हेच खरे माहेर आणि खरी लक्ष्मी
हेच खरे माहेर आणि खरी लक्ष्मी
सीमा नावाची एक हुशार मुलगी असते .ती दहावीला असतानाच तिच्या आईचे कॅन्सरने निधन होते. ती आणि तिचे बाबा दोघेच घरी राहत असतात.ती मोठी होते जाते कॉलेजचे शिक्षण पूर्ण करते. बाबांवर तिचे आणि बाबांचे तिच्यावर खूप प्रेम होते. आई गेल्यानंतर प्रत्येक सण अगदी प्रेमाने जिवाभावांने दोघेच साजरा करत असे. प्रत्येक दिवाळी आली की तिच्यावर फार तान येत असे, घरची साफसफाई , फराळ करणं आणि पूजेच्या दिवशी बाबांबरोबर पूजा.
सीमा मोठी झाली. दोहोचे चार हात करावेत असे तिच्या बाबांना वाटू लागले .तसे बाबा तिच्या लग्नाचा विचार करतात .ती बाबांची खूप काळजी करत असे माझ्या नंतर बाबांचं कसं होईल?? परंतु मुलीची जात घरी ठेवता येत नाही ना -- बाबांनी चांगलं स्थळ शोधून लग्न केले. लग्नानंतर तिची पहिलीच दिवाळी असते. दिवाळी जवळ येत असते .तसेच तिला राहवत नाही. यावर्षी बाबा दिवाळी कशी साजरी करतील असे तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सासरी ही तिची सासू आणि तिचे पती दोघेच असत.
एक दिवस आपल्या पतीला ती विचारते की," मी दिवाळीसाठी एक दिवस बाबांकडे जाईन आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत येईन ." बाबा एकटेच आहेत ना -!!".परंतु पती म्हणाले ,"ते आईला विचार माझं काही नाही." इतक्यात सासुबाई त्यांचं बोलणे ऐकत होत्या . त्या आल्या आणि जोराने म्हणाल्या, "काही नाही पहिली दिवाळी ही सासरीच करायची असते, तू घरची लक्ष्मी आहेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची पूजा कोण करणार ? ते काही नाही तू जायचं नाही. " तरीही तिला न राहून बोलली' "आई गेल्यापासून बाबा आणि मी दिवाळी साजरी करतो. पण यावर्षी मीही घरी नसल्याने बाबांना कसं वाटेल?" आणि तिचे डोळे भरून आले.
बाबा एकटे दिवाळी कशी साजरी करतील.प्लीज ना सासुबाई -!! परंतु नाही सासूबाईंनी तिचे थोडेही ऐकले नाही. तिला खूप तळमळ वाटत होती. खूप काही वाटत होतं पण ती सांगू शकत नव्हती . कारण सासर होतं. कोणाला सांगणार? शेवटी मनाच्या गाभाऱ्यामध्ये सर्व घालून ती शांतपणे कामे करू लागली. सगळ्यांची मने जपू लागली .दिवाळीचा पहिला दिवस दुसरा दिवस गेला. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी तिचे पती मार्केटमध्ये जातो असे सांगून संध्याकाळी पाचच्या सुमारास घराबाहेर पडले. रात्री नऊ वाजले तरी येईनात. ती थोडी टेन्शनमध्ये आली, तिने कॉल केला की कुठे आहात? त्यावेळेला पती म्हणाले "ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलो आहे." असं म्हणताच ती दु:खी झाली व म्हणाली " मला सांगितलं ना, तुम्ही कधी येणार आहात? उद्या तर लक्ष्मीपूजन आहे." बोलता बोलता पती म्हणाले ," पाठीमागे बघ .'तर काय गम्मत --- !! पाठीमागे पाहिले तर पती आणि त्याच्या मागेच तिची वडील . तिने पाहताच काहीच कळत नव्हते. आणि काय-- बाबांना पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू --! जाऊन बाबांना मिठी मारली . बाबा ----- आणि हो तो प्रसंग तिच्या पतीच्या डोळ्यात बसला. काय असते मुलीचे आणि वडिलांचे नाते. खरंच काय असते बाबांचे प्रेम .आपण यांची ताटातूट करणे कितपत योग्य होते.नंतर पत्तीचे आभार मानत आपल्या पतीलाही घट्ट मिठी मारली. आणि दोघांचे संभाषण झाले. तुम्ही मला न सांगता हे सगळं का केलंत? मला तेव्हा सांगायचं होतं ना -!! परंतु पती म्हणाले, नाही ,हा सगळा प्लॅन आईचा होता. तू आईला विचार. त्यावेळेला आई बाहेर रांगोळी काढत होत्या. ती गेली आणि सासूबाईंना मिठी मारली .आई --- ,म्हणून आनंदाश्रू वाहून लागले . त्या वेळेला आईला म्हणजे सासूला मारलेले मिठी ही खूप खूप काही सांगून गेली. सासुबाईमध्ये तिची आई दिसली. आणि आईला म्हणाली,आई ,तुम्ही मला अगोदरच का नाही सांगितला हा प्लॅन. तर सासुबाई म्हणाल्या मी अगोदर सांगितलं असतं तर तुला त्याची किंमत कळाली नसती .आणि तू मला अशी मिठी मारली नसतीस. त्यामुळे मी नाही सांगितले. मस्तपैकी सर्वजण आनंदाने जेवुण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. तिचे वडील आणि या घरातील सर्वांनी मिळून खूप आनंदाने लक्ष्मीपूजन साजरे केले. जेवण वगैरे झाले आणि त्यांना खूप बरं वाटलं की आज आपण मुलीच्या घरी सर्व सुखासमाधानाने आहेत.मुलीची सासू नाही तर ती आई आहे . याची जाणीव झाली. सून नसून ती मुलगी आहे आणि आपण तिला आपल्या मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. समाजातील प्रत्येक सासूने जर सासू नसून आईप्रमाणे वागणूक दिली तर आज समाजात होणारे घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होतील.
घरातील स्त्री हीच लक्ष्मी मानून तिला जर सदैव तुम्ही खुश ठेवले, आनंदी ठेवले तर वैभव लक्ष्मी , धनलक्ष्मी अविरत आपल्या घरात वास करत राहील. हीच शिकवण या कथेतून मिळते .
