शाळेतील मित्र
शाळेतील मित्र


माझी शाळा म्यु .अ.प्रा. मराठी शाळा असल्याने आणि घरापासून काही शा अंतरावर असल्याने माझे शिक्षण पहीली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळेतच झाले. शाळा जरी प्राथमिक असली तरी शिक्षक हे खुप उत्तम प्रकारे शिकवत असल्याने आम्हाला वेगळाच आनंद मिळे,आणि समाधान मिळे सवंगडी तर मधल्या सुट्टीत लपाछपी चा खेळ उत्तम प्रकारे खेळत नाही तर मग विटी दांडु हे ठरलेलच असे आणि मधल्या सुट्टीचा वेळ कसा निघून जायचा कळायचा नाही....
असे शिक्षण खेळत बागडत कसे सातवी पर्यंत पुर्ण झाले ते कळलेच नाही. आणि पुढील शिक्षणासाठी सर्व मित्र वेगवेगळ्या शाळेत शिकावयास गेले. त्यामुळे साहजिकच मित्रांच्या भेटी गाठी या कमी होवु लागल्या. आणि ते प्राथमिक शाळेतले मित्रांचे मौजमजेतले घालवलेले दिवस एकमेकांना सतावु लागले. परंतु सर्वाचा नाइलाज होता.
मात्र शालेय शिक्षण पुर्ण करून जो तो कामाधंदयामुळे इतरत्र व्यस्त राहु लागले. शिक्षणातल्या या आठवणी हळुहळू कमी होऊ लागल्या. आणि काही वर्षानी तो योग जुळुन आला. निमित्त होते पिकनिक चे एक मित्र भेटला, त्याने गप्पा गोष्टीत सहज म्हटले काय मित्रा, आपण इतक्या वर्षांनी भेटतोय मग सर्व मित्रांनी एकत्र येवुन एक सहलीच आयोजन का नाही करत , विचार पटले आणि एका नंतर पाच मित्र आम्ही एकत्र भेटलो. आणि छानच सहलीचे कार्यक्रम पार पडले.एवढया वर्षानी एकत्र भेटल्याने प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर्वानी खुप धमाल केली. आयुष्यात कधीही न वीसरता येणारी. कधीही त्या सवंगडया ना न विसरता येणारी,.अशी सहल ती अविस्मरणीय अशी झाली.,