Namrata Madhavi

Others

4.3  

Namrata Madhavi

Others

मला देव दिसला.....

मला देव दिसला.....

2 mins
169


मला देव दिसला

एक कुटुंब होते..त्यामध्ये त्या मुलाचे आई बाबा आणि तो राहत असे..सर्व काही नीट चालत होते ..मुलगा वयात आला ..पंख फुटले त्याला ..आई बाबांशी उलट बोलायला लागला .. त्यांची सेवा करायचं सोडून त्यांना वाईट वाईट बोलत असे ..त्यांचे जीवाला मात्र घोर लागला होता की या मुलाचे पुढे कसे होणार ..ह्याला आयुष्यात मोठा व्हायचं असेल तर ह्याच्या कडे नम्रता आली पाहिजे ..सर्वांशी मिळून मिसळून आनंदाने राहावे ..सर्वांचा आदर करावा असे त्याच्या आई बाबांना वाटत असे ..पण त्या मुलाची वाईट वागण्याची ,एकही काम न करण्याची वृत्ती मात्र गेली नाही ...तो तसाच वागत राहिला .. एक दिवस तो मुलगा त्याच्या कुटुंबा सोबत फिरायला गेला होता ..त्याला खूप भूक लागली होती तर ते जवळ असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवायला गेले ..त्यांचे जेवण चालू होते ..

तेव्हा तिथे एक माणूस आला आणि त्याने त्या मुलाच्या वडिलांना हात जोडून नमस्कार केला ..आणि विचारले की मी तुमच्या मुलाशी 2 मिनिटे बोलू शकतो का ? त्या वर त्या मुलाचे वडील बोलले की चालेल तुम्ही बोलू शकता ..

त्या माणसाने त्या मुलाच्या कानात काहीतरी सांगितले आणि तो निघून गेला ..मागे वळून त्या मुलाने पाहिले तर तो माणूस तिथे नव्हताच.. त्या मुलाला आश्चर्य वाटले ..

तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना विचारले की तो माणूस काय बोलून गेला ?? तर तो मुलगा त्या वर म्हणाला की तो माणूस मला बोलला की दर रोज आई बाबा नच्या सकाळी उठल्या वर पाय पड आणि त्यांची सेवा कर ...

हे ऐकुन त्या आई बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले..कारण त्या अनोळखी माणसाने ही गोष्ट त्या मुलाला सांगितली होती ज्या गोष्टीला धरून त्या मुलाचे आई बाबा बैचेन होत असे ...

त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाने त्या माणसात देव पाहिला..


Rate this content
Log in