Sanjay Ronghe

Abstract

3.5  

Sanjay Ronghe

Abstract

गुलाबजाम राणी - भाग 7

गुलाबजाम राणी - भाग 7

5 mins
120


   जसजसे दिवस जात होते राणी बद्दलची मुलांच्या मनात धुसफूस वाढतच होती. राणी आपल्या परीने मुलांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्यात ती असफलच होत होती. आज सकाळचीच गोष्ट बघा. मीतू ला आज शाळेला एक तास अगोदर जायचे होते पण त्याची कल्पना तिने राणीला दिलीच नाही. ती राणीला सांगायला विसरली. मग मात्र वेळेवर तिची खूप घाई झाली. राणीला पूर्व कल्पना नसल्याने ती आपल्या नेहमीच्या गतीने घरातली कामे करत राहिली. मीतूचा टिफिन, युनिफॉर्म प्रेस करणे, शूज पोलिश सगळेच व्हायचे होते. वेळ झाला असल्याने मीतू मग चीड चीड करायला लागली. ती राणीला म्हणाली बघ आई आता मला तुझ्यामुळेच वेळ होत आहे, माझा टिफिन, स्कुल बॅग, युनिफॉर्म, शूज तू काहीच तयार करून ठेवलं नाहीस. टीचर उशीर होण्याचं कारण विचारतील तर मी तुझंच नाव सांगणार. तूच मला तयार केलं नाहीस. आता लेट तर नक्कीच होणार. तू नेहमी अशीच करते. आमच्याकडे लक्षच देत नाहीस. नेहमी आपलीच कामं करत असतेस. आम्हाला मुळीच मदत करत नाही. तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. पप्पा बघा ना आता मला किती वेळ होणार, आज टीचारनी एक्स्ट्रा क्लास साठी एक तास अगोदर बोलवले, पण आईने माझे अजून काहीच करून दिले नाही. मी आता आईमुळेच लेट होणार. सांगा ना तिला काही. ती आमचे काहीच ऐकत नाही.


    मीतूचे बोलणे ऐकून नाईकांच्या मनातही राणी बद्दल थोडा रोष निर्माण झाला. मात्र तिकडे राणीची सारखी धावपळ सुरू होती. तिची ती धावपळ बघून ते शांतच राहिले. राणीने मीतूचा युनिफॉर्म प्रेस केला. तिची स्कुल बॅग रेडी केली. आणि तिला स्कुल साठी तयार करायला लागली. त्यात तिचा टिफिन भरायचा राहिला. तशी ती मितूला म्हणाली . मीतू बेटा तू सावकाश स्कुल मध्ये जा. मी तुझा टिफिन नितु जवळ देते. स्कुल मध्ये तो आणून देईल तुला. जा आता लवकर जा स्कुल मध्ये , तुला वेळ व्हायला नको. पण अगोदरच चिडचिड करणारी मीतू अजूनच चिडली. काही नको मला टिफिन आज मी उपाशीच राहणार. तू टिफिन नितु जवळ पाठवूच नको. तुला बरंच आहे ना मी नाही जेवली तर. राणी नितुच्या बोलण्याने खूप नर्व्हस झाली. तिच्या डोळ्यात आसवे आली . तिने ते हळूच आपल्या पदराने पुसले आणि ती आपल्या कामाला लागली. तिला आता नाईकांची तयारी करायची होती. ती त्या तयारीला लागली. नाईक ऑफिसला निघून गेले मागोमाग नितुही स्कुलला जाय साठी तयार झाला. तिने मीतूचा टिफिन नितु कडे दिला पण नीतूही मीतूचा टिफिन घेऊन जायला तयार नव्हता. तो म्हणाला , आई तू तिला टिफिन नाही दिला ना, मग मी कशाला नेऊ. आता तूच तिला नेऊन दे. मी टिफिन नेणार नाही. राणीने नितुला समजवायचा खूप प्रयत्न केला पण नितु ऐकायलाच तयार नव्हता. आणि तो तसाच स्कुल ला निघून गेला. राणीला मात्र आता रडणे आवरले नाही. तिच्या डोळ्यातून सर सर आसवे गळत होती.


     सगळी कामं तिने भराभर आटोपून घेतली आणि मग मीतूचा टिफिन घेऊन ती स्कुल ला जायला निघाली. वाटेतच तिला सरिता भेटली. सरिता नाईकांची बहीण. ती काही काम निमित्त बाहेर निघाली होती. राणी ला बघून तीच थांबली. तिनेच राणीला आवाज दिला. राणीचे सरीताकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात घाई घाईने स्कुल कडे निघाली होती. सारिताचा आवाज ऐकून राणी थांबली आणि सारिताच्या जवळ पोचली. सारिताने तिला विचारले, काय ग राणी इतक्या घाई घाई ने कुठे निघालीस. घरी सगळे ठीक आहेत ना. कुणाला बरं नाही का. आणि कुठल्या विचारात आहेस तू. राणी फक्त सरिता कडे बघतच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना . तशी सरिता म्हणाली अगं तुलाच विचारतेय. काय झालं , तुला बरं नाही का. तू ठीक आहेस ना. तसे राणीच्या डोळ्यातून आसवं टपटप गळायला लागली. सरिता राणीच्या डोळ्यात आसवं बघून अजूनच घाबरली. अगं काय झालं सांग ना. तशी राणी बोलली ताई अहो आज मीतू टिफिन न घेताच स्कुलला गेली. माझंच वेळेवर झालं नाही चूक झाली माझी. तिला मी टिफिन पोचवून येते. त्यासाठी निघाली होती. तशी सरिता बोलली, ते ठीक आहे ग पण तू रडत का आहेस. दादा काही बोलला का तुला. तू टेन्शन नको घेऊस, मी सांगते दादाला . तो असाच आहे. काही न समजून घेताच काहीही अर्थ लावून घेतो. मी समजवते दादाला. चल मी येऊ का तुझ्या सोबत. मला काही जास्त काम नाही. लवकर होईल माझे काम वेळाने गेले तरी चालेल. चल मी येते तुझ्या सोबत. म्हणून सारिताही तिच्या सोबत स्कुल कडे निघाली.


     दोघीही स्कुल मध्ये पोचल्या. त्या नितुच्या क्लास मध्ये पोचल्या. क्लास सुरू होता. राणीने टिचरला मीतूचा टिफिन आणल्याचे सांगितले. तसे टीचारनी मितूला बोलवून तिला तिचा टिफिन घेण्यास सांगितले. मीतू जवळ येताच राणीने मितूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या हातात टिफिन देत म्हणाली मीतू बेटा , जेवण करून घेशील. छान हं माझं बाळ . जा बस आता क्लास मध्ये. मी निघते. सारितानेही मीतूची पप्पी घेतली . मीतू क्लास मध्ये जाताच दोघीही परत निघाल्या . वाटेतच सारिताने आपले काम आटोपले. राणीने सरीताला घरी चलण्याचा आग्रह केला. मग दोघीही नाईकांच्या घरी आल्या. राणीने सरिता साठी चहा ठेवला. दोघीनीही आपला चहा संपवला. सारिताच्या मनात अजूनही प्रश्न कायम होता. राणी का रडत होती. सारिताने राणीला परत विचारले काय गं मघाशी तू रडत का होतीस. मला काही सांगशील का. तसे राणी परत रडायला लागली. तिने आपल्या मनात होणारी ओढाताण सरिता जवळ व्यक्त केली. मुलांची तिच्यावर होणारी चिडचिड , घरच्या कामात तिची होणारी ओढाताण सांगितली. सारिताने राणीला समजावले. अगं घरात हे चालतच असते. सगळं मॅनेज करावे लागते. हळूहळू जमेल तुला. आता मुलं मोठी होत आहेत. कळेल त्यानाही तू त्यांच्यासाठी किती धावपळ सहन करतेस ते. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे हा नियमच आहे. तसही तू छान सांभाळलं आहेस सगळं. मुलांना आनंद कशात होतो ते शोधायचं. त्यांना आनंदी ठेवायचं. ते खुश असलेत की सगळे खुश असतील. तू टेन्शन नाही घ्यायचं. राणीला काही संसारतल्या टिप्स देऊन सरिता निघून गेली.


      राणीने दुपारचे आपले सगळे काम आटोपले. आज स्कुल मधून मुलांना खुश करायचेच त्यांना आनंदी करायचे असे तिने ठरवले. त्यासाठी काय करावे. राणीला काहीच सुचत नव्हते. तेव्हा राणीला आठवले की नितु मीतू बरेच दिवसापासून राणीला गुलाब जाम करायला सांगत होते. त्यांना गुलाबजाम खूप आवडायचे. तीने पक्के केले आज गुलाबजाम करायचे. राणी ताबडतोब उठून तयार झाली आणि गुलाबजाम साठी खवा घेऊन आली मुलं घरी यायच्या आधीच तिने गुलाबजाम करून ठेवले. सायंकाळी मुलं येताच ती फ्रेश होऊन आपल्या रूम मध्ये गेली. राणीने मुलांसाठी डिश मध्ये गुलाब जाम काढले आणि ती मुलांना बोलवायला त्यांच्या रुम मध्ये गेली. नितु मीतू चला डायनिंग टेबल वर चला आज मी न तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. चला चला. चला पटकन आणि बघा काय आहे ते. मुलं डायनिंग टेबलवर आली. गुलाब जाम बघून तर दोघेही नाचायलाच लागली. तेवढ्यात नाईकही घरी आले. राणीने त्यांच्यासाठी पण डिश तयार केली. नाईक मुलांना खुश बघून स्वतःही खुश झाले होते. सगळ्यांनाच गुलाबजाम खूप आवडले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract