Namrata Madhavi

Others

3.8  

Namrata Madhavi

Others

काय कमावले काय गमावले........

काय कमावले काय गमावले........

3 mins
257


           निर्णय झाला .मी गावी जाणार होते .खूप कंटाळा आला होता गावी जाण्याचा ..पण मातोश्री बोलतील ती पूर्व दिशा होती .. कारण मुंबई मध्ये रुग्णांची संख्या वाढतच चालली होती .गावी जाण्याचा दिवस आला ..मी माझे हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकत आईच्या बाजूला बसले . पहिल्यांदा गावी जाणार होते आज पर्यंत गाव कसं असते माहीतच नव्हते ...उस्तुक होतेच पण बैचेन पण होते की कसं असेल गाव ? काय काय असते गावात ? बस चालू झाली बाहेर बघत बघत ह्या विचारात मन विरून गेलं ...काही वेळा नंतर आईने भानावर आणले . " पिंकी " ,आई ने हाक मारली . मी तिच्या कडे पाहिलं ती बोलली बाहेर बघ खिडकीतून ...

         समोर पाहते तर काय !!! मामाच्या गावाला जाऊया मधली झाडे फक्त धावत नव्हती तर त्यावरील दवबिंदूनी नटून ती मिरवत होती .पक्ष्यांची किलबिल आज मी रिंगटोन मध्ये नाही तर प्रत्यक्षात अनुभवत होते... जगाचं भान हरपून पाणी उंचच उंच कडेकपारितून उड्या मारत खाली येत होत ...आज मी पहिल्यांदा चिमणीची चिव चिव ऐकत होती ...आणि या दृश्याचे स्वागत करण्यासाठी मेघ बसरायला लागले होते ..हे दृश्य मी वॉलपेपर मध्ये पाहत नव्हते तर वास्तवात पाहत होते. हे सर्व मी पहिल्यांदा अनुभवत होते ...या अगोदर सिमेंट च्या बिल्डिंग मधून खाली पाणी जरी पडले की खालच्या खोलीतल्या काकू ओरडायचा ...पण इथे खूपच छान होत ..मला इंस्टाग्राम वर स्टोरी टाकायची होती पण नेटवर्क मिळत नव्हते.. पण गावी येण्याबद्दलची खंत वाटत नव्हती .

          गावी पोहचताच आजी ने घट्ट मिठी मारली आणि सर्व ताण तणाव मी विसरून गेले होते .आजीच्या हातचे जेवण जेवले . ते जेवण माझ्या पिझ्झा पेक्षा किती रुचकर होते .१४ दिवस आम्ही वेगळे राहत होतो .ते दिवस कधी संपत आहेत असे झाले होते कारण मला बाहेर फिरायला जायचे होते ..१५ व्या दिवशी मी बाहेर पडले आणि मला खऱ्या अर्थाने निसर्ग दर्शन घडले . आज पर्यंत मी पाऊस हा फक्त माझ्या खिडकी बाहेर पाहिलं होता , पण आज त्याच पावसाच्या प्रत्येक थेंबाचा गाणं मी ऐकत होते . त्या गाण्यावर ताल धरून नाचणार गवताचं पातं पाहत होते . या पावसात खुदकन हसणारे गोंडस फुल पाहत होते आणि मी स्वतःला विसरून त्या पावसात भिजत होते ..

          आज अचानक ते न विसरता येणारे ४ महिने आठवले .ज्या मध्ये करोना या बकासुराने त्याच्या हातात येणाऱ्या साऱ्या माझ्या बंधुबघिनींना गिळंकृत करायला सुरूवात केली होती. या राक्षसापासून वाचण्या साठी स्वतःला घरबंद करावे लागले होते .. हा सृष्टीने घेतलेला बदला होता तिच्या सर्वात मोठ्या राक्षस मानव याचा ...कारण जबाबदारी पासून पळाले की आपला सर्वनाश निच्छित असतो .. जिवापेक्षा पैसा मोठा झालेला लोकांसाठी जीव कसा महत्त्वाचा आहे ते कॅरोना ने सांगितले .. आपल्या चैनीच्या वस्तूंन पेक्षा आपल्या गरजा खूप कमी आहेत हे कारोना ने पटवून दिले ..

         जसे महाभारत श्री कृष्ण भगवान् नी सांगितले होते की ," ओल्याबरोबर सुके पण जळते", तसचं आजची परिस्थिती आहे. एकीकडे अापल्याला कडे गरिबांना मदत करणे ..चांगला वेळ मार्गी लावणे असे खूप पर्याय असताना आपण ज्या गोष्टीची गरज नाहीये ते करतोय .

करोना आपल्या माणसांना वेळ देण्यासाठी आला ज्यांच्या साठी आपल्या कडे वेळ नव्हता . वेळ अशी गोष्ट आहे की ती हातातून गेली की पुन्हा येत नाही म्हणून कुटुंबासोबत रहा ,घरी रहा, सुरक्षित रहा . कारण तुमची काळजी ही तुमच्या निर्णया वर अवलंबून आहे .


Rate this content
Log in