"गुरुनिष्ठा "
"गुरुनिष्ठा "
स्वामी दयानंद सरस्वती हे फार मोठे तत्त्ववेत्ते होते. त्यांचे खरे नाव मूळशंकर. बालपणी दयानंदजी एका आश्रमात राहून विद्या संपादन करत होते .आश्रमाची शिस्त अतिशय कडक होती. आश्रमातील प्रत्येक गोष्टीवर गुरुजींची कर करडी नजर असे. गोंगाट, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता त्यांना अजिबात आवडत नसे . आश्रमातील सर्व कामे प्रत्येक शिष्यांना वाटून दिलेली होती. कोणी जंगलातून लाकडे आनीत, कोणी फुल-पत्रे आणि कोणी पाक शाळेत जेवण बनवायला जात. दयानंद यांच्याकडे आश्रमातील केर -कचरा काढण्याचे काम होते .ते आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असे.
एके दिवशी दयानंद खूप दमले असल्यामुळे त्यांच्याकडून केर-कचरा काढायचे राहून गेले .परंतु आश्रमात खूपच कचरा होता असे नव्हते. पण त्यांचे नित्याचे काम होते ते राहिले होते. गुरुजी अनवाणी पायांनी आश्रमात फिरत होते. त्यावेळेस त्यांच्या पायाला खडा लागला त्यांनी खाली पाहिले तर थोडासा कचरा त्यांना दिसला. गुरुजी संतप्त होत करड्या आवाजात दयानंला हाक मारली. दयानंद विनम्रतेने हात जोडून गुरुजींसमोर उभे राहिले काहीही न बोलता वेताच्या छडीने दयानंद यांच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. ते हुं- की, चूं न करता मार सहन करत राहिले .त्यांच्या अंगावर वळ उठले. गुरुजीनी छडी फेकली आणि जाऊन खुर्चीवर शांतपणे बसले.
दयानंद गुरुजीजवळ आले आणि त्यांचे पाय चेपत म्हणाले," गुरुजी माझ्या हातून चूक झाली मला तुम्ही शिक्षा केली हे योग्य झाले पुन्हा मी अशी कधी चूक करणार नाही, पण मला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे. तुम्हाला विनंती करायची आहे." "कसली विनंती "? गुरुजीनी विचारले "गुरुजी माझ्याकडून पुन्हा अशी चूक झाली तर मला शिक्षा जर द्या तुम्हाला वाटले तर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या करवी मला शिक्षा करा ,कारण मला शिक्षा करताना तुमचे हात दुखतील एवढीच माझी विनंती आहे."
दयानंदजींचे हे शब्द ऐकून गुरुजींनाही धन्य धन्य वाटले. त्यांनी प्रेमाने त्यांना छातीशी कवटाळले ते म्हणाले दयानंद तू साधारण पुत्र नाहीस .भूमातेचा थोर सुपुत्र आहेस. जगाचा मार्गदर्शक म्हणून इतिहास सदैव तुझा ऋणी राहील.
गुरुजींची वाणी खरच महर्षी दयानंद सरस्वती म्हणून त्यांनी इतिहास घडवला. जगाला कर्मकांडाच्या ,जातीभेद भेदाच्या, रूढी, परंपरेच्या जोखाड्यातून मुक्त करून. निर्गुण-निराकार विशाल परमात्म्याची भक्ती शिकवली. म्हणूनच.
मित्रांनो जो शिष्य गुरु विषयी अपार भक्ती, प्रेम व निष्ठा बाळगतो. गुरु विषयी मनामध्ये कोणतीही
भावना आणत नाही असा शिष्य गुरूच्या कृपेस पात्र ठरतो.
