End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Sunny Adekar

Others


4.8  

Sunny Adekar

Others


एक प्रेरणा दायक दिवाळी

एक प्रेरणा दायक दिवाळी

1 min 822 1 min 822

काय मित्रहो दिवाळी च्या गोड गोड पदार्थ लाडु चकली, करंज्याचा आनंद मनोसोक्त लुटला ना सर्वानी , मग या दिवाळीत सर्वानी फटाक्यांची आतीषबाजी ही केली ना ! बरे दिवाळी वरून च आठवली आमची बालपणची दिवाळी ,

आमच्या आजुबाजुला दाटिवाटिने चाळ संस्कृती आणि ती टुमदार घरे त्यामुळे ती सणांची आनंद आणि मजा काही औरच वेगळी असायची. दिवाळी म्हणजे आम्ही चाळीतले बालगोपाळ आणि मोठे सारेच खुप अगोदर तयारी ला लागायचो, आणि उत्साह वाखाणण्याजोगे असायचा. सर्वात आधि सुरुवात व्हायची ती घरची साफसफाई अगदी पोटमाळ्या वरच्या बाजुपासुन स्वच्छ साफ करण्यास सुरुवात करत असु, आणि सामान निटनेटके पणाने त्या च जागी राखले जायचे आणि मग गोड गोड पदार्थ बनवायला सुरुवात केली जायची, आणि मग घराजवळ रांंगोळी काढण्यात एकापेक्षा एक सरस चढाओढ व्हायची,

परंतु आजच्या धावपळीच्या युगात व जिवनात ह्या सणाला पुर्वी सारखा ऊत्साह दिसत नाही, धावपळीत च सारे काही करावे लागते नाही का ! बर्याच दा गोड गोड पदार्थ ही बाजारातुन विकत आणले जातात. या विज्ञन वादि युगात सण हे कायम आठवणीत राहतील हे मात्र खरे आहे नाही का !


Rate this content
Log in