ट्रेनकथा
ट्रेनकथा
रोहन नावाचा एक गरीब मुलगा होता.त्याची परिस्थिती जेमतेम होती. त्याचे वडील माथाडी कामगार होते .घरात पाच तोंड खाणारी होती.त्यामुळे त्यांचे कसेबसे पोट भरे. रोहन शाळेमध्ये खूप हुशार विद्यार्थी .. परंतु परिस्थितीमुळे त्याला काही कामे करावी लागत असे. छोट्या छोट्या कामांमध्ये तो नेहमी व्यस्त असत. त्याच्याच बाजूला सीमा नावाची त्याची बालमैत्रिण राहत होती. तिही त्याच्याच वर्गामध्ये शिकत होती. दोघे जवळ जवळ त्याच परिसरात राहत असल्यामुळे दोघांची चांगलीच मैत्री होती. परंतु सीमाची परिस्थिती खूप चांगली होती. अभ्यासामध्ये सीमा रोहनची बऱ्याच वेळा मदत घेत असे. रोहन काम करूनही शाळेमधील अभ्यास पूर्ण करत. त्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत असे .असे करता करता त्याची दहावी झाली. दहावीला चांगले गुण मिळाले. बारावी झाली.. दहावीनंतर सीमा आणि तो वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होते. तरीही अधून मधून त्यांची भेट होत असे .रोहनची बारावी झाली बारावीलाही तो चांगल्या मार्काने पास झाला. परंतु त्याला व्यवसाय शिक्षण न घेता तो फौजी मध्ये जाण्याच्या तयारीत होता .तो दररोज धावणे, व्यायाम करणे ,उड्या मारणे या शारीरिक कसरतीची प्रॅक्टिस करत असे. असे करता करता त्याने रात्र कॉलेज मध्ये ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतले. एक दिवस त्याने फौजी भरतीची जाहिरात वाचली. तो भरतीसाठी गेला त्यामध्ये त्याची शारीरिक परीक्षेत निवड झाली. तसेच तो अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या बौद्धिक पातळीवर ही निवड झाली. तो फौजी मध्ये भरती झाला. त्याला ते गाव सोडून ट्रेनिंग साठी सहा महिन्याला पुण्याला जावे लागले. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीरच्या सीमेवर फौजी मध्ये दाखल व्हायचे होते.त्याच्या परिसरातील लोकांनी घरातील लोकांनी त्याला निरोप दिला. तो कामावर रुजू झाला. परंतु अधून मधून त्याला सीमाची आठवण येई.आणि सीमालाही त्याची.. तो बऱ्याच वेळेला सीमाला फोन करत असे.सीमाही त्याच्याशी बोलत असे.
सीमाचे ग्रॅज्युएशन झाले .सीमाला बाहेरची स्थळ पाहण्यासाठी येऊ लागली . तिच्या दोहाचे चार हात करायचे होते. परंतु सीमाचे रोहनवर व रोहनचे सीमावर खूप प्रेम होते .तिला रोहन जोडीदार असावा असे वाटत होते. रोहनचे सहा महिने झाले असतील तो एका महिन्याच्या सुट्टीवर गावी आला . सीमाला खूप खूप आनंद झाला की आपण आता काहीतरी करू लग्न करायचेच.
एक दिवस भेटण्यासाठी ते एका मंदिरात गेले मंदिरात त्या दोघांच्याही खूप गप्पा रंगल्या सीमा म्हणाली," अरे ! लवकर काहीतरी लग्नाचा बघ. नाहीतर घरचे माझे लग्न दुसऱ्यांबरोबर करून टाकतील.मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत .रोहन, तू समजून घे."रोहन म्हणाला ठीक आहे. मी आता सुट्टीतच माझ्या घरच्यांशी बोलतो आणि सुट्टी संपायच्या आधीच आपण काहीतरी करू. "सुट्टीचे दहा-पंधरा दिवस गेले असतील त्या दोघांनी एक दिवस फिरायला जायचा विचार केला. घरच्यांना पटतील अशी कारणे सांगून आपण दोघे बाहेर जाऊया . लोणावळ्याला ट्रेनमधून जायचे ठरले. सीमा ने तिच्या घरी सांगितले की, मी मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसासाठी जाणार आहे.दुसऱ्या दिवशी येेईन.त्यानेही असेच काहीतरी कारण सांगून एक दिवस दोघेही सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडले . ते ट्रेनमध्ये बसले तसा वेळ होत होता.दिवस मावळत होता . तिचे एकच होते आपण पळून जाऊन लग्न करूया .नाहीतर माझं लग्न माझ्या घरचे दुसऱ्यांशी लावून देतील. ती सतत लगणाबध्दलच बोलत होती.रोहन तिची समजूत काढत होता.अशाच प्रेमाच्या गप्पा रंगात आल्या ,रोहन मोबाईल पाहता- पाहता गप्पा मारत होता. इतक्यात त्याला त्याच्या कामावरचा(नोकरीचा) मेसेज आला, की पुढील दोन दिवसात कामावर हजर राहावे. कारण पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या सीमेवर वेढा दिला आहे.त्यामुळे बरेच सैनिक तिकडे सीमेवर पाठवायचे आहे. सांगितल्याप्रमाणे सर्वांनी वेळेत हजर राहावे.परिस्थिती खूप हलाक्याची आहे. कधी काय होईल सांगू शकत नाही.त्यामुळे सुट्टीवर गेलेल्या सर्वांच्या रजा कॅन्सल करून कामावर हजर राहावे.असा निरोप पाहताच रोहनला एकदम कसेतरी झाले. आत्ता सीमाला कसे समजावयाचे? ती इतकी लग्नासाठी उत्तवीळ झाली आहे. आता काय करायचे?तो मेसेज सीमाला दाखवत म्हणाला, "अरे ..! 'बघ माझी सुट्टी कॅन्सल झाली.आणि मला कामावर येण्याचा मेसेज आला आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केल्या आहेत. मझ्याच नाही तर माझ्याबरोबर येणाऱ्या माझ्या मित्रमच्याही .मला उद्या निघावं लागेल. सीमा सो सॉरी यार... देशसेवा फार महत्त्वाची आहे. पहिले देशाचे रक्षण करणे.. देशावर संकट उभे आहे.मला जावच लागेल.परंतु सीमा कशीच ऐकत नव्हती.सीमाने त्याला घट्ट पकडले.आणि म्हणत होती, "आत्ताच आपण पळून जाऊन लग्न करूया.मी तुझ्याबरोबर तिकडे येईन मग तू कामावर जा ."पण ही वेळ ती नव्हती. रोहन तिला समजावत होता. आणि माझं कर्तव्य मला बजावणं खूप महत्त्वाचा आहे. आज नाहीतर उद्याही आपण लग्न करू शकतो.परंतु आमच्या सारख्या फौजी साठी माझा देश,त्याची सेवा करणे, देशाचे रक्षण करणे हे माझं पहिलं कर्तव्य असेलअसे म्हणतो. सीमा थोडे मला समजून घे.तो तिच्या मिठीतून अलगत बाहेर निघतो. इतक्या तिला वाटते आणि ती त्याचा पाय पकडते. तिला एकच भीती होती.तिचे लग्न दुसऱ्याशी लावून देतील आणि आपण रोहनला गमावू .पण नाही.... रोहन अजिबात ऐकायला तयार नसतो.
थोड्या वेळानं दोघेही थोडे शांत होतात.खर तर आजची रात्र हॉटेलात काढण्याच्या तयारीनेच ते लोणावळ्याला आले होते.परंतु सुट्टी कॅन्सल झाल्याने सगळ्या नियोजनावर पाणी पडले.ते दोघे हॉटेलवर उतरतात जेवण करतात. तेव्हाही रोहन तिला समजत असतो. दुसऱ्याच दिवशी रोहनला जायचे होते.त्यामुळे रोहनने तिला परत फिरण्याविषयी सांगितले मला उदया कमवर जायला निघावे लागेल त्यामुळे आत्ता आपणाला जावेच लागेल असे म्हणून ते दोघे परत फिरले.रात्रीचे अकरा वाजून गेले होते. वेळ तर झाला होता राहण्याच्या हेतूने ते आले होते .त्यामुळे घरूनच ते उशिराने निघाले होते. परंतु रोहनच्या मेसेजने सर्वच नियोजन बारगळले .परत निघताना रोहनला पनवेल जवळ त्याच्या मित्राच्या घरी उतरून त्याच्या घरच्यांनी दिलेले सामान घेऊन जायचे होते. त्यामुळे तो म्हणाला की ,"तू असंच या ट्रेनने पुढे जा. मी नंतरच्या ट्रेनने येतो.," ती तयार होत नव्हती .परंतु तिला पुढे वेळ होईल यापेक्षा तू पुढे जा असे तो तिला जायला सांगत होता . तिचीअवस्था खूप रडवेली झाली .रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये तशी गर्दी नव्हतीच.परंतु सीमाला थोडीसी भीती वाटत होती .तरीही त्याने धीर देऊन तिला पुढे जायला सांगितले.मी मित्राच्या घरी जाणार आहे त्यामुळे मला वेळ होईल .कृपया तु निघ. मी मागून येईनच आणि तू लग्नाच अजिबात टेन्शन घेऊ नकोस
मी नंतर येईन तेव्हा नक्कीच आपण लग्न करू.सुखाने संसार करू .अशी तिची समजूत घालून तिला पाठवून देतो.
ट्रेन निघाली रोहन पनवेलला उतरला. आणि सीमा ट्रेनमधून तसीच निघाली .तिला कुर्ल्याला उतरून परेलला जायचे होते. वाशी जवळ आल्यानंतर ट्रेनमध्ये ती एकटीच असल्यामुळे आणि डोळे लाल झाले होते त्यामुळे तिची झोप लागली .ती थकल्यामुळे, रडल्यामुळे तिला झोप लागली होती. इतक्यात ट्रेनमध्ये दारू पिलेले दोन तरुण चढले. तिला एकटीला पाहून त्यांच्या मनात काय आले देव जाणे .ते एकमेकांशी बोलू लागले काही चाळे करू लागले मात्र ती झोपेतच होती. तिची गाढ झोप लागली होती. त्या दोघांनीही प्लॅनिंग करून विचार करून तिच्यावर अत्याचार करण्याचे वासनाधीन असलेले ,दारू पिलेले होते. एकाने रुमालाने तिचे तोंड दाबले. ती पटकन जागी झाली .आणि तिला बोललेले , "शू ... शू... आज करायचा नाही. जर आवाज केला तर तुला आम्ही ठेवणार नाही". दुसऱ्याने लगेच तिच्या शरीराशी चाळे करायला सुरुवात केली. तिचे कपडे काढू लागले. तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली ती ओरडण्याचा प्रयत्न करी होती पण तिचे तोंडचं बंद केलं होते .दोघांनीही तिला सोडले नाही .आणि तिची अवस्था खूप न पाहण्यासारखी केली.शिवाय स्टेशन जवळ येताच त्यांनी तिचा मोबाईल व गळ्यातील चैन काढून पळकाढला .इतक्यात कुर्ला स्टेशन जवळ आल्यानंतर तिथे महिला पोलीस डब्यामध्ये चढली . तिला विवळण्याचा आवाज ऐकू आला. तीन इकडे तिकडे पाहिले तेवढ्यात सीमावर तिची नजर गेली.तर तिची अवस्था पाहवत नव्हती. तिला तर काहीच सांगताही येत नव्हते. नंतर ती बेशुद्ध झाली.
पटकन महिला पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिच्या घरच्यांना कॉल केला.व घडलेला प्रसंग सांगितला. हळूहळू सीमा शुद्धीवर येऊ लागली. आपण कुठे आहोत हे तिला काही कळतच नव्हते. नंतर तिच्या डोळ्यासमोर प्रसंग आठवला ...इतक्यात तिचे आई, बाबा आले.सीमा आईच्या गळ्यात पडून ओकसाभोक्षी रडू लागली .माझे काय होईल? माझ्याशी लग्न कोण करेल ?समाजात मी कोणत्या तोंडात जगू? हे काय झाले ? त्या नराधमाने माझी काय अवस्था केली? तिच्या मनात खूप विचार येऊ लागले .मला कोणी स्वीकारेल का? बघता बघता घडलेल्या प्रसंगाची न्यूज सगळीकडे पसरली. रोहन त्याच्या जाण्याच्या गडबडीत होता. पण त्याच्या घरच्यांनी जेव्हा ती न्युज पाहिले तेव्हा रोहनला दाखविली,अरे रोहन हे बघ काय झालं?? आपल्या बाजूच्या सीमाची काय अवस्था झाली ?किती हे वाईट लोक आहेत? त्यांना कोणी आया, बहिणी नाहीत काय?
इतक्यात रोहनची अवस्था न पाहण्यासारखी झाली .तो मटकन खाली बसला .डोक्याला हात लावत तसाच थेट तो हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे गेल्यावर त्याला काहीच कळत नव्हते. आपण काय करावे आणि जे घडले ते माझ्यामुळेच घडले. तो स्वतःला दोष देऊ लागतो. पण काय करणार त्यालाही जायचे होते? असे होईल असे त्यालाही माहित नव्हते. एका तासानंतर त्याला ड्युटीवर जायला निघायचे होते.. हॉस्पिटलमध्ये सीमाजवळ गेला तिच्याकडे पाहून त्याला खूप भरून आले. परंतु तिच्या आजूबाजूला तिचे आई-वडील नातेवाईक होते. तो काही बोलू शकत नव्हता. त्यानंतर त्याचे आई-वडील, नातेवाईक यांच्यात प्रसंग कसा झाला काय झाला याची चर्चा होऊ लागली. त्यांच्यासमोर एकच प्रश्न असा होता की ,आता तिचे कसे होणार? या घटनेमुळे समाजात तिचे काय स्थान असणार? तिच्याशी कोणी लग्न करेल ? त्यातच रोहन पुढे सरसावला सीमाचा हात आपल्या हातात घेऊन तिच्या वडिलांना म्हणाला, "काका, मी आज ड्युटीवर जात आहे. दोन महिन्यांनी येऊन मी सीमाशी लग्न करेन तुम्ही काळजी करू नका." आणि काय ...सीमाच्या वडिलांनाही हायसे वाटले... पण त्यांना शक्यता वाटत नव्हती. रोहन असाच बोलत असेल असे त्यांना वाटत होते .परंतु रोहनने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना वचन दिले .सीमालाही खूप भरून आले. सीमा त्याचा हात हातात घेऊन खूप जोर जोराने रडू लागली. रोहन तिला समजावत होता. "मी दोन महिन्यांनी तुझ्याशी लग्न करेन. तू काळजी घे, स्वतःला सावर, जे झालं ते झालं त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस."मी आहे ना... या वाक्याने सीमाला थोडा धीर आला.त्या दिवशीच तिला घरी सोडले.रोहनही आपल्या ड्युटीवर गेला. तिच्याकडे मोबाईल नव्हता.त्यामुळे बरेच दिवस दोघांचे बोलणे झालेच नाही.मात्र दोघांच्याही हृदयात एकमेकांबद्दल स्थान होते. बघता बघता दोन महिने कसे गेले कळालेच नाही. रोहन पुन्हा एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आला. आणि त्याने आपल्या आई-वडिलांना सीमाबद्दलझालेली सर्व हकीकत सांगितली. आज सीमाची जीअवस्था झाली आहे, ती केवळ आणि केवळ माझ्यामुळेच झाली आहे. त्यामुळे मला तिच्याशी लग्न करावेच लागेल. असे सांगून घरच्यांना लग्नासाठी तयार केले.अगदी साध्या पद्धतीने लग्न करून सुखाने संसार करू लागले.मात्र ट्रेन मधील ती घटना आजही रोहन आणि सीमा विसरू शकत नव्हते.
