जीवन एक संघर्ष......
जीवन एक संघर्ष......
संध्याकाळची वेळ होती . दोनदा वापरलेले कपडे पुन्हा वापरण्याची सवय नसल्यामुळे आम्ही खरेदी करायला गेलो. त्या पैकी एका दुकानात जाताच मी अवाक झाले. मी त्या दुकानामध्ये माझ्या वर्गात शिकणाऱ्या माझ्या मित्राला पाहिले तो त्या दुकानात काम करत होता .मी त्याला विचारले,"तू इथे कसा?" आणि " येथे काय करतोय ?". तर तो स्मितहास्य करीत म्हणाला,"माझे वडील शेतात काम करतात आणि मला तीन बहिणी आहेत ,बाबांच्या कामावर इतक्या सर्वांचे पोट भरणे कसे शक्य होत नाही .त्यात दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली की आमच्या सारख्या शेतकऱ्यानं काय करावे ? म्हणून मी कॉलेज सुटल्यावर येथे काम करतो".
त्याचा ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नव्हते ,कारण एसी कार मध्ये बसून बाहेर उन्हातानात वस्तू विकणाऱ्या माणसांची दुःख माझ्या वाट्याला येणं दूरच , उलट आजपर्यंत मी जे मागेन ते मला मिळाला असल्यामुळे मला कोणत्या गोष्टीची किंमत नव्हती असं म्हणालात तरी चालेल. पण याला इथे काम करावं लागतेय आणि कॉलेज आणि काम कसं प्रकारे करत असेल ? असा मी विचार करतच होते आणि....."बोला मॅडम,काय पाहिजे?" त्याने माझ्या आईला विचारले.मी घरी जाताना देखील हाच विचार करत होती की खरच गरीबी माणसाला काय काय करायला शिकवते.... माझी आई देखील गरीब कुटुंबातून आली होती . ती सांगत होती की जन्मापासून गरिबीची चादर अंगावर ओढलेली होती. दोघी बहिणी एकमेकींचे कपडे वापरून मोठ्या झाल्या होत्या . त्यामुळे लहानपणापासूनच तडजोडीची सवय झाली होती . अर्ध्या किमतीत पुस्तके घ्यायची आणि वर्ष संपले की पुन्हा अर्ध्या किमतीत परत करायची .त्या मुळे त्यांना चांगल्या रीतीने पुस्तके हाताळण्याची सवय लागली होती . भाडे घेण्यासाठी घरमालक यायचा पण हातात पैसे नसल्यामुळे लाचारी पत्करावी लागली होती . म्हणून आम्हाला आई बाबा कधी काही कमी नाही पडून देत हे तेव्हा मला कळले.
माझ्या आयुष्यातील दुःख हे असायचे की सकाळी कॉलेज ला जाण्यासाठी मला उठावे लागत असे आणि एसी ची छान थंड हवेत उठणे नकोसे वाटत असे . मला बॅग उचलण्या इतपत पण कष्ट मी कधी घेतलेत मला आठवत नाही . पण त्यांच्या आयुष्यात सकाळी उठल्यावर घरातील सर्व कामे पूर्ण करून कॉलेज करणे मग पुन्हा कामाला जाणे आणि अभ्यास उरकणे यांना कसे बरे जमत असेल तेच कळत नाही .. आणि त्यांनी ची ही लढाई त्यांच्या परिस्थिती शी असते ..यांच्या आयुष्यातील संघर्ष सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत चालूच असतो आणि माझा संघर्ष मला आवडते टीव्ही कार्यक्रम बघता येत नाही हा असतो ... थोडक्यात काय जीवन जगण्यासाठी चा संघर्ष , तडजोड मला माहीतच नव्हती.
त्या दिवशीच चित्रपट पाहिला . दोन बहीण भाऊ २रीत असतात . बहिणीचे शूज तुटून जातात. पण घरच्या परस्थितीमुळे घरी सांगता पण येत नव्हते . बहिणीची सकाळची शाळा असल्यामुळे ती तिच्या भावाचे शूज घालून जायची आणि दुपारची भावाची शाळा असायची तेव्हा त्याला धावत येऊन ती द्यायची . एकदा शाळेत स्पर्धा होती धावण्याची! त्या स्पर्धेत 1 नंबर ला विजयपदक तर दुसऱ्या नंबर ला शूज असे बक्षीस होते. तर तो मुलगा घरी धावत आला आणि बहिणीला सर्व वृत्तांत सांगितला. दिवस उजाडला. तो धावला. अगदी जीव मुठीत घेऊन धावला आणि या मध्ये त्याचा पहिला नंबर कधी आला हे त्याला देखील कळले नाही. तो हिरमुसला . तो पहिला नंबर येऊन सुद्धा हिरमुसला कारण त्याचा संघर्ष हा त्याच्या गरजा न पूर्ता मर्यादित होता .
कारण परिसथितीमुळे त्याला शूज घेऊ शकत नव्हत.
आपण पाहतो की ९०% विद्यार्थी हे गरीब घरान्यातील असूनही त्यांनी अव्वल मार्क मिळवलेले असतात...का माहितेय? कारण त्या परिस्थितीची त्यांना जाणीव असते . त्या परिस्थितीत होरपळून निघालेला जीव काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो तेव्हा त्यांच्या जिद्दिपुढे बाकी सारे शून्य असते . माझ्या रूम मध्ये AC लावा नाहीतर माझा स्टडी नाही होणार , मला बाईक घेतलीत तरच मी कॉलेज ला जाईन..मला हेच पाहिजे तेच पाहिजे. या ऐशोरामाच्या वस्तू काहीच नसतात तरी ते ध्येय गाठतात.
गरीबी माणसाला वय नसताना मोठा विचार करायला लावते . दुसऱ्यांबद्दल विचार करायला लावते. काही नसताना जगायला शिकवते .एक एक पैश्यामागची मेहनत माहीत असते . सुखाची सवय नसते ,मग कोणतीही परिसथितीत जगायला शिकवते.ज्या वक्ती स्वतः मेहनत करून आपल्या आयुष्याला आकार देतात त्यांनाच खरा जीवनाचा अर्थ आकलन आलेला असतो. जीवनातील संघर्ष हा प्रत्येकाचा लहानपणीच सुरू होतो पण त्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि संघर्षातून जो संकटांवर मात करून पुढे येतो तोच यशस्वी होतो.
