Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

कथेचं नाव :-खरी सावित्री

कथेचं नाव :-खरी सावित्री

4 mins
395


 एप्रिल-मे २०२१ कोरोनाने तर कहरच केला होता .मी ,माझे पती गिरीश आणि माझ्या दोन मुली. दूरदर्शन वरील कोरोनाच्या बातम्या, सोसायटीतील कोरोना लागण झालेले पेशंट पाहून पायाखालची जमीन सारकायची. बाहेर कुठेही जायची हिंमतच होत नसे. परंतु पोटासाठी काहीतरी वस्तू आणायला तर बाहेर जावंच लागे. मी ,माझ्या मुली कधीही घराबाहेर पडलो नाही .परंतु माझा पती गिरीश याला साहित्य आणण्यासाठी गरज असेल तेव्हा बाहेर पाठवत असे. तरीही आम्ही खूप काळजी घेत असे.

    २५ एप्रिल२०२१ ची रात्र गिरीश ला थोडासा ताप भरला .आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. कोरोना तर नसेल ना ---?राहून राहून हा प्रश्न मनात येऊ लागला परंतु घरामध्ये जी औषधे होती ती दिली. वाफ घेणे काढा करणे हे पण चालूच होते. तरीही त्याचा ताप कमी होईना. थोडीशी सर्दी, अंगदुखी चालू झाले, जेवणाला चव पण लागत नव्हती. आम्ही खूप घाबरून गेलो. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे पाठवले. त्या वेळेची अवस्था अशी होती की कोणी डॉक्टरही त्याला जवळ घ्यायला तयार नव्हते. प्रथम कोरोना टेस्ट करायला सांगत .

माझ्या जीवाची धडधड चालू होती पॉझिटीव्ह आला तर काय करणार--? पण शेवटी नाविलाजाने कोरोना टेस्ट केली आणि तो पॉझिटिव्ह आला .मात्र आम्ही सगळी निगेटिव्ह झालो . कारण त्याला वेगळे ठेवून मुली त्याच्या शिवाय राहत नसे. बाहेरून साहित्य कोण आणून देणार? अनेक प्रश्न समोर उभे होते .आणि तो कसा बरा होईल-? काय होईल -?असे ही वाटत होते. डॉक्टरांनी औषध गोळ्या सर्व दिल्या. डॉक्टरांना सांगितले आम्ही आमच्या घरात डबल बेड फ्लॅट असल्याने आम्ही त्याला घरीच विलंगिकरण करतो. मी खूप काळजी घेत होते. दोन-चार दिवस गेले आणि त्याला श्वासोश्वासाचा त्रास चालू झाला. मी खूपच घाबरले काय करायचं सुचेना मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांनी सांगितलं "तुम्ही ताबडतोब त्याला घेऊन या." त्याला दुसऱ्या रिक्षात मी दुसऱ्या रिक्षात बसून आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो .डॉक्टरांनी सांगितलं की" त्याची H.R सिटी करायला लागेल". ती केली फुफुसाची ती टेस्ट ७ लेवल वर आली. डॉक्टर म्हणाले काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांनी त्याला ऍडमिट होण्यास सांगितले. त्याला ऍडमिट केले. ऑक्सिजन लावला मी घरी आले माझी काळजी घेत होते. मुली घरी दोघीच होत्या .एक - दोन दिवस गेलेअन् गिरीशने मला स्वतःहून व्हिडीओ कॉलिंग केला. "थोडासा ठीक आहे ".असे म्हणाला मुलींशी बोलला. आम्हालाही खूप आनंद झाला . बरं झालं लवकर घरी येईल कोरोनातून मुक्त होईलअसे वाटले. एकच दिवस गेला आणि सकाळी सकाळी डॉक्टरांचा कॉल आला मॅडम," तुम्ही लवकर दवाखान्यात या, गिरीशची तब्येत बिघडली आहे, त्यांना आयसीयूमध्ये हलवावें लागेल . त्यांची स्थिती खूप डेंजर आहे. "मी पुरती घाबरली मुलींना घरात असच टाकलं निघताना छोटी एक वर्षाची मुलगी खूप रडू लागली माझ्या पाठी लागली. परंतु मी नाविलाजाने बाहेरून कुलूप लावलं आणि हॉस्पिटलमध्ये गेले. गिरीश ला आयसीयूरूम मध्ये डॉक्टरांनी हलवलं होतं. त्यांची कंडीशन खूपच हलालक्याची झाली होती .डॉक्टरांनी मला काही इंजेक्शन आणायला सांगितली. इंजेक्शन म्हणताच बातम्यांमध्ये पाहिलेले सर्व प्रसंग ,चित्रे माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. सर्व मेडिकल्स शोधले परंतु मला ते कुठेच मिळाले नाहीत. शेवटी एका ठिकाणी इंजेक्शन मिळाले प्लाजमाचीही व्यवस्था केली . पहिल्याच वेळेला मी इतकी जबाबदारीचं काम केलं असेल आणि हे करता करता मला दुपारचे तीन वाजले .काही कळलंच नाही मी ही सकाळपासुन काही खाल्लं नव्हतं. मुलींना मी बाहेरून कोंडून आली होते. माझं मुलींकडे लक्षच नव्हत. आणि मी तशीच घरी गेली लॉक काढलं छोटी मुलगी झोपली होती. मोठी मुलगी गेल्या बरोबर " आई बाबा कसे आहेत ग " ? मी म्हणाले" ठीक आहेत . तू काय खाल्लं का ग?" तिला विचारलं .ती म्हणाली, "जे होतं ते खाल्ले." "आई तू पण काय खाल्लं नसेल ना ? तुम्ही जेवणाचं काय केलं ?तू काहीतरी खाऊन घे " मला थोडसं बरं वाटलं मी आवरलं थोडस खावून घेतलं .पण मला सतत गिरीशच डोळ्यासमोर दिसत होता. काय करायचं कळत नव्हतं . वेगवेगळ्या न्यूज ऐकून माझी माझी कंबर हबकली होती. न्यूज मध्ये किती तरी लोक कोरोनाने मृत्युमुखी पावले अशा न्यूज येत होत्या. त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. त्या दिवशी रात्रभर मी इतके दमले होते तरीही मला झोप लागली नाही .काय होईल काही नाही याची चिंता मला सतावत होती. दोन दिवस गेले आणि गिरीश ने स्वतःहून व्हिडीओ कॉलिंग केला .मला खूप आनंद झाला तो मुलींशी बोलला, माझ्याशी बोलला. "मी दोनच दिवसात घरी येईन मला डिस्चार्ज मिळेल " असं म्हणाला. त्यामुळे मला खूप आनंद झाला दोन दिवसांनी मला कॉल केला की "हॉस्पिटलचे बिल घेऊन ये .मला आज डिस्चार्ज देतात." मी येतोय मुलीनाही आनंदाने सांगून टाकले. त्याला आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलचे बिल पे केलं आणि त्याला घेऊन आले. तो जवळ जवळ तो पंचवीस दिवसांनी घरात येणार होता. मुलींनाही फार आनंद झाला. बाबा आले. बाबा आले----

 आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले आणि डोळ्यातून आपोआप अश्रू दाटून आले. त्या दिवशी खरं मला माझ्यातील सावित्रीचे रूप कळाले. कारण मला कधीही बाहेर जाण्याची फिरण्याची बाहेरचे काम, जबाबदारीची सवय नव्हती परंतु कोरोनाने मला बरंच काही शिकवलं. आणि माझ्यातील सावित्री जागी केली. खरोखरच मी जर गंभीरपणे उभा राहिले नसते. आणि प्रयत्न केले नसते, तर आज गिरीश माझ्यासोबत नसता..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational