत ती त्यांची गोष्ट सांगते लेकरांना..