जीवनाची प्रेरणा
जीवनाची प्रेरणा
पहाटे पहाटे मंद वाऱ्याची झुळुक आणि शांत वातावरण मनाला भुरळ पाडत होते. मी ही शांत वातावरणात काही आवडीची पुस्तके व वरतमान पत्रे चाळत व वाचत होतो. व थोडासा ताजेतवाने होण्यासाठी प्रांत विधी आटोपून मस्त सोबतीला चहाचा आस्वाद घेत होतो. व ताज्या बातम्या घडामोडींचा कानोसा घेत होतो. व काही गमतीदार पुस्तके वाचून त्याचा आनंद घेत होतो. इतक्यात समोरच्या खिडकीतुन मला कसला तरी विशीष्ट आवाज कानी आला. म्हणून मी पळतच बाहेर पहावयास गेलो.
तर समोरच्या झाडावर एक सुंदर अशा पक्षाची जोडी पहावयास मिळाली. नेत्रदीपक अशा घुबड पक्षाची ती जोडी होती. तो पक्षी त्यांचे ते रुप
मनाला खुप सुखावणारे असे होते. या अगोदर या पक्षाविषयी फक्त ऐकून होतो परंतु आज याची देही याची डोळा पाहील्या ने मनोमनी सुखावलो होतो.
आकाशात भरारी घेताना आणि लक्ष्य गाठताना त्यांची ती गरूड भरारी खुप काही शिकवुन जाते. त्यांच्या कडे पाहुन मनात खुपकाही प्रश्नांचा काहुर माजला होता. आणि मी त्यांच्या कडे एकटक पाहातच राहीलो. याचे मलाच भान राहीले नव्हते. परंतु स्वतःला सावरत मी भानावर आलो. परंतु घडयाळाच्या काटयाकडे पाहतो तर खूप ऊशीर झाला होता. मी लगबगीने गडबडीत भराभर उरकत माझ्या दिनक्रम घालवण्यात मग्न झालो. त्याच नवऊमेदिने नव आशेने. आणि नव प्रेरणेने!