परिवार...
परिवार...


हा निर्णय जरी दोघांचा(ज्योती,सुरेश) होता,तरी दोघांच्या मनात धाकधूक होतीच.आपण करतोय ते योग्य आहे का वैगेरे गोंधळ चालूच होता. सुरेश च तिकीट ही कन्फम झालेल होतं अमेरीकेकेच.आईला एकटीला सोडून जाण जमत नव्हत त्याला. वडील गेले. अनतीच आई वडील झाली होती. एकटीनच सांभाळल होतं.
"आई चल ग लवकर, बघ दहा वाजत आले." तो नेहमी सारख्या चिडक्या आवाजात बोलला.
ती "आले रे राजा.आवरलच." ती गाडीजवळ आली.
तिला सार पटल होतं सुरेश आणि सुनबाई परदेशी गेल्यावर तीची काळजी घेणार कोणीतरी हवंच होतं खुप विचाराअंती हा निर्णय घेतला होता . आईलाही तस पटवुन दिलं होतंच.
गाडी नेहमी सारखीच चालवत होता.पण डोक्यात विचार चालू होते. आपण आई बरोबर जे करतोय ते योग्य आहे का वैगेरे..
ते काका योगा क्लास चालवत त्यांचाही एकुलता एक मुलगा परदेशी गेला.तो कायमचाच लग्नही तिकडच करून तो सेटल झाला. पंधरा वर्षापुर्वीच त्यांच्या मिसेस देवाघरी गेल्या.यांची ओळख तिथेच झाली होती.ती हळुहळू मैत्रीत झाली हल्ली तर रोजच चहा नाष्टा सोबतच व्हायच..
तो म्हणाला"आई तू रागावली नाहीस ना?"
"नाही रे राजा, आपणकोणाला चीटिंग वैगेरे करत नाही."
"आयुष्य जगायला यावयात एकमेकाची सोबत असण खुप गरजेच असत."
तो गाडी चालवत होताच. ती म्हणाली"अरे समाज समाज काय असतो पाठ फिरल्यावर सगळेच बोलतात.पण गरज पडल्यावर कोणचं पटकन धावून येत नाही."
"काळजी नको करूस राजा."
",बर तुझ पॅकींग झाल ना सगळ?"
त्याची पहाटेची फ्लाईट होती म्हणजे मध्यरात्री दोनची..
गाडी थांबली त्यानं गाडीच दार उघडल.आई काठापदराच्या साडीत छान दिसत होती. काका ही बरोबर वेळेला आलेले होते.
ज्योतीनेच आईंना तयार केल होतं.या दोघांनी खुप समजावुन आणि पटवून दिल होत आईंना अणि त्या काकांनाही..
मग रजिस्टर आॅफीस मधे त्यांच नाव पुकारल गेलं..आणि काकांचे दोन मित्र आलेले होते.सुरेश,ज्योतींनी आईकडन सही केली आणि कोर्ट मॅरेज पार पडलं.